-
CENTRES
Progammes & Centres
Location
हवामान बदलाचे परिणाम लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहेत. या सगळ्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम मोठे आहेत.
उष्णतेमुळे आणि हवामान बदलामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे जीवितहानी होते आहे आणि रोगांमध्ये भर पडते आहे. त्याशिवाय अन्न आणि पाण्याची दीर्घकालीन कमतरता, वायू प्रदूषण आणि रोगांचा प्रसार हे देखील हवामान बदलाचेच परिणाम आहेत.
जंगलातल्या आगींचा धूर, वातावरणातील धूळ आणि हवेतले प्रदूषक घटक यामुळे ह्रदयरोग आणि श्वसनाच्या रोगांचं प्रमाण वाढतं आहे. अवकाळी पाऊस आणि पुरामुळे अन्नपाण्यातून संसर्ग होण्याचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यामुळे आरोग्य सेवाही विस्कळीत झाली आहे. या सगळ्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम मोठे आहेत.
डासांमुळे होणार्या रोगांचा प्रसार हा तापमानात झालेल्या बदलांमुळे होत असतो. कारण डासांचे जीवनचक्र, चावण्याचे प्रमाण आणि डासांकडून होणारा संसर्ग हा तापमानातल्या बदलांवरच अवलंबून असतो.
माणसांमध्ये रोगाचा प्रसार करणारे सर्वात प्रमुख वाहक म्हणजे अॅनोफिलीस आणि एडीस हे डास मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू, फिलेरियासिस, रिफ्ट व्हॅली फिव्हर, यलो फिव्हर आणि झिका यांसारख्या अनेक रोगांचा प्रसार करतात.
2050 पर्यंत जगातल्या सुमारे 50 टक्के लोकसंख्येला एडिस डासांचा प्रादुर्भाव असलेल्या वस्तीच्या ठिकाणी राहावं लागेल, असा अंदाज आहे आणि 2080 पर्यंत सुमारे एक अब्ज लोकांना डासांपासून होणा-या आजारांना सामोरे जावे लागणार आहे. आकृती क्र. 1 मध्ये डासांपासून होणारा संसर्ग हा वर्षभर किंवा उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये कसा वाढत जातो याचं चित्र दिसतं. जगातल्या समशीतोष्ण प्रदेशांमध्ये उन्हाळ्याच्या महिन्यांशिवाय हा संसर्ग आणखी वाढला आहे. वाढत्या कार्बन उत्सर्जनासह अॅनोफिलीस डासांचं प्रमाण, त्यांची संख्या आणि घनता देखील वाढण्याची शक्यता आहे. समशीतोष्ण प्रदेशांमध्ये 2070 पर्यंत डेंग्यू आणि मलेरियाचा संसर्ग वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे अतिरिक्त 4.7 अब्ज लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. युरोपधल्या डेंग्यूच्या प्रसाराचा पॅटर्न पाहिला तर याचा संबंध थेट हरित वायू उत्सर्जनाशी आहे असं लक्षात येईल. म्हणूनच या वायूंचं उत्सर्जन कमी करणे आणि डासांचा प्रसार रोखणे हे युरोप आणि इतर समशीतोष्ण प्रदेशांमधला डेंग्यूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक आहे.
आकृती 1. (A) एडिस इजिप्ती आणि (B) एडिस अल्बोपिक्टस आणि (C) एडिस इजिप्ती किंवा एडिस अल्बोपिक्टस यांच्या संसर्गाचे प्रमाण दर्शवते.
1940 आणि 2004 च्या दरम्यान संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराचे कारण मुख्यत: झूनाॅटिक होते. म्हणजेच या रोगांचा प्रसार वन्य प्राण्यांकडून माणसांकडे होत होता.
प्राण्यांनी चावल्यास किंवा कच्च्या आणि कमी शिजलेल्या मांसाच्या सेवनाने किंवा दूषित पाण्याद्वारे आणि अप्रत्यक्षपणे डासांसारख्या वाहकांमुळे असे रोग होऊ शकतात. पाळीव प्राणी किंवा माणसांच्या हस्तक्षेपामुळे आणि अधिवास गमावलेले प्राणी आणि माणूस यांच्या सहवासामुळे असे रोग पसरतात. पर्यावरणातले मोठे बदल हेही अशा रोगांच्या प्रसाराला कारणीभूत ठरतात. हवामान बदलामुळे प्राणी आणि माणूस यांचा संपर्क आणि संघर्ष वाढतो आणि प्राण्यांकडून होणाऱ्या आजारांचेही धोके वाढत जातात. विविध सस्तन प्राण्यांचे गट आणि त्यांच्यामधल्या विषाणूंचं मोठं प्रमाण हे प्राण्यांकडून माणसांकडे जाणाऱ्या रोगांसाठी जबाबदार आहेत.
सस्तन प्राण्यांमध्ये उंदीर, घुशींसारखे (rodents) प्राणी 45 टक्के आहेत आणि वटवाघुळांचं प्रमाण 20 टक्के आहे. उंदीर, घुशी यांसारख्या प्राण्यांमध्ये 60 टक्के विषाणू राहतात आणि वटवाघळांमध्ये विषाणूंचं प्रमाण 30 टक्के आहे. हे प्राणी विषाणूजन्य रोगांचे प्रसारक आहेत आणि माणसांची संख्या मोठी असल्याने त्यांचे लक्ष्य हे माणसंच आहेत. माणसांमध्ये रोगाचा प्रसार करणारे कमीतकमी 10 हजार भिन्न विषाणू आहेत. बहुतेक विषाणू वन्य प्राण्यांच्या शरीरात राहत असतात. जेव्हा प्राण्यांचं स्थलांतर होतं तेव्हा ते या विषाणूंनाही त्यांच्यासोबत आणतात आणि त्यामुळे विषाणूंचा प्रसार आणखी वाढतो.
पुढच्या 50 वर्षांमध्ये, हवामान बदलामुळे सस्तन प्राण्यांच्या प्रजातींमध्ये विषाणूंची देवाणघेवाण होण्याच्या 15 हजार हून अधिक नवीन घटना घडू शकतात. विशेषत: दाट लोकवस्ती असलेले भाग यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. भारत, इंडोनेशिया आणि आफ्रिकन साहेल हे नवीन रोग उद्भवण्याचे हॉटस्पॉट आहेत. (आकृती 2).
आकृती 2 असं दाखवते की 2070 पर्यंत आणि पूर्व-औद्योगिक काळाच्या तुलनेत सरासरी तापमानात 2 अंश से. ची वाढ झाल्यामुळे सस्तन प्राण्यांकडून विषाणूंचा प्रसार वाढतच जाईल. स्रोत: कार्लसन एट अल, https://doi.org/10.1038/s41586-022-04788-w.
तापमान वाढीमुळे हिमनद्यांमध्ये सुप्तावस्थेत असलेले प्राचीन सूक्ष्मजंतूंही बाहेर पडू शकतात. सायबेरियामध्ये 2016 साली झालेल्या अँथ्रॅक्सच्या उद्रेकावरून हे स्पष्टच होते. 15 हजार वर्षांपूर्वीच्या हिमनद्यांमध्ये आणि 30 हजार वर्षे जुन्या सायबेरियन पर्माफ्रॉस्टमध्ये देखील नवीन विषाणू आढळले.हे विषाणू वातावरणात लपलेले असू शकतात पण आता तापमानवाढीमुळे त्यांनाही पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याची संधी मिळाली आहे.
अलीकडेच झालेल्या अभ्यासानुसार, हरित वायूंच्या उत्सर्जनाचा संसर्गजन्य रोगांच्या आजारावर काय परिणाम होतो याची आकडेवारी मांडण्यात आली. यामध्ये हवामान बदलाच्या धोक्यामुळे निम्म्या रोगांचं प्रमाण वाढलं आहे, हे निदर्शनास आलं.
हरित वायूंचं उत्सर्जन कमी केलं नाही तर संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखणं केवळ अशक्य आहे.
हवामानाच्या संकटामुळे लाखो लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. पूर, जंगलातल्या आगी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD), नैराश्य आणि व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलं आहे.
महिला, मुले, गरीब, विशेषत: कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील लोक सर्वात यादृष्टीने सर्वात असुरक्षित आहेत आणि त्यांच्यामध्ये मानसिक आजारांचं प्रमाणही वाढतं आहे.
हवामान बदलाचे इतरांवर काय परिणाम होत आहेत याचं निरीक्षण करून लोक स्वत:वर होणाऱ्या परिणामांचा अंदाज बांधत आहेत. हवामान बदलाचे दीर्घकालीन आर्थिक आणि सामाजिक परिणाम हे संपूर्ण जगातच होणार आहेत. वारंवार आलेला दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पूर यांमुळे पिके नष्ट होतात. यामुळे उत्पन्नाचे नुकसान होते आणि अन्नटंचाई निर्माण होते.
समुद्राची वाढती पातळी, वाळवंटीकरण आणि जंगलतोड यामुळे लोकांचं राहणीमान आणि उपजीविका यावर परिणाम होतो आहे. त्यांना जगण्यासाठी आणि काम शोधण्यासाठीची जमीन आणि जागा नष्ट होते आहे. निसर्गावर अवलंबून असणारी उपजीविका आणि सुरक्षित जागा नष्ट झाल्यामुळे संघर्ष, विस्थापन आणि सक्तीचे स्थलांतर वाढेल आणि याचा गरीबांवरही मोठा परिणाम होईल हे स्पष्टच आहे.
ढासळलेलं मानसिक आरोग्य आणि त्याचा एकूण आरोग्य आणि उत्पादकतेवर होणारा परिणाम यामुळे 2030 पर्यंत वार्षिक 6 ट्रिलियन अमेरिकी डाॅलर एवढी किंमत जगाला मोजावी लागेल, असा अंदाज आहे.
हवामान बदलामुळे बिघडलेले मानसिक आरोग्य मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त खर्चात भर पाडेल आणि म्हणूनच हवामानातील बदल कमी करण्याच्या कृती आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हाच यावरचा उपाय आहे.
असं असलं तरी हवामानविषयक कृती आणि धोरणे त्यांच्या मानसिक आरोग्यावरील परिणामांबाबत अनेकदा संवेदनशील नसल्यामुळे त्यावर उपाय काढण्यात अडथळे येत आहेत. याच कारणामुळे त्यावर उपाय काढण्यासाठी एक सक्षम फ्रेमवर्कही तयार झालेलं नाही.
2030 ते 2050 दरम्यान की हवामान बदलामुळे अतिसार, उष्णतेचा ताण, मलेरिया आणि कुपोषणामुळे दरवर्षी 2 लाख 50 हजार अतिरिक्त मृत्यू होतील, असा जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अंदाज आहे.2030 पर्यंत हवामान बदलामुळे आरोग्यावर होणारा नजीकचा थेट खर्च दरवर्षी 2 ते 4 अब्ज अमेरिकी डाॅलरपर्यंत पोहोचेल, असाही अंदाज आहे. या दराने, हवामान बदलामुळे पुढील 10 वर्षांत 100 दशलक्षाहून अधिक लोक दारिद्र्याच्या खाईत ढकलले जाण्याचा धोका आहे.
हवामान बदलामुळे येणारं आरोग्याचं संकट टाळायचं असेल तर कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे आणि अल्पकालीन आणि दीर्घकालीन शाश्वत पावले उचलणे गरजेचे आहे.
यामध्ये आरोग्य यंत्रणा मजबूत करणे, रोगांवर संशोधन करणे, रोगनिदानाच्या पद्धतींचा अभ्यास करणे आणि प्राण्यांकडून माणसांना होणाऱ्या रोगांबाबत वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा रोगजनक विषाणूंवर पाळत ठेवणेही आवश्यक आहे. औषधांसाठी (विशेषतः नवीन प्रतिजैविके) आणि नवीन लसींसाठी संशोधन आणि विकास, ही उत्पादनं बाजारपेठेत आणणे हेदेखील आपण केले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, श्रीमंत आणि गरीब देशांमधील आरोग्यसेवांची दरी कमी करणारी स्वस्त आरोग्यसेवा मिळणे प्रत्येकाच्या हिताचे आहे.
जगाच्या कोणत्याही भागात उद्भवणारा एक नवीन रोग त्वरीत मोठ्या आर्थिक क्षेत्रांमध्ये आणि दाट लोकसंख्या असलेल्य़ा प्रदेशांमध्ये पसरू शकतो आणि माणसांचे जीवन खंडित करू शकतो हे कोविडने दाखवून दिले आहे. म्हणूनच हवामान बदल आणि संसर्गजन्य रोग याबद्दल अखिल जगानेच जागरुक होण्याची गरज आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr. Shahid Jameel established and for 25 years led the Virology Group at the International Centre for Genetic Engineering and Biotechnology New Delhi. He was ...
Read More +