Published on Jun 01, 2021 Commentaries 0 Hours ago

गेल्या वर्षी या सर्व भांडवली बाजारांनी त्यांचा उच्चांक गाठला होता. १२ महिन्यांत गुंतवणूकदारांना भारतातून ८५ टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे, जो जगात सर्वाधिक आहे.

भारतीय बाजार आणि जागतिक अर्थगणित

भांडवली बाजार हा संवेदनशील असतो. जनसमूहाच्या क्रिया-प्रतिक्रियांचे प्रतिबिंब या भांडवली बाजाराच्या निर्देशांकात पडत असते. हा संवेदनशील निर्देशांक कधी उसळी घेतो तर कधी दाणकन खाली आपटतो. म्हणजे एका अर्थी माणसाच्या-जनसमूहाच्या स्वभावाप्रमाणेच सर्व. म्हणूनच २४ मे २०२१ रोजी जेव्हा मुंबई भांडवली बाजाराच्या (बीएसई) भांडवली मूल्याने प्रथमच ३ ट्रिलियन डॉलर संपत्तीचा आकडा पार केला तेव्हा वरील सर्व बाबींचे मूल्यमापन करताना तुम्ही या बाजार भांडवलाचा (सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य) मुद्दाही लक्षात घ्यायला हवा.

बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनी यासंदर्भातील सांख्यिकी सादर केली आहे. ती पुढीलप्रमाणे : ६ कोटी ९० लाख नोंदणीकृत गुंतवणूकदार, १,४०० दलाल, ६९,००० म्युच्युअल फंड वितरक आणि ४,७०० कंपन्या या सगळ्यांनी एकत्र येत हा २१९ लाख कोटी रुपये मूल्याचा पल्ला गाठला असल्याचे चौहान नमूद करतात.

भारताचा जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपी. सकल राष्ट्रीय उत्पादनाची याख्या ढोबळमानाने पुढीलप्रमाणे करता येऊ शकेल. अर्थव्यवस्थेतील सर्व निवासी उत्पादकांची मूल्यवर्धित ढोबळ रक्कम अधिक कोणतेही उत्पादन कर आणि उत्पादनाच्या मूल्यात समाविष्ट करण्यात न आलेली कोणतीही सवलत) अंदाजे १९६ लाख कोटी रुपये आहे. याचाच अर्थ जीडीपीच्या तुलनेत बाजार भांडवल ११२ टक्के अधिक आहे.

गेल्या १५ वर्षांपासून भांडवली बाजाराची एका स्थिर गतीने प्रगती होत आहे. २०१० मधील ९७ टक्क्यांचा अपवाद वगळता भारताचा भांडवली बाजार जीडीपी सरासरीच्या तुलनेत ७० टक्क्यांपर्यंत वाढला. या कालावधीत अर्थव्यवस्था आणि बाजार दोघांचीही स्वतःच्या गतीने स्थिरपणे प्रगती झाली. सध्याचा ११२ टक्के वाढीचा दर उच्चांकी आहे.

भारतीय भांडवली बाजार ११२ टक्क्यांनी वाढलेला असताना जागतिक सरासरी १२९ टक्के आहे. भारतीय भांडवली बाजाराचा विकास दर अमेरिका (२२२ टक्के), कॅनडा (१८० टक्के), दक्षिण कोरिया (१३६ टक्के), जपान (१३३ टक्के) आणि ब्रिटन (१३१ टक्के) यांच्या भांडवली बाजारांपेक्षा कमी आहे. परंतु चीनपेक्षा (७९ टक्के) अधिक आहे.

अर्थात, गेल्या वर्षी या सर्व भांडवली बाजारांनी त्यांचा उच्चांक गाठला होता. १२ महिन्यांत गुंतवणूकदारांना भारतातून ८५ टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे, जो जगात सर्वाधिक आहे. त्यानंतर दक्षिण कोरिया (८१ टक्के), कॅनडा (६३ टक्के), अमेरिका (५१ टक्के), ब्रिटन (४८ टक्के) आणि जर्मनी (४६ टक्के) या देशांचा क्रम लागतो. परंतु एवढ्या अल्पकालीन हालचालींवर आधारलेल्या बाजाराचे मूल्यमापन केले जाऊ शकत नाही. ही एक लाटही असू शकते. गेल्या दोन दशकांत भारतीय बाजारपेठांचे बाजार भांडवली मूल्य कम्पाऊंडेड ऍन्युअल ग्रोथ रेटच्या १८.२ टक्क्यांनी वाढले आहे.

हा विकास विविध पद्धतींनी पाहता येतो. प्रथमतः, विभाजक – जीडीपी विकास. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) आणि जागतिक बँक तसेच इतर बहुराष्ट्रीय संस्था आणि मोठे खासगी दलाल यांच्या मते भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था आहे. आंतरराष्ट्री नाणे निधीच्या (आयएमएफ) एप्रिल, २०२१च्या अहवालात असे भाकीत करण्यात आले आहे की, २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १२.५ टक्के दराने विकसित होईल आणि २०२२ मध्ये हाच विकास दर ६.९ टक्के राहील, जो मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वोच्च असेल.

आशियाई विकास बँकेच्या एप्रिल, २०२१ मधील अहवालातही भारताचा विकास दर यंदा ११.० टक्के राहील आणि २०२२ मध्ये हाच विकास दर ७.० टक्के असेल, जो मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वोच असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रगतिशील अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याचे संकेत असतील तर भांडवली बाजारातही चैतन्य संचारते. तूर्तास बाजार अर्थव्यवस्थेच्याही पुढे जाऊन उच्चांकी उसळला आहे. त्यामुळे बाजार भांडवलीकरणाने जीडीपीच्या तुलनेत १००चा आकडा पार केला आहे.

दुसरा मुद्दा, परताव्याचा. गेल्या ३० वर्षांत भांडवली बाजाराच्या निर्देशांकाने १००० वरून ५०,००० पर्यंत झेप घेतली आहे. सीएजीआर (कम्पाऊंडेड ऍन्युअल ग्रोथ रेट) १४.९ टक्के राहिला आहे. गेल्या २० वर्षांत हा दर १३.४ टक्क होता. १० वर्षांत ११.९ टक्के आणि गेल्या पाच वर्षांत हा दर १४.६ टक्के होता. सध्या ज्या बाजारांचे भांडवली मूल्य २ ट्रिलियन डॉलरहून अधिक आहे त्यांच्यात परताव्याच्या हा दर सर्वोच्च आहे. गेल्या ३०, २०, १० आणि पाच वर्षांत अमेरिकी भांडवली बाजारातून मिळणारे परतावे अनुक्रमे ८.६ टक्के, ६.१ टक्के, ११.२ टक्के आणि १४.६ टक्के या दराचे आहेत. हेच परताव्याचे दर हाँगकाँगमध्ये ७.० टक्के, ४.८ टक्के, ४.० टक्के आणि ११.७ टक्के आहेत. अतिरिक्त तरलतेमुळे जगभरातच भागभांडवलाच्या किमती (स्टॉक प्राइस) घसरू लागल्या आहेत. भारतात मात्र गुंतवणूकदार इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत असल्याने या किमती वाढत आहेत.

तिसरा मुद्दा म्हणजे भागभांडवल आणि बाजार भांडवलीकरण यांच्यात वाढ होण्याने मूल्यांमध्ये सुसंगत अशी वाढ होते, त्यामुळे काही विश्लेषकांची मते इतर बाजारांप्रमाणेच भारतीय भांडवली बाजारही वाजवीपेक्षा अधिक मूल्याचा ठरतो. ३१ पट एवढ्या गतीने, कमाईमध्ये कैकपटीने वाढ करण्याची भारताची पत इतरांमध्ये अधिक आहे. एकदाच सर्वोच्च असणे यात काही अडचण नाही परंतु पीई गुणोत्तर सातत्याने राखून ठेवणे हे अडचणीचे ठरू शकते. परंतु सध्याचे उच्च पीई गुणोत्तर कदाचित अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या भूतकाळातील वाटचालीवर आणि विकासाचा हाच वेग भविष्यातही कायम रहावा या अपेक्षेवर परिणामकारक ठरू शकला असेल. त्यामुळे देश आणि त्याच्या माध्यमातून कंपन्या, ज्या अर्थव्यस्थेपेक्षा अधिक जोमाने प्रगती साधत आहेत, यांना लाभ मिळतात. अर्थात हे चित्र एका रात्रीत बदलू शकते.

आणि चौथा मुद्दा म्हणजे ग्राहकांची मोठी बाजारपेठ आणि औद्योगिक व सेवा उपक्रमांची एकत्रित मोठ्या प्रमाणावर उपलब्धता ज्यांना मोठ्या व्यावसायिक आकांक्षा आहेत, यांमुळे चमत्कार घडतात. भारतीय उद्योग उड्डाण घेण्याच्या तयारीत आहे का? याची खात्री आपण देऊ शकत नाही. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी यांच्यानंतर जगातील पाचव्या क्रमांकाची सुमारे २.७ ट्रिलियन डॉलरची भारतीय अर्थव्यवस्था असून या दशकात जगातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यस्था म्हणून विकसित होण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जीडीपीला कंपन्यांवर स्वार व्हावे लागेल. चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेले असतानाही जागतिक तसेच भारतीय गुंतवणूकदार, हे उद्दिष्ट शक्य असल्याचे मान्य करतात.

भारतीय कंपन्यांचे ३ ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल मोठ्या प्रमाणावर संस्थात्मक प्रमाण दर्शवते, ज्यामध्ये थेट गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे आणि ही गुंतवणूक म्युच्युअल फंड्स, विमा आणि भविष्य निर्वाह निधी यांच्या माध्यमातून होत असते. मात्र, यातला विरोधाभास असा आहे की, या गुंतवणुकांच्या शक्तीने मूल्य उच्चांकावर नेऊन ठेवले आहे असे नाही तर अंतर्निहित कंपन्यांचे सशक्तीकरण होऊन त्या बाजारमूल्यांच्या बरोबरीने येऊ पाहात आहेत.

एक असाही सिद्धांत आहे की, बाजार अल्पावधीत हलू शकतो परंतु दीर्घावधीत तो पुन्हा मूळ जागी दीर्घ काळासाठी परतू शकतो. पुढील दशकात बाजार नक्कीच अधिक जोमाने फुलेल आणि उसळी घेईल. परंतु हा परतीचा फेरा, पुन्हा दीर्घकाळासाठी असेल, अधिक वेळा घडेल कारण बाजार मूल्य कमी होण्याऐवजी कंपन्यांचे उत्पन्न वाढेल.

भांडवली बाजार हे अल्पावधीसाठी मूडी स्वभावाचे असतात परंतु दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचार केल्यास त्यांच्याकडून चांगले परतावे मिळतात. आणि कितीही चांगल्या कथा असल्या तरी कधीतरी हे अंदाजही चुकू शकतात. कोणत्याही क्षणी ते जादा किमतीचे वाटू शकतात. अनेकदा या बाजारांनी विश्लेषकांना खोटेही ठरवले आहे. तुम्ही भारतीय गुंतवणूकादर असाल तर तुम्ही गुंतवणूक करायलाच हवी. परंतु तुम्ही परदेशी असाल तर हे लक्षात ठेवा की भांडवली बाजाराच्या निर्देशांकाने ५०,००० चा टप्पा ओलांडला असून भारत अशा टप्प्यावर पोहोचला आहे की जिथे १० टक्के इक्विटी एक्स्पोजर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणे गरजेचे असून त्यातून प्रगती साधता येईल, परंतु हे सर्व भारतीय बाजारांतच शक्य आहे, उगवत्या किंवा आशियाई बाजारांत नाही. अर्थात तुम्ही यासाठी सहमत होण्याआधी तुम्ही निर्देशांक ६०,००० किंवा ७५,००० वा त्याहून अधिक उच्चांकापर्यंत पोहोचण्याची वाट तुम्हाला पहावी लागेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.