Published on Dec 03, 2018 Commentaries 0 Hours ago
शहरांचा ‘ट्राफिक जॅम’ सुटणार कसा?

वेगाने वाढणारा स्वयंचलित वाहन उद्योग व उदासीन सरकार यामुळे मुंबईसह भारतातील अनेक शहरांमध्ये ट्राफिक जाम होतोय. त्यातून सुटका कशी करायची?

रस्त्यावरची सार्वजनिक वाहतूक म्हणजे बस आता बेभरवशाची ठरू लागली आहे. यामुळेच लोकांनी वाहतुकीसाठी अन्य पर्यायांची म्हणजे, ऑटो रिक्षा, टॅक्सी किंवा खासगी दुचाकी आणि चारचाकींचा पर्याय निवडला आहे. एकंदरितच मुंबईसह भारतातील अनेक शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मोडकळीस आलेली आहे. वेगाने वाढणारा स्वयंचलित वाहन उद्योग व उदासीन सरकार यामुळे ही दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. एका अहवालानुसार भारतातील मोठ्या शहरातील प्रवासी वाहतूक सेवेतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वाटा ६०-८०% वरून कमी होऊन २५-३०% झाला आहे.

भारतीय शहरांमधील जीवनमान उंचावण्यासाठी ‘ट्राफिक जाम’च्या म्हणजेच वाहतूककोंडीच्या दुष्टचक्रातून तातडीने बाहेर पडण्याची गरज आहे. भारतातील मोठ्या शहरांच्या रक्तवाहिन्या असलेल्या रस्त्यांचा, गर्दीच्या वेळेस वाह्तुंक कोंडीमुळे श्वास गुदमरतो आहे. माध्यमांच्या एका अहवालानुसार, ‘मुंबईतील बेस्ट बसेसचा गर्दीच्या वेळेचा सरासरी वेग गेल्या दशकात १६ किमी/तास ते आता ९ किमी/तास असा जवळपास निम्म्याने कमी झाला आहे.’ ही परिस्थिती गर्दीच्या वेळी नक्कीच अजून गंभीर होत असेल. गेल्या दशकभरात १.७ दशलक्ष प्रवाश्यांनी रोजच्या प्रवासासाठी बसने प्रवास करायचा पर्याय निवडला. त्यांनी किती वेळ वाया घालवला याचा हिशेबच करायला नको.

आपल्याकडील दयनीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वेगाने वाढणारा स्वयंचलित वाहन उद्योग व उदासीन सरकारे यांचा परिणाम म्हणून मोडकळीस आलेली आहे. भारतातील सर्व मोठ्या शहरांतील शहरी जीवनाच्या भविष्यासाठी हे चांगले चिन्ह नाही. ही शहरे एका दुष्टचक्रात अडकली आहेत. वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे प्रदूषण, खासगी वाहनांची वाढत असलेली संख्या याचा परिणाम म्हणजे वाढणारी वाहतूक कोंडी. यामुळे हरित गृह वायूंच्या उत्सर्जनात वाढ होते आणि इतर प्रदूषणकारी वायू देखील हवामान बदलाला सहाय्यकारी ठरतात. रहिवाश्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ह्या समस्येचे गांभीर्य निश्चीतच वाढत जाणारे आहे.

या परिस्थितीचे उत्तर शोधण्यासाठी आधी आपल्याला आताच्या परिस्थितीला जे कारणीभूत आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे. ए.टी.किअर्ने या जागतिक सल्लागार संस्थेचा एक अभ्यास असे दाखवतो की, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येत २०१४-२०१७ या काळात वार्षिक ८-१० टक्के वाढ झाली आहे. याच काळात भारतातील बसेसची संख्या कमी झाली आहे. हे सर्व होत असताना शहरांच्या रक्तवाहिन्या असलेल्या रस्त्यांच्या लांबीत आणि क्षेत्रफळामध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळेच हे रस्ते वाहनांच्या वाढणाऱ्या संख्येला अपुरे पडत आहेत.

वरील आकडेवारी ही या प्रश्नाचे गांभीर्य दर्शविते. आपण जर सामान्य प्रवाशाची मानसिकता समजून घेतली तर या प्रश्नांचे उत्तर शोधणे शक्य आहे. एखादा प्रवासी त्याच्या प्रवासाचे मध्यम कसे निवडतो? प्रत्येक प्रवाशाची प्राथमिकता असते ती म्हणजे आपल्या इच्छित स्थळी कमीतकमी वेळेत पोहोचणे. त्यामुळे प्रवासाचे माध्यम निवडण्याचा सर्वात महत्त्वाचा निकष त्याचा सरासरी वेग हा असतो. प्रवाशाच्या दृष्टीने पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रवासी सेवेची वारंवारता हा होय. असं म्हणतात की, ‘पहिली रेल्वे मिळणे तुम्हाला शक्य नसते आणि दुसरी येण्यासाठी खूप वेळ असतो’. दोन रेल्वे किंवा बस यांच्यामधील वेळ हा प्रवाशांच्या दृष्टीने तो कोणती सेवा वापरणार हे ठरवण्यासाठी म्हणूनच सर्वात महत्वाचा घटक असतो. प्रवासी कोणती सेवा वापरणार? यासाठी दर तासाला असलेली वाहतूक सेवेची वारंवारता हा दुसरा महत्वाचा मुद्दा ठरतो. प्रवासी सेवेची चांगली चांगली वारंवारता हे सुनिश्चित करते की, प्रवाश्याचा वेळ तो वापरत असलेल्या सेवेमुळे वाया जात नाही.

तिसरा मुद्दा म्हणे प्रवासी सेवेचे मूल्य. सेवेचे मूल्य जर प्रवाश्याला परवडणारे नसेल तर तो आरामदायी सोयींकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या स्वस्त सेवेला प्राधान्य देईल. यावरून आपण असे म्हणू शकतो की, काटकसर व आरामदायी सोई हे अनुक्रमे प्रवाश्याच्या सेवा निवडीतील तिसरा व चौथा घटक आहे.

आपण जर सामान्य प्रवाशाची मानसिकता समजून घेतली तर या प्रश्नांचे उत्तर शोधणे शक्य आहे. एखादा प्रवासी त्याच्या प्रवासाचे मध्यम कसे निवडतो? मुंबई उपनगरांमध्ये रेल्वे सेवा लोकप्रिय होण्यामागचे कारण म्हणजे रेल्वे सेवा वरील पहिल्या तीन निकषांची पूर्तता करते. शहरात प्रवास करण्यासाठीचे ते एक वेगवान माध्यम आहे. प्रत्येक मार्गावरील रेल्वेची वारंवारता ही दर तीन ते चार मिनिटे इतकी चांगली आहे. तसेच मुंबईची रेल्वेसेवा जगामध्ये शहरांतर्गत प्रवासात सर्वात स्वस्त वाहतूक सेवा आहे. त्यामुळे भरगच्च गर्दी असूनही पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गाने प्रवास करण्याशिवाय लोकांकडे पर्याय नसतो.

मुंबई महानगरपालिकेची सेवा असलेली “बेस्ट” बसेस मात्र या निकषांवर कमी पडताना दिसते आहे. करण बससेवेचा सरासरी वेग हा गर्दीच्या वेळेस ताशी ९ किमी. इतका कमी झाला आहे. यामुळे प्रवासी झपाट्याने इतर वाहतुकीच्या माध्यमांकडे वळत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार वर सांगितल्याप्रमाणे गेल्या दशकात १.७ दशलक्ष प्रवाश्यांनी इतर वाहतूक पर्यायांची निवड केली. ज्यामुळे इतर प्रवासी वाहतूक माध्यमे जसे: रेल्वे, टॅक्सी, खासगी वाहने यावर खूप मोठ्या प्रमाणावर ताण आला. गेल्या पाच वर्षात मुंबईत चारचाकी वाहनांच्या नोंदणीत एकत्रित वार्षिक विकास दर हा ८.१८ टक्के तर दुचाकींचा ९.४ टक्के इतका वाढलेला आहे. यामुळे गर्दीच्या वेळा सोडून देखील मुंबईच्या रस्त्यांवर कोंडी होत असेल तर आश्चर्य वाटायला नको.

मुंबईची भौगोलिक स्थिती बघता, तिन्ही बाजूंनी अरबी समुद्र असल्यामुळे मुंबईच्या विकासाला मर्यादा आहेत. उत्तरेकडे जरी विकास होत असला,तरी दक्षिण व मध्य मुंबईत वाहतूक कोंडी होतेच, ज्यामुळे रस्त्याने प्रवास करणे हे त्रासदायक ठरते. या समस्येपासून फक्त सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीतजास्त वापरच मुंबईला वाचवू शकतो.

महाराष्ट्र शासनाने मेट्रो रेल्वे बांधण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प वेगाने हाती घेतला आहे. ह्यामध्ये १,२५,२०१ कोटी रुपये मूल्य असलेले १२ प्रकल्प आहेत. ज्यामध्ये २७६ किमी. मेट्रो रेल्वे मार्ग शहरात तयार होतील. या प्रकल्पांची सरासरी किंमत ४५४ कोटी रुपये प्रती किमी. अशी आहे.

मेट्रो रेल्वेचे पूर्ण जाळे तयार होऊन त्याचे प्रत्यक्ष फायदे मिळायला काही दशके लागतील. याकाळात बेस्ट बसेस चा सरासरी वेग वाढवण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. या बससेवेला कार, बाईक्स, काळी-पिवळी टॅक्सी, अतिक्रमणे, विक्रेते आणि याशिवाय सायरन वाजवत जाणारी वाहने यांच्या गराड्यात सोडून दिले आहे. यावर उत्तर म्हणून बेस्टच्या अधिकाऱ्यांनी आकाराने लहान बसेस चे उत्तर शोधले आणि जणूकाही लढायला उतरायच्या आधीच शस्त्रे खाली टाकली.

“मुंबईची भौगोलिक स्थिती बघता, तिन्ही बाजूंनी अरबी समुद्र असल्यामुळे मुंबईच्या विकासाला मर्यादा आहेत.” स्थानिक सरकारांनी शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर बस साठी वेगळे मार्ग ठेवण्याची तातडीने गरज आहे. बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टीम (BRTS) चे प्रयोग जगभरातील अनेक महानगरांमध्ये यशस्वी झाले. मात्र भारतीय महानगरांमधील बेशिस्त रस्त्यांवरील याच्या अंमलबजावणीचा अनुभव हा खिन्न करणारा आहे.

शासन मात्र उत्साहाने भारतातील प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे निर्मितीचे प्रकल्प उभारत आहे. हे प्रकल्प एकतर भुयारी (मेट्रो लाईन ३,मुंबई) किंवा उन्नत आहेत. जर हेच

उन्नत (एलिव्हेटेड) प्रकारचे बांधकाम जर बस वाहतुकीसाठी मिळाले, तर नागरी सोयीसुविधांच्या निर्मितीचा आणि रेल्वे गाड्यांच्या डब्यांचा खर्च कितीतरी कमी होईल. ‘एलिव्हेटेड बस रॅपिड ट्रान्झिट’ हे भारतातील शहरी वाहतूक समस्येवरील रामबाण औषध आहे.

उन्नत मार्गांवर वातानुकुलीत बसेस सहज सरासरी ४० किमी. वेगापेक्षा जास्तवेगाने, दर मिनिटापेक्षा कमी वेळेच्या वारंवारतेने धावू शकतील. ही व्यवस्था दर तासाला सहज १८,००० प्रवासी वाहतूक करू शकेल आणि तरीसुद्धा ही व्यवस्था तुलनेने कमी खर्चिक ठरेल. अंतर्गत अरुंद रस्त्यांवर जिथे एका वेळी एकच बस जाऊ शकते, तिथे एकाच दिशेने असलेला उन्नत बस मार्ग, हा उपाय शहरात सर्वदूर बसचे जाळे पोहचवण्यात यशस्वी होऊ शकतो. ही परिस्थिती सर्वांसाठीच लाभदायक असेल.

म्हणूनच मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीतील ट्राफिक जाम काढायचा असेल, ‘एलिव्हेटेड बस रॅपिड ट्रान्झिट’ हा नवा आणि फायदेशीर उपाय असू शकेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.