Author : Harsh V. Pant

Published on Feb 12, 2020 Commentaries 0 Hours ago

ब्रेक्झिटनंतर आपली नवी जागतिक भूमिका काय असेल, हे अजून ब्रिटनने स्पष्ट केलेली नाही. या स्पष्टतेची उरलेल्या जगासह भारतसुद्धा वाट पाहत आहे.

ब्रेक्झिटनंतर काय होणार?

ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून युनाइटेड किंग्डममध्ये तीन वर्षांहून अधिक काळ चाललेला देशांतर्गत राजकीय कलह अखेर ३१ जानेवारी २०२० रोजी संपला. युनाइटेड किंग्डमअखेरीसअधिकृतपणे युरोपियन युनियनच्या बाहेर पडले. जगातील सर्वात यशस्वी आंतरराष्ट्रीय संघटना युरोपियन युनियन आणि युनाइटेड किंग्डम या दोन्ही घटकांच्या इतिहासातील हा एक महत्वाचा दिवस आहे.

२०२० च्या अखेरपर्यंत या संक्रमणाची मुदत ठेवण्यात आली आहे.दरम्यानच्या काळात दोन्ही घटक आपली व्यवस्था अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करतील.तोपर्यंत बरेच काही बदलले आहे असे जाणवणार नाही. परंतु, तेथे बदल झाला आहे आणि साधासुधा नाही तर मूलभूत बदल घडला आहे. जेव्हा झालेला हा बदल अमलात येईल तेव्हा युरोपियन युनियन आणि यूके लक्षणीय भिन्न दिसतील.

डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत बोरिस जॉन्सन यांना लोकांनी निवडून दिले. त्यामुळे ब्रेक्झिट प्रत्यक्षात येऊ शकले.कारण जॉन्सन हे मूळातच ब्रेक्झिट पूर्ण करण्याच्या आश्वासनावर निवडणूक लढले होते. बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली कन्झव्हेटीव्ह पक्षाच्या ३६५ नेत्यांनी हाउस ऑफ कॉमन्स मध्ये विजय मिळवला. १९८७ पासून आतापर्यंत कन्झव्हेटीव्ह पक्षासाठी हा सर्वात मोठा विजय होता.

या विजयापाठी ब्रेक्झिटवरून अखंड चाललेल्या चर्चेला कंटाळलेली ब्रिटनमधील जनता आहे. युनाइटेड किंग्डमच्या ईयूमधून अधिकृतरित्या बाहेर पडण्यापूर्वी जॉन्सन यांनी दिलेल्या संदेशावरून हे स्पष्ट दिसून येते. जॉन्सन यांनी देशाला एकत्र आणून “सर्वांना पुढे” नेण्याचे वचन दिले तेव्हा ते म्हणाले की, “बर्‍याच लोकांसाठी हा एक आशेचा आश्चर्यकारक क्षण आहे, हा असा क्षण आहे जो कधीच येणार नाही असे त्यांना वाटत होते. तसेच असेही बरेच लोक आहेत ज्यांना चिंता वाटते आहे आणि काहीतरी हरवल्याची भावना आहे.”

ब्रिटनमध्ये बऱ्याच ठिकाणी या निर्णयामुळे उत्सव चालू असताना, काही ठिकाणी युरोपियन युनियनला समर्थन करणारे मोर्चे काढण्यात आले. काही ठिकाणी ब्रेक्झिटविरोधी मोर्चेदेखील झाले. स्कॉटलंडमध्ये, जिथे स्कॉटलंडचे राष्ट्रवादी आपल्या स्वातंत्र्यासाठी नव्या रेफेरेंडमची मागणी करत आहेत, तेथील नेत्या निकोला स्टर्जियन यांनी ट्विट केले की, “स्कॉटलंड स्वतंत्र देश म्हणून युरोपचा भाग बनेल.” युरोपियन युनियनमुळे निर्माण झालेले विभाजन इतक्यात संपणार नाही, आणि खरे तर भविष्यात हा संघर्ष आणखी तीव्र होऊ शकेल. दुसरीकडे यूके-ईयू संघर्ष देखील सुरू राहील.

युरोपातील नेत्यांनी युनाइटेड किंग्डम युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्याबद्दल दुःख व्यक्त केले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की,“ते फार दु: खी झालेआहेत”.  ब्रेक्झिटचे समन्वयक गाय वरोफस्तात “ईयू हा असा प्रकल्प आहे ज्याचा तुम्हाला परत हिस्सा बनाव असे वाटेल याची मला खात्री आहे.” परंतु दोन्ही घटक मुक्त व्यापार करार (FTA), सुरक्षासंबंधी करार, मासेमारीसाठी नवीन व्यवस्था निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यासाठी एकत्र येतील तेव्हा त्यांना गंभीर वाटाघाटीला सामोरे जावे लागेल, कारण काहीच ठरलेले नाही. ब्रेक्झिटमुळे उर्वरित युरोपियन युनियनच्या सदस्य देशांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली आहे आणि या प्रकारामुळे ब्रिटनबद्दल कठोर वृत्ती निर्माण होणे स्वाभाविक आहे.

जॉन्सन यांना वर्षाअखेरीपर्यंत व्यापार करार अस्तित्वात यायला हवा असल्याने, त्यांचे त्याकडे लक्ष असेल. या आठवड्यात युनाइटेड किंग्डम आणि युरोपियन युनियन आपल्या वाटाघाटी करण्याची भूमिका पक्की करतील.  जरी युनाइटेड किंग्डमने ईयूच्या नियमांचे पालन करावे असे युरोपियन युनियनला वाटत असले तरी, ब्रिटन असे सुचवित आहे की ते ब्रेक्झिटनंतरच्या कोणत्याही व्यापार करारात ते “ईयूच्या नियमांशी जुळवून घेणार नाहीत”.

जॉन्सन यांची कॅनडा सारखा मुक्त व्यापार करार करण्याची इच्छा आहे, परंतु आयरिश पंतप्रधान लिओ वराडकर यांनी हे स्पष्ट केले की, “युनाइटेड किंग्डम कॅनडा नाही, युके हा भौगोलिकदृष्ट्या युरोपियन खंडाचा भाग आहे, आपले सागरी आणि हवाई क्षेत्र जोडलेले आहे आणि आपल्या अर्थव्यवस्था एकीकृत आहेत.”

युनाइटेड किंग्डम आता  अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांशी मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देण्यास उत्सुक आहे. ब्रेक्झिटनंतर व्यापार करार करण्यासाठी भारत हादेखील महत्वाचा देश असेल असे प्रतिपादन जॉन्सन यांनी केले आहे. ब्रिटनचा परराष्ट्र धोरणासंबंधीचा पारंपारिक दृष्टिकोन आता निरर्थक असल्याने ब्रिटनला आपल्या परराष्ट्र धोरणातील मूलभूत गोष्टींचे पुन्हा एकदा मूल्यमापन करणे आवश्यक आहे.

ब्रेक्झिटनंतर ‘ग्लोबल ब्रिटन’ चा विचार ग्लोबल कसा ठेवायचा हे लंडनसाठी आव्हान ठरणार आहे. कारण गेल्या तीन वर्षात चाललेल्या देशांतर्गत कलहामुळे ब्रिटनचे लक्ष अधिकाधिक अंतर्गत गोष्टींकडे वेधले आहे. युनाइटेड किंग्डम अपरिचित परिस्थितीत अडकलेला आहे आणि जागतिक संवादकर्ते अशी आशा व्यक्त करत आहेत की युके लवकरात लवकर युरोपियन युनियन सोबतच्या समस्यांचे निराकरण करेल. जर युके आपल्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये गुंतलेला असेल तर सरकारचा हेतू सर्वोत्तम असला तरी जागतिक घडामोडींमध्ये त्यांचे स्थान दुय्यम राहील.

भारतासाठी भारत-युके संबंधस्थिर असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारत-युके यांचा जागतिक स्तरावर पुन्हा उदय होईल अशी आशा करत आहे. युरोपियन युनियनमधून औपचारिकपणे  बाहेर पडल्यामुळे युनाइटेड किंग्डमसाठी एक युग संपुष्टात आले आहे, परंतु नव्या युगात प्रवेश करताना आपली नवी जागतिक भूमिका अजून ब्रिटनने स्पष्ट केलेली नाही. उरलेल्या जगासह भारतसुद्धा या स्पष्टतेची वाट पाहत आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Harsh V. Pant

Harsh V. Pant

Professor Harsh V. Pant is Vice President – Studies and Foreign Policy at Observer Research Foundation, New Delhi. He is a Professor of International Relations ...

Read More +