Published on Oct 05, 2023 Commentaries 0 Hours ago

चिनी अधिकारी लाच घेण्यास संवेदनाक्षम असल्यास शत्रुत्ववादी शक्ती चिनी कारभारावर प्रभाव टाकू शकतात, या भीतीने अकस्मात नेतृत्वाच्या पुनर्रचनेला आणि भ्रष्टाचाराच्या तपासांना पुढे ढकलले जाते.

शांगफू प्रकरण: चीनची शस्त्रास्त्र क्षमता आणि पक्षऐक्याला भगदाड

चीनच्या राजकीय अभिजात वर्गाचे प्रकरण अधिकाधिक विचित्र होत आहे. परराष्ट्र मंत्री किन गँग यांचे गायब होणे आणि त्यांचे राजकीयदृष्ट्या कमी झालेले महत्त्व याच्या पाठोपाठ, संरक्षण मंत्री आणि केंद्रीय लष्करी आयोगाचे सदस्य ली शांगफू व त्यांचे पूर्वीचे काही सहकारी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे वृत्त समोर आले आहे. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र कार्यालय हे सरकारच्या महत्त्वाच्या कार्यालयांपैकी एक आहेत आणि या विभागांमध्ये कोणत्याही प्रकारची अनिश्चितता चांगली नाही.

अलीकडच्या काळात, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या उच्चपदस्थांमध्ये स्थिर मंथन होत आहे. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या स्थापना दिनाच्या बरोबर आधी, राष्ट्राच्या अणु शस्त्रागाराचा प्रभारी असलेल्या त्यांच्या अभिजन रॉकेट दलामध्ये कार्यकारी आणि वैचारिक अशा दोन्ही आघाड्यांवर नेतृत्व बदल दिसून आला. वँग हाऊबीन आणि शु शीशेन्ग यांना रॉकेट दलाचे प्रमुख आणि चीनमधील लष्करी विभागातील राजकीय शिक्षण आणि संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले. हे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे, जे संस्थेवर ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’चे नियंत्रण राखण्याशी संबंधित आहे. रॉकेट दलाचे पूर्वीचे नेतृत्व-माजी कमांडर जनरल ली युचाओ आणि त्यांचे उप-अधिकारी झांग झेंझोंग व लियू गुआंगबिन- यांची भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे. लक्षणीय बाब अशी की, ली युचाओ हे पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि ‘नॅशनल पीपल्स काँग्रेस’चे उपाध्यक्ष म्हणून पक्षाच्या सत्ता संरचनेत अंतर्भूत होते. महत्त्वाच्या लष्करी तुकडीच्या नेतृत्वात अचानक बदल करून, पूर्वीच्या नेतृत्वाविरुद्ध तपास करणे हे अनपेक्षित आहे आणि यातून खोल अस्वस्थता दिसून येते.

महत्त्वाच्या लष्करी तुकडीच्या नेतृत्वात अचानक बदल करून, पूर्वीच्या नेतृत्वाविरुद्ध तपास करणे हे अनपेक्षित आहे आणि यातून खोल अस्वस्थता दिसून येते.

परस्परांशी जोडलेली असलेली ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ची सत्ता संरचना आणि व्यवस्थेची अपारदर्शकता हे मुख्य घटक आहेत, जे भ्रष्टाचाराला जन्म देतात. चीनच्या निर्णय घेणार्‍या संस्थांमध्ये- पॉलिटब्युरो आणि केंद्रीय समितीमध्ये ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे प्रतिनिधित्व आहे. दोन वरिष्ठ ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ जनरल पॉलिटब्युरोवर बसतात, तर केंद्रीय समितीमध्ये २०५ कायमस्वरूपी आणि १७१ पर्यायी सदस्यांपैकी सुमारे २० टक्के सैनिकी आस्थापनेचा वाटा असतो. ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’तील उच्चभ्रूंच्या नातेवाईकांचा चीनच्या संरक्षण औद्योगिक संकुलात मोठा हिस्सा होता. उदाहरणार्थ, वरिष्ठ चिनी नेते डेंग झियाओपिंग, ये जियानिंग आणि यांग शांगकुन यांच्या नातेवाईकांचे चीनमधील मोठ्या संरक्षण कंपन्यांशी संबंध होते.

ली शांगफू प्रकरण काही अस्वस्थ प्रश्न मागे ठेवते. पहिला मुद्दा म्हणजे, प्रतिस्पर्ध्याची चिंता करण्याच्या उद्देशाने लष्करी किंवा राजकीय सामर्थ्याचे सार्वजनिक प्रदर्शन तयार करण्यामागील चीनचा हेतू आणि त्यानंतरच्या वर्तनाचे मूल्यांकन करण्याचा मुद्दा आहे. २० व्या पार्टी काँग्रेसमध्ये, शी यांनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे जलद आधुनिकीकरण करण्याचे आणि ‘स्थानिक युद्धे जिंकण्यासाठी’ त्याची क्षमता वाढवण्याचे वचन दिले. त्यानंतर, केंद्रीय लष्करी आयोगासारखी एक शक्तिशाली सर्वोच्च संस्था, जी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’वर ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’चे नियंत्रण राखते, ती लढाईचा अनुभव असलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी भरलेली होती. शी हे लष्करी तळांचा दौरा करत आहेत. तेथील सुविधांची पाहणी करत आहेत आणि त्यांच्या सेनाप्रमुखांना प्रत्यक्ष लढाऊ परिस्थितीत सैन्याला प्रशिक्षण देण्यास उद्युक्त करत आहेत. मात्र, आता, लक्ष कर्मचार्‍यांच्या सज्जतेपासून ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या हार्डवेअरच्या गुणवत्तेकडे- शस्त्रे आणि उपकरणे यांच्याकडे वळले आहे. चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाचे उपाध्यक्ष जनरल झांग युक्सिया (ली शांगफूचे सहकारी) यांनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या शस्त्रास्त्रांच्या संपादनात सुधारणा करण्याचे आणि शस्त्रास्त्रांची गुणवत्ता सुधारण्याचे आवाहन केले. एका वेगळ्या घटनेत, ‘पीपल्स डेली’ने ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ तपासणी संघाचा अहवाल दिला, ज्यांनी पारंपरिक आणि आण्विक क्षेपणास्त्रांच्या प्रभारी रॉकेट दलाच्या विभागामधील ‘सुस्पष्ट आणि सहज लक्षात येणाऱ्या उणिवा’ शोधून काढल्या. चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या उपकरण विभागामध्ये काम करणार्‍या ली यांच्यावरील ही मूल्यांकने म्हणजे एक कठोर आरोप असल्याचे दिसत होते. काहीजण रास्त युक्तिवाद करतात की, ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चा सर्वोच्च कमांडर या नात्याने शी हे संरक्षण सज्जतेचे मूल्यांकन करण्यास बांधील आहेत, परंतु प्रश्न असा आहे की, या सर्वच विभागांची सफाई करण्याच्या या सरावातून काय साध्य होईल? गेल्या वर्षीपासून, चीनने तैवानच्या सामुद्रधुनीमध्ये लष्करी कवायतींचा अवलंब केला आहे, ज्यात अमेरिकी नेत्यांनी तैवानला भेट दिली आहे किंवा तैवानच्या राजकारण्यांचे परदेश दौरे आहेत. या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या युक्त्यांनी त्यांच्यातील कमकुवतपणा उघड केला आहे का, ज्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. आणखी एक शक्यता अशी आहे की, कर्मचारी आणि शस्त्रास्त्रांची कार्यक्षमता मोजण्यासाठी चीन-तैवान संबंधांबाबत सामरिक कौशल्याची चाचणी घेण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी ‘वॉर गेम्स’च्या रूपात वारंवार केलेल्या लष्करी सरावादरम्यानच्या ‘तणाव चाचण्या’ या उणिवा उघड करतात, अशा परिस्थितीत, ही नजीकच्या भविष्यात मोठे लष्करी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काळजीपूर्वक विचार केलेली रणनीती आहे का?

दुसरे असे की, शी यांच्या राजवटीत धोरणात्मक दिशानिर्देशांबाबत बऱ्यापैकी अटकळ आहे. अलीकडेच असे अहवाल समोर आले आहेत की, बेइदाइहे बैठकीत शी यांची निंदा करण्यात आली होती- एक प्रमुख संस्थात्मक आंतर-पक्ष संवाद यंत्रणा- ज्यामध्ये ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’च्या वरिष्ठांचा सहभाग होता. अलीकडच्या काळात, शी यांनी तणाव वाढवला आहे, ज्यामुळे अमेरिकेसोबतचे संबंध बिघडले आहेत, परिणामी,  तंत्रज्ञान उपलब्धता आणि भांडवलाच्या प्रवाहावर अंकुश ठेवला गेला आहे. या व्यतिरिक्त, शी यांच्या कोविड-१९च्या रुग्णांची संख्या शून्यावर आणण्याकरता लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या रणनीतीमुळे गेल्या वर्षी अनेक शहरे दीर्घकाळासाठी बंद ठेवण्यात आली होती, ज्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली होती. परिस्थितीचे अमेरिकेने केलेले मूल्यांकन असे आहे की, ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’मधील लोकांमध्ये मतभेद आहेत, जे अमेरिकेशी आर्थिक व्यवहार सुरू करण्यास उत्सुक आहेत, विरुद्ध शी अनुयायी- जे आर्थिक विचारांपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वावर जोर देतात. चीनच्या नेतृत्वाचा बालेकिल्ला असलेल्या झोंगनानहाईच्या सुरक्षेचे प्रभारी जनरल वांग शाओजुन यांच्या गूढ निधनाने पुराव्यांनुसार दुफळीतील मारामारी आता अधिक गंभीर आणि अतिरंजित कारस्थानांमध्ये बदलली आहेत का? ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’च्या वरिष्ठ पदांचे मत शी यांच्या विरोधात वळत आहे, संशयास्पद निष्ठा असलेल्या विलक्षण लोकांविरुद्ध शुद्धीकरण करून याला कोण प्रतिसाद देत आहे?

 अशी भीती आहे की, पाश्चात्य शक्ती देशाच्या राजवटीत बदल घडवून आणतील. या पार्श्‍वभूमीवर, पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या संकल्पनेत, केवळ सामाजिक दुष्प्रवृत्ती म्हणून पाहण्यापासून- राजवटीच्या स्थैर्यावर परिणाम करणारे असे पाहण्यापर्यंत महत्त्वपूर्ण बदल झाला आहे.

अखेरीस, ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, आशिया-ओशनिया प्रदेशात ८० टक्के शस्त्रास्त्र विक्री करणाऱ्या चीनच्या संरक्षण कंपन्या रग्गड नफा कमावीत आहेत. या वर्षीच्या ‘शांग्री ला’ संवादादरम्यान, चीनच्या तुलनेत भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला चिनी अभ्यासकांनी कमी लेखल्याने विजयाची भावना होती. आता, जर खरोखरच ली यांचे पतन निकृष्ट संरक्षण उपकरणांमुळे झाले असेल, तर चिनी शस्त्रास्त्रे खरेदी करणाऱ्या राष्ट्रांना त्यांच्या कार्यक्षमतेचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल. बिघडलेल्या अमेरिका-चीन संबंधांच्या प्रकाशात, शी यांनी चेतावणी दिली आहे की, चीन त्यांच्या इतिहासातील सर्वात गुंतागुंतीच्या अंतर्गत आणि बाह्य घटकांचा सामना करत आहे आणि आव्हाने ‘परस्परांशी व्यग्र आणि परस्पर सक्रिय’ आहेत. अशी भीती आहे की, पाश्चात्य शक्ती देशाच्या राजवटीत बदल घडवून आणतील. या पार्श्‍वभूमीवर, पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या संकल्पनेत, केवळ सामाजिक दुष्प्रवृत्ती म्हणून पाहण्यापासून राजवटीच्या स्थिरतेवर परिणाम करणारे- म्हणून पाहण्यापर्यंत एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. चिंता अशी आहे की, जर चिनी सेनाप्रमुख लाच आणि मोहक गोष्टींसाठी संवेदनाक्षम असतील तर ते कम्युनिस्ट चीनला भगदाड पाडण्यासाठी विरोधी शक्तींना नवीन संधी देऊ शकतात.

कल्पित ए मंकीकर हे ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’चे ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राम’चे फेलो आहेत.

अकिब रेहमान हे ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’च्या ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राम’मध्ये ‘रिसर्च इंटर्न’ आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.