Published on Jun 12, 2020 Commentaries 0 Hours ago

परिवर्तनासाठी हिंसेचा मार्ग कघीही स्वीकारार्ह होऊ शकतो का? हा सनातन प्रश्न आता अमेरिकेत झालेल्या आंदोलनानंतर पुन्हा विचारला जाऊ लागलाय.

अहिेसेच्या मार्गाने आजही जिंकता येईल

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीयाची पोलिसांकडून झालेल्या हत्येनंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. या निदर्शनांदरम्यान सोशल मीडियाच्या अकाउंटवरून मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांचे ‘a riot is the language of the unheard’ (दंगल ही पीडितांची भाषा असते) हे प्रसिध्द वाक्य वारंवार वापरले गेले. याच भाषणात त्यांनी परिवर्तनासाठी ‘अहिंसेचा मार्ग हा सर्वोत्तम आणि प्रभावशाली असल्याचे वक्तव्य केले होते. म्हणूनच अमेरिकेत जर हिंसेचा मार्ग निवडला गेल्या श्वेतवर्णियांच्या मनातली भीती आणखी वाढून, त्यांना अपराधी वाटणे कमी होऊ शकते.

अमेरिकेत अहिंसक निदर्शनांबाबत होणारी चर्चा, जेव्हा नैतिकतेच्या अंगाने होते तेव्हा त्यात थोडी गफलत होत असल्याचे दिसून येते. हा केवळ नैतिक प्रश्न नाही. नैतिकतेसोबतच यासाठी तुम्ही निवडलेला मार्ग देखील महत्वाचा ठरतो. महात्मा गांधी आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेले मार्टिन ल्युथर किंग हे दोघेही राजकारणी होते. कोणाचेही मन परिवर्तन करण्यासाठी उच्च नैतिकतेचा पाया असणे आवश्यक आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. अशावेळी हिंसेचा मार्ग निवडल्यास ती गोष्ट जुलमी सत्तेच्या पथ्यावर पडून, ते करत असलेली दडपशाही कशी योग्य आहे याचे ते समर्थन करू शकतात.

परिवर्तनासाठी हिंसेचा मार्ग कदापि स्वीकारार्ह होऊ शकतो का, याबाबत अमेरिकेत जो वादविवाद सुरू आहे तो तसा जुनाच आहे. भारतातही स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी हेच घडले होते.

राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांनी बरोब्बर शंभर वर्षापूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतला होता. जोपर्यंत भारतीय जनता ब्रिटिशांविरुद्ध थेट आणि निर्णायक भूमिका घेत नाही, तोपर्यंत ते भारतावरचे आपले वर्चस्व सोडणार नाहीत. त्यासाठीची चळवळ त्यांनी उभी केली आणि त्याचे नेतृत्वही केले. अहिंसेच्या मार्ग स्वीकारून अन्यायी ब्रिटिश सत्तेला सहकार न करण्याचा, तसेच अन्यायकारक कायदे न मानण्याचा मार्ग त्यांनी निवडला. हजारो भारतीयांना त्यांचे ध्येय मात्र मान्य होते, परंतु त्यांनी निवडलेला मार्ग आणि कल्पना पसंत नव्हती. त्यापैकी काहींनी तर हिंसेचा मार्ग निवडला होता.

अमेरिकेतील अंहिसापर्व

सततच्या अन्यायाने संतप्त झालेले अमेरिकेन यापूर्वी त्यांनी अहिंसेच्या मार्गाने केलेल्या विविध आंदोलनांचा दाखला देतात. कॉलिन केपर्निकने राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहता गुडघ्यावर बसण्याची अहिंसात्मक पध्दत अवलंबवली होती. अहिंसेची भाषा बोलणारे डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांची अखेर हत्या करण्यात आली? गांधीजीबाबत काय घडले? सत्य आणि व्हिडिओचे धडधडीत पुरावे जवळ असताना ते विचारतात, ‘आम्ही जेव्हा अहिंसक असतो तेव्हा ते आमच्यावर जोरदार हल्ला करतातच, तर अर्थ  काय उरतो?

खरतर, हाच नेमका मुद्दा आहे. जुलमी सत्तेच्या जाचापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मुळी गांधीजींनी अहिंसेचा मार्ग निवडला नव्हता. उलट जुलमी सत्तेने सार्वजनिकरित्या उघडे पाडण्यासाठी अंहिसा हा प्रभावी माध्यम ठरते. कमकूवत लोक अहिंसेचा मार्ग स्वीकारू शकत नाहीत. दबून राहून, घाबरून शरण जाण्यापेक्षा, अहिंसेचा मार्ग हा एकमेव आणि परिणामकारक पर्याय असल्याचे डॉ. किंग मानत होते.

अमेरिकेत आज हेच घडताना दिसते आहे. नागरी हक्काबाबत लढणारे नेते पुढे येऊन याबाबत बोलत आहेत. ‘दंगल, लुटमार आणि जाळपोळ हा मार्ग नव्हे. संघटन, निदर्शने, ठिय्या धरा, उभे रहा, मतदान करा’ असं रिप. जॉन लेविस यांनी त्यांच्या वेबसाइटवर लिहिले आहे.

खरंतर अहिंसावाद्यांची नैतिकता आणि युक्ती हिंसेच्या वापरकर्त्यांना, खासकरून राज्य पुरस्कृत हिंसाचार करणाऱ्यांना बचावात्मक परिस्थितीत आणून ठेवते. या गोष्टीचा वापर केल्यास जुलूमकर्त्याची हिंसा ही अनैतिक ठरवता येऊ शकते मात्र अशा प्रकारच्या नाट्यासाठी प्रेक्षक लागतात हे मात्र सत्य आहे. ज्यांचे मतपरिवर्तन होऊ शकतील अशी मने लागतात. अमेरिका याबाबत नशीबवान आहे. अमेरिकेत आजही अहिंसेच्या मार्गाने अनेकांची मने जिंकल्या जाऊ शकतात, याचे अनेक पुरावे आहेत. ही गोष्ट ओपिनियन पोलमधून स्पष्ट झालेली आहे.

मॉनमॉथ विद्यापीठाने नुकत्तेच एक सर्वेक्षण केले असून, अमेरिकेत पोलिसांकडून कृष्णवर्णीय गुन्हेगारांविरोधात अधिक जुलूम केला जात असल्याचे मत येथील ४९ टक्के श्वेतवर्णीय नागरिकांनी नोंदवले आहे. २०१६ मध्ये करण्यात आलेल्या अशाच एका पाहणीपेक्षा सध्याचे (२५ टक्के) प्रमाण हे दुप्पट आहे. कोणताही वर्ण वगैरेचा भेद न करता पोलीस अधिक बळाचा वापर करतात असे ३९ टक्के श्वेतवर्णियांना वाटते. चार वर्षांपूर्वी श्वेतवर्णियांची ही टक्केवारी ६२ एवढी होती. त्यामध्ये यंदा लक्षणीय घट झालेली आहे.  

जेव्हा पोलीस अधिकारी आंदोलकांच्या शेजारी येऊन गुडघ्यावर बसतात, प्रमुख पोलीस अधिकारी माफी मागतात, इतकेच नव्हे तर राष्ट्राध्यक्षाला तोंड बंद ठेवण्यास बजावतात, त्यावेळी ही कृती प्रतिकात्मक आहे की दांभिक हे तुमच तुम्ही ठरवायचे. मात्र भारतीयांना पक्के ठावूक आहे की यात जिंकण्यास वाव असतो.

अमेरिकेने ही संधी गमावता कामा नये. कारण एकदा का या नाट्यातले प्रेक्षक निघून गेले की, मग परिस्थिती झपाट्याने बिघडते. भारतात सरकारकडून मुस्लिमांना मिळत असलेल्या सापत्न वागणुकीच्या विरोधात यावर्षाच्या सुरूवातीला प्रचंड मोठी, अहिंसात्मक पध्दताची निदर्शने करण्यात आली होती. पण अखेरीस सत्ताधारी पक्षाच्या तथाकथिक नेत्यांकडून लोकांना भडकविण्यात आल्याने दंगल उसळली. अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प नेमके त्याच काळात देशात भेटीवर होते. सरकारकडून मोठ्या शिताफिने आतापर्यंत घडलेल्या सर्व घटनांसाठी याच हिंसेचा वापर करण्यात आला. अशाप्रसंगी पोलिसांमार्फत आंदोलकांवर दाखवलेले क्रौर्य ही सर्वसाधारण घटना ठरते. कोणीही यासाठी जबाबदार ठरवले जात नाही.

आपल्यामध्ये आणि अमेरिकेत असणारा फरक काही आठवड्यांपूर्वी स्पष्ट झाला. भारतात आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, त्यांच्यावर खटला भरा किंवा किमान माफी तरी मागावी, अशी मागणी पश्चातापाने आणि हसत हसत ट्विटरवरून केली जात होती. उलट जनतेचा पाठिंबा लाभलेल्या भारत सरकारने तरुण विद्यार्थ्यांविरोधात उघडपणे कायद्याचा बडगा उगारत फेब्रूवारीत दंगल ‘भडकविण्याच्या’ आरोपाखाली एका कार्यकर्त्याला दहा दिवसात तीन वेळा अटक करण्याची कमाल केली आहे. देशात शांततेने झालेल्या निदर्शनांचा अनेक भारतीयांना सोयीस्कर विसर पडला. निदर्शकांनी एखाद-दोन बसेस जाळल्याच्या घटनेवरच लोक अधिक जोर देत राहिले असल्याचे दिसून आले.

संतप्त अमेरिकन कदाचित ही गोष्ट मान्य करणार नाही. परंतु अमेरिकेत बदल शक्य आहे. तेथे मने बदलली जातात आणि जाऊ शकतात. गांधी आज त्यांच्याच जन्मभूमीत कमकुवत झाल्याची भीती मला वाटते. परंतु अमेरिकेत डॉ. किंग यांचा विसर पडू देऊ नका.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.