Originally Published डिसेंबर 26 2022 Published on Jul 19, 2023 Commentaries 0 Hours ago

क्वाड तंत्रज्ञानविषयक भागिदारी, क्वाड संघटनेच्या प्रत्येक सदस्य देशांच्या व्यापक धोरणात्मक आणि आर्थिक उद्दिष्टपुर्तींकरता किती पूरक ठरेल, त्यावर या भागिदारीचं यश अवलंबून असणार आहे.

विश्वासार्हतेचा प्रश्न : क्वाड तंत्रज्ञानविषयक भागिदारीबद्दल भारताचा दृष्टीकोन काय?

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या अर्थात क्वाड संघटनेच्या प्रमुख नेत्यांची मार्च २०२१मध्ये शिखर परिषद झाली होती. या परिषदेत क्वाड अत्यावश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान कार्यकारी गटाची (क्वाड क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी वर्किंग ग्रुप – Quad Critical and Emerging Technology Working Group) स्थापना करण्यात आली होती. या कार्यकारी गटाला आता दोन वर्षे पूर्ण होत आली आहे. या कार्यकारी गटाअंतर्गत व्यापक कामे ठरवली गेली आहेत. पुरवठादारांमधील वैविध्यीकरण, तंत्रज्ञानविषयक मानके, देखरेखविषयीचे कल, रचनाआरेखन (design), विकास आणि वापरविषयक तत्वांचा या कामांमध्ये समावेश आहे. याशिवाय कृत्रीम बुद्धीमत्ता (AI), ५ जी तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान (biotech), अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर्स – semiconductors), पुरवठा साखळी असे इतर उपगटही या कार्यकारी गटाच्या अंतर्गतच काम करत आहेत.

प्रत्येक उपगटाची दर महिन्याला बैठक होते, त्याशिवाय क्वाड टेक ग्रुप अर्थात क्वाड तंत्रज्ञानविषयक गटाच्या नियमित बैठका होत असतात. काही उपगटांमध्ये इतर गटांच्या तुलनेत जास्त क्रियाप्रक्रिया होत असल्याचे दिसते. यात जपानच्या नेतृत्वाखाली काम करत असलेला ५जी तंत्रज्ञानविषयक गट विशेष उल्लेखनीय असल्याचे म्हणता येईल. याच गटाअंतर्गत ५जी पुरवठादारा आणि मुक्त रेडिओ तरंगांमधे [Open RAN(Radio Access Network)] वैविध्यपूर्णता घडवून आणण्यासंदर्भातल्या सहकार्य कराराची घोषणा करण्यात आली आहे.यासोबतच क्वाड देशांनी क्वाड सायबर सुरक्षा भागीदारी, क्वाड अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर्स – semiconductors) पुरवठा साखळी उपक्रम आणि तंत्रज्ञानविषयक मानकांसंबंधी आंतरराष्ट्रीय मानक सहकार्य जाळे उभारण्यासारखी कामेही हाती घेतली आहेत.

जपानच्या नेतृत्वाखाली काम करत असलेला ५जी तंत्रज्ञानविषयक गट विशेष उल्लेखनीय असल्याचे म्हणता येईल. याच गटाअंतर्गत ५जी पुरवठादारा आणि मुक्त रेडिओ तरंगांमधे [Open RAN (Radio Access Network)] वैविध्यपूर्णता घडवून आणण्यासंदर्भातल्या सहकार्य कराराची घोषणा करण्यात आली आहे.

अर्थात इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहीजे ती म्हणजे, चीनचा प्रतिकार करणे हे क्वाड ची ही कल्पन प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यामागचे एक न टाळता येणारे कारण आहे. पण तरीदेखील, क्वाड टेक ग्रुप अर्थात क्वाड तंत्रज्ञानविषयक गटाची स्थापना ही क्वाडच्या प्रत्येक सदस्य देशांच्या व्यापक धोरणात्मक आणि आर्थिक उद्दीष्टांच्या पुर्ततेच्या वाटचालीला पूरक आहे असे म्हणता येईल. त्यामुळेच घोषणांच्या या भाऊगर्दीत क्वाड समुहाची ही कल्पना भारताच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानविषयक दृष्टीकोनात / विचारात कशी आणि कुठे बसते याचं विवेचन आणि मूल्यांकन करावं लागेल आणि त्यासाठी काही पावलं मागे वळूनही पाहावं लागेल.

अ. भारत प्रशांत क्षेत्रातल्या विश्वासपात्र भागिदरांसोबतच आर्थिक भागीदारी

भारतासाठी क्वाड म्हणजे काही अखेरचा पर्याय वा आशास्थान नक्कीच नाही. पण त्याचवेळी भारतासाठी क्वाड म्हणजे आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेसह (आसियान)  भारत प्रशांत क्षेत्रातल्या व्यापक व्यापार आणि तंत्रज्ञानविषयक आदान प्रदानासाठीची ओळख मिळवून देणारं / मोठी सुरूवात करून देणारं व्यासपीठ आहे. मुख्यत्वेकरून तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तनाचा विचार करता क्वाड हा समूह भारतासाठी भारत प्रशांत क्षेत्रातील मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक तंत्रज्ञाना ओघ कायम ठेवणारा आणि इथल्या राजवटींना पाठबळ देणारा आधारस्तंभ म्हणून मोलाची भूमिका बजावू शकणारी संघटना आहे. पंतप्रधान मोदी यांच्याच शब्दांत सांगायचे तर, “क्वाड भारत प्रशांत क्षेत्रासाठी एक विधायक अजेंडा / कार्यक्रमपत्रीका राबवत असलेली संघटना आहे. यातूनच ‘फोर्स फॉर गुड’ अर्थात चांगल्याचे कारक अशी क्वाडची प्रतिमा अधिकच दृढ होत जाणार आहे. खरे तर या घडामोडी बाब भारत आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परस्परांमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या अगदी उलट आहेत. खरे तर भारत शांघाय सहकार्य संघटनेसोबत अगदी गरजेपोटी संबंध राखून आहे, यातून भारताने एकाकी पडत चाललेली रशिया आणि युद्धज्वराने ग्रासलेल्या चीनसोबतच्या संवादाचा एक मार्ग खुला ठेवण्याचाच प्रयत्न केला आहे. इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी की भारताने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह उपक्रमात सहभागी व्हायला कायमच नकार दिला आहे. आणि त्याऐवजी “परस्पर विश्वास” राखण्याचे आणि “विश्वासार्ह, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळ्यांची” गरज मान्य करून पुढे वाटचाल करण्याचे आवाहनच भारताने सातत्याने केले आहे.

मुख्यत्वेकरून तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तनाचा विचार करता क्वाड हा समूह भारतासाठी भारत प्रशांत क्षेत्रातील मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक तंत्रज्ञाना ओघ कायम ठेवणारा आणि इथल्या राजवटींना पाठबळ देणारा आधारस्तंभ म्हणून मोलाची भूमिका बजावू शकणारी संघटना आहे.

ब. भारताच्या हिताचे प्रतिबिंब असलेली तंत्रज्ञानविषयक मानके

तंत्रज्ञानविषयक मानक संस्थांमध्ये सहभागी होणं आणि सक्रिय राहण्याचं महत्व भारत जाणून आहे. त्यामुळेच तर ५जी सुकाणू समितीनं २०१८ला जाहीर केलेल्या अहवालात अशी शिफारस करण्यात आली होती की, “सरकारने… जागतिक मानकांममधला आपला सहभाग (प्रोफाइल) वाढवला पाहीजे”. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि मंत्रालयाच्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक समितीनंही भारतानं इलेक्ट्रिकल  आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियंते संस्था (IEEE – Institute of Electrical and Electronics Engineers) आणि आंतरराष्ट्रीय मानके संस्थेसोबतची (ISO – International Organization for Standardization) भारताची देवाणघेवाण वाढायला हवी यावर आपल्या अहवालांमधून सातत्याने भर दिला आहे. भारत क्वाड अत्यावश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान कार्यकारी गटाच्या माध्यमातून कार्यरत राहण्यासाठी प्रतिबद्ध आहे, यामुळे भारताची आपल्या हिताच्या गोष्टी पूर्णत्वाला नेण्याची ताकद आपोआप वाढते आहे. इतकंच नाही तर भारत क्वाड ससस्य देशांपासून वेगळा असला तरीदेखील आपल्या प्रतिबद्धतेमुळेही भारताची ताकद वाढत असल्याचं नाकारता येणार नाही. ५जीआय (5Gi) तंत्रज्ञानाच्या मानकांच्या बाबतीतली भारताची कामगिरी ही या वाढलेल्या ताकदीचंच उदाहरण आहे. याबाबतीतल्या भारताच्या कामगिरीनं देशाच्या भागीदार देशांनाही आश्चर्यचकित केलं. ही कामगिरी म्हणजे मोबाईल दूरसंचारविषयक प्रक्रियांची मानकांची आखणी करणाऱ्या संस्थांची प्रमुख संस्था असलेल्या ३जीपीपीवर (3GPP), त्यांच्या १७व्या प्रकाशन आवृत्तीत काहीएका प्रमाणात ५जीआयचा (5Gi) समावेश करण्यासाठी भारतानं यशस्वी दबाव आणला. भारत हे करू शकला कारण शकला कारण, उदयोन्मुख जागतिक आघाड्यांसह क्वाड प्रक्रियेत एक भागिदार देश म्हणून भारताची कायमच अनुषांगिक आणि महत्वाची भूमिका राहिली आहे.

क. भारतीय तंत्रज्ञानविषयक उत्पादने आणि उपाययोजनांना जगभरात पोहचवणे

भारतानं मांडलेली आत्मनिर्भर भारताची संकल्पना म्हणजे अलिप्ततावाद आणि संरक्षणवाद असल्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. खरे तर यातून भारताच्या पुरवठा साखळीला, कोणत्याही आपत्ती तसेच महामारीमुळे किंवा भू-राजकीय कारणांमुळे तसेच धोरणांमुळे उद्भवलेल्या धक्यांपासून सावरण्यायोग्य लवचिक बनवणे हा या संकल्पनेचा खरा अर्थ आहे. दुसरीकडे भारताला जगासमोर एक पंसंतीचा आणि विश्वासार्ह पुरवठादार देश म्हणून ओळख निर्माण करून देत, भारताला मूल्य साखळीत वरच्या स्थानावर नेणे हेच भारत सरकारच्या धोरणांचे उद्दिष्ट आहे. भारताच्या माहिती तंत्रज्ञानविषयक निर्यातीचा विचार केला तर त्यात सेवांचा वाटा सर्वाधिक आहे. पण त्याचवेळी भारताच्या माहिती तंत्रज्ञानविषयक उत्पादनवाढीसाठीचा पाया तयार करून, अशा उत्पादनांची जगाला निर्यात करण्यासाठीचे ठोस प्रयत्न धोरणकर्त्यांकडून सुरु आहेत. राष्टीय सॉफ्टवेअर उत्पादने धोरण २०१९ [National Policy on Software Products (2019)], इलेक्ट्रॉनिक सुटे भाग आणि अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर्स – semiconductors) प्रोत्साहन योजना [ the Scheme for Promotion of Manufacturing of Electronic Components and Semiconductors (SPECS)],   त  नॅशनल पॉलिसी ऑन सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स (2019), द स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड सेमीकंडक्टर्स (SPECS), सुधारीत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन समुह योजना [Modified Electronics Manufacturing Clusters (EMC 2.0) Scheme] या योजनांसह अनेक योजना म्हणजे वर सांगितलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आखलेला पण सहज दिसून न येणारा आराखडा आहे. देशांतर्गत तंत्रज्ञानविषयक उत्पादनासाठीचा पाया तयार करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणातल्या भांडवलाची, विशेष ज्ञान आणि कौशल्यांची तसंच पायाभूत सुविधांमधे प्रचंड गुंतवणूक करण्याची गरज आहे. वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचं झालं, तर भारताचं अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्रात रूपांतर करणं ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे, आणि ती पूर्णत्वाला नेण्यासाठी क्वाड देशांसोबत ज्याप्रकारची विश्वासार्ह भागीदारी आहे, तशीच भागिदारी यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

भारत क्वाड अत्यावश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान कार्यकारी गटाच्या माध्यमातून कार्यरत राहण्यासाठी प्रतिबद्ध आहे, यामुळे भारताची आपल्या हिताच्या गोष्टी पूर्णत्वाला नेण्याची ताकद आपोआप वाढते आहे. इतकंच नाही तर भारत क्वाड ससस्य देशांपासून वेगळा असला तरीदेखील आपल्या प्रतिबद्धतेमुळेही भारताची ताकद वाढत असल्याचं नाकारता येणार नाही.

क्वाडमधल्या प्रत्येक सदस्य देशाचा भारत प्रशांत क्षेत्राबाबत तसंच त्यांच्या स्वतःच्या देशाबाबत काहीएक दृष्टीकोन, काहीएक स्वप्न बाळगलं आहे. ते प्रत्यक्षात उतरवण्याच्यादृष्टीनं, क्वाड संघटना हे या संघटनेच्या सदस्य देशांसाठीचा कोरा कॅनव्हासच आहे. क्वाड अत्यावश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान कार्यकारी गटानं (क्वाड क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी वर्किंग ग्रुप – Quad Critical and Emerging Technology Working Group) आपल्या स्थापनेपासूनच्या गेल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात, चारही सदस्य देशांना तंत्रज्ञानविषयक क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासाठीची पूर्वतयारी करण्याचा अवकाश मिळवून दिला आहे. त्यामुळेच आता क्वाड तंत्रज्ञानविषयक सहकार्य राजनैतिक बैठका आणि वाटाघाटींच्या पुढे जात प्रत्यक्षातल्या संयुक्त कृतींच्या दिशेने वाटचाल करेल का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.