Author : Manoj Joshi

Published on Dec 11, 2020 Commentaries 0 Hours ago

चीनच्या भूतानमधील वाढलेल्या हालचालींमुळे भारताने डोकलाममध्ये मिळविलेल्या विजयी मुत्सद्दिगिरीचे, पुढे काय झाले? असा प्रश्न विचारला जात आहे.

डोकलाम विजयाचे पुढे काय झाले?

भूतानच्या हद्दीत चीन गाव वसावत असल्याच्या आणि मोचू नदीच्या खालच्या बाजूस रस्ता बनवित असल्याच्या ताज्या बातम्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. ‘गुगल अर्थ’वर डोकलाम चे डिसेंबर २०१९ मधील मूळ छायाचित्र पाहिल्यास, त्या ठिकाणी गावाची चिन्हे सहज नजरेस पडतील. तसेच मोचू नदीच्या पश्चिम काठापासून दक्षिण बाजूस भारताच्या दिशेने येणारा रस्ता, चीनचे कारनामे उघडे करतो आहे. त्यामुळे भारताने डोकलाममध्ये मिळविलेल्या विजयी मुत्सद्दिगिरीचे, पुढे काय झाले? असा प्रश्न विचारला जात आहे.

२८ ऑगस्ट २०१७ मध्ये भारत आणि चीन दरम्यान सीमेवरील सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयावर एकमत झाल्यानंतर, भारतातील बहुतेक विश्लेषकांनी हा भारताच्या मुत्सद्दिगिरीचा विजय असल्याचे म्हटले होते. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते निवृत्त ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांनी चीन भारताच्या इच्छाशक्तीपुढे झुकल्याचे आणि चीनने रस्ते बांधकामात दिलेल्या स्थगितीस दुजोरा मिळत असल्यास हा भारताचा रणनैतिक विजय मानावा लागेल असे म्हटले होते.

‘स्वराज मॅग डॉट कॉम’ या सरकार समर्थक वेबसाईटवर लिहिताना आर्यन पवरिया यांनी चीनचा रस्ता बांधणी रोखून पंतप्रधान मोदी आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी यशस्वी मुत्सद्दी आणि मनोबल उंचावणारी कामगिरी केल्याचे म्हटले. अभिजित अय्यर मित्रा या दुसऱ्या एका विश्लेषकांने या घटनेस ‘यशस्वी करार’ असे संबोधिले आणि भारताचा दशकांमधील सर्वात मोठा मुसद्दी विजय असल्याचे प्रतिपादन केले.

माजी सचिव कवल सिब्बल सारख्या मितभाषिक विश्लेषकांनी सुद्धा यशस्वी मुत्सद्देगिरी म्हणून भारताची पाठ थोपटली. तसेच हा मुद्दा धरून चीनचा अवमान न करण्याची विनंती सुद्धा केली. विजयाच्या आवेशात इतर अनेक विश्लेषकांनी मुत्सद्दीपणाने तोडगा काढणाऱ्या भारताचे कौतुक केले.

ऑस्ट्रेलियातील विश्लेषक रोरी मेडकॉफ यांनी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी माघार घेण्याच्या निर्णयानंतर केलेल्या अधिकृत निवेदनाला डोंगर पोखरून उंदीर काढण्याची उपमा दिली. याउलट चीनच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या निवेदनात भारताची माघार यावर शिक्कामोर्तब करून, चीनच्या कृत्याबद्दल गोंधळात टाकले. चीनच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांनी यापुढे सुद्धा आमचे सैन्य डोकलाम येथे तैनात राहून गस्त घालेल आणि बदलत्या परिस्थितीनुसार योग्य वाटणाऱ्या समायोजना आणि उपाययोजना करत राहील, असे सांगितले.

आणखी एका सुप्रसिद्ध अभ्यासक टेलर फ्राव्हेल यांनी भारत जिंकला व चीन हरला या मतावर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांच्या मताप्रमाणे, चीनला भूतकाळाप्रमाणे डोकलाम भागात गस्त घालण्याची व नवीन रस्ता कायम ठेवण्याची मुभा देऊन भारताने प्रथम माघार घेणे म्हणजे भारताच्या विजयाबद्दल बोलणे अतिघाईचे होईल. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने सुद्धा या मताला दुजोरा देत विजयाचा टिळा हा नवी दिल्ली च्या माथ्यावर नसून बीजिंगच्या माथ्यावर दिसत असल्याचे म्हटले.

फ्राव्हेल यांनी चीनच्या भूमिकेचे स्पष्टीकरण समर्पकपणे मांडले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीस होऊ घातलेल्या आगामी झियमन ब्रिक्स शिखर परिषदेमुळे व १९ व्या महत्त्वपूर्ण कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनामुळे चीनने नरमाईची भूमिका घेतली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारत डावपेच पातळीवर जरी जिंकला असला तरी, प्रत्यक्ष सामन्यात मात्र सपशेल हरला आहे.

भारतीय सैनिकांनी रोखलेल्या डोका लाच्या खालील भागापासून ते झोंपेलरी कडेपर्यंत रस्ता वाढविण्याच्या प्रकल्पाला चीनने दिलेल्या स्थगितीमुळे व डोकलाममध्ये एक पद्धतशीर बांधणी सुरू करून भूतानने हक्क सांगितलेल्या पठारावर स्वतःची स्थिती मजबूत करून घेतली. २०१७ मध्येच, सिन्च ला पासून  डोका ला पर्यंत चुंबी खोऱ्यातून जाणाऱ्या रस्त्यावर लष्करी तळ आणि हेलिपॅड उभारून त्यांनी यावर शिक्कामोर्तब केले होते.

फ्रॅव्हल यांनी चीनच्या डोकलामधील कामगिरी समाप्तीसंदर्भात असे स्पष्टीकरण दिले की, पीएलएत भारतीयांना तेथून बाहेर काढण्याची लष्करी क्षमता नसण्याची शक्यता आहे. वरिष्ठ कर्नल झोऊ बो – पीएलए अकादमी ऑफ मिलिटरी सायन्सचे मानद सहकारी आणि आंतरराष्ट्रीय सर्किटमधील परिचित व्यक्ती, चर्चासत्रे, मंच आणि कार्यशाळेस उपस्थित राहून चीनची ठामपणे बाजू मांडणारे आहेत. ते चार महिन्यांनंतर दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टमध्ये लेखन करताना म्हणाले- डोकलामचा निकाल हा “भारतासाठी रणनीतिकखेळ विजय” देखील नव्हता कारण चिनी लोक तिथेच राहिले आहेत आणि त्यांनी पुन्हा रस्ते बांधणीचे काम सुरू केले आहे. पण, कदाचित, झोऊच्या लेखाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, आता भारत निव्वळ तोट्याचा ठरेल ही त्यांची घोषणा होती कारण “वादग्रस्त सीमा चीनच्या सामरिक रडारवर नव्हती” पण आता डोकलाम स्टँडऑफने “चीनला धडा शिकविला तो त्याच्या सुरक्षिततेच्या समस्येवर पुनर्विचार करणे. ” याचा परिणाम असा झाला की चीनने संपूर्ण भारताच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर आपल्या पायाभूत सुविधांच्या बांधकामास बळकटी देण्यास सुरुवात केली.

हे अपेक्षेपेक्षा वेगवान होऊ लागले. डोकलाममध्ये, चीनने रस्ता बांधणीच्या कामास स्थगिती दिली, परंतु तेथे नव्या सैनिकी सुविधांचे बांधकाम सुरू केले. सेवानिवृत्त भारतीय लष्करातील सेटेलाइट प्रतिमा विश्लेषक कर्नल विनायक भट्ट यांनी भारत सरकारी अधिकार्‍यांच्या माहितीचा अआधार घेत असे मत मांडले की, डिसेंबर २०१७ पर्यंत पीएलएने उत्तर डोकलममध्ये तब्बल सात हेलिपॅड बनवून आपले स्थान मजबूत केले आहे. मोनिशन स्टोरेज साइट्स, क्षेपणास्त्र डंप, एक रडार स्टेशन, आरमार वाहने आणि संदेशवहनासाठी फायबर ऑप्टिकचे जाळे विणले आहे. थोडक्यात त्यांनी संपूर्ण उत्तर डोकलामला ताब्यात घेतले आहे.

२९ ऑक्टोबरला पार्टी कॉंग्रेसच्या समाप्तीच्या काही दिवसातच यासंदर्भात संकेत पाठविण्यात आला होता. सिन्हुआने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांपैकी पहिल्या एकात असे जाहीर केले होते की, शीं यांनी तिबेटी कळपांना राष्ट्रीय भूभागाचे रक्षण करण्यास प्रोत्साहित केले होते. पार्टी कॉंग्रेस दरम्यान दोन तिबेटी मुलींनी सीमेच्या क्षेत्रामधील त्यांच्या अनुभवांची माहिती देताना दिलेल्या पत्राला उत्तर देताना, शीं यांनी त्यांची निष्ठा आणि चीनच्या भूभागाचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले व आगामी काळात चीन-भारत आणि चीन-भूतान सीमारेषा चिनी सैन्यदलाचे अग्रक्रम असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

पठाराच्या उत्तरार्धात स्वतःची स्थिती मजबूत करत दक्षिणेकडे जाताना केलेले प्रयत्न विफल झाल्यावर चीनने दीर्घ रणनीतीचा अंगिकार केला. त्यांनी आपल्या बाजूस तोर्सा नल्हाच्या कडेने रस्त्यांची बांधणी सुरू केली, नल्हाच्या दक्षिणेस नल्हा व  झोंपेलरी (जांफेरी) कड्याला पुलाप्रमाणे जोडणारा  रस्ता केला. ह्यावरून संपूर्ण विवादित क्षेत्र ताब्यात घेण्याचा चीनींचा हेतू होता हे स्पष्ट होते.

त्यांचे अलिकडील पाऊल म्हणजे मोचू नदीच्या पश्चिमेला आपल्या ताबारेषेवरून पुढे जाणे आणि डोकलामच्या पूर्वेकडील भागात मोचू (आमो चू) नदीकाठी एक संपूर्ण गाव आणि एक रस्ता तयार करणे. पॅनगडा नावाच्या या गावच्या छायाचित्रांना नोव्हेंबर २०२० मध्ये चीनचे पत्रकार शेन शिवे यांनी ट्विट केले होते. परंतु डिसेंबर २०१२ मधील गुगल अर्थ प्रतिमेवरून या प्रदेशातील काम यापूर्वी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गावातून चिनी लोकांनी नदीच्या दिशेने दक्षिणेकडे भारताच्या दिशेस जाणारा रस्ता तयार केला आहे. आतापर्यंत १० ते १५ कि.मी. पर्यन्त रस्ता बांधला आहे, आणि जर पश्चिमेकडे चीनच्या बाजूकडील शाखा विकसित झाल्या आणि त्या झोम्पेलरी (जंफेरी) कड्यापर्यंत पोहोचल्या तर भारताला हस्तक्षेप करणे अवघड आहे.

दुर्दैवी भूतानी या व्ददांत काहीही करण्यास असमर्थ आहेत. त्यांना या बाबतीत विचारले असता, भारतातील भूतानचे राजदूत, मेजर-जनरल (निवृत्त) व्ही नामगेल यांनी “भूतानच्या भूभागावर चिनी गाव नसल्याचे” जाहीर केले. तज्ज्ञांनी सांगितले की, ते भूतानच्या प्रांतात कमीतकमी २कि.मी. अंतरावर आहे आणि मोचूमार्गे आणखी १० ते १५  कि.मी.पर्यंत हा रस्ता भारतापर्यंत जातो.

जून २०२० मध्ये भूतानवरील विस्तारवादी चीनचा दावा आणि भूतान-चीन सीमेच्या चर्चेच्या निष्फळ ठरलेल्या २४ फेऱ्या म्हणजे बोटचेपी भूमिका घेणाऱ्या भूतानला मिळालेला तडाखा आहे.  हा वादग्रस्त  विशाल भाग पूर्व भूतानमधील असून चीनने या भागातील सक्तेंग वन्यजीव अभयारण्य विकसित करण्याच्या निधीच्या प्रस्तावाला विरोध करून, हा परिसर वादग्रस्त असल्याचे निकक्षून सांगितले. या विषयावर भूतानने बीजिंगला दिशानिर्देश पाठवल्यानंतर, चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्त्याने जुलै २०२० मध्ये म्हटले आहे की, “चीन आणि भूतान दरम्यानची सीमा अद्याप निश्चित केलेली नाही आणि सीमेच्या मध्यम, पूर्व आणि पश्चिम भागामध्ये वाद आहे.” महत्त्वाचे म्हणजे, हा परिसर तवांग मार्गाच्या दक्षिणेस आहे व चीनच्या म्हणण्याप्रमाणे हा भाग भारताशी असलेला कोणताही सीमा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने शुल्लक आहे.

सन २०१७ मध्ये चीनने स्वतः केलेल्या १८९० च्या अँग्लो चिनी अधिवेशनातील करार मोडित काढत मोचू नदीला एकतर्फीपणे सीमा बनविण्याची आणि सर्व डोकलाम ताब्यात घेण्याची कृती केली होती. ह्या करारात स्पष्टपणे केले आहे की दोन्ही देशांदरम्यानची सीमा तिब्बती मोचूमध्ये वाहणाऱ्या पाण्यापासून सिक्किम तीस्तामध्ये जाणार्‍या पाण्याचे विभाजन करणार्‍या पर्वतरांगाच्या शिखरावर असेल. परंतु, आज चिनी लोक पाणलोटावर नाही तर मोचूच्या अगदी तटावर आहेत.  १९९८ मध्ये असे ठरले होते की जोपर्यंत दोन्ही बाजूंनी सीमा तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत तोपर्यंत मार्च १९५९ पूर्वीच्या सीमेची स्थिती कायम ठेवली जाईल.” परंतू चीनने आपलीच कटीबध्दता मोडण्यात धन्यता मानली. एक गोष्ट आपल्याला चिनी लोकांबाबत लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे ” मी करेल तोच कायदा हेच चीनचे धोरण आहे”.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.