-
CENTRES
Progammes & Centres
Location
कोणत्याही निवडणुकीतील बहुमत सर्वशक्तीशाली ठरत नाही व कोणतेही वैचारिक वर्चस्व कायमस्वरूपी टिकून राहू शकत नाही हा भारताच्या राजकीय मांडणीतील विविधतेचा अर्थ आहे.
हा लेख भारत @७५ : भारतीय लोकशाहीच्या प्रमुख संस्थांचे मूल्यांकन या मालिकेचा भाग आहे.
_________________________________________________________________________
भारतीय लोकशाहीमध्ये मूलभूत परिवर्तन होत आहे हे सर्वज्ञात आहे. निवडणूकांतील स्पर्धेच्या स्वरूपातील पद्धतशीर बदल, मध्यमवर्गात झालेली वाढ, सोशल मीडियाचा वाढता वापर आणि जुन्या वर्गव्यवस्थेचे लोप पावणे यासह अनेक बदलांनी हे दिसून आले आहे. २०१४ पासून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सामाजिक आणि भौगोलिक विस्ताराने राजकीय अवकाशात अनेक बदल झाले आहेत, परिणामी काँग्रेस आणखी दुर्लक्षित होऊन, डावे कमजोर झाले आहेत आणि राज्यस्तरीय पक्षांची ताकद कमी झाली आहे. भाजपने याचा पुरेपुर फायदा घेतला आहे. अर्थातच यामुळे भूतकाळात सामाजिक तफावतीचा परिणाम असलेल्या विविध मतदार गटांमधील फरक कमी झाला आहे. तसेच गेली २ दशके राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव असलेल्या प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी झाले आहे.
भूतकाळात सामाजिक तफावतीचा परिणाम असलेल्या विविध मतदान गटांमधील फरक कमी झाला आहे. अर्थातच भाजपने याचा पुरेपुर फायदा घेतला आहे.
भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना, या झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय अवकाशात तसेच देशाच्या लोकशाहीला आकार देणाऱ्या राजकीय पक्षांच्या भूमिकेचे आम्ही मूल्यांकन करत आहोत. हे राजकीय पक्ष वैयक्तिक तक्रारी मांडण्याचे माध्यम, राजकीय महत्त्वाकांक्षेचे साधन आणि राजकीय तोडगा काढण्यासाठी हितसंबंधांचे व्यासपीठ यांसंबंधी नागरिक आणि सरकार यांना जोडणारा दुवा म्हणून काम करतात. म्हणूनच, आधुनिक लोकशाही राजकीय पक्षांशिवाय अकल्पनीय आहे.
राजकीय पक्षांचे स्वतःचे संघटनात्मक जीवन असते, ते राजकीय व्यवस्थेतही परावर्तीत होते. ते प्रणालीचे घटक किंवा ‘भाग’ आहेत आणि म्हणून प्रणालीतील बदलांचे परिणाम नैसर्गिकरित्या त्यांच्यावर होतात. भारतातील पक्ष व्यवस्थेत अगदी सुरुवातीपासून किमान चार बदल झाले आहेत हे सर्वमान्य आहे. सर्वप्रथम, पक्ष व्यवस्थेत (१९५२-६७), काँग्रेस हा राष्ट्रीय स्तरावर आणि बहुतेक राज्यांमध्ये विजय मिळवणारा प्रमुख पक्ष होता याला ‘काँग्रेस व्यवस्था’ असे म्हटले गेले. पुढील टप्प्यात (१९६७-८९) अनेक राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या विरोधात अनेक प्रादेशिक पक्ष उदयाला आले परिणामी राज्य पक्ष प्रणालीचे ध्रुवीकरण झाले. काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर विजय मिळवत असतानाच, बिगर-काँग्रेस विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणात जागा आणि मतसंख्या जिंकण्यास सुरुवात केली.
सध्याच्या पक्ष पद्धतीची सुरुवात २०१४ मध्ये भाजपच्या हुकमी बहुमतापासून झाली आहे. २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून आणि पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे भारताने भाजपच्या भोवती असलेल्या दुस-या-प्रबळ पक्ष प्रणालीच्या टप्प्यात प्रवेश केला आहे, हे स्पष्ट झाले आहे.
तिसर्या टप्प्यात (१९८९-२०१४) काँग्रेसनंतरच्या राजकारणात स्पर्धात्मक बहु-पक्षीय प्रणाली उद्याला आली. यात कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळू न शकल्याने राष्ट्रीय स्तरावर युती सरकारे स्थापन झाली. परिणामी, प्रादेशिक पक्षांना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर मोठे महत्त्व प्राप्त झाले. सध्याच्या पक्ष पद्धतीची सुरुवात २०१४ मध्ये भाजपच्या हुकमी बहुमतापासून झाली आहे. २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून आणि पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे भारताने भाजपच्या भोवती असलेल्या दुस-या-प्रबळ पक्ष प्रणालीच्या टप्प्यात प्रवेश केला आहे, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे विरोधी पक्ष झाकोळून गेला आहे.
भारतातील निवडणूक स्पर्धेची वैचारिक चौकट काय आहे ? आणि भारत ही संकल्पना राजकीय पक्ष, पक्ष प्रणाली आणि लोकशाहीला कसा आकार देते ?
यात पाच व्यापक ट्रेंड आहेत.
भारताचे राजकीय पक्ष या सामाजिक शक्तींसाठी व्यासपीठ म्हणून काम करते. काही वेळा ते यशस्वी ठरतात तर काही वेळा अपयशी ठरतात.
महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका जिंकणारे राज्यस्तरीय पक्ष एकीकडे तर भाजपच्या वैचारिक वर्चस्वासह रस्त्यावर निदर्शने करणारे सक्रिय नागरिक दूसरीकडे हे आपल्या देशाच्या राजकारणातील विरोधाभास समजून घेणे गरजेचे आहे. एकीकडे भारतातील बहुतांश राजकीय पक्ष संघटना संपुष्टात येत आहेत तर दुसरीकडे केंद्रीकरणाची प्रवृत्ती दिसून येत असली तरीही उपेक्षित गटांच्या प्रतिनिधित्वासारख्या लोकशाहीशी निगडीत मुद्दे राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, हे विरोधाभास समजून घेणे कठीण आहे.
भारतीय लोकशाही हे संस्थात्मक रचनेचे जसे उदाहरण आहे तसेच ते समाजात रुजलेल्या विरोधाभासी शक्तींचा परिणाम आहे. भारताचे राजकीय पक्ष या सामाजिक शक्तींसाठी व्यासपीठ म्हणून काम करते. काही वेळा ते यशस्वी ठरतात तर काही वेळा अपयशी ठरतात. याचा परिणाम म्हणून दैनंदिन राजकारणाला आकार येत आहे. राजकारणातील घडामोडी आणि भारतातील राजकारण्यांचे उद्योजकीय मुल्य हे हेजीमोनिक दर्जा प्राप्त करणार्या कोणत्याही प्रकारच्या राजकीय संस्कृतीविरूद्ध सुरक्षा झडपाचे काम करू शकते. कोणत्याही निवडणुकीतील बहुमत सर्वशक्तीशाली ठरत नाही व कोणतेही वैचारिक वर्चस्व कायमस्वरूपी टिकून राहू शकत नाही हा भारताच्या राजकीय मांडणीतील विविधतेचा अर्थ आहे. भारताच्या वैविध्यपूर्ण मांडणीत सतत होणारे मंथन हे लोकशाहीचा समतोल सुनिश्चित करत राहणार आहे.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Rahul Verma is a Fellow at the Centre for Policy Research (CPR) and visiting assistant professor of political science at Ashoka University. His research interests ...
Read More +