Author : Ayjaz Wani

Published on Jul 26, 2023 Commentaries 0 Hours ago

मादक पदार्थांचा वापर करून होत असलेला नार्को-दहशतवाद काश्मिरात भयंकर प्रमाणात वाढतो आहे. धार्मिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे त्यात आणखी भर पडली आहे.

काश्मिरातील नार्को-दहशतवाद : धार्मिक नेते गप्प का?

भारताविरुद्ध सुरू असलेल्या अप्रत्यक्ष युद्धामध्ये (प्रॉक्सी वॉर) पाकिस्तानकडून मादक पदार्थांचा वापर शस्त्र म्हणून होतो आहे. या नार्को दहशतवादाला बळी पडलेल्या काश्मीर खोऱ्यात गेल्या पाच वर्षामध्ये हेरॉइनचा गैरवापर २००० टक्क्यांनी वाढला आहे. थेट तरुणांना लक्ष करणारा आणि यातून मिळणाऱ्या पैशातून पाकिस्तान समर्थन असणाऱ्या दहशतवादी कारवायांना बळ देणारा हा नार्को-दहशतवाद हे खोऱ्यातील आजचे ‘सर्वात मोठे आव्हान’ असल्याचे, मत काश्मीर पोलीस प्रमुखे दिलबाग सिंग यांनी व्यक्त केले आहे. मजबूत सुरक्षा व्यवस्था आणि विविध सुरक्षा संस्थांमधील वाढत्या समन्वयामुळे आज काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्था पाठविले जात असल्याने, ते रोखता येणे अवघड बनून बसले आहे.

काश्मीरमधील नार्को-दहशतवाद

पंडित आणि मुस्लिम यांच्या शतकानुशके सुरु असलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक नातेसंबंधांवर काश्मीरमधील सामाजिक आणि आर्थिक रचना उभी आहे. या अनोख्या, धर्मसंस्कृतीच्या संगमाने एका अनवट, भक्तीमय आणि तात्विक अशा ‘काश्मिरी’ जीवनपद्धतीला आकार दिला आहे. या जीवनपद्धतीतून तयार झालेल्या अनौपचारिक सामाजिक व्यवस्थेने येथील माणसांवर आणि त्यांच्या आयुष्यवर प्रभाव पाडला आहे. पण, १९८९ सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, कट्टरतावाद आणि दहशतवाद यामुळे या सामोपचाराच्या जीवनशैलीला हादरे बसू लागले. शतकानुशकते जपलेला सौहार्द, सामाजिक जडणघडण या साऱ्यामुळे कमकुवत पडली आहे. तसेच, फुटिरतावादी आणि अतिरेकी यांच्याकडून हाणारे हल्ल्याचे आव्हान, सुरक्षा यंत्रणांकडून होणारे दीर्घकालीन कर्फ्यू आणि न संपणारा संघर्ष यामुळे चिंता, नैराश्य, उदासिनता आणि मानसिक तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तसेच मनोरंजनाच्या साधनांना जवळपास पूर्णपणे अभाव असल्याने जम्मू-काश्मीरमधील तरुण वेगाने अंमली पदार्थाच्या धोकादायक व्यसनांकडे आकर्षिक झाले आहे.

मजबूत सुरक्षा व्यवस्था आणि विविध सुरक्षा संस्थांमधील वाढत्या समन्वयामुळे आज काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे.

खोऱ्यातील सर्व भागातील सर्वच सामाजिक-आर्थिक वर्गांमध्ये या अंमली पदार्थांच्या व्यसनात चिंताजनक वाढ झाली आहे. काश्मीरमध्ये सुरु करण्यात आलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात दर तासाला एक नवीन व्यसनाधीन प्रवेश घेतो आहे. श्रीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ओरल सबस्टिट्यूशन थेरपी सेंटरमध्ये २०१६ मध्ये फक्त ४८९ प्रकरणे नोंदवली गेली होती, परंतु २०२१ मध्ये या संख्येने १०,००० चा टप्पा ओलांडला आहे. व्यसानाधीन झालेल्यांच्या सख्येत गेल्या पाच वर्षात झालेल्या या २००० टक्के वाढीमुळे तेथील सुरक्षा यंत्रणा आणि जम्मू-काश्मीर सरकारपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. काश्मीर खोऱ्यातील फक्त श्रीनगर आणि अनंतनाग हे दोन जिल्हे जरी घेतली तरी तेथील अंमली पदार्थांवर दररोज होणारा खर्च हा ३.७ कोटींहून अधिक आहे. शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. या अंमली पदार्थांच्या अतिरेकामुळे अनेकांचा मृत्यूही होत आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या दोघांनी संयुक्तरित्या २०१९ मध्ये एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार एकूण लोकसंख्येपैकी ४.५ टक्क्यांहून अधिक लोक अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत.

अलीकडे, खोऱ्यातील सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी आणि संघर्षाची धार कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानकडून दुहेरी रणनितीचा उपयोग केले जात आहे. ते आता सीमेपलिकडून शस्त्रांसोबत अंमली पदार्थही खोऱ्यामध्ये पाठवित आहेत. काश्मीरमध्ये सर्वाधिक सेवन केले जाणारा अंमली पदार्थ हा ओपिओईड हा असून, त्याची पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात तस्करी केले जाते. अंमली पदार्थांच्या या तस्करीमधून दहशतवादाला चालना मिळत असून, तो लवकरात लवकर रोखला जाणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तो खोऱ्यातील एक संपूर्ण पिढी गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.

या अंमली पदार्थांच्या विक्रीमधून तयार होणारा पैसा हा फुटिरतावाद्यांच्या खिशात जात असून त्यामुळे राष्ट्रविरोधी कारवायांचा प्रसार वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी ज्या दहशदावादविरोधी कारवाया केल्या, त्यातून जी कार्यपद्धती उकलली आहे ती एकंदरित समाज आणि सुरक्षेसाठी भयंकर आव्हान देणारी आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात बारामुल्ला जिल्ह्यामध्ये एका नार्को-दहशतवादी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्यात ४५ कोटी रुपयांचे हेरॉइन, चायनीज ग्रेनेड्स आणि चार पिस्तुले यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली. ही टोळी संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या आसपास काम करत होती.

अंमली पदार्थांच्या या तस्करीमधून दहशतवादाला चालना मिळत असून, तो लवकरात लवकर रोखला जाणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तो खोऱ्यातील एक संपूर्ण पिढी गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.

धर्मगुरूंच्या मौनामुळे परिस्थिती आणखी बिघडतेय

सुरक्षा दलाची वाढीव दक्षतेव्यतिरिक्त, जम्मू आणि काश्मीर सरकारने श्रीनगर आणि जम्मू येथे दोन मोठ्या व्यसनमुक्ती केंद्रांची स्थापना केली आहे. तसेच अन्य दहा केंद्रे व्यसनमुक्ती रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर आणि समुपदेशक यांचा समावेश असलेले समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच व्यसनमुक्तीबाबत जागृती करण्यासाठी विविध कार्यशाळा, परिषदा आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. एवढे सारखे होत असताना एक गोष्ट मात्र सातत्याने खटकत राहते ती म्हणजे या भयंकर परिस्थितीबद्दल धार्मिक नेत्यांनी बाळगलेले मौन. हे धार्मिक नेते येथील सामाजिक व्यवस्था अनौपचारिकरित्या नियंत्रित करतात. त्यामुळे त्यांच्या मौनामुळे हे नियंत्रण अधू होऊन बसले आहे.

गेली ३० वर्षे, पाकिस्तानने जमात-ए-इस्लामी, सलाफिझम आणि तबलीग यांसारख्या कट्टरतावादी धार्मिक विचारसरणी रुजवून येथील पारंपरिक धर्मव्यवस्था पद्धतशीररित्या मोडून काढल्या आहेत. या प्रतिस्पर्धी विचारसरणींनी समाजातील विवेकाचा आवाज क्षीण केला आहे. अनेक परंपरा, रुढी, समजुती या आज या कट्टरतावादामुळे विस्मरणात गेल्या आहेत. या कट्टरतावादाशी लोकांनी नाळ जोडल्याने समाजात मोठ्या प्रमाणात फूट पडली आहे. तरुणांचा तोल घसरतो आहे. या बेताल झालेल्या तरुणांच्या वर्तनाने एकीकडे कट्टरतावाद, अतिरेकी उन्माद आणि अंमली पदार्थांचा दुरुपयोग प्रचंड वाढला आहे.

या असल्या धार्मिक विचारांबद्दल मुल्लामंडळी शुक्रवारी आणि उत्सवाच्या वेळी मशिदीमधून प्रवचने देतात. या प्रवचनांमध्ये धार्मिक सिद्धांताबद्दल बोलले जात असले तरीही त्यांची प्रवचने समाजाकडून गांभीर्याने घेतली जातात. एवढे या प्रवचनांचे महत्व असूनही ही मुल्लामंडळी अंमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी काहीही भूमिका घेताना दिसत नाहीत. या अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये अंमली पदार्थांचा धोका आणि त्यामागे असलेली पाकिस्तानचा हात याद्दल गांभीर्याने बोलण्याऐवजी, हे धार्मिक नेते स्वतःच्या गोष्टी सांगण्यात आणि कुराणातील वचने सांगण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे तरुण पिढी आणि काश्मीरची संस्कृती वाचविणे यापेक्षा फुटिरतावाद्यांची हातमिळवणी करून त्यांनी मूग गिळून बसणे पसंत केले आहे.

धार्मिक कार्यक्रमांमध्ये अंमली पदार्थांचा धोका आणि त्यामागे असलेली पाकिस्तानचा हात याद्दल गांभीर्याने बोलण्याऐवजी, हे धार्मिक नेते स्वतःच्या गोष्टी सांगण्यात आणि कुराणातील वचने सांगण्यातच धन्यता मानतात.

परिवर्तनासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाने फक्त ‘अंमलबजावणी’चा सूर आळविण्यापेक्षा ‘विकासा’च्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. त्यातील अरितेकी आणि कट्टरतावाद्यांना रोखण्यासाठी विकासाची कास धरणे गरजेचे आहे. हे परिवर्तन येऊन, लोकांचे भले व्हावे असे वाटत असेल तर धार्मिक नेत्यांनी आपापल्या कोषातून बाहेर येऊन भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. पाकिस्तान आणि त्यांच्या हस्तकांमार्फत काश्मीरवर आणि तेथील तरुणाईवर होणारा हे जीवघेणे आक्रमण रोखण्यासाठी धार्मिक नेत्यांना प्रशासन आणि समाजातील धुरिणांसोबत एकत्र येऊन काम करावेच लागेल.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.