युक्रेन संकट : संघर्षाचे कारण आणि वाटचाल या लेखामधून हा संक्षिप्त लेख घेतला आहे.
रशियाचा हल्ला परतून लावण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या देशाला मदत करण्यासाठी आवाहन केल्यानंतर युरोपमधील तरुण मुले युक्रेनच्या स्वयंसेवक सैन्याची फळी मजबूत करत आहेत, अशा वेळी, ‘परदेशी सैनिकांच्या’ या नवीन जमातीच्या निर्मितीनंतर सुरक्षा तज्ज्ञांसमोर परिभाषात्मक पेच उभा राहिला आहे. युक्रेनच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 16,000 पेक्षा जास्त परदेशी नागरिक स्वयंसेवी सैन्यात भर्ती झाले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांच्या दृष्टीने “हा एखाद्या पिढीत एकदाच घडणारा लोकशाही आणि हुकुमशाही यांच्या दरम्यानचा संघर्ष आहे,” असे रॉयटरच्या बातम्यांमधून सांगितले जात आहे.
दुहेरी मापदंड?
मात्र, भाषा हेच सर्व काही आहे, आणि पाश्चिमात्त्य जग आणि रशिया यांना एकमेकांविरुद्ध उभे करणारे संदर्भ आणि कथन (नरेटिव्ह) यांना अनुरूप अशी ‘परदेशी सैनिक’ या शब्दप्रयोगाभोवती सुरू असलेली शाब्दिक कसरत ही फक्त जागतिक राजकारणातील नैतिकता आणि व्यवहारवाद यांच्यातील विरोधाभास अधोरेखित करते.
संयुक्त राष्ट्रांमध्ये, ‘एका माणसासाठी स्वातंत्र्यसैनिक असलेली व्यक्ती दुसऱ्या माणसासाठी दहशतवादी असते’ – या प्रसिद्ध म्हणीने ‘दहशतवादाची’ सर्वत्र स्वीकृत व्याख्या अनेक वर्षांपासून ओलीस धरली आहे. याचा बराचसा दोष भू-राजकीय कारणांसाठी, विशेषतः शीतयुद्धादरम्यान, जेव्हा विचारसरणीने प्रेरित हिंसेला एक साधन मानले जात होते, फुटकळ परदेशी सैनिक, बिगर-सरकारी घटक आणि जिहादी गटांना पाठिंबा देणाऱ्या अनेक राष्ट्रांना देण्यात आला होता.
अमेरिकेने 1979 नंतर अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत रशियाविरोधात मुजाहिदीनला दिलेला पाठिंबा, किंवा आज अमेरिकेने 2021 मध्ये अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर रशियाची स्वतःची तालिबानविषयक भूमिका ही काही उदाहरणे आहेत. आणि दहशतवादाची परिभाषा ठरवण्याच्या संदर्भा, ख्रिस मेसेरोल आणि डॅन बायमन या विद्वानांचा असा युक्तिवाद आहे की, “अगदी लोकशाही सरकारांनी तयार केलेल्या याद्यांमध्ये काही दहशतवादी गटांचा समावेश असण्याची पण काही गट वगळलेले असण्याची अधिक शक्यता आहे.”
अमेरिकेने 1979 नंतर अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत रशियाविरोधात मुजाहिदीनला दिलेला पाठिंबा, किंवा आज अमेरिकेने 2021 मध्ये अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर रशियाची स्वतःची तालिबानविषयक भूमिका ही काही उदाहरणे आहेत.
विशेषतः 9/11 नंतर, जागतिक सुरक्षा समुदायाने स्वतःचा देश सोडून इराक, सिरीया आणि अफगाणिस्तानसारख्या देशांमध्ये अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटबरोबर जिहाद करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांसाठी ‘परदेशी सैनिक‘ ही संज्ञा अक्षरशः तयार करून वापरली आहे. इतके की त्याच्या दहशतवाद विरोधी आणि घुसखोरी विरोधी कारवायांच्या चौकटींनी तेव्हापासून धोरणे आखण्यासाठी आणि अशा दहशतवादी आणि त्यांच्या समर्थक जाळ्यांविरोधातील न्यायप्रक्रिया चालवण्यासाठी हा शब्दप्रयोग स्वीकारला आहे.
परिणामी, एक संपूर्ण समकालीन सुरक्षा नामकरण अक्षरशः एका रात्रीतून उलटसुलट झाली आहे. गेली दोन दशके जागतिक जिहादाच्या संदर्भात परदेशी सैनिकांवरून धोक्याचे इशारे देणारे तेच सुरक्षा तज्ज्ञ आता अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांतील, युक्रेनसाठी शस्त्र उचलण्याची तयारी असणाऱ्या बिगर-सरकारी घटकांच्या – लष्करी आणि नागरी – बांधिलकीची प्रशंसा करत आहेत. यातील स्पष्ट भेद असा आहे की, युक्रेनसाठी लढणे हे ‘न्याय्य कारण‘ आहे. आणि त्यांच्या प्रशंसेचा गर्भित अर्थ असा आहे की, एक जबाबदार राष्ट्र म्हणून युक्रेनने ते करत असलेल्या स्वयंसेवक सैन्याच्या भर्तीसाठी उत्तरदायित्व स्वीकारावे, त्यांना नियमित सैनिकांप्रमाणे साज द्यावा – रेजिमेंट आणि गणवेष आणि आदेशाची स्पष्ट साखळी या स्वरूपात, आणि पारंपरिक राष्ट्रीय सैन्यांच्या वर्तनाचे नियमन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय करारांच्या चौकटीमध्ये रशियाच्या हल्ल्याला हे ‘सैनिक‘ उत्तर देतील हे सुनिश्चित करावे. पण हे तितकेसे सोपे असेल का?
नवीन युद्धनायकांपासून सावध राहताना
जर राष्ट्रीय सैन्य आणि व्यावसायिक लष्करांदरम्यान लढले केलेले युद्ध हे राष्ट्र राज्यांच्या पाश्चात्त्य रचनेच्या प्रणालीचा परिपाक असेल तर, हेही तितकेच सत्य आहे की युद्धभूमीवरील बिगर-सरकारी घटकांची वाढ – मग ते येथे परदेशी सैनिक असोत, मध्य-पूर्व आखातात कारवाया केलेले रशियन आणि अमेरिकी कंपन्यांकडून भाडोत्री सैनिक असोत, किंवा सरसकट कोणालाही निशाणा करणारे जिहादी दहशतवादी असोत – हे युद्धाच्या अगदी जुन्या स्वरूपाकडे परत जाण्यासारखे आहे.
हे खरे आहे की यूएन चार्टरअंतर्गत (संयुक्त राष्ट्रांची घटना), संयुक्त राष्ट्रांच्या प्रत्येक सदस्य देशाला बाह्य आक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे, आणि यामध्ये बाहेरून/बाहेरच्यांची मदत घेण्याचा समावेश आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत अशा बाहेरच्यांची स्थिती काय असते? त्यांना योद्धे मानले जाईल की बेकायदेशीर योद्धे? त्यांनी युद्ध गुन्हे केल्यास त्यांच्यावर कोणत्या करारांअतर्गत कोणत्या कारवाई केल्या जातील? रशियन सैन्याने त्यांना बंदी केल्यास काय होईल, त्यांना जिनिव्हा कराराअंतर्गत कायदेशीर युद्धकैदी मानले जाईल का? आणि सर्वात महत्त्वाचे, आज कोण, कोणत्या प्रकारच्या व्यक्ती लढण्यासाठी तयार होत आहेत?
अतिरेकी गटांचे निरीक्षण करणाऱ्या एसआयटीई (SITE) इंटेलिजन्स या खासगी संशोधन गटाने न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, अनेक अति-उजव्या ऑनलाईन जागांमध्ये रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनियन जनतेला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. वेगवेगळ्या विचारसरणींच्या, एकमेकांपासून भिन्न, एकमेकांशी न जोडलेल्या व्यक्ती युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आल्या आहेत. फिनलँड आणि फ्रान्ससारख्या देशांमध्ये अति-उजव्या बिगर-लष्करी सैनिकांकडून चालवल्या जाणाऱ्या टेलिग्राम चॅनेलवर भरतीचा प्रचार जोरात सुरू आहे.
दहशतवादाविरोधात जागतिक युद्धाची एक प्रमुख निष्पत्ती अशी आहे की शस्त्रे उचलणाऱ्या व्यक्तींवर केवळ विचारसरणी आणि पैशांचे नियंत्रण नसले तर कोणत्या तरी टोळीचा सदस्य असल्याची भावना असते, जी कोणत्याही नागरी किंवा सामाजिक ओळखीवर मात करते.
एसआयटीईच्या (SITE) संचालिका रिता कात्झ यांनी न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, लढाऊ प्रशिक्षण मिळणे ही एक महत्त्वाची प्रेरणा असते. जागतिक सुरक्षेच्या गुंतागुंतीच्या चित्रामध्ये अति-उजवा अतिरेक हा वाढता, आंतरराष्ट्रीय धोका असल्याचे जाहीर झाले असताना, एका ध्येयासाठी तयार करण्यात येत असलेले नवीन प्रकारचे परदेशी सैनिक मूलतत्त्ववादी झाल्याचे आणि एकमेकांवर चाल करून जात असल्याचे आढळू शकते.
केवळ विचारसरणी आणि पैशांचे नियंत्रण नसलते तर कोणत्या तरी टोळीचा सदस्य असल्याची भावना असते, जी कोणत्याही नागरी किंवा सामाजिक ओळखीवर मात करते. अमेरिकेमध्ये 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलवर झालेल्या हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात नवनाझी आणि श्वेतवर्णीय वर्चस्ववादी गटांना जबाबदार धरले गेले, त्यांच्यामुळे परदेशी युद्धभूमीकडे जाणाऱ्या सैनिकांच्या प्रकाराचे विश्लेषण करण्याचे प्रयत्न अधिकच गुंतागुंतीचे झाले आहेत, कारण त्यांचे ऑनलाईन भाष्य आणि त्यांचे निर्णय यांच्यावर त्यांच्या स्थानिक राजकारणाचा (म्हणजेच बिडेन प्रशासनाबद्दलचा तिरस्कार) खोलवर प्रभाव आहे.
युरोपमधून येणाऱ्या बातम्यांमध्ये भीती, राग, सूड घेण्याची गरज, वर्णद्वेष आणि आत्यंतिक झेनोफोबिया (परकीय माणसांबद्दल प्रचंड भीती) यांचे मिश्रण दिसून येत आहे. सीमा भागांतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या वर्णाप्रमाणे वेगवेगळ्या रांगा केल्या जात असल्याच्या येणाऱ्या बातम्या असोत, किंवा श्वेतवर्णीय युक्रेनियन निर्वासितांचे युरोपमध्ये खुलेपणाने केले जाणारे स्वागत असो – बाल्कन राष्ट्रे, सिरिया किंवा अफगाणिस्तानमधून येणाऱ्या निर्वासितांना याच्या अगदी विपरित वागणूक मिळाली होती, युक्रेनियन नागरिकांना मिळणारा पाठिंबा हे विशिष्ट ओळखीवर आधारित, अतिरेकी राजकारणाचे यांचे अविभाज्यपणे मिश्रण, विशेषतः ऑनलाईन जगतातील, आहे.
जरी युक्रेनियनचे ध्येय ही न्याय्य लढाई असू शकते, तरी या स्वयंसेवी परदेशी सैनिकांवर नियंत्रण ठेवणारी परिभाषा आणि सीमा सुरुवातीलाच स्पष्ट करणे अत्यावश्यक आहे. युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा बचाव करणे याकडे जितके आंतरराष्ट्रीय जबाबदारी म्हणून पाहिले जाते, तितकेच आंतरराष्ट्रीय समुदायाने हे सुनिश्चित केले पाहिजे की, स्वयंसेवी परदेशी सैनिकांच्या सैन्यासाठी असलेली प्रशंसेचा परिणाम या छुप्या अति-उजव्या लष्करी संस्कृतीचे समर्थन करण्यात किंवा तिची वाढ होण्यात होता कामा नये, ज्यामुळे ‘न्याय्य‘ ध्येयाच्या नावावर हिंसा आणि साहस शोधणाऱ्या कट्टरपंथी बिगर-सरकारी घटकांचा आणखी एक प्रवाह तयार होईल.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.