Published on Oct 09, 2023 Commentaries 0 Hours ago

भारत आणि सिंगापूरच्या नौदलांनी 21 सप्टेंबरला त्यांच्या वार्षिक सागरी लष्करी सरावाला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये दक्षिण चीन समुद्रात कवायतींचा समावेश असणार आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका निवेदनानुसार सिंगापूर-भारत सागरी द्विपक्षीय सराव (SIMBEX) हा जवळपास 1994 पासून हाती घेण्यात आला आहे. “भारतीय नौदलाने अन्य कोणत्याही देशांसोबत केलेला हा सर्वात लांब आणि सतत चालणारा सराव आहे.”

2023 मध्ये 21-28 सप्टेंबर दरम्यानचा सराव हा सिमबेक्सची 30 वी आवृत्ती आहे. भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांनी त्यांचे लष्करी तसेच सुरक्षा संबंध अधिक मजबूत करण्यासाठी राजकीय आणि धोरणात्मक वचनबद्धतेचे यामधून प्रदर्शन होत आहे.

सिंगापूरच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की SIMBEX चांगी नौदल तळावरील RSS सिंगापुर येथे हार्बर टप्पा (21 ते 24 सप्टेंबर) आणि आंतरराष्ट्रीय दक्षिण चीन समुद्राच्या पाण्यात दक्षिणेकडील भागात समुद्र टप्पा (25-28 सप्टेंबर) हे समाविष्ट आहे.

भारताकडून केलेल्या निवेदनामध्ये दोन टप्प्यांचा तपशील देताना म्हटले आहे की, बंदर/किनाऱ्याच्या टप्प्यात व्यावसायिक संवादांची मालिका, क्रॉस-डेक भेटी, विषय तज्ञ एक्सचेंजेस (SMEE) आणि स्पोर्ट्स फिक्स्चर यांचा समावेश केला जाणार आहे. हे सर्व उत्तम इंटरऑपरेबिलिटी सुनिश्चित करण्याच्या उद्दिष्टाने तसेच दोन्ही नौदलांमधील परस्पर समंजसपणा वाढविण्यासाठी केले जात आहे.

सागरी टप्प्यामध्ये  “जटिल आणि प्रगत हवाई संरक्षण सराव, तोफखाना गोळीबार, सामरिक युक्ती, पाणबुडीविरोधी सराव आणि इतर सागरी ऑपरेशन्स” यांचा समावेश राहणार आहे. सरावातील प्रत्येक युद्ध अभ्यासाचे उद्दिष्ट नौदलाचे युद्ध कौशल्य वृद्धिंगत करून, सामुद्रिक क्षेत्रात संयुक्तपणे बहु शिस्त ऑपरेशन्स करण्यासाठी त्यांची क्षमता मजबूत करणे हे आहे. सिंगापूरच्या निवेदनामध्ये म्हटले आहे की दोन्ही नौदल पाणबुडी बचाव संयुक्त मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (JSOP) दस्तऐवजावर स्वाक्षरी करणार आहेत.

SIMBEX च्या या वर्षीच्या सरावाच्या आवृत्तीत पुढे दिलेल्या गोष्टींचा समावेश असेल. RSS Stalwart आणि RSS Tenacious, दोन्ही S-70B नौदल हेलिकॉप्टर वाहून नेणारी दोन फॉर्मिडेबल-क्लास फ्रिगेट्स आणि रॉयल सिंगापूर नेव्हीकडून एक विजय-श्रेणी क्षेपणास्त्र कॉर्व्हेट, RSS व्हॅलोर, तसेच, रॉयल सिंगापूर हवाई दलाकडून फोकर-५० सागरी गस्ती विमान आणि चार एफ-१५एसजी लढाऊ विमाने असतील. भारताकडील बाजूचे प्रतिनिधित्व राजपूत श्रेणीतील विनाशक आयएनएस रणविजय करणार आहे; कमोर्टा-क्लास कार्वेट, INS कावरत्ती; आणि भारतीय नौदलाचे P-8I सागरी गस्ती विमान सहभागी असेल. सिंगापूरच्या निवेदनात म्हटले आहे की या आवृत्तीत सागरी सरावासाठी प्रत्येकी एक पाणबुडी तैनात करणाऱ्या दोन नौदलांचाही समावेश असणार आहे.

सिंगापूर नेव्ही फ्लीट कमांडर कर्नल क्वान होन चुओंग यांनी द्विपक्षीय सागरी सरावाच्या SIMBEX23 च्या सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. क्वान म्हणाले की, SIMBEX “त्याच्या माफक सुरुवातीपासून एक मजबूत व्यासपीठ म्हणून विकसित झाले आहे. जे केवळ आमच्या ऑपरेशनल क्षमतांनाच बळकटी देत नाही तर आमच्या खलाशांना जोडणारे मैत्रीचे बंधन देखील वाढवत जाणार आहे”

भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांसाठी त्यांच्या लष्करी गुंतवणुकीचा विस्तार, सखोलता आणि सुरक्षा सल्लामसलत, युद्धखोर चीनच्या तोंडावर त्यांच्या लष्करी आणि राजनैतिक डावपेचांचा एक भाग आहे.

2023 मध्ये मार्च महिन्यात भारतीय लष्कर आणि सिंगापूर आर्मीने तेराव्या वृत्तीचे सराव करताना बोर्ड कुरुक्षेत्र या द्विपक्षीय शस्त्रास्त्र सरावाचे आयोजन केले होते. गेल्या काही वर्षात या सरावांना अधिक परिष्कृतता प्राप्त केलेली आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार दोन्ही सैन्यांमध्ये प्रथमच कमांड पोस्ट सरावात भाग घेतला आहे. ज्यामध्ये बटालियन- ब्रिगेड-स्तरीय नियोजन घटक आणि संगणक युद्ध गेमिंगचा देखील समावेश करण्यात आला होता.

भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार दोन्ही सैन्यांमध्ये प्रथमच कमांड पोस्ट सरावात भाग घेतला आहे. ज्यामध्ये बटालियन- ब्रिगेड-स्तरीय नियोजन घटक आणि संगणक युद्ध गेमिंगचा देखील समावेश करण्यात आला होता.

42 व्या बटालियन सिंगापूर आर्मर्ड रेजिमेंट आणि भारतीय सैन्याच्या आर्मर्ड मधील ब्रिगेडमधील जवानांसह दहा दिवसांचा हा सराव उभारणाऱ्या धोक्यांमध्ये तसेच विकसित होत असलेल्या नव्या तंत्रज्ञानामध्ये यांत्रिक युद्धाची सामान्य समज विकसित करण्यासाठी तसेच संगणक सिमुलेशन आधारित इंटरऑपरेबिलिटी विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक फायदेशीर ठरला आहे. संयुक्त कमांड पोस्टद्वारे नियंत्रित असलेल्या संयुक्त ऑपरेशनल आणि रणनीती प्रक्रियेचा वापर करून वॉरगेम देखील पूर्ण करण्यात आला.

अशा प्रकारच्या कवायतींना एकमेकांचे कार्यपद्धती तसेच सरावांमधील सामायिक केलेल्या चांगल्या सरावाची समज पूर्णपणे होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे आतापर्यंत पाहिले गेले आहे. अशा प्रकारचे सराव दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये 2005 पासून सुरू आहेत.

याशिवाय अतिशय वेगाने बदलणारे धोक्याचे वातावरण, नवीन विघटनकारी तंत्रज्ञानाचा प्रभाव त्यामुळे होणारे नकारात्मक परिणाम कमी करण्याच्या मार्गाबद्दलची समज वाढविण्यासाठी भारत आणि सिंगापूर तसेच इतर आग्नेय आशियाई देशांना या धोरणात्मक संवादामध्ये सहभागी करून घेत आहेत. या सर्व संभाषणांचा केंद्रबिंदू अर्थातच चीन सर्वात मोठा दिसत आहे.

चीनची एक समान आणि सामायिक धोक्याची धारण एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा तसेच प्रादेशिक अखंडतेचा आदर करणारी प्रादेशिक चौकट निर्माण करण्याची गरज यामुळे भारतासह व्हिएतनाम, फिलीपिन्स, सिंगापूर आणि इंडोनेशियासह अनेक आसियान देशांसोबत संरक्षण विषयक जवळची भागीदारी निर्माण करण्यास प्रवृत्त केले आहे. अशा संबंधांमध्ये लष्करी ते लष्करी सराव, लष्करी देवाणघेवाण, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सामायिक समज गाठण्यासाठी राजकीय संवाद यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि ASEAN यांच्यात संपूर्णपणे  लष्करी भागीदारी प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने  पहिला ASEAN-भारत सागरी सराव (AIME) या वर्षी मे महिन्यात पूर्ण करण्यात आला आहे. भारत, फिलीपिन्स, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ब्रुनेई आणि व्हिएतनाम या देशांच्या नौदल जहाजांनी दक्षिण चीन समुद्रात AIME नौदल कवायतींमध्ये भाग घेतला होता.

ASEAN देशांसोबत भारताने जरी अनेक लष्करी सराव वैयक्तिकरित्या केले असले तरी, AIME कडे एक पाऊल म्हणून पाहिले गेले आहे. याचे कारण म्हणजे, दोन्ही बाजूंनी काही संकोच टाळण्याचा निर्णय घेतला गेला आहे, ज्याने ASEAN ला भारतासोबत सराव करण्यापासून रोखले होते. दोन्ही बाजूकडील देशांना चीनकडून संभाव्य नकारात्मक प्रतिक्रिया येणार याची चिंता होती, परंतु चीनच्या चिंतेबद्दल दोन्ही बाजू संवेदनशील असूनही आसियान देश आणि भारत यांच्याविरुद्ध चीनच्या आक्रमक कारवाया अव्याहतपणे सुरू आहेत. याशिवाय दोन्ही बाजूचे देश, चीनच्या आक्रमक कृतीचा फटका सहन करत असूनही हा प्रदेश कोविड-19 साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या आरोग्य आपत्तीतून अधिक त्रस्त झाला होता.

आसियान देशांना संरक्षण पुरवठादार म्हणून भारत उदयास येण्याची योजना आखत आहे. 2022 मध्ये फिलिपिन्सला ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राची विक्री या प्रदेशात अशाच प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या विक्रीची शक्यता उघडली जात आहे. अशा प्रकारचा करार भारतासोबत करण्यासाठी व्हिएतनाम आणि इंडोनेशिया हे देश इच्छुक असल्याचे दिसत आहे.

सिंगापूरसह भारत आणि आग्नेय आशियासाठी चीन हा धोका आणि चिंतेचा विषय बनत चालला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन SIMBEX सारखे सराव जटिलतेच्या दृष्टीने अधिक प्रगत होतील. त्यासाठी सर्व नौदलांनी सागरी क्षेत्रामध्ये अखंडपणे एकत्र येऊन काम करण्याची समान आवश्यकता निर्माण झाली आहे.

हा लेख मूळतः द डिप्लोमॅटमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

भारत, सिंगापूर यांच्यातील SIMBEX लष्करी सराव
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.