Author : Ayjaz Wani

Published on Aug 14, 2023 Commentaries 0 Hours ago

एकीकडे अत्यंत नाजूक अशी जागतिक व्यवस्था आणि दुसरीकडे महासत्तांची स्पर्धा, या पार्श्वभूमीवर अलीकडेच झालेल्या जीसीसी-सीएआर शिखर परिषदेचे उद्दिष्ट राजकीय व धोरणात्मक संबंध बळकट करणे होते.

महासत्तांच्या स्पर्धेत जीसीसी-सीएआर परिषदेची सांगता

गोल्फ सहकार्य मंडळ (जीसीसी) आणि पाच मध्य आशियाई प्रजासत्ताकांनी (सीएआर) संयुक्तपणे दि. १९ जुलै २०२३ रोजी सौदी अरेबियामधील जेद्दा येथे पहिली शिखर परिषद आयोजित केली होती. जगातील सध्याची अत्यंत नाजूक व्यवस्था व बड्या राष्ट्रांची सत्ता स्पर्धा यांच्या पार्श्वभूमीवर, सामायिक मूल्ये, सखोल ऐतिहासिक संबंध व परस्परहितसंबंधांवर आधारित जीसीसी आणि सीएआर यांची परिषद पार पडली. राजकीय व धोरणात्मक संबंध बळकट करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. या शिखर परिषदेदरम्यान, जागतिक नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, उर्जा आणि पुरवठा अशा विविध क्षेत्रांतील सहकार्यासंबंधात चर्चा केली; तसेच या वेळी २०२३ ते २०२७ या दरम्यानच्या काळासाठी एका संयुक्त कृती योजनेअंतर्गत राजकीय व सुरक्षा संवाद सुरू ठेवण्यावर एकमत झाले.

सध्याची नाजूक जागतिक व्यवस्था आणि महान शक्ती स्पर्धा यांच्या दरम्यान, शिखर परिषदेचा उद्देश सामायिक मूल्ये, खोल ऐतिहासिक संबंध आणि परस्पर हितसंबंधांवर आधारित जीसीसी आणि सीएआरएस यांच्यातील राजकीय आणि धोरणात्मक संबंध मजबूत करणे हा होता.

जेद्दा शिखर परिषदेपाठोपाठ प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरील जीसीसी-सीएआर यांच्यातील मंत्रिस्तरीय पहिला संयुक्त धोरणात्मक संवाद २०२२ च्या सप्टेंबर महिन्यात घेण्यात आला. या संवादाने वादग्रस्त प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय स्तरावर दोन्ही बाजूंमधील सहकार्याचा पाया घातला गेला. विविध आघाड्यांवरील वाढत्या समान मुद्द्यांना बळकट करण्यासाठी पुढील जीसीसी-मध्य आशिया शिखर परिषद २०२५ मध्ये उझबेकिस्तानातील समरकंद येथे आयोजित केली जाईल.

जीसीसी-सीएआर आणि संवेदनशील जागतिक व्यवस्था

सध्या सुरू असलेला रशिया-युक्रेन संघर्ष आणि तालिबान्यांचे अफगाणिस्तानातील पुनरुत्थान यांमुळे महासत्तांना ‘सीएआर’मध्ये पुन्हा स्वारस्य वाटू लागले आहे. महासत्तांनी या महत्त्वपूर्ण प्रदेशात केवळ आपला प्रभाव व आपले हितसंबंध जपण्यासाठीच नव्हे, तर या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर एकमेकांशी संघर्ष करण्याचाही निर्धार केला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये, चीनमधील शिआन येथे चीन-मध्य आशिया शिखर परिषद आणि किर्गिझ्स्तानमधील चोल्पोन-आटा येथे झालेल्या युरोपीय महासंघ व मध्य आशिया शिखर परिषदेने या प्रदेशातील विविध शक्तींच्या महत्त्वपूर्ण हितसंबंधांवर प्रकाश टाकला आहे.

चीन व अमेरिका यांच्यातील तीव्र शत्रुत्व दहशतवाद, इस्लामची भीती, कट्टरतावाद आणि सशस्त्र संघर्ष यांसारख्या जागतिक समस्यांसाठी हानिकारक असताना या शत्रुत्वामुळे भू-राजकीय वातावरणातही तणाव निर्माण झाला आहे.

या प्रकारची भू-राजकीय आणि भू-आर्थिक आव्हाने लक्षात घेता जीसीसी-मध्य आशिया शिखर परिषद महासत्तांमध्ये पुन्हा सुरुवात झालेल्या स्पर्धेचा प्रभाव प्रादेशिक स्तरावर कमी करण्यासाठी नव्या भागीदारीचा प्रारंभ करत आहे. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाने सार्वभौमत्व, सुरक्षितता आणि स्थैर्य यांसंबंधी आपल्या परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार करण्यास ‘सीएआर’ला भाग पाडले आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत व व्यापारात विविधता आणण्यासाठी आणि आंतर व परस्पर प्रादेशिक दळणवळण प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ‘सीएआर’कडून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा शोध घेतला जात आहे. ‘जीसीसी’च्या सदस्य देशांनी आतापर्यंत ‘सीएआर’मध्ये एकमेकांपासून वेगळे प्रामुख्याने उर्जा व संस्कृतीतील गुंतवणुकीच्या माध्यमातून काम केले आहे. सौदी अरेबियाने कझाकस्तानमध्ये गुंतवणूक केली आहे. अलीकडील काळात सौदीने उझबेकिस्तानमध्येही कृषी, औषध, वाहतूक आणि माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये १४ अब्ज डॉलर गुंतवणूक केली आहे. संयुक्त अरब अमिरातीने कझाकस्तानमधील पायाभूत सुविधांमध्ये आणि तुर्कमेनिस्तानमधील तेलात गुंतवणूक केली असून उझबेकिस्तानशी उर्जा उत्पादन व उर्जा वितरणासाठी दहा अब्ज डॉलरचा करार केला आहे.

दुसरीकडे, कतारने ताजिकिस्तानातील मशिदीच्या बांधकामासाठी दहा कोटी डॉलरची देणगी दिली आहे. मात्र चीन, रशिया आणि युरोपीय युनायटेडच्या तुलनेत जीसीसी देशांचे त्यांच्या वायव्येकडील देशांशी व्यापार व गुंतवणूक संबंध अल्प आहेत. उदाहरणार्थ, २०२१ मध्ये जीसीसी आणि ‘सीएआर’मधील व्यापार २०२२ मधील चीनच्या ७० अब्ज डॉलरच्या तुलनेत किमान ३.१ अब्जांपर्यंत होता.

जुन्या सिल्क रोडने सीएआर आणि जीसीसी यांच्यात सामाजिक-आर्थिक संबंध निर्माण करून व्यापार व सांस्कृतिक अभिसरणाचाच मार्ग उपलब्ध करून दिला. दोन्ही क्षेत्रांनी लवचिक पुरवठा साखळ्या, अन्न सुरक्षा आणि उर्जा सुरक्षा यांची गरज व्यक्त केली आहे. या शिवाय त्यांनी व्यापार व वाणिज्य यांमध्ये सुलभता आणण्यासाठी वाहतूक व दळणवळणाच्या कार्यक्षमतेवरही भर दिला आहे.

अलीकडे, सौदी अरेबिया आणि इराणने राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये महत्त्वपूर्ण राजकीय व राजनैतिक पुनर्संरचना होऊ शकते आणि जीसीस-सीएआर संबंधांनाही आणखी मदत होऊ शकते. पश्चिम आशियातील ही मुत्सद्दीगिरी मध्य आशियामार्गे आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर आणि सिस्तान-बलुचिस्तान या इराणमधील प्रांतातील भारताच्या नेतृत्वाखालील चाबहार बंदराच्या विकासाला चालना देऊ शकते. जेद्दा परिषदेमध्ये जीसीसी देशांनी खोलवर रुजलेली मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक श्रद्धांसह ऐतिहासिक ऐतिहासिक संबंधांवर आधारित एकसंध दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘सीएआर’मधील धर्माचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांनी लिहिलेले ‘सेइंग्ज ऑफ द प्रॉफेट’ हे पुस्तक दोन्ही प्रदेशांमधील सामायिक धार्मिक विश्वासांवर आधारित आहेत. शिखर परिषदेत सौदी युवराज महंमद बिन सलमान यांनी प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्यासाठी निर्णायक म्हणून जीसीसी-सीएआरच्या सुधारित सहकार्यावर प्रकाश टाकला. ‘देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर, त्यांची प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य, त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे’ आणि संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्यावर आधारित जागतिक व्यवस्थेचे संरक्षण यावर भर दिला. सध्याच्या भू-राजकीय आणि भू- आर्थिक आव्हानांमध्ये; तसेच हवामान बदलामुळे इस्लामिक जगतातील गरजू देशांसाठी विश्वसार्ह अन्नपुरवठा साखळी अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यांनी इस्लामिक सहकार्य संघटनेमध्ये अधिक समन्वय साधण्याचे आवाहन केले.

सध्याच्या जागतिक भू-राजकीय स्पर्धांमुळे ‘डीएश’सारख्या दहशतवादी संघटनांना बळ दिले असून य़ुरोप व आशिया आणि आखातामध्ये इस्लामिक स्टेट कोरसान प्रांत (आयएसकेपी) यांसारख्या उपसंघटनांचा उदय झाला आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यावर आत्मविश्वास निर्माण झालेल्या ‘आयएसकेपी’ने अफगाणिस्तान-पाकिस्तान भागातून मध्य आशियाई देशांवर रॉकेट हल्ले सुरू केले. दि. १८ एप्रिल २०२२ रोजी ‘आयएसकेपी’ने उझबेकिस्तानमधील टेर्म येथील लष्करी तळावर दहा कटुशा रॉकेट डागली. त्याचप्रमाणे दि. ७ मे २०२२ रोजी ‘आयएसकेपी’ने अफगाणिस्तानच्या ख्वाजा घार जिल्ह्यातून ताजिकिस्तानातील अनिर्दिष्ट लष्करी तळांवर सात रॉकेट सोडली. जेद्दा शिखर परिषदेनंतर, जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जागतिक नेत्यांनी दहशतवाद आणि कट्टरतावाद व त्यांच्या निधीच्या स्रोतांचा सामना करण्यासाठी प्रादेशिक व जागतिक प्रयत्नांना मदत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या निवेदनातून त्यांनी मुस्लिम अल्पसंख्याक आणि इस्लामिक प्रतीकांविरुद्ध असहिष्णुता व हिंसाचाराच्या रूपात वर्णद्वेष व इस्लामद्वेष्टेपणाच्या वाढत्या वक्तव्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. उदाहरणार्थ, स्वीडन आणि डेन्मार्कमध्ये कुराण जाळण्यात आले.

जीसीसी आणि ‘सीएआर’मधील वाढलेले सहकार्य ही या प्रदेशासाठी एक महत्त्वपूर्ण विकासात्मक घडामोड आहे. विशेषतः शांघाय सहकार्य संघटनेसह अन्य प्रादेशिक आघाड्या प्रादेशिक व जागतिक शांततेसाठी ठोस उपाययोजना करीत नाहीत. मात्र जीसीसी व मध्य आशिया सहकार्य अधिक वाढण्यासाठी ‘सीएआर’ने सर्वप्रथम सीमावाद व गेल्या दोन वर्षांत वाढलेली सरकारविरोधातील आंदोलनांसारखे आपले अंतर्गत प्रश्न हाताळणे आवश्यक आहे. प्रादेशिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी ‘सीएआर’मध्ये अभिसरण ही पूर्वअट आहे. अखेरीस, सीएआर आणि जीसीसी या दोहोंसह अधिक भक्कम सहभागाचा आनंद घेतात, ते भू-सामरिक असो वा भू-आर्थिक अशा कोणत्याही प्रादेशिक सहकार्यामध्ये प्रबळ भूमिका बजावू शकतात.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.