-
CENTRES
Progammes & Centres
Location
प्रमुख पारंपरिक शस्त्रांच्या वितरणाच्या प्रमाणाचा कल (ट्रेंड-इंडिकेटर व्हॅल्यू- टीआयव्ही) सध्या आहे तसाच सुरू राहिल्यास भारताचे रशियाच्या निर्यातीवरील अवलंबित्व नाहीसे होईल.
सध्या सुरू असलेल्या युक्रेन पेचप्रसंगादरम्यान, युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणाबाबत भारताने घेतलेल्या ‘तटस्थ’ भूमिकेभोवतीचे जे अनेक विवाद आहेत, ते शस्त्रास्त्रांच्या आयातीकरता भारताचे रशियावर जे अवलंबित्व आहे, त्याच्याशी केंद्रित आहेत. रशियाकडून भारत करीत असलेली शस्त्रास्त्रांची आयात आणि त्याचा भारताची संरक्षण औद्योगिक क्षमता आणि भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी असलेला संबंध या लेखात विशद करण्यात आला आहे.
भारताने १९५० च्या दशकात रशियाकडून शस्त्रे आयात करण्यास सुरुवात केली. इल्युशिन आयवन-१४ मालवाहू वाहतूक विमाने ही भारतीय ताफ्यात समाविष्ट झालेली पहिली विमाने होती, त्यानंतर मिग-२१ लढाऊ विमाने भारताच्या ताफ्यात दाखल झाली. १९६२ सालापासून रशियावर असलेले भारताचे आयात अवलंबित्व सातत्याने वाढत आहे. आजही भारतात लक्षणीय प्रमाणात रशिया-निर्मित व्यासपीठे अस्तित्वात आहेत आणि शीतयुद्धानंतरच्या काळात, भारताने मोठ्या प्रमाणात अधिग्रहणे केली आहेत.
तक्ता क्र. १ मध्ये, १९९९ ते २०२१ दरम्यान भारत रशियाकडून जी शस्त्रास्त्रआयात करतो, त्याचे प्रकार स्पष्ट केले आहेत. आपण १९९९ पासून सुरुवात करूया, कारण १९८७-१९९८ या कालावधीत, अगदी मर्यादित प्रमाणात अधिग्रहण झाले होते, या कालावधीला भारताच्या संरक्षण खरेदी इतिहासातील ‘हरवलेले दशक’ मानले जाते. भारताच्या अधिग्रहणांचे नमुने आणि स्वरूप यावरून, रशियाचे भारतीय संरक्षण बाजारपेठेत अद्यापही सर्वोच्च स्थान असल्याचे स्पष्ट दिसून येते. तक्ता क्र. १ वरून, भारताने दोन दशकांहून अधिक काळ रशियाकडून संपादन केलेल्या शस्त्रास्त्रांची विविधता आणि रशियाकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व स्पष्ट होते. सर्वच नाही, परंतु यातील बरीचशी उपकरणे भारतीय सूचीत किमान पुढील दोन दशके कार्यरत राहतील.
तक्ता १: रशियामधून आयात केलेल्या शस्त्रास्त्रांचे प्रकार (१९९९-२०२१)
शस्त्रास्त्रांचे प्रकार | शस्त्रास्त्रे/ उपकरणे |
क्षेपणास्त्र प्रक्षेपक आणि तोफखाना प्रणालीचा समावेश असलेली क्षेपणास्त्र प्रणाली |
१९९९-२००५: आर-२७इआरआय-४० आर-२७इटीआय-३६ आर-७३इ-१०० आरव्हीव्ही-एइ ३०, युरान ३एम २४ इ, युरान ३एम २४इ लढाऊ क्षेपणास्त्र, युरान ३एम २४इ एनएच सराव क्षेपणास्त्र, क्लब क्षेपणास्त्र, लढाऊ, क्लब क्षेपणास्त्र, सराव, क्लब क्षेपणास्त्रासाठी कंटेनर, आरव्हीव्ही एइ क्षेपणास्त्रांसाठीचे प्रक्षेपक, क्लब जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रक्षेपक २००६-२०११ : हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, एसएएम (३एम २४इ), मोठ्या ताकदीची क्षेपणास्त्र प्रणाली ९ए५२०२टी क्षेपणास्त्र व्यवस्था स्मेर्क एमएलआरएस, ट्रान्सपॉन्डर लोडर वाहन, ९ए५२-२टी एमएलआरएस ‘स्मेर्क’, ९टी२३४-२टी वाहतूक लोडिंग वाहने, एसएएम (९एम३८एम१), एसएसएम (३एम५४इ), जमिनीवर हल्ला करणारी क्षेपणास्त्रे (३एम१४इ), क्षेपणास्त्रे आर-७३इ, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे २०१२-२०१६: स्ट्रेला १० एम (लष्कर) साठी विमानविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे, आरव्हीव्ही-एइ क्षेपणास्त्रे, कॉन्कर्स क्षेपणास्त्रे, इन्वर क्षेपणास्त्रे, स्मेर्क रॉकेट प्रोजेक्टाइल्स, १२२ मिमि रॉकेट प्रोजेक्टाइल्स, ग्रॅड (बीएम) २०१७: एस-४०० ट्रायम्फ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, ९एम११४ कोकॉन रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे, स्मेर्क रॉकेट प्रक्षेपक प्रणाली, ३एम-५४इ क्लब कमी उंचीवरून उडणारे क्रुज क्षेपणास्त्र, आर-२७आर, आर-७३ आणि आर-७७ हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र |
लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स |
१९९९-२००५: एसयु-३० एसी, एसयु-३० एमके१ विमाने, मिग-२१ युएम, कामोव्ह-३१, एमआय-१७ आयव्ही, आयएल-३८ २००६-२०११: सीएसयु ३० एमके१, एसयु-३०एमके१, मिग २९के युद्धनौकेवर तैनात केलेली लढाऊ विमाने (नौदल), एमआय-१७ व्ही५ मध्यम उंचीवरून हवेत उडणारी विमाने (हवाई दल), केए-३१ युद्धनौकेवर तैनात केलेली लढाऊ विमाने (नौदल) २०१२-२०१६: मिग २९ के युद्धनौकेवर तैनात केलेली लढाऊ विमाने (नौदल), एमआय-१७ व्ही५ मध्यम उंचीवरून हवेत उडणारी विमाने (हवाई दल), केए३१ युद्धनौकेवर तैनात केलेली लढाऊ विमाने (हवाई दल) २०१७: मिग-२९ के नौदलाचे लढाऊ विमान, एसयु-३० एमकेआय लढाऊ विमान संच, केए-३१ नौदल हेलिकॉप्टर्स |
युद्धनौका, पाणबुड्या आणि नौदल यंत्रणा |
१९९९-२००५: किलो प्रवर्गातील पाणबुडी, क्रिवाक प्रवर्गातील मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट्स २०१२-२०१६: ११३५.६ (नौदल) युद्धनौका, आयएनएस विक्रमादित्य (नी गोर्शकोव्ह) विमानवाहू युद्धनौका २०१७: आयएनएस चक्र आण्विक पाणबुडी (भाडेपट्टीवर) |
लढाऊ रणगाडे |
१९९९-२००५: लढाऊ रणगाडे (टी-९०५/टी-९०५के) २००६-२०११: टी-९०सी, टी-९०सीके, टी-९०, एस आणि एसके प्रवर्गातील रणगाडे |
स्रोत: संयुक्त राष्ट्र संघटनेचे पारंपरिक शस्त्रास्त्रांचे नोंदपुस्तक, स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेची शस्त्रास्त्र हस्तांतरणाची माहिती
आलेख क्र. १ मध्ये दर्शवल्यानुसार, गेल्या ३० वर्षांत भारताने रशियाकडून केलेल्या आयातीवरून असे दिसून येते की, १९९१ ते २००१ या दशकात रशियाकडून भारताला झालेले शस्त्रास्त्रांचे हस्तांतरण सर्वात कमी होते. भारताने रशियाकडून केलेल्या या मर्यादित आयातीला दोन मुख्य घटक कारणीभूत आहेत. पहिला घटक म्हणजे, पूर्वीच्या सोव्हिएत युनियनच्या पतनामुळे सोव्हिएत युनियनचे उत्तराधिकारी-रशियन फेडरेशन यांच्याकडून पुरवठा आणि वितरणास अडथळा आला. रशियाकडून भारताने केलेली आयात मर्यादित प्रमाणात होती, याचे स्पष्टीकरण देणारा दुसरा घटक म्हणजे या दशकात भारतीय संरक्षण अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून भांडवली संपादनासाठी (ज्यात युद्धनौका, लढाऊ विमाने इत्यादी मोठ्या वस्तूंचा समावेश होतो) कमी आर्थिक तरतूद केली गेली. खरोखरीच, या कालावधीत रशियाकडून ७.६५ अब्ज अमेरिकी डॉलर्स किमतीच्या शस्त्रास्त्रांचे हस्तांतरण झाले.
२००१-२०१० या पुढील दशकादरम्यान, यात १४ अब्ज अमेरिकी डॉलर्सने वाढ झाली, ही वाढ मागील दशकापेक्षा जवळपास दुप्पट होती. २०११ ते २०२१ या दशकात, रशियाने भारताला २२.८ अब्ज अमेरिकी डॉलर्स किमतीची शस्त्रास्त्रे हस्तांतरित केली, मागील दशकाच्या तुलनेत याचे प्रमाण ४२.५ टक्के अधिक होते. जरी आपण २०२१ हे वर्ष वगळले, तरीही २००१-२०१० या कालावधीच्या तुलनेत, रशियाने भारताला केलेल्या शस्त्रास्त्रांचे हस्तांतरण ३६.४ टक्के जास्त असेल. खाली नमूद केलेली आकडेवारी पाहिल्यानंतर बोध होतो की, इतर पुरवठादारांना फायदा झाला आहे, भारत रशियाकडून जी संरक्षणविषयक आयात करतो, त्यावरील भारताचे अवलंबित्व केवळ भांडवली खर्चाच्या बाबतीत वाढले आहे.
आलेख १: १९९१ सालापासून रशियाकडून भारताने केलेली शस्त्रास्त्रांची आयात
स्रोत: स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेची शस्त्रास्त्र हस्तांतरणाची माहिती (आकडे दशलक्ष डॉलर्समध्ये आहेत.)
२०११ ते २०२१ दरम्यानच्या दशकात, आलेख क्र. २ मध्ये दर्शवल्याप्रमाणे, रशियाकडून भारत जी आयात करायचा, त्याचे प्रमाण (ट्रेंड इंडिकेटर व्हॅल्यू) २२.८ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके होते. याच कालावधीत, अमेरिका, इंग्लंड, इस्रायल आणि फ्रान्समधून भारत करत असलेली एकूण आयात १३.५ अब्ज अमेरिकी डॉलर्स अथवा रशियाकडून केल्या जाणाऱ्या भारतातील एकूण आयातीच्या ५९.२१ टक्के होती. त्याचप्रमाणे, याच कालावधीत या चार देशांकडून भारत जी आयात करायचा, त्याचा वाटा अंदाजे २.१ अब्ज अमेरिकी डॉलर्स किंवा अंदाजे १६.८ टक्के म्हणजेच भारताच्या रशियाकडून केल्या जाणाऱ्या आयातीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक होता.
मात्र, आलेख क्र. २ वर बारकाईने नजर टाकल्यास हेही सूचित होते की, फ्रान्स आणि अमेरिका या सर्वात मोठ्या दोन पुरवठादार देशांकडून भारत करत असलेली शस्त्रास्त्रांची आयात- प्रत्येकी ४.६ अब्ज अमेरिकी डॉलर्स आणि एकत्रितपणे ९.२ अब्ज अमेरिकी डॉलर्स होती. याच कालावधीत, भारतासाठी फ्रान्सचा आणि अमेरिकेचा एकत्रित आयात वाटा २.२ अब्ज अमेरिकी डॉलर्स किंवा २१.३ टक्के होता, जो भारताच्या रशियाकडून होणाऱ्या एकूण आयातीपैकी निम्म्याहून कमी होता. यावरून हे सूचित होते की, रशियावर भारताचे शस्त्रास्त्र अवलंबित्व अजूनही अधिक आहे. असे असले तरी, भारत रशियाकडून करीत असलेल्या आयातीमधील रशियाच्या वाट्याच्या तुलनेत बिगर-रशियन स्रोतांकडून भारत करत असलेल्या आयातीच्या प्रमाणाचा कल (ट्रेंड-इंडिकेटर व्हॅल्यू) वाढला आहे आणि २००१-२०११ च्या तुलनेत मागील दशकाची आकडेवारी यास दुजोरा देते.
२००१ ते २०११ या कालावधीत, भारताने रशियाकडून केलेली शस्त्रास्त्रांची आयात १७.२९ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती, जी आलेख क्र. ३ मध्ये दर्शवली आहे. रशियाकडून भारत जी शस्त्रास्त्रआयात करायचा, ती पुढील चार सर्वात मोठ्या पुरवठादारांपेक्षा पाच पटीने अधिक होती. आलेख क्र. ३ मध्ये दाखवल्यानुसार, त्यांची भारतात होणारी एकूण आयात ३.३२ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती. अशा प्रकारे, या कालावधीत चार सर्वात मोठ्या बिगर-रशियन पुरवठादारांचा भारताच्या आयातीतील वाटा हा रशियाकडून भारत करत असलेल्या एकूण आयातीच्या १९.२० टक्के इतका होता. २०११ ते २०२१ या दशकात, भारत ज्या चार सर्वात मोठ्या बिगर-रशियन पुरवठादारांकडून आयात करीत होता, त्यांचा वाटा रशियाच्या एकूण आयातीच्या तुलनेत ५९.२१ टक्के एवढा होता, म्हणजेच त्यांचा वाटा मागील दशकाच्या तुलनेत तीन पटीने वाढला होता. २००१ ते २०११ या दशकाच्या तुलनेत, २०११ ते २०२१ या दशकात रशियाकडून भारत करीत असलेली एकूण आयात ५ अब्ज अमेरिकी डॉलर्स जास्त होती. तरीसुद्धा, शस्त्रांच्या वितरणाच्या प्रमाणाचा कल (ट्रेंड-इंडिकेटर व्हॅल्यू) पाहिल्यास, किमान गेल्या दशकात, बिगर-रशियन स्त्रोतांकडून भारत करत असलेल्या आयातीत वाढ झाल्याचे दिसून येते, परंतु, रशिया कमी फरकाने असूनही, सर्वात मोठा एकल पुरवठादार म्हणून आघाडीवर आहे.
आलेख २: भारत करीत असलेल्या शस्त्रास्त्रांच्या आयातीच्या प्रमाणाचा कल (२०११-२०२१)
आलेख ३: भारत करीत असलेल्या शस्त्रास्त्रांच्या आयातीच्या प्रमाणाचा कल (२००१-२०११)
स्रोत: स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेची शस्त्रास्त्र हस्तांतरणाची माहिती
अखेरीस, भारताच्या इतर चार प्रमुख पुरवठादारांच्या तुलनेत भारत रशियाकडून जी आयात करतो, त्याचा वाटा जास्त आहे. आलेख क्र. ४ वर एक नजर टाकल्यास असे दिसून येते की, २०२१ साली, भारताने फ्रान्सकडून २.१ अब्ज अमेरिकी डॉलर्स किमतीच्या शस्त्रास्त्रांची आयात केली. भारताच्या शस्त्रास्त्रआयातीत रशियाहून अधिक वाटा असलेला फ्रान्स हा एकमेव पुरवठादार देश होता. अन्यथा, २०११ ते २०२१ या कालावधीत इतर कोणत्याही देशाने रशियाकडून भारत करीत असलेल्या आयातीचा वाटा ओलांडला नाही. २०१४ साली, रशियाच्या तुलनेत, १.१ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा शस्त्रास्त्रपुरवठा भारताला करून, अमेरिका पुरवठादारांमध्ये द्वितीय क्रमांकावर होता. मात्र, रशिया आणि अमेरिका यांच्या आकड्यांत मोठी तफावत होती. रशियाने एकत्रितपणे १ अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक पुरवठा केला. मात्र, इतर चार बिगर-रशियन पुरवठादारांनी आलेख क्र. २ मध्ये दाखवल्यानुसार, भारताच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीत लक्षणीय नफा संपादन केला आहे.
आलेख क्र. ४: इतर प्रमुख पुरवठादारांच्या तुलनेत भारत करीत असलेल्या शस्त्रास्त्रांच्या आयातीमधील रशियाचा वाटा (२०११-२०२१)
स्रोत: स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेची शस्त्रास्त्र हस्तांतरणाची माहिती (आकडे दशलक्ष डॉलर्समध्ये आहेत.)
जर सध्याच्या आयातीच्या प्रमाणाचा कल (ट्रेंड-इंडिकेटर व्हॅल्यू) पुढील दशकात (२०२१-२०३१) दरम्यान कायम राहिल्यास आणि भारताची सध्याची संरक्षण औद्योगिकीकरणाची मोहीम रुळावर राहिल्यास, भारताकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या आयातीतील रशियाचा वाटा आणि इतर पुरवठादारांमधील तफावत आणखी कमी होईल.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Kartik Bommakanti is a Senior Fellow with the Strategic Studies Programme. Kartik specialises in space military issues and his research is primarily centred on the ...
Read More +Dr Sameer Patil is Director, Centre for Security, Strategy and Technology at the Observer Research Foundation. His work focuses on the intersection of technology and national ...
Read More +