Author : Abhishek Sharma

Originally Published Japan Times Published on Feb 27, 2025 Commentaries 0 Hours ago

यून यांच्या जनाधाराला संजीवनी देण्याचे काम या घटकांनी एकत्र येऊन केले आहे.

Men, Media आणि MAGA: दक्षिण कोरियातील फूट वाढण्यास जबाबदार

दक्षिण कोरियात वाढत्या प्रमाणात ध्रुवीकरण होत आहे. त्याचे कारण राजकीय पक्षांमध्ये दीर्घ काळ सुरू असलेले कलह एवढेच नाही, तर पारंपरिक राजकीय क्षेत्राच्या बाहेर असलेल्या काही घटकांमुळेही ही प्रक्रिया होत आहे.

कन्झर्व्हेटिव्ह ऑनलाइन माध्यमांचा उदय, आपली मते ओरडून व्यक्त करणारे तेथील तरुणांचे समूह आणि अमेरिकेतील ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या वचनापासून प्रेरणा घेऊन उभी राहिलेली चळवळ या गोष्टींमुळे अत्यंत परिश्रमपूर्वक मिळवलेला देशाचा लोकशाही समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महाभियोग चालवण्यात आलेल्या अध्यक्ष यून सोक योल यांच्या अयशस्वी ठरलेल्या मार्शल लॉच्या घोषणेनंतर विशी-तिशीतील तरुण मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देऊ लागले. अनेकांनी तर त्यांचे समर्थन करण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली. पारंपरिकरीत्या ‘पीपल पावर पार्टी’चा आधार असलेल्या प्रौढ मतदारांच्या तुलनेत हा बदलच होता. या उलट तरुण मुलींनी यूनविरोधी आणि महाभियोगाच्या बाजूने निदर्शने केली होती. हे लिंगविभाजन देशात आधीपासूनच चालत आले आहे. सध्याच्या निराशाजनक वातावरणात हे विभाजन अधिक टोकदार बनले आहे. निषेध हा या घटनेचा नवा चेहरा बनला आहे.

कन्झर्व्हेटिव्ह नवमाध्यमांनी विशेषतः यूट्यूबर आणि छोट्या वेब आउटलेट्सनी तरुणांच्या नाखुशीचा वापर केला आहे, विशेषतः या माध्यमांचा आशय (काँटेट) रोज पाहणाऱ्या तरुण मुलांच्या नाराजीला चुचकारले आहे.

कन्झर्व्हेटिव्ह नवमाध्यमांनी विशेषतः यूट्यूबर आणि छोट्या वेब आउटलेट्सनी तरुणांच्या नाखुशीचा वापर केला आहे, विशेषतः या माध्यमांचा आशय (काँटेट) रोज पाहणाऱ्या तरुण मुलांच्या नाराजीला चुचकारले आहे. ‘फेक न्यूज’ आणि ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’ पसरण्यासाठी ते एक कारण बनले आहे. काही वेळा तर स्वतः यून यांच्यासह कन्झर्व्हेटिव्ह राजकारण्यांनी त्यास खतपाणी घातले आहे.

एक नवी प्रक्रियाही सुरू आहे : ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’पासून प्रेरणा घेतलेली आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुप्रसिद्ध चाळे संबोधल्या गेलेल्या ‘स्टॉप दि स्टील’सारख्या प्रचारमोहिमेची आदर्श असलेली आणि ‘पर्यायी तथ्या’चे समर्थन करणारी एक चळवळ. यापूर्वी दक्षिण कोरियात निवडणुकीत फेरफार केल्याचे केवळ आरोप केले जात होते. आता या आरोपांनी मूळ धरले आहे. त्या बरोबरच यून समर्थनासाठी होणाऱ्या निदर्शनांनी त्यास मध्यवर्ती स्थान दिले आहे.

‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ चळवळीला जोर आल्याच्या पार्श्वभूमीवर उजव्या विचारसरणीच्या माध्यमांकडून लोकप्रिय केलेल्या पर्यायी तथ्यांमुळे तीव्र झालेल्या ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’चा उन्माद झाला, निदर्शनांमुळे त्यांचा प्रसार झाला. तरुणांमध्ये ते अधिक फैलावले. यामुळे दक्षिण कोरियाच्या लोकशाही संस्थांची हानी करणारी स्फोटक कथने तयार झाली आहेत.

अनेक गोष्टी एकत्र आल्याने पीपल पावर पार्टीतील (पीपीपी) काही सदस्यांनाही धोक्याचा इशारा मिळाला आहे. ‘कॉन्स्पिरसी थिअरी रचणाऱ्या कट्टरवाद्यांबद्दल आणि कट्टर यूट्यूबरबद्दल आम्हाला सहानुभूती नाही किंवा मुद्दामहून त्रास देणाऱ्यांना आम्ही घाबरत नाही. कन्झर्व्हेटिव्हना येथे कोणतेही भविष्य नाही,’ असे वक्तव्य ‘पीपीपी’चे माजी नेते हान डाँग हून यांनी केले आहे. अशा प्रकारचे घटकच पक्षाच्या कन्झर्व्हेटिव्ह पायाचे विभाजन करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. यून यांच्यावरील महाभियोगावेळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

उदाहरणार्थ, यून समर्थकांच्या निदर्शनांची तीव्रता वाढत असताना कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय लोकांनी उत्तर कोरियावर आगपाखड करण्यास सुरुवात केली. उत्तर कोरियानेच राष्ट्रीय निवडणूक आय़ोगाच्या (एनईसी) सुरक्षेचे उल्लंघन केल्यामुळे एप्रिलमध्ये झालेल्या संसदीय मतदानात फेरफार झाला होता आणि त्यामुळेच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधी उदारमतवादी गटाने पीपीपीवर विजय मिळवला होता, असा आरोप त्यांनी केला. मात्र, या प्रकारात चीनचा हात असल्याच्या कॉन्स्पिरसी थिअरीच्या विरोधात उत्तर कोरियाने भूमिका घेतली असली, तरी यून यांच्या समर्थकांनी चीनचाच हात असल्याची चिंता व्यक्त करून या आगीत तेल ओतले होते.

चीनच्या हस्तकांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा वापर केल्याचा दावा ‘स्काय डेली’ यासारख्या यून यांच्या समर्थक ऑनलाइन माध्यमाने केला. या दाव्यामुळे सोलमधील चीनच्या दूतावासासमोर अनेक निदर्शने झाली.

या कथनांचा लाभ स्वतः यून यांना होत आहे. यून यांनी आपल्या कृतींबद्दल माफी मागण्यास नकार दिला असून मार्शल लॉ लागू केल्याचे समर्थन केले आहे आणि अखेरीस ते आपल्या पक्षात पुन्हा लोकप्रिय चेहरा झाले आहेत. हे निवडणुकीतील मतदानातून आणि त्यांच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनांमधून स्पष्ट झाले आहे.

पीपीपीच्या अन्य नेत्यांनाही या उन्मादाचा लाभ मिळत आहे. रोजगार व कामगार मंत्री किम मून सू यांची लोकप्रियता त्यांच्या यून यांच्याविषयीच्या बिनशर्त व अंध पाठिंब्यामुळे वाढली आहे. किम यांची लोकप्रियता पक्षातील त्यांच्या स्थानामध्ये प्रतिबिंबित होत नसली, तरी देश कोणत्या दिशेने जात आहे, हे त्यातून अधोरेखित होत आहे.

सारांग जील प्रिस्बिटेरियन चर्च, कुम्नान मेथॉडिस्ट चर्च व सेव्ह कोरिया हा ख्रिश्चन तत्त्वनिष्ठेवर आधारलेला गट या तिन्ही धार्मिक गटांमधील प्रमुख सदस्य यून यांच्या समर्थकांमध्ये येऊन दाखल झाल्याने अनेक तरुण आणि ऑनलाइन कन्झर्व्हेटिव्ह माध्यमांची व्याप्ती वाढली आहे.

या तीव्र ध्रुवीकरणाचे काही गंभीर परिणाम झाले आहेत. उदाहरणार्थ, यून यांच्यावरील अटक वॉरंटला मंजुरी देणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात निदर्शकांनी प्रवेश मिळवला आणि यून यांच्या समर्थकांनी न्यायाधीशांना धमकावले. जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या.

सारांग जील प्रिस्बिटेरियन चर्च, कुम्नान मेथॉडिस्ट चर्च व सेव्ह कोरिया हा ख्रिश्चन तत्त्वनिष्ठेवर आधारलेला गट या तिन्ही धार्मिक गटांमधील प्रमुख सदस्य यून यांच्या समर्थकांमध्ये येऊन दाखल झाल्याने अनेक तरुण आणि ऑनलाइन कन्झर्व्हेटिव्ह माध्यमांची व्याप्ती वाढली आहे. यून व माजी संरक्षणमंत्री किम योंग ह्यून यांनी घटनात्मक न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान आपल्या कृतीबद्दल अजिबात पश्चाताप व्यक्त केलेला नाही. उलट या निदर्शनांमुळे त्यांचे बळ वाढले असून राजकीय कथनांवरून सुरू असलेले युद्ध पुढेही चालूच राहील, असे संकेत यातून मिळत आहेत.

दक्षिण कोरियाचे राजकीय भविष्य अनिश्चित दिसत आहे. अलीकडील गॅलप कोरिया कल चाचणीत हे विभाजन दृश्य झाले आहे. त्यात पीपीपीला डेमॉक्रॅटिक पार्टीपेक्षा तीन टक्के अधिक मते मिळाली आहेत. एका कल चाचणीत ४७ टक्के सहभागींनी यून यांना पाठिंबा दिला आहे. तरीही महाभियोगाला मिळालेला पाठिंबा खूप मोठा असला, तरी २०१६ मध्ये आणखी एक कन्झर्व्हेटिव्ह अध्यक्ष पार्क ग्युन यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला होता, त्या वेळी त्यांना मिळालेल्या पाठिंब्याच्या तुलनेत यून यांना मिळालेल्या पाठिंब्याचे प्रमाण कमी आहे. असे असले, तरी उजव्या विचारसरणीचे मतदार पीपीपी आणि यून यांच्याभोवती एकत्र आले आहेत, याचे संकेत त्यातून मिळतात.

यून यांच्या कृतींची चौकशी जितकी वेगाने होईल आणि जितक्या वेगाने अधिकाधिक माहिती प्रकाशात येईल, तसतशी त्यांच्या बाजूने निदर्शने वाढण्याची शक्यता आहे; तसेच कन्झर्व्हेटिव्ह माध्यमे अनुकूल घडवण्यासाठी आपले काम करीतच राहतील. अर्थात, यामुळे यून यांचे अध्यक्षपद कायम राहील, याची हमी मिळणार नसली, तरी यामुळे हरवलेला आधार परत मिळवण्यासाठी सत्तेवरील पक्षाला मदत होईल.

राजकीय सामना घटनात्मक न्यायालय आणि जनमताच्या वाढत्या प्रमाणात विभागलेल्या न्यायालयात खेळला जाईल. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे, दक्षिण कोरियामध्ये डावे आणि उजवे यांच्यातील स्पर्धा आता पारंपरिक राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती सार्वजनिक क्षेत्राचा एक भाग बनली आहे. या स्पर्धेत माध्यमे व जनता यांचा सहभागही सक्रिय आहे.


हा लेख ‘दि जपान टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.