Published on Oct 23, 2023 Commentaries 0 Hours ago

चिनी संशोधन जहाजाच्या श्रीलंकेतील प्रलंबित असलेल्या भेटीवर भारताकडून पुन्हा एकदा हरकत घेतली गेली आहे.

श्रीलंकेत भारत-चीन यांच्यातील टँगो सुरूच

अलीकडे चीनचे एक सागरी संशोधन जहाज शि यान 6, श्रीलंकेच्या राष्ट्रीय जल संसाधन संशोधन आणि विकास संस्था (NARA) च्या सहकार्याने संशोधनासाठी  कोलंबोमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा होती. भारत आणि चीन यांच्यामध्ये श्रीलंका सापडलेला आहे.

श्रीलंकेतील NARA ने पूर्वी सुचित केले होते की, शि यान 6 “रुहुना विद्यापीठाशी झालेल्या करारानुसार” श्रीलंकेत येणार आहे. मात्र, श्रीलंकेच्या विद्यापीठाने या प्रकल्पातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. रुहुना विद्यापीठाने चिनी जहाजाबरोबरच्या असलेल्या संशोधन भागीदारीतून बाहेर पडण्यासाठी विविध तार्किक कारणे दिलेली आहेत.

कोलंबो मध्ये एका महिन्यासाठी येणाऱ्या या चिनी जहाजच्या डॉकिंगवर भारताने आक्षेप घेतला होता. ही गोष्ट लक्षात घेऊन श्रीलंकेने चीनला “ ही भेट पुढे ढकलण्यास”सांगितले आहे. परंतु चीनने ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये असलेल्या मूळ वेळापत्रकावर ठाम राहण्याचा आग्रह धरला आहे. तसेच या जहाजाला श्रीलंकेमध्ये डॉक करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भामध्ये श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी म्हणाले की,  श्रीलंकेने “शी यान 6 या चिनी जहाजाला परवानगी दिली नाही, कारण भारतीय सुरक्षा चिंता बेट राष्ट्रासाठी महत्त्वाची होती.” परंतु ते पुढे म्हणाले की “वाटाघाटी चालू आहेत, चीनच्या या जहाजाने श्रीलंकेच्या मानक कार्यपद्धतींचे पालन केले तर कोणतीही अडचण येणार नाही.”

अमेरिकेनेही हा मुद्दा श्रीलंकेकडे उचलून धरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएस अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर पॉलिटिकल अफेअर्स व्हिक्टोरिया नुलँड यांनी गेल्या महिन्यात यूएन जनरल असेंब्लीच्या वेळी न्यूयॉर्कमध्ये सॅब्री यांची भेट घेतली होती. तसेच चीनी संशोधन जहाजाच्या डॉकिंगबद्दल चिंता व्यक्त केली होती. परंतु साब्री यांनी अशी टिप्पणी केली आहे की, श्रीलंकेने एक मानक कार्यप्रणाली स्थापित केली आहे, ज्याचे पालन कोणत्याही परदेशी जहाज आणि विमानाने त्यांच्या प्रदेशात प्रवेश करणे आवश्यक आहे. श्रीलंकेने ठरविलेल्या “समान-हाताच्या दृष्टिकोन” नुसार मंत्री म्हणाले की ते “चीनला वगळू शकत नाही.”

यूएस अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर पॉलिटिकल अफेयर्स व्हिक्टोरिया नुलँड यांनी गेल्या महिन्यात यूएन जनरल असेंब्लीच्या वेळी न्यूयॉर्कमध्ये सॅब्रीची भेट घेतली होती. तसेच चीनी संशोधन जहाजाच्या डॉकिंगबद्दल चिंता देखील व्यक्त केली होती.

कार्नेगी एंडॉवमेंट फॉर इंटरनॅशनल पीसने न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सप्टेंबरच्या सुरुवातीला बोलताना, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे म्हणाले होते की, “श्रीलंकेत गुप्तचर जहाजे नाहीत. कोणी गुप्तचर जहाज स्थापन करू शकेल की नाही हे मला माहीत नाही.” चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस आणि श्रीलंकेची राष्ट्रीय जलचर संशोधन संस्था यांच्यात झालेल्या करारानुसार, गेल्या दशकापासून श्रीलंकेत येणाऱ्या “संशोधन जहाजे” म्हणून त्यांनी चिनी जहाजांचे वर्णन केले आहे.

श्रीलंकेच्या नेतृत्वावरील चीनच्या प्रभावाचा एक संकेत म्हणून कदाचित त्यांनी AUKUS वर टीका केली – यूएस, यू.के. आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्यांसह सुसज्ज करण्यासाठीचा करार – त्याला “एका देशाविरुद्ध लष्करी युती झाली” असे म्हटले आहे.  विक्रमसिंघे यांनी “इंडो-पॅसिफिक” या संकल्पनेची खिल्ली उडवण्याची संधीही यावेळी साधून घेतली आहे. ही बाब असे सुचविते की नवीन नाणे ही “कृत्रिम चौकट” आहे.  “इंडो-पॅसिफिक म्हणजे काय हे कोणालाच माहीत नाही.”

सध्या सुरू असलेला हा वाद काही वेगळा नाही गेल्या वर्षी देखील आणखी एक चिनी जहाज युआन वांग 5 जे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि उपग्रह ट्रॅकिंग जहाज मानले जात होते.  या जहाजाच्या संदर्भामध्ये 16 ऑगस्ट 2022 पासून श्रीलंकेच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील हंबनटोटा बंदरात एक आठवडाभर गोंधळ उडालेला होता. भारताने व्यक्त केलेल्या चिंतेमुळे श्रीलंकेने यावर्षीप्रमाणेच चीनला त्यावेळी देखील जहाजाचे आगमन पुढे ढकलण्यास सांगितले होते, परंतु अनन्य आर्थिक क्षेत्रामध्ये स्वयंचलित ओळख प्रणाली(AIS) चालू ठेवेल या अटींवर नंतर चिनी जहाजाला डॉकिंगसाठी मंजुरी दिली होती. श्रीलंकेच्या पाण्यात कोणतेही वैज्ञानिक संशोधन (EEZ)  केले जाणार नाही. श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी कथितरित्या सांगितले की जहाजाला मंजुरी केवळ भरपाईच्या उद्देशाने देण्यात आली होती.

याबाबत भारताची चिंता होती की युआन वांग 5 सुमारे 750 किमी एरियल क्षमतेसह केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दक्षिणेकडील भारतीय राज्यांमध्ये रडार मॉनिटरिंग पोर्ट होते. श्रीलंकेमध्ये डॉक केलेले चीनचे जहाज भारताच्या युक्तीवादामुळे थांबले. या जहाजामुळे दक्षिण भारतातील अनेक महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर लक्ष ठेवण्याची स्थिती निर्माण झाली होती.

चीनकडे अशा स्वरूपाची सात ट्रेकिंग जहाजे आहेत, जी पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंद महासागरामध्ये काम करू शकतात. चीनचे जहाज-आधारित निरीक्षण चीनच्या जमीन-आधारित ट्रॅकिंग क्षमतेत भर घालणारे आहे. युआन वांग 5 बद्दल भारताच्या चिंतेबरोबरच, यूएस स्टेट डिपार्टमेंटने असेही नमूद केले की चीनी जहाज पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सचा एक भाग आहे. “पीएलएच्या मोक्याच्या जागेचे केंद्रीकरण करण्यासाठी स्थापन केलेली थिएटर कमांड-स्तरीय संघटना असून सायबर, इलेक्ट्रॉनिक, माहिती, संप्रेषण आणि मनोवैज्ञानिक युद्ध मोहीम यासारख्या क्षमता आधारित आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार 2019 आणि 2023 दरम्यान 48 चिनी वैज्ञानिक संशोधन जहाजे आहेत, ज्यांनी हिंद महासागराच्या प्रदेशांमध्ये डॉक केलेले आहे. या जहाजांच्या बहुतेक तैनाती बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या आसपास पर्शियन गल्फच्या दिशेने आहेत.

या वैज्ञानिक मोहिमा आहेत, असा दावा चीन वारंवार करत आहे. या मोहिमांचा वापर गुप्तचर माहिती गोळा करण्यासह लष्करी उद्देशांसाठी चीन करत असल्याचा भारताचा संशय आहे. जोपर्यंत याबाबत स्पष्टता होत नाही तोपर्यंत भारताचा संशय दूर होणार नाही. दरम्यान श्रीलंकेसारखे छोटे देश भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी स्वत:चा भू-राजकीय खेळ खेळत आहेत.

तात्पुरत्या स्वरूपात का होईना या घटनांमुळे भारतामध्ये श्रीलंकेबद्दल चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार होते.  परंतु काही “अपरिहार्य परिस्थिती”मुळे ही बैठक शेवटच्या क्षणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही घटना चीनी जहाज श्रीलंकेत डॉकिंग करण्याच्या बातमीशी जोडली आहे की नाही, हे अद्याप निश्चित नाही, परंतु हे केवळ निव्वळ योगायोग असण्याची शक्यता आहे. कदाचित ही स्थगिती कोलंबो मध्ये भारताची नाराजी व्यक्त करण्यासाठी देखील होती.

हा लेख मूळतः द डिप्लोमॅटमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.