Published on Sep 12, 2023 Commentaries 0 Hours ago

उत्तर कोरियाकडून उद्भवलेल्या वाढत्या धोक्यामुळे दक्षिण कोरियाला अमेरिकेकडून वाढीव लष्करी आश्वासन मिळवणे किंवा स्वतःची आण्विक क्षमता वाढवण्यास भाग पडू शकते.

उत्तर कोरियाचे लष्करी प्रदर्शन: सेऊलसाठी धोका

कोरियन द्वीपकल्पातील अर्धा भाग असलेला उत्तर कोरिया, त्याच्या लष्करी ताकदीकरता आणि अण्वस्त्रांसाठी कुप्रसिद्ध आहे. जर २०२२ मधील क्षेपणास्त्र चाचणीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न पुरेसा ठरला नसेल, तर त्यांच्या सैन्याच्या वार्षिक प्रदर्शनामुळे केवळ दक्षिण कोरियालाच नाही तर अमेरिकेलाही धोका निर्माण झाला आहे. ‘डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’ दर वर्षी लष्करी संचलनाद्वारे आपली लष्करी शक्ती प्रदर्शित करते. कोरियन पीपल्स आर्मीच्या अधिकृत ७५ व्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त, अलीकडेच ८ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे हे संचलन पार पडले. उत्तर कोरियाच्या १३ हजार सैनिकांसह प्योंगयांग येथे एका मोठ्या लष्करी संचलनाची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत होते आणि काही महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत याचा सराव सुरू होता. उत्तर कोरियाचे लष्करी प्रदर्शन आणि त्यामुळे दक्षिण कोरियाला निर्माण झालेला धोका, तसेच उत्तर कोरियाच्या भयावह धोक्याचा सामना करण्यासाठी विश्वास आणि प्रतिकार यांतून तयार होणाऱ्या कठोर दृष्टिकोनाची आवश्यकता यांवर हा लेख प्रकाशझोत टाकेल.

प्योंगयांग येथे उत्तर कोरियाच्या १३ हजार सैनिकांसह एका मोठ्या लष्करी संचलनाची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत होते आणि काही महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत तिथे सराव सुरू होता.

लष्करी संचलन समारंभाचा दिवस

लष्करी संचलन समारंभाच्या दिनी, ८ फेब्रुवारी रोजी, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाने अपेक्षित रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर लष्करी संचलन आयोजित केले होते. सैन्य स्थापनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ते देशाच्या नवीनतम शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करतील अशी अपेक्षा होती. हे संचलन म्हणजे उत्तर कोरियाच्या ‘अण्वस्त्र हल्ला क्षमतेचे’ आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रदर्शन होते आणि त्यात उत्तर कोरियाच्या ‘अक्राळविक्राळ’ ह्वासॉन्ग-१७ प्रवर्गातील आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपैकी किमान ११, एकूण १६ लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश करण्यात आला होता- एकाच संचलनामध्ये प्रदर्शित करण्यात आलेली ही आजवरची सर्वाधिक क्षेपणास्त्रे होती. उत्तर कोरियाच्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी या सरकारी माध्यमाने किमान पाच ट्रान्सपोर्टर-इरेक्टर लाँचर्स दाखवले, जे घन-इंधन असलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे वाहून नेण्याकरता मोठ्या क्षेपणास्त्र पात्रांत ती ठेवण्यात आली होती; अर्थात, खरी क्षेपणास्त्रे प्रदर्शनात नव्हती. शिवाय, सेल्फ-प्रोपेल्ड गन, मल्टिपल रॉकेट लाँचर्स आणि रणगाडे यांसारख्या इतर क्षेपणास्त्र प्रकल्पांसह, उत्तरेकडील केएन-२३ कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ज्यांची गेल्या वर्षी अनेक वेळा चाचणी घेण्यात आली होती, तीही संचलनामध्ये प्रदर्शित केली गेली. मात्र, संचलनाच्या छायाचित्रांमध्ये किंवा व्हिडिओमध्ये कोणतीही नवीन पाळत ठेवणारी किंवा लढाऊ ड्रोन्स अथवा व्हासाँग-१५ ही मध्यवर्ती पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे अथवा पाणबुडीवरून मारा करणारी क्षेपणास्त्रे दिसली नाहीत.

२०२२ मध्ये जेव्हा उत्तर कोरियाने ७० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली, तेव्हा तणाव वाढला आणि जगभरात धोक्याची घंटा वाजली. या वर्षी उत्तर कोरियाने अद्याप क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले नसले तरी, तज्ज्ञांच्या मते, २०२३ हे वर्ष अधिक धोकादायक ठरू शकते. असे संकेत मिळत आहेत की, २०२१ मध्ये अधिक प्रगत क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रे विकसित करण्याची किम जोंग उन यांनी जी प्रतिज्ञा घेतली होती, ते वचन पूर्ण करण्यासाठी तो अद्यापही वचनबद्ध आहे. शिवाय, उत्तर कोरियाने सप्टेंबरमध्ये कायदाही पारित केला, ज्याद्वारे देशाच्या सैन्याला त्याच्या नेतृत्वावर आसन्न हल्ल्याचा धोका आढळल्यास अण्वस्त्रांसह प्रथम हल्ला चढवण्याची परवानगी हा कायदा देतो. शिवाय, नवीन वर्षासाठी आपली उद्दिष्टे मांडताना अलीकडील धोरणात्मक भाषणात, किम यांनी अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान या ‘शत्रू शक्तीं’वर तोंडसुख घेतले. सामरिक शस्त्रास्त्रांच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनांसह देशाच्या आण्विक शस्त्रागारात ‘घातक वाढी’वर देखरेख करण्याचे वचनही त्यांनी दिले.

उत्तर कोरियाने सप्टेंबरमध्ये कायदादेखील पारित केला, ज्याद्वारे देशाच्या सैन्याला त्याच्या नेतृत्वावर आसन्न हल्ल्याचा धोका आढळल्यास प्रथम अण्वस्त्रांसह हल्ला करण्याची परवानगी मिळते.

धमकीचा पुनरुच्चार

नवीनतम आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त, अलीकडील लष्करी प्रदर्शन म्हणजे जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेचा सामना करण्यासाठी उत्तर कोरिया पुरेसे सामर्थ्यवान बनवण्याच्या किम यांच्या दुस्साहस उद्दिष्टांचा आणखी एक पुनरुच्चार असल्याचे दिसून आले. शिवाय, हे संचलन म्हणजे अमेरिकेला एक स्पष्ट संदेश होता की, उत्तर कोरियाची आंतरखंडीय क्षेपणास्त्र क्षमता, रखडलेल्या आण्विक चर्चेदरम्यान आणखी विकसित झाली आहे. दरम्यान, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त, उत्तर कोरियाची ‘रणनैतिक आण्विक शस्त्रे मोहीम विभाग’ही पहिल्यांदाच लष्करी संचलनामध्ये सहभागी झाला होता. शत्रूंसाठी असलेली सामरिक अण्वस्त्रे असे त्याचे वर्णन करण्यात आले होते. बहुधा हा उल्लेख दक्षिण कोरिया आणि तिथे तैनात असलेल्या अमेरिकी सैन्याकरता केला जात होता, कारण ही शस्त्रे कमी पल्ल्याची आहेत. नंतर, अण्वस्त्रांच्या पूर्वनिश्चित वापराचा स्तर कमी करण्याच्या त्यांच्या हालचालींवर एक पुनर्तपासणी म्हणून, उत्तर कोरिया सामरिक अण्वस्त्रे आघाडीवर तैनात करू शकतो- याचा अर्थ दक्षिण कोरिया विरुद्ध जास्तीत जास्त फायदा मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये आंतर-कोरियन सीमेजवळ सामरिक अण्वस्त्र मोहीम विभाग एकत्रित केले जाऊ शकतात, तर दुसरीकडे किम जोंग-उन पत्नी आणि मुलीसोबत बसलेले दिसले. कोणत्याही ज्ञात कारणास्तव, किम यांनी कोणत्याही प्रकारचे भाषण देणे टाळले आणि दिसणारी शस्त्रेच बोलत होती. संचलनाच्या माध्यमातून किम यांनी पुन्हा एकदा अमेरिकेविरूद्धच्या ‘अण्वस्त्रांसाठी अण्वस्त्रे’ भूमिकेला दुजोरा दिला.

अंकित पांडासारख्या विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जर उत्तरेकडील आंतरखंडीय क्षेपणास्त्रांमध्ये एकाहून अधिक शस्त्रांस्त्रे असतील तर अमेरिकी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा त्यांना हवेत सुरक्षितपणे रोखू शकणार नाही. त्यांच्या निष्कर्षांमुळे दक्षिण कोरियाची भीती वाढू शकते की, अमेरिकेचा मुख्य भूभाग उत्तर कोरियाच्या आण्विक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांना संवेदनाक्षम असताना दक्षिण कोरियाचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका सर्व आवश्यक खबरदारी घेणार नाही. मात्र, हे अनिश्चित आहे की, उत्तर कोरियाची आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे खरोखरच अमेरिकी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण टाळू शकतात, कारण अमेरिकाही उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र विषयक प्रगतीची बरोबरी राखण्यासाठी त्यांची संरक्षणात्मक प्रणाली सुधारण्याचे काम करत आहे. असे असले तरी, अमेरिकेच्या आधी, दक्षिण कोरिया आहे जो क्षेपणास्त्राच्या धगीचा आणि वक्तव्याचा सामना करत आहे, म्हणून, दक्षिण कोरियाला विश्वासाने विणलेल्या वाढीव विस्तारित प्रतिकारशक्तीची आवश्यकता आहे.

अण्वस्त्रांच्या पूर्वापार वापराचा स्तर कमी करण्याच्या त्यांच्या हालचालींचा पाठपुरावा म्हणून, उत्तर कोरिया सामरिक अण्वस्त्रे आघाडीवर तैनात करू शकतो- याचा अर्थ असा की, दक्षिण कोरियाविरुद्ध जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी, आंतर-कोरियन सीमेजवळ सामरिक अण्वस्त्र मोहीम विभाग एकत्रित केले जाऊ शकतात.

विश्वासाने विणलेले प्रतिबंध

उत्तर कोरियाच्या आण्विक धोक्याच्या चक्रीय स्वरूपाने कोरियन जनतेचा अमेरिकेवरील विश्वास उडाला आहे. ‘गॅलप कोरिया’ने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणानुसार, ७६.६ टक्के कोरियन लोकांनी अण्वस्त्रांच्या विकासाला पाठिंबा दर्शवला असून अमेरिकेच्या विस्तारित प्रतिबंधक वचनबद्धतेबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. विस्तारित प्रतिबंध म्हणजे आक्रमण झाल्यास दक्षिण कोरियाचे रक्षण करण्यासाठी आपली सर्व लष्करी क्षमता वापरण्याच्या अमेरिकेच्या प्रतिज्ञेचा संदर्भ. साशंकता व्यक्त होत असताना, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी अलीकडेच म्हटले आहे की, ‘आम्ही आमची संपूर्ण क्षमता- आण्विक, पारंपरिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता वापरून कोरिया प्रजासत्ताकचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि उत्तर कोरियापासून सुरुवात करीत- आमचे सहयोगी, आमचे भागीदार, आमचे मित्र आणि विस्तारित प्रतिबंधाकरता आमची असलेली वचनबद्धता याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसावी.’

मात्र, सार्वजनिक अविश्वास, आणि सरकारांमधील विश्वासाचा अभाव असताना, विस्तारित प्रतिबंध विषयक आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे आणि विश्वास हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. यासाठी तीन क्षेत्रांमध्ये विश्वास आवश्यक आहे: यात सर्वप्रथम येतो तो, अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात परस्परांविषयी असलेला विश्वास. कोरियाच्या विकासातील अमेरिकेच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे, त्यांच्यातील आंतरराष्ट्रीय संबंध हे वाटाघाटींऐवजी सल्लामसलतीवर अधिक केंद्रित होते. आता कोरिया एक प्रगत राष्ट्र बनले आहे, ज्यामुळे अमेरिकेशी संघर्ष होऊन त्यांच्या भूमिकेत आणि अपेक्षांमध्ये बदल झाला आहे आणि त्यात आण्विक शस्त्रास्त्रे किंवा विस्तारित प्रतिबंध या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे, प्रतिसादात्मक आणि अचूक विस्तारित प्रतिबंधासाठी संबंधित सरकारांमध्ये विश्वास निर्माण होणे महत्त्वाचे आहे. दुसरे असे की, विस्तारित प्रतिबंधावर विश्वास वाढवण्यासाठी दक्षिण कोरियाचे सरकार आणि कोरियन नागरिकांमध्ये विश्वास वाढवणे अत्यावश्यक आहे. त्याच मतदानात, ६१.६ टक्के कोरियन लोकांनी सांगितले की, त्यांना सरकार योजत असलेल्या उपाययोजनांची माहिती नाही. तथापि, स्वतंत्र अण्वस्त्रांची कमतरता, विस्तारित प्रतिबंधाची वैशिष्ट्ये आणि आण्विक शस्त्रास्त्रांचा प्रसार रोखण्यासाठीचा करार या चौकटीत सामील होण्याचा दक्षिण कोरियाचा निर्णय योग्यरित्या संप्रेषित केला जाऊ शकतो, तर जनमत वेगळ्या पद्धतीने तयार केले जाऊ शकते. त्यामुळे, याखेरीज, सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या निर्णयांवर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी माध्यमांचे सहकार्य आवश्यक आहे. तिसरे, आण्विक शस्त्रास्त्रांचा प्रसार रोखण्यासाठीचा करार या नियमावरील विश्वासाबाबत, पाच अण्वस्त्रधारी देशांवर प्रमुख जबाबदाऱ्या आहेत. जर त्यांना जागतिक विश्वास संपादन झाला असता, तर कोरियातील अण्वस्त्रांचा विकास या उंचीवर पोहोचला नसता. जेव्हा उत्तर कोरियाच्या आण्विक समस्येवर तोडगा काढण्याचा विचार येतो, तेव्हा अमेरिकाही निष्क्रिय राहून परस्परविरोधी संदेश पाठवत आहे. त्यामुळे, उत्तर कोरियाचा मुकाबला करण्यासाठी दक्षिण कोरियाला एक तर अण्वस्त्रे विकसित करणे किंवा शीतयुद्धाच्या काळात केली होती, त्याप्रमाणे अण्वस्त्र क्षेपणास्त्रे पुन्हा तैनात करून उत्तर कोरियाविरुद्ध अमेरिकेकडून वाढीव लष्करी आश्वासन मिळवणे भाग पडू शकते.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.