-
CENTRES
Progammes & Centres
Location
लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या चीनने संपादन केलेल्या महत्त्वाने, व्यवहारात सहभागी नसलेल्या तिसऱ्या पक्षाला जी किंमत चुकवावी लागते, त्याचे व्यवस्थापन करण्याबाबत फ्रान्स किती गंभीर आहे याबद्दल मॅक्रॉन यांनी साशंकता उपस्थित केली आहे.
युरोपीय युनियन अखेरीस, जागतिक बहुआयामी भू-राजकीय संबंधाबाबत, धोरणात्मक सुसंगतता साधत आहे असे वाटत असतानाच, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या अलीकडील चीन भेटीने त्या मिथकाला छेद दिला.
जेव्हा जगातील प्रमुख शक्तींमधील मतभेदांची दरी तीव्र होत असताना, चीनविरोधात एकतेची भावना प्रक्षेपित करण्याच्या आशेने, गेल्या आठवड्यात फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि युरोपीय कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन, चीन भेटीवर होते. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारासह वाढत्या कठीण व्यापार संबंधांना स्थिर करण्यासाठी तसेच युक्रेन युद्ध संपवण्यासाठी चीनला अधिक सक्रिय भूमिका घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला होता. इतर युरोपीय नेत्यांनी, उदाहरणार्थ जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ आणि स्पॅनिश पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनीही अलीकडच्या काही महिन्यांत चिनी नेतृत्वाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.
परंतु, मॅक्रॉन इतरांच्या पलीकडे पोहोचले, कारण त्यांनी ‘तिसरी महासत्ता’ म्हणून युरोपसाठी ‘धोरणात्मक स्वायत्तते’ची वकिली केली. जर युरोप “आपल्या नसलेल्या संकटात अडकले तर, युरोपला ‘मोठा धोका’ आहे, जे युरोपला त्यांची धोरणात्मक स्वायत्तता संपादन करण्यापासून रोखते, असा युक्तिवाद करत, मॅक्रॉन यांनी युरोपने अमेरिकेवरील आपले अवलंबित्व कमी करायला हवे आणि तैवान प्रश्नावरून चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्षात ओढले जाणे युरोपने टाळायला हवे, असे सुचवून मोठा वाद निर्माण केला. अमेरिका-चीन संघर्षाच्या तीव्रतेच्या बाबतीत, मॅक्रॉन यांनी म्हटले, “आपल्याकडे (युरोपकडे) आपल्या स्वतःच्या धोरणात्मक स्वायत्ततेसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी वेळ किंवा साधन असणार नाही आणि आपण सरंजामदाराच्या संरक्षणाखाली असलेली व्यक्ती- ज्याला त्याने निष्ठा बहाल केली आहे, असे बनू, अन्यथा जर आपल्याला धोरणात्मक स्वायत्तता विकसित करण्यासाठी काही वर्षे मिळाली, तर आपण जागतिक क्रमवारीत तिसरा ध्रुव बनू शकू.”.
चिनी कम्युनिस्ट पार्टी संचालित ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे की, टिप्पण्या ‘स्पष्टपणे मॅक्रॉन यांच्या दीर्घकालीन निरीक्षणाचा आणि सखोल मनन केल्याचा परिणाम’ होत्या आणि ‘तुलनेने वस्तुनिष्ठ, तर्कसंगत आणि युरोपच्या स्वतःच्या हितसंबंधांचा’ मार्ग दर्शवतात.
मॅक्रॉनच्या निमंत्रणावरून वॉन डेर लेयेन चीनला गेल्या असल्या तरी, मॅक्रॉन यांचा पवित्रा आणि चीनला झालेल्या स्पष्ट आनंदामुळे, अटलांटिक समुद्राच्या आर-पार असलेल्या संबंधांमध्ये फूट पडणे खरोखरच शक्य आहे, अशी छाया त्या भेटीवर पडली आहे. मॅक्रॉन यांचे चीनमध्ये भव्य स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या टिप्पण्यांना व्यापक प्रसिद्धी मिळाली. चिनी कम्युनिस्ट पार्टी संचालित ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे की, टिप्पण्या ‘स्पष्टपणे मॅक्रॉन यांच्या दीर्घकालीन निरीक्षणाचा आणि सखोल मनन केल्याचा परिणाम’ होत्या आणि ‘तुलनेने वस्तुनिष्ठ, तर्कसंगत आणि युरोपच्या स्वतःच्या हितसंबंधांचा’ मार्ग दर्शवतात.
मॅक्रॉन यांनी या भेटीचे वर्णन युक्रेनमधील युद्धावर ‘सामाईक दृष्टिकोन एकत्रित’ करण्याचा आणि चीनशी असलेल्या संबंधांची किंमत चीनला मान्य करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न म्हणून केला आहे. पण भेटीदरम्यान आणि नंतर हे कसे साध्य झाले हे क्वचितच दिसून आले. उर्सुला वॉन डेर लेयेन, ज्यांचे चीनमध्ये अतिशय थंडपणे स्वागत केले गेले, त्यांनी युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या चिनी बारा-सूत्री योजनेचा निषेध अधिक जोरकसपणे व्यक्त केला आहे आणि युरोपचे चीनशी व्यापारी संबंध संपुष्टात आणण्याची गरज अधोरेखित केली आहे.
परंतु मॅक्रॉन यांच्या हस्तक्षेपामुळे सर्व बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. युरोपीय लोक हे स्पष्ट करत आहेत की, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेला क्वचितच व्यापक समर्थन आहे. चीनवरील आंतर-संसदीय आघाडीने एका निवेदनात म्हटले आहे की, मॅक्रॉन यांच्या टिप्पण्या संपूर्ण युरोपीय नेतृत्त्वाच्या भावनांहून ‘अत्यंत वेगळ्या’ आहेत आणि ते युरोपकरता बोलत नाहीत. विशेषतः, मध्य आणि पूर्व युरोपच्या अधिकाऱ्यांनी मॅक्रॉन यांच्या अप्रिय आणि अनपेक्षित वक्तव्यामुळे झालेले तीव्र दु:ख, निराशा आणि मॅक्रॉन यांच्या धोरण प्राधान्यक्रमांबाबतचा विरोध बोलून दाखवला आहे. “अमेरिकेकडून धोरणात्मक स्वायत्तता निर्माण करण्याऐवजी, मी अमेरिकेसोबत धोरणात्मक भागीदारीचा प्रस्ताव ठेवतो,” पोलंडचे पंतप्रधान मॅट्युझ मोराविकी यांनी त्यांच्या युरोपीय भागीदारांना स्पष्टपणे सांगितले. रशियन लष्करी आक्रमणाच्या अग्रभागी असलेली युरोपीय राष्ट्रे आजची आव्हाने अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून पाहतात. देशावर राज्य करण्यावरील फ्रेंच तात्त्विक ग्रंथासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. फ्रान्स आणि जर्मनी कोणत्याही महत्त्वपूर्ण लष्करी पराक्रमापासून वंचित असल्याने, अमेरिकेवर युरोपीय युनियनचे अवलंबित्व धोरणात्मकदृष्ट्या अनिवार्य आहे. जरी ‘जुना’ युरोप मॅक्रॉन यांच्या जागतिक दृष्टिकोनाला पाठिंबा देत नसला तरीही, मॅक्रॉन यांच्या चुकीच्या टिप्पण्यांनी पुन्हा एकदा ‘जुन्या’ आणि ‘नव्या’ युरोपमधील भिन्नता प्रकट केली आहे.
फ्रान्स आणि जर्मनी कोणत्याही महत्त्वपूर्ण लष्करी पराक्रमापासून वंचित असल्याने, अमेरिकेवर युरोपियन युनियनचे अवलंबित्व धोरणात्मकदृष्ट्या अनिवार्य आहे.
अमेरिकेच्या प्रतिक्रियाही तितक्याच तीव्र आहेत. जरी ‘व्हाइट हाऊस’ने असे म्हटले आहे की त्यांनी “फ्रान्ससोबत असलेल्या उत्कृष्ट सहकार्यावर आणि समन्वयावर लक्ष केंद्रित केले आहे”, रिपब्लिकन पक्षाने या वादावर लक्ष केंद्रित केले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर मार्को रुबिओ यांनी केलेल्या भाषणात मुद्दा उपस्थित केला की, मॅक्रॉन यांच्या टिप्पण्यांनंतर, अमेरिकेने केवळ चीनवर नियंत्रण ठेवण्यावर आपले परराष्ट्र धोरण केंद्रित करण्याचा विचार करायला हवा आणि युक्रेनमधील युद्ध हाताळणे युरोपवर सोडायला हवे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह निवड समितीचे रिपब्लिकन अध्यक्ष माईक गॅलाघर यांनी मॅक्रॉनच्या टिप्पण्यांचे वर्णन ‘लाजिरवाणे’ आणि ‘धक्कादायकपणे अस्वीकारार्ह’ असे केले. आणि अर्थातच, माजी अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प त्यांचा प्रतिसाद अधिक रंगतदार होता, जेव्हा ते म्हणाले की, मॅक्रॉन ‘फायदा उठविण्याकरता चीनच्या शी जिनपिंग यांच्याशी चांगले वागत आहे.’ जरी अमेरिकेने युरोपीय सुरक्षेसाठी किती वचनबद्ध असायला हवे, या चर्चेला पुन्हा उधाण आले असले तरी, मॅक्रॉन यांची भूमिका अमेरिकेला त्रायदायक असेल, कारण ते चीनला प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे.
मॅक्रॉन यांना फ्रान्समध्ये वेढा घातला गेला आहे, त्यांच्या जनमताचे मूल्यांकन धुळीला मिळाले आहे आणि त्यांचे सरकार गेल्या महिन्यात अविश्वासाच्या मतदानाच्या वेळी थोडक्यात टिकले आहे. त्यामुळे फ्रेंच राजकारणात दीर्घ इतिहास असलेल्या एका मुद्द्यावर जागतिक व्यासपीठावर भूमिका मांडणे कदाचित त्यांच्याकरता राजकीयदृष्ट्या अर्थपूर्ण आहे. त्यांनी भूतकाळातही वादग्रस्त टिप्पण्या केल्या आहेत, उदाहरणार्थ- नाटोचा मेंदू मृतवत झाला आहे आणि युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर काही महिन्यांनंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ‘सुरक्षा हमी’ देण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अशा वेळी- जेव्हा पाश्चिमात्य देशांनी चीनसंबंधीचे गंभीर धोरण मांडण्याचा मोठ्या कष्टाने प्रयत्न केला आणि जेव्हा चिनी आक्रमकता, विशेषत: तैवानविरोधात सुस्पष्ट आहे, अशा टिप्पण्या भेटीच्या उद्दिष्टांच्या अगदी नेमक्या उलट आहेत. ज्या समस्यांच्या निराकरण करण्याच्या संकल्पाचा विश्वासघात करतात, ज्याचा फायदा उठवायला चीनला आनंदच होईल आणि इंडो-पॅसिफिकमधील फ्रान्सच्या भागीदारांमध्ये, लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या चीनने संपादन केलेल्या महत्त्वाने, व्यवहारात सहभागी नसलेल्या तिसऱ्या पक्षाला जी किंमत चुकवावी लागते, त्याचे व्यवस्थापन करण्याबाबत फ्रान्स किती गंभीर आहे याबद्दल मॅक्रॉन यांनी साशंकता उपस्थित केली आहे.
हे भाष्य मूलतः Bloomberg मध्ये प्रकाशित झाले आहे.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Professor Harsh V. Pant is Vice President – Studies and Foreign Policy at Observer Research Foundation, New Delhi. He is a Professor of International Relations ...
Read More +