Author : Elizabeth Hessek

Published on Jan 31, 2021 Commentaries 0 Hours ago

कोविडनंतर शहरांनी आरोग्याशी निगडित अशा संकटातून उभे राहण्यासाठी, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

शहरांना बसलेला ‘कोविड सेटबॅक’!

एखाद्या शहराचे महत्त्व हे त्याचे इतर शहरांशी असलेला संपर्क साधानावरून ठरते. सामाजिक बंध, आर्थिक संबंध आणि पायाभूत सुविधांचे जाळे यावरून त्या शहराची व्याप्ती ठरते. २०२०च्या सुरुवातीला कोविड-१९ च्या महामारीमुळे शहरी लोकांच्या प्रवासावर बंधने आली. नागरिकांनीही घरी थांबण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचनेमुळे सार्वजनिक वाहतुकीची साधने ओस पडली. घरातून काम कराण्याच्या सुविधेमुळे तसेच जमावबंदी दुकाने व आस्थापनावर घातलेल्या बंदीमुळे लोकांचा वावर कमी झाला.

लॉकडाऊनची बंधने शिथिल होत गेली, तसतसे शहरी जीवनमान हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. परंतु कोविड – १९ च्या महामारी पूर्वीच्या तुलनेत लोकांची वर्दळ ही फारच कमी होती आणि ती स्थानिक बंधनानुसार इतर शहरांत कमी जास्त होती. मुंबई उपनगरीय लोकल सेवा मार्च २०२० ला बंद केली व जुलै २०२० मध्ये फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी काही अंशी सुरू करण्यात आली. पुढे हळूहळू त्यात शिथीलता येत गेली. फिलाडेल्फियामध्ये ऑक्टोंबर २०१९ मधील रेल्वे प्रवाशांचे प्रमाण कोविड १९ पू्र्वीच्या तुलनेत केवळ १५ टक्के होते. न्यूयॉर्क मध्ये डिसेंबर २०२० मध्ये हेच प्रमाण ३० टक्‍क्‍यांपर्यंत पोहचले.

गर्दीच्या ठिकाणी कोविड-१९ च्या विषाणूची लागण होण्याची भीती व सर्व माध्यमातून गर्दी टाळण्याचे केलेल्या आव्हानांमुळे सार्वजनिक वाहतुकीवरील गर्दी रोडावणे स्वाभाविकच आहे. परंतु सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर व कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण याबाबतचा इशारा कोणत्याही अभ्यासात दिला नाही. जून २०२० फ्रान्समध्ये शून्य कोरोनाबाधित क्षेत्र एकमेकांस पुन्हा सार्वजनिक वाहतुकीने जोडले गेल्याचे संशोधकांनी दाखवून दिले. जपानमधील विषाणूतज्ञाना एकही असा विषाणूबाधित क्लस्टर संपूर्ण रेल्वेमार्ग परिसरात आढळला नाही तसेच ऑस्ट्रिया व तायपेयी मध्ये सुद्धा रूग्णाची संपर्क साखळी शोधली असता, त्याचे धागेदोरे सार्वजनिक वाहतूक सेवेचे ठिकाणी आढळलेच नाही. याचा अर्थ सार्वजनिक वाहतुकीची साधने कोविड – १९ च्या प्रसाराचे हॉटस्पॉट मुळीच नव्हती असा होतो.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत इतर सार्वजनिक ठिकाणापेक्षा जास्त सुरक्षित का आहे? वास्तविक पाहता कोणतीही सार्वजनिक व्यवस्था व ठिकाण हे पूर्णतः सुरक्षित आहे असे नाही. सातत्यपूर्ण व योग्यप्रकारे मास्कचा वापर मुख्यतः सार्वजनिक वाहतूक व इतर ठिकाणी कोरोना प्रसारास आळा घालू शकतो, हे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. सार्वजनिक वाहतूकीचा वापर करताना लोकांचा एकमेकांशी संवादाचा फारसा संबंध येत नाही, त्यामुळे विषाणू प्रसाराचा धोका हा मर्यादित होतो.

लोकांचा कार्यालयात, व्यायामशाळेत किंवा सामाजिक कार्यक्रमात (जास्त कोरोना बाधित असलेली ठिकाणे) जेवढा वेळ एकमेकांशी संवाद साधतात त्याहीपेक्षा क्वचितच सार्वजनिक वाहतूकीतून प्रवास करताना साधत असतात. परिणामी श्वासोच्छावासाद्वारे वातावरणात सोडले जाणारे घटकाचे प्रमाण कमी असते. वातानुकुलित सार्वजनिक वाहतुकीची साधने एक सारखी हवा शुद्ध करून प्रवासी डब्यात सोडत असतात. बोस्टन, न्यूयॉर्क व सॅन फ्रान्सिस्को मधील सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांनमध्ये प्रत्येक साडे पाच मिनिटाला शुद्ध हवा सोडली जाते.

कितीही शास्त्रीय अभ्यास मांडला तरी, साथीच्या रोगाच्या भितीपोटी व लोकांना नवीन पद्धतीच्या प्रवासाची सवय होईपर्यंत सार्वजनिक वाहतुकीवरील ही गर्दी अशीच रोडावलेली राहील. परिणामी लोकांकडून होणारा सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी होऊन फिलाडेल्फियातील सेपटा सारखे प्रकल्प ओस पडण्याची भिती वाहतूक तज्ञांना वाटते.

संपर्कक्षमतेच्या परिणाम सोबत सार्वजनिक वाहतूकीतील गुंतवणुकी अभावी दोन मुख्य प्रश्न उभे राहतील, एक तर पर्यावरणीय स्थिरतेला धक्का लागल्याने हवामानाच्या संकटामुळे शहरांची स्थितीस्थापकतेला धोका निर्माण होऊ शकतो दुसरा म्हणजे साथीच्या रोगांमुळे आधीच वाढलेली सामाजिक विषमतेची दरी आणखी वाढेल.

वाहनाच्या प्रसारामुळे शहरातील वाढत्या हवेतील तसेच पाण्यातील प्रदूषणावर आळा घालण्याच्या धोरणाचा भाग म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढविण्यासाठी त्यात गुंतवणूक केली जात आहे परंतु कोविड – १९च्या भितीमुळे खाजगी वाहनांचा वाढलेला वापर, समुद्र पातळीत होणारी वाढ रोखण्याच्या व जागतिक तापमानात होणाऱ्या वाढीस लावण्याच्या प्रयत्नास खीळ बसली आहे.

शहरांत राहणाऱ्यापैकी मोठ्या वर्गाकडे प्रवासासाठी कारसारख्या सुखवस्तूचा पर्याय उपलब्ध नाही. फिलाडेल्फियाच्या अभ्यासाअंती असे निदर्शनास आले आहे ज्या लोकांनी कोविड – १९ च्या काळात सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडला ते अल्प उत्पन्न गटातील होते व बहुतेक श्रमिक वर्गात मोडत होते. मुंबईत सुध्दा असंघटित क्षेत्रातील बहुतेक मजुरांना लोकलचा प्रवास नाकारल्याने हाती असलेल्या कामाला मुकावे लागले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कमी झाल्यामुळे त्या व्यवस्थेच्या निर्गुतवणुकीच्या प्रयत्नास शहरातील सुज्ञ लोकांनी रोखले पाहिजे. कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पायाभूत सुविधांपैकी एक असून पर्यावरणीय व सामाजिक संवर्धनाच्या पर्यायास पूरक अशी आहे. 

कोविड १९ च्या माहामारीतून सावरताना शहरांना असुविधेचा अडथळा असता कामा नये. त्यामुळे आता काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील जर आता हात आखडता ठेवला तर त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतील. कारण बंद पडलेल्या प्रणालीला पुन्हा चालू करण्याच्या खर्चापेक्षा तिला चालू ठेवण्याचा खर्च कमी असतो. वाहतूक क्षेत्रातील ही अधोगती वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्या संख्येवर वर्षानुवर्षे परिणाम करीत राहील. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गुंतवणूक ही सर्जनशील व  प्राथमिकता ठरवून केली पाहिजे जेणेकरून पर्यावरणीय समृद्ध व जगण्यास योग्य अशी शहरे या महामारी नंतर सुद्धा लोकांसाठी उपलब्ध असतील.

लोकांची चिंता व स्थानिक लोकांची गरज ओळखून वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. ताईपेई मध्ये उच्च दर्जाची निर्जंतुकीकरणाची सुविधा निर्माण केल्याने तसेच प्रवाशांचे तापमान मोजण्यासाठी शेकडो नवीन तरुण भरती केल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्यांची संख्या महामारीपूर्वी असलेल्या पातळी एवढीच राहीली. अशा प्रकारच्या सुरक्षा उपायांवर केलेल्या खर्चामुळे फिलाडेल्फिया सारख्या शहरातील लोकांमध्ये असलेली असुरक्षिततेची भावना दूर होण्यास मदत होईल व सार्वजनिक वाहतूक साधनांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. 

पॅरिस या शहराने कोविड १९ च्या काळात सामाजिक अंतर राखणे लोकांना शक्य व्हावे म्हणून १७६ किलोमीटर लांबीच्या सायकल मार्गाचे निर्माण कार्य हाती घेतले व तात्पुरता बांधलेला हा सायकल मार्ग आता कायमचा झाला असून त्याने परिसवासियांच्या रोजच्या प्रवासाचा मार्ग सुकर केला आहे. अशा प्रकारच्या पादचारी व सायकल मार्गाच्या पायाभूत सुविधांवर मुंबईसारख्या महानगरांमध्ये खर्च करणे अधिक फायदेशीर ठरेल कारण येथे जगातील सर्वात जास्त सार्वजनिक वाहतूकीचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण आहे परिणामी रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी काही प्रमाणात आळा बसेल. जगभरातील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी आणि शहरातील त्याचे निरंतर महत्त्व अधोरेखित करण्याचा एक उपाय म्हणजे आकारले जाणारे भाडे पूर्णपणे काढून टाकणे हा होय.

कोविड – १९ च्या साथीमुळे शहरांची प्रणाली, अर्थव्यवस्था व समाजाचे एकमेकांशी असलेले संबंध अधोरेखित झाले आहेत. शहरांना आरोग्याशी निगडित अशा संकटातून उभे राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून कोविड – १९ नंतरचा काळ हा चिरकाल व शाश्वत असेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Elizabeth Hessek

Elizabeth Hessek

Elizabeth Hessek is a Program Manager at the Pennsylvania Environmental Council. She holds degrees in City Planning and Historic Preservation from the University of Pennsylvania ...

Read More +