Published on May 15, 2020 Commentaries 0 Hours ago

जागतिक बाजारपेठेतील आर्थिक संकटाची मोठी झळ जगभरातील हवाईक्षेत्राला बसली आहे. नव्याने संरचना होत असलेल्या भारतीय हवाईउद्योगाने याकडे संधी म्हणून पाहायला हवे.

जागतिक हवाई उद्योगातील मंदी, भारताला संधी

बोईंग कंपनीच्या विमानांची सुरक्षितता आणि त्यांच्या बांधणीचा दर्जा दर्शवण्यासाठी विमानचालक किंवा वैमानिक “बोईंग नसेल तर आम्ही उड्डाण करणार नाही” असे सूचक शब्द वापरत असतही काही अगदी फार जुनी बाब नाहीपरंतु२०२० मधील अलीकडच्या काही घटनांवर नजर टाकल्यास बोईंग कंपनी आपला दर्जा राखण्यातच अपयशी ठरली असल्याचे दिसतेअलीकडेच त्यांच्या दोन नव्या MAX 737 जेट विमानांचा गंभीर अपघातांचा सामना करावा लागलायाशिवायजागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विस्तृत प्रमाणात पसरलेल्या साखळी उत्पादकांना आधार देण्यासाठी बोईंग व्हाईट हाउसकडून ५० अब्ज डॉलर्सचे कर्ज मागत असल्याबद्दलही चर्चेत आहेसध्या बदललेल्या परिस्थितीमुळे त्यांच्या उत्पादनाच्या किमती २५पेक्षाही जास्त दराने घसरल्या आहेतएअरबस या कंपनीला देखील अशाच नुकसानाला सामोरे जावे लागले. शेकडो विमानांच्या ऑर्डर्स रद्द करण्यात आल्याने युरोपीय अर्थव्यवस्था मजबूत करणारे रोजगार क्षेत्र संकटाच्या गर्तेत सापडले आहेएअरबसचे सीईओ फॉरी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “कंपनीला पहिल्यांदाच इतक्या तीव्र गतीने आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे.” जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या उत्पादनात घट केल्याने त्यांच्या व्यवसायात एक तृतीयांश तोटा सहन करावा लागत आहे

बोईंग आणि एअरबस या कंपन्यायुरोपीय महासंघाच्या प्रदेशात ९०व्यावसायिक विमानांचा पुरवठा करतातफक्त निर्यातीतूनच त्यांना जवळपास ९४ अब्ज युरो आणि १२२ अब्ज डॉलर्सची कमाई होतेगलेलठ्ठ पगार देणाऱ्या क्षेत्रांमध्ये एअरोस्पेस क्षेत्राचाही समावेश होतोयातील बहुसंख्य कर्मचारी हे हनीवेलप्रॅट अँड व्हिटनेएमएसएमए अशा मजबूत पुरवठा साखळी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणि विशेष  अत्यावश्यक सेवा देणाऱ्या छोट्या कंपन्यांमध्ये कार्यरत आहेतटील ग्रुपच्या अंदाजानुसारएअरोस्पेस क्षेत्राची वार्षिक उलाढाल ही जवळपास एक ट्रिलियन डॉलर इतकी आहेयामुळे हा व्यवसाय जागतिक स्तरावर एक प्रमुख व्यवसाय ठरला आहेजागतिक महामारीमुळे सर्व प्रकारची हवाई उड्डाणे ठप्प झाल्याने,हवाई उद्योगाला अत्यावश्यक उप्तादनांचा पुरवठा करणारे  एअरोस्पेस क्षेत्र प्रचंड तोट्यात आले आहेआयएटीएच्या (IATA) अंदाजानुसार हवाई क्षेत्रातील . दशलक्ष इतका रोजगार बुडू शकतो.

गलेलठ्ठ पगार देणाऱ्या क्षेत्रांमध्ये एअरोस्पेस क्षेत्राचाही समावेश होतोयातील बहुसंख्य कर्मचारी हे हनीवेलप्रॅट अँड व्हिटनेएमएसएमए अशा मजबूत पुरवठा साखळी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणि विशेष  अत्यावश्यक सेवा देणाऱ्या छोट्या कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

सीआयआय(कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज) च्या मतेवार्षिक वृद्धीदरानुसार२०१६२०३५ दरम्यानआंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक विमानांच्या ताफ्यात %नी वाढ होणे अपेक्षित होतेयातील ३९,६०० पेक्षा जास्त विमानांचा पुरवठा बोईंगकडूनतर एअरबसकडून ३३,०७० विमानांचा पुरवठा केला जाईल असा अंदाज होतायात  सरासरीनुसारसध्याच्याच विमानांमध्ये ४२फेरबदल करण्यासोबतच ५८ज्यादा वाढ करण्याची मागणी केली होतीयातील बहुसंख्य पुरवठा हा आशियापॅसिफिक आणि त्या आसपासच्या प्रदेशात होत असतोजगातील प्रमुख विमान उत्पादकांसाठी भारतचीनआग्नेय आशिया आणि मध्य पूर्वेतील देश म्हणजे महत्वाच्या बाजारपेठा आहेतया प्रदेशांतून जवळपास  ट्रिलीयन डॉलरचा व्यवसाय होणे अपेक्षित होतेपरंतुया महामारीमुळे सगळ्यांनी एकत्रितपणे नव्या विमानांची मागणी रद्द केली किंवा ती अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केली.

कोव्हीड१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती ही एअरोस्पेस उत्पादकांसाठी एक मोठी आपत्ती ठरली आहेएअरोस्पेस उद्योगातील बड्या कंपन्यांना पुरवठा करणारे बहुसंख्य लघु उद्योग कायमस्वरूपी बंद पडले आहेतलॉकडाऊन उठल्यानंतर हवाई उद्योगाची स्थिती काय असेल याचा अंदाज करणे सध्या तरी कठीण आहेमहामारीनंतरच्या काळात प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगस्वच्छता राखणेसामान्य कार्यप्रणालीत दिल्या जाणाऱ्या गंभीर सूचनांना कसा प्रतिसाद द्यावा याचे नियम आत्मसात करावे लागतील.महत्वाच्या बैठकाकॉन्फरन्सेस,यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा काळ मागे पडला असल्यानेव्यावसायिक कारणासाठी होणारा प्रवास आता इतिहास जमा झाला आहेमात्रपर्यटन क्षेत्र थोडक्या ते मध्यम कालावधीत पुन्हा उचल घेईल याची शक्यता कमी आहे

एअरोस्पेस उद्योगातील बड्या कंपन्यांना पुरवठा करणारे लघु उद्योग मोठ्या प्रमाणात आणि कायमस्वरूपी बंद पडले आहेतलॉकडाऊन उठल्यानंतर हवाई उद्योगची स्थिती काय असेल याचा अंदाज करणे सध्या तरी कठीण आहे

भारताची भूमिका काय हवी?

आजपर्यंतचे काही मोठे व्यवहार पाहता एअरोस्पेस उत्पादनांसाठी चीन आणि भारत या जगातील सर्वांत मोठ्या बाजारपेठ आहेतमहामारी येण्यापूर्वी भारतीय हवाई उद्योग क्षेत्राची प्रगतीची घोडदौड अत्यंत  वेगाने सुरु होतीइंडिगो आणि स्पाइसजेटसारख्या कंपन्यांनी एकूण ४०० जेट विमाने खरेदी करण्याची योजना जाहीर केली होती२०३० पर्यंत भारताच्या विमान ताफ्यात आणखीन २००० नव्या विमानांची भर पडेल अशी अपेक्षा होतीहवाई उद्योगात काही उदारमतवादी सुधारणा आणि नवे उपक्रम राबवण्यासाठी भारत सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु होतेहवाई उद्योगाला अनुकूल अशी एमआरओ धोरणाचा अवलंबउडान’ (UDAN) योजने अंतर्गत कमी खर्चात विमान प्रवास देणे आणि जवळपास २०० नवी अद्यावत विमानतळे उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता२०२१ पर्यंत एमआरओ क्षेत्रात १०%ची वाढ होईल आणि त्यातून . अब्ज डॉलरची कमाई होईल असा अंदाज बांधला जात होताभारतातील राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाचे व्यापारीकरण करणे हा प्राधान्यक्रमा वरचा विषय होता.

नव्या विमानांना मागणी नसल्याने विमान निर्मितीत घट झाली आहे,  याचा भारतीय एअरोस्पेस उद्योगावर गंभीर परिणाम होऊ शकतोलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारने काही कृतीशील उपाय योजत एअरोस्पेस आणि सरंक्षण उद्योगाला उत्पादन सुरु ठेवण्याची अनुमती देणारे आदेश जारी केले होतेपरंतुदेशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि सरकारी पातळीवर परस्पर समन्वय नसल्याने हा उद्योग थोड्याक्या प्रमाणात का असेना पणसामान्य पातळीवर आणण्याच्या प्रक्रियेलाही खीळ बसलीयाचा परिणाम म्हणून जागृत करण्याचा अधिकार आणि उपाय करण्याचा अधिकाराअंतर्गत बड्या एअरोस्पेस कंपन्यांनी आपल्या ग्राहकांवर दबाव टाकायला सुरुवात केली आहेसध्या केलेले करार वेळेत पूर्ण  झाल्यास या करारांचे नुतनीकरण होणार नाहीअशी भीती भारतीय एअरोस्पेस कंपन्यांना वाटत आहेभारतीय एअरोस्पेस क्षेत्राची विश्वासू पण तणावग्रस्त पुरवठादार अशी प्रतिमा निर्माण झाल्यास त्यांना हे अजिबात परवडणारे नाही.

सध्या केलेले करार वेळेत पूर्ण  झाल्यास या करारांचे नुतनीकरण होणार नाहीअशी भीती भारतीय एअरोस्पेस कंपन्यांना वाटत आहे.

मंदीतील संधी

भारताने सध्या या क्षेत्रातील खडतर आव्हानांवर मात करतहवाई उद्योग क्षेत्रातील नवे नेतृत्व प्रस्थापित करण्याची हीच वेळ आहेलक्षणीय एसओपीसह ठिकठिकाणी देशी हवाई क्षेत्राला चालना देता येईलकेंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्या परस्पर समन्वयातून  सर्व महत्वपूर्ण मार्गावरील व्यापारी वाहतूक सुरु केली जाऊ शकतेसंपूर्ण किंवा अंशतलॉकडाऊन असणाऱ्या भागात किंवा शहरातील प्रवाशांशी शेवटच्या टोकापर्यंत संपर्क ठेवणेया सारख्या सोयी सुरु करता येतीलहवाई उद्योगाला विशेष प्रोत्साहन देण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने विमानतळावरील पार्किंग शुल्क कमी करणेविमान वाहतूक शुल्क कमी करणे आणि हवाई इंधन जीएसटीच्या अखत्यारीत आणणे अशा प्रकारच्या उपाययोजनांचा विचार केला जाऊ शकतोयातून हवाई वाहतुकीसाठी आशादायी चित्र निर्माण होण्याची शक्यता आहेभारताचे आकारमान आणि स्केल इकोनॉमी यामुळे हवाई आणि एअरोस्पेस उद्योगावर भारत आपला ठसा उमटवू शकतोसध्या क्रूड ऑईल आणि एव्हिएशन फ्युएलचे दर अगदी कमी आहेतत्यामुळे सध्याचे साठे पूर्ण क्षमतेने भरतील आणि मोठमोठे टँकर एव्हिएशन फ्युएलने भरून ते पार्क करून ठेवण्याची योजना सरकार करू शकतेयामुळे एअरलाईन कंपन्यांची क्षमता नसेल तेंव्हाही त्यांना ठोस मदत मिळू शकते.

उत्पादनाला चालना देण्यासाठी एनएएलएसएआरएएस (NAL-SARAS) सारख्या लाईट ट्रान्सपोर्ट विमानांच्या स्वदेशी योजनांना गती दिली पाहिजेमहिंद्राचा १० आसनी हवाईबसला देखील छोट्या पल्ल्याच्या वाहतुकीची संधी दिली गेली पाहिजेनव्या जोमाने प्रादेशिक जेट विमाने विकसित करता आली पाहिजेतज्यामध्ये संपूर्ण देशी इरोस्पेस क्षेत्राला सामावून घेण्याची क्षमता असेलसर्व नागरिकांसाठी वैश्विक आरोग्य सेवेचा आराखडा मांडण्यासाठी भारत पुढाकार घेत असतानापरकीय व्यापाऱ्यांकडून लढाऊ जेट विमाने आणि गनशिप खरेदी करण्यासाठी आर्थिक चणचण भासू शकते.  भारताने एचएएलतेजसरुद्राएएलएच यासारख्या एअरोस्पेस क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या देशी मिसाईल प्रोग्रॅम्सच्या सहाय्याने अधिकाधिक उत्पन्न मिळवणेखर्च करणे आणि प्राधान्यक्रमाची पुनर्रचना करण्यावर भर दिला पाहिजेसर्वच्या सर्व ११४ लढाऊ जेट विमानांची खरेदी जर भारतीय कंपन्यांकडूनच झाली तर भारतीय एअरोस्पेस क्षेत्रासाठी हे एक वरदानच ठरेलत्याचप्रमाणेजहाजे वाहून नेण्यासाठी लागणारी मोठी विमाने देखील जर भारतीय व्यापाऱ्यांकडूनच विकत घेतली पाहिजेततेजसचे नौदलीय प्रतिकृती जवळपास पूर्णत्वास पोचली आहेभारताकडे क्षमता असल्यास परदेशी बनवटीच्या कंपन्यांकडून एअरोस्पेस उत्पादनांची खरेदी तात्पुरत्या काळासाठी स्थगित केली पाहिजे

नव्या जोमाने प्रादेशिक जेट विमाने विकसित करता आली पाहिजेतज्यामध्ये संपूर्ण देशी इरोस्पेस क्षेत्राला सामावून घेण्याची क्षमता असेलसर्व नागरिकांसाठी वैश्विक आरोग्य सेवेचा आराखडा मांडण्यासाठी भारत पुढाकार घेत असतानापरकीय व्यापाऱ्यांकडून लढाऊ जेट विमाने आणि गनशिप खरेदी करण्यासाठी आर्थिक चणचण भासू शकते.  

चीनबाहेर गुंतवणूक करणार्स उत्सुक असणाऱ्या परदेशी कंपन्याना आकर्षित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी हरेक प्रयत्न केले पाहिजेतत्यांना उत्तम पायाभूत सुविधा जसे की उर्जाकामगार  आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धतीनुसार बौद्धिक संपत्तीची सुरक्षा पुरवली पाहिजे.विशेष क्षमता असणाऱ्या अशा अनेक परदेशी एअरोस्पेस कंपन्या आहेत ज्या या महामारीने निर्माण झालेल्या गोंधळवजा स्थितीतून बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेतअशा अडचणीत असलेल्या कंपन्या शोधल्या पाहिजेतबायआउट आणि जेव्ही यांनी आधीच अशा कंपन्यांत प्रवेश मिळवला आहेचीनने आपल्या कंपन्यांच्या क्षमतांचा एक महत्वपूर्ण भाग अशा अडचणीतील कंपन्यांच्या बायआउट्सवरच उभा केला आहे.

उदाहरणच द्यायचे तर, चीनची अँटोनोव्ह२२५ च्या उत्पादनातील गुंतवणूक आणि त्यांचा संयुक्त प्रकल्प.  बोईंगसोबतच्या कराराचे नूतनीकरण केल्यानंतर सध्या ते एम्ब्रिअर विकत घेण्याचे नियोजन करत आहेत. भारतानेदेखील एम्ब्रिअरसाठी बोली लावली पाहिजे, भारत सरकार आणि भारतीय कार्पोरेट्सनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे. या महामारीच्या काळात सर्वत्र देखरेख ठेवण्यासाठी यूएव्ही (मानवरहित हवाईयंत्र) देखील अनेक प्रकारच्या भूमिका बजावत आहेत. हवाई क्षेत्राच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे. नागरी उड्डाण मंत्रालय आणि डीजीसीए (DGCA) संयुक्तरीत्या यूएव्हीसाठी काही मार्गदर्शक तत्वे लागू करण्याचा विचार करत आहेत. हा उपक्रम आता आणखी एक पाउल पुढे नेत  राष्ट्रीय हवाई दलात आत्ता युएव्हींचाही समावेश केला पाहिजे. भारतातील तरुणांनी आपल्या कौशल्याला आणखीन धार देत जागतिक स्तरावर अव्वल ठरेल अशा प्रकारचे युएव्ही क्षेत्र विकसित केले पाहिजे. डीजीसीए आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने पारंपारिक हवाई वाहतुकीला दिले जाते तितकेच महत्व  यूएव्ही क्षेत्रालाही दिले पाहिजे. तंत्रज्ञानातील ही बदलती गती लक्षात घेतली पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना राज्यकर्त्यांनी अधिक कृतीशील राहिले पाहिजे. मानवविरहित दलामुळे हवाई उद्योगाला जे काही नुकसान सोसावे लागले आहे त्याची भरपाई होऊ शकत नाही. पण, याकडे भविष्यातील गुंतवणूक म्हणून पाहिजे पाहिजे, कारण मानवविरहीत दल हेच या क्षेत्राचे भविष्य आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.