Author : Uday Nitin Patil

Published on Oct 20, 2023 Commentaries 0 Hours ago

अमेरिका आणि चीन यांच्यातील वरिष्ठ स्तरावरील राजनैतिक भेटी विविध मुद्द्यांवर दळणवळणाची माध्यमे पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमेरिका चीन यांच्यातील भेटी सुधारणांच्या दिशेने?

2023 च्या 20 जुलै रोजी युनायटेड स्टेटस (यूएस-चीन) येथील एक अनुभवी मुत्सद्दी वरिष्ठ स्तरावरील व्यक्तींपैकी एक हेन्री किसिंजर यांनी बीजिंगला भेट दिली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यांनी माजी परिराष्ट्र सचिवांच्या भेटीचे नियोजन केले होते. त्या भेटी च्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधोरेखित केले होते की, “चीनी लोक त्यांच्या जुन्या मित्रांना कधीही विसरत नाहीत आणि चीन-अमेरिका संबंध हेन्री किसिंजरच्या नावाने नेहमीच जोडले जातील”. हे वक्तव्य करताना राष्ट्राध्यक्ष जिनपिंग 1971 मध्ये किसिंजर यांनी बजावलेल्या भूमिकेचा संदर्भ देत होते. यावर्षी अमेरिका आणि चीनमधील संबंध सामान्यीकरणाची नव्याने सुरुवात झाली होती. अखेरीस अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि चीनचे झोऊ एनलाई यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा घडून आली होती. या ऐतिहासिक घटनेकडे चीनमध्ये आजही आदराने पाहिले जाते.

या वर्षाच्या सुरुवातीला जुलै महिन्यात अमेरिकेचे हवामान विषयक विशेष दूत जॉन केरी यांनी चीनला भेट दिली होती.  16 ते 19 जुलै या कालावधीत केरी यांनी बीजिंगमध्ये अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. चीनचा विरोध असतानाही त्याला न जुमानता 2 ऑगस्ट 2022 रोजी युएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी तैवानुला भेट दिली होती. त्यामुळे युएस चीन यांच्यातील हवामान विषयक चर्चा जवळपास एक वर्षासाठी स्थगित करण्यात आली होती. तैवानला चीन आपल्या भूभागाचा एक भाग मानतो आणि त्यावर सार्वभौमत्वाचा दावा करत आला आहे.

यूएसमधील ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांनी सहा ते नऊ जुलै 2023 या कालावधीत बीजिंग मध्ये भेट दिली होती. सेक्रेटरी जेनेट एल. येलेन यांनी अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये ताणल्या गेलेल्या आर्थिक संबंधांमध्ये समतोल साधण्यात काही प्रमाणात प्रगती केली होती. त्यांचा हा दौरा संबंध सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाची पायरी मानला गेला असला तरी त्यामध्ये मोठे यश मिळालेले नाही.

चीनचा विरोध असतानाही त्याला न जुमानता 2 ऑगस्ट 2022 रोजी युएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी तैवानुला भेट दिली होती. त्यामुळे युएस चीन यांच्यातील हवामान विषयक चर्चा जवळपास एक वर्षासाठी स्थगित करण्यात आली होती.

येलेन यांच्या आधी, परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी या वर्षी 18 आणि 19 जून रोजी चीनचा दौरा केला होता. 2018 नंतर अशा स्वरूपाचा दौरा करणारे ते पहिले राज्यसचिव होते. ब्लिंकेन यांची भेट म्हणजे एक प्रकारे साक्ष देत होती की द्विपक्षीय संबंध आधी कधीही कमी न झाले असल्याने हे संबंध पुन्हा जोमदार करण्यासाठी त्यांना स्थिरता प्रदान करण्यासाठी हा प्रयत्न आवश्यक होता. दोन दिवसांच्या भेटीदरम्यान ब्लिंकेन यांनी चीनच्या सर्वोच्च दर्जाच्या परराष्ट्र धोरण अधिकाऱ्यांची देखील चर्चा केली. त्याबरोबरच ही भेट संपण्यापूर्वी त्यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटण्याची संधी देखील मिळाली होती.

चीन सोबत संवाद वाढवण्याचा प्रयत्न म्हणून CIA संचालक विल्यम बर्न्स यांनी मे 2023 मध्ये बीजिंगला भेट दिली होती. त्यांनी चीनमधील समकक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्याबरोबरच गुप्तचर माध्यमांमध्ये पारदर्शक संवाद टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर गंभीरपणे टिप्पणी देखील केली होती.

द्विपक्षीय संबंध कधीही कमी झाल्यानंतर संबंधांना पुन्हा बळकटी देण्यासाठी आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, याची साक्ष ब्लिंकन यांची भेट होती.

चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान झालेल्या प्रत्येक भेटीकडे बारकाईने पाहिल्यास त्यामागील हेतू आणि परिणामांचा उलगडा करणे अत्यावश्यक ठरते. कारण या सर्व हाय प्रोफाईल भेटी केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत झाल्या आहेत. या बैठकांचे परिणाम यामुळेच वैयक्तिकरित्या लक्षात घेणे देखील या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

अमेरिकेचे कोषागार सचिव जेनेट एल. येलेन आणि वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांना चीनमध्ये भेटी देण्यास उद्युक्त करण्यात आले होते. कारण चिनी अधिकारी यु एस चीन संबंधांमध्ये वाणिज्य च्या दृष्टिकोनातून प्राधान्य देण्यासाठी उत्सुक होते.

तथापि अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी आग्रह धरला की परराष्ट्र सचिव अँटनी जे ब्लिंकन यांची भेट वरील अधिकाऱ्यांच्या आधी असावी. ब्लिंकेन यांच्या भेटीमुळे उच्चस्तरीय द्विपक्षीय गिरीमुत्सद्देगिरीतून तैवान बाबतच्या चीनच्या भूमिकेमुळे त्याबरोबरच वाढत्या लष्करी आणि आर्थिक स्पर्धेमुळे दोन्ही देशांमधील संवादाची अनिश्चित स्थिती देखील अधोरेखित झाली आहे.

ब्लिंकेन यांच्या भेटीने बायडेन प्रशासनाला भेडसावणाऱ्या प्रश्नावर प्रकाश टाकून युक्तीवादासाठी काही प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. एकीकडे बायडेन प्रशासन वॉशिंग्टन मध्ये चीन विरुद्ध कठोर शक्तीचे डावपेच अधिक तीव्र करत आहे आणि दुसरीकडे त्याचवेळी जबाबदार म्हणून स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा देखील व्यक्त करत आहे. हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानावर सहकार्य करण्याची त्याबरोबरच सामर्थ्यांच्या प्रति स्पर्धांच्या परिणामापासून अमेरिकन व्यवसायांचे संरक्षण करण्याची इच्छा देखील ते व्यक्त करत आहेत. या सर्व घडामोडींवर या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे की प्रशासन या उद्दिष्टांमध्ये प्रभावीपणे समतोल साधू शकेल की नाही हे अनिश्चित आहे. कारण चीनचा या दृष्टीकोनावर विश्वास नाही दुसरीकडे प्रस्तावित रणनीतीवर ते विश्वास ठेवत नाहीत.

प्रशासन वॉशिंग्टनमध्ये चीनविरोधात कठोर शक्तीची रणनीती वाढवत आहे आणि त्याच वेळी जबाबदार स्पर्धेत सहभागी होण्याची, हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांवर सहकार्य करण्याची आणि अमेरिकन व्यवसायांना महान शक्तीच्या स्पर्धेच्या परिणामांपासून संरक्षण करण्याची इच्छा व्यक्त करत आहे.

चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांनी संबंधांच्या मार्गदर्शक तत्त्वावर सल्लामसलत सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे. ब्लिंकेन यांनी “एक चीन” धोरणासाठी वॉशिंग्टनच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला आहे की ते तैवानच्या स्वातंत्र्याला समर्थन देत नाही परंतु तैवानच्या कोणत्याही आक्रमणाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता राखून आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील लष्करी-ते-लष्करी दळणवळणाची पुनर्स्थापना ही एक महत्त्वाची न सुटलेली बाब होती. दोन्ही देशांतील सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांमधील संपर्क स्थगित करण्यात आला होता. ब्लिंकन यांनी त्यांच्या बैठकीदरम्यान अशा चॅनेलच्या आवश्यकतेवर वारंवार जोर देऊनही, या संदर्भात कोणतीही तत्काळ प्रगती साधली गेली नाही.

बीजिंगच्या चार दिवसांच्या भेटीनंतर, विशेष हवामान दूत जॉन केरी यांच्या प्रयत्नांना ठोस परिणाम मिळाले नाहीत. परंतु केरी यांनी हवामान बदल चर्चेतील प्रगती सुलभ करण्याच्या उद्देशावर जोर दिला होता. अपेक्षित प्रगती साधण्यासाठी फोकस क्षेत्र म्हणून शक्तिशाली हरितगृह वायू मिथेन उत्सर्जन मानले गेले होते. 2021 मध्ये चीनने युनायटेड स्टेटस सोबत COP26 च्या बैठकीत मिथेन वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी योजना विकसित करण्याच्या आपल्या इराद्याचा पुनरुच्चार केला होता, परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. COP28 पूर्वी किंवा त्या आधीच्या कालावधीत चीनने मिथेन वायू कमी करण्याचे वचन दिल्यास वॉशिंग्टन मध्ये टीकाकारांना संबोधित करणे केरीसाठी एक महत्त्वपूर्ण यश असेल. महत्त्वपूर्ण फरक असूनही सर्व पक्षांकडून हवामान सहकार्यावर सकारात्मक दृष्टिकोन सूचित करतात. चीनचे पंतप्रधान ली यांनी बहुपक्षीय हवामान प्रशासनासाठी व्यावहारिक संस्थात्मक सहकार्यासाठी मोकळेपणा दर्शविला आणि उपाध्यक्ष हान झेंग यांनी दोन्ही देशांच्या हवामान बदलाला तोंड देण्यासाठी नवीन योगदान देण्याच्या क्षमतेचा उल्लेख केला आहे. या दोन्हींच्या संयुक्त घोषणेमध्ये मान्य केल्याप्रमाणे, याचा अर्थ चीनच्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानामध्ये (NDC) वर्धित कार्य गट आणि संभाव्य नवीन वचनबद्धता राहणार आहे.

COP28 पूर्वी किंवा त्या आधीच्या कालावधीत चीनने मिथेन वायू कमी करण्याचे वचन दिल्यास वॉशिंग्टन मध्ये टीकाकारांना संबोधित करणे केरीसाठी एक महत्त्वपूर्ण यश असेल.

किसिंजर यांची भेट खाजगी स्वरूपाची होती असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले असले तरी. किसिंजर यांनी त्यांच्या या दौऱ्यात चीनचे सर्वोच्च मुत्सद्दी वांग यी आणि संरक्षण मंत्री ली शांगफू यांच्याशी भेटी घेतल्या. “चीन-अमेरिकेच्या स्थिर प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दोन्ही देशांना एकत्र येण्यासाठी योग्य मार्गासाठी चीन अमेरिकेच्या बाजूने चर्चा करण्यास इच्छुक आहे. असे राष्ट्राध्यक्ष शी यांना किसिंजरच्या भेटीबद्दल म्हटले आहे.

या बैठकींमुळे संबंध स्थिर करण्यासाठी काही प्रगती झाली असली तरी अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव लक्षणीय आहे. चीनच्या मागण्यांमध्ये तंत्रज्ञानावरील निर्बंध उठवणे, तैवानला मिळणारा पाठिंबा कमी करणे आणि आशियाई प्रदेशातील यूएस सहयोगी, भागीदारांसोबत सुरक्षा संबंध मजबूत करण्यावर केंद्रीत असलेली एक प्रतिबंधक रणनीती म्हणून समावेश आहे. जर बिडेन प्रशासनाने क्वांटम कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टरशी संबंधित चीनी कंपन्यांमधील अमेरिकन गुंतवणुकीवर नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणू शकतात. या क्षेत्रातील विश्लेषकांचा असा अंदाज आहे की चीनने किसिंजर यांचे ज्या पद्धतीने स्वागत केले त्यावरून असे स्पष्ट होते की, बीजिंग आपल्या संदेशाचा प्रभाव वाढवण्यासाठी त्याबरोबरच वॉशिंग्टनच्या विचारसरणीवर प्रभाव टाकण्यासाठी गैर अधिकृत राजनीतिक माध्यमांचा वापर करत आहे. बीजिंग अधिक संशयास्पद आणि काही प्रमाणात अधून मधून उघडपणे समोर येत असल्याचे पाहून बिडेन प्रशासन निराश झाले असल्याचे पाहून चीनने आपल्या भूमिकेबद्दल अधिक सहानुभूती दर्शविणाऱ्या व्यक्तींची संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

अमेरिकन अधिकार्‍यांच्या मते, ब्लिंकेनची यात्रा आवश्यक होती. कारण जागतिक स्तरावर सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सैन्य असलेल्या दोन आघाडीच्या महासत्तांमधील सातत्यपूर्ण उच्च-स्तरीय मुत्सद्देगिरी टिकवून ठेवणे महत्त्वपूर्ण आहे. उघड संघर्ष टाळण्यासाठी अशी राजनैतिक प्रतिबद्धता राखणे अत्यावश्यक आहे. दोन्ही सरकारे, तसेच त्यांचे सहयोगी आणि इतर राष्ट्रे संबंधांमध्ये तणावाच्या ऐवजी स्थिरतेचा शोध घेत असतात. दोन्ही देशांमधील उच्च स्तरावरील प्रतिनिधींच्या भेटीतून मुत्सद्देगिरी दोन्ही बाजूंना चर्चेदरम्यान खुलेपणाने आणि खाजगीरीत्या त्यांचे दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात.

बायडेन प्रशासनाबद्दल बीजिंग अधिक संशयास्पद आणि कधीकधी उघडपणे निराश होत असल्याने, त्याने आपल्या भूमिकेबद्दल अधिक सहानुभूती दर्शविणार्या व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.

हे स्पष्ट आहे की जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणाव युक्रेन, तैवानमधील संघर्ष आणि व्यापार निर्बंधांसह विविध विषयांवर वाढला आहे. या आणि इतर मुद्द्यांवर संप्रेषण चॅनेल पुन्हा स्थापित करण्याच्या प्रयत्नात, वॉशिंग्टनने अलीकडील उच्च-प्रोफाइल राजनैतिक भेटी घेतल्या आहेत. नुकत्याच झालेल्या भेटी आणि संवादांमुळे हे संबंध कितपत सुरळीत झाले आहेत, हे आगामी काळात कळणारच आहे. दुसरीकडे मात्र असे दिसून येते की, चीन तैवानबद्दलच्या त्याच्या भूमिकेवर दृढ आहे. ज्यामुळे अमेरिकेशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगली जात आहे. दुसरीकडे, प्रचलित तणाव असूनही वॉशिंग्टन पुढे जाण्यासाठी आणि परिस्थितीवर नेव्हिगेट करण्याचा दृढनिश्चय करत आहे. चीनसाठी अर्थव्यवस्था हा एक महत्त्वाचा पैलू आहे, तर लष्करी आणि हवामानासारख्या क्षेत्रात सहकार्यासाठी शांततापूर्ण आणि स्थिर संबंध हे अमेरिकेसाठी महत्त्वपूर्ण प्राधान्य राहिले आहेत.

उदय नितीन पाटील हे मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनच्या भूराजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभागात डॉक्टरेटचे उमेदवार आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.