Published on Aug 29, 2023 Commentaries 0 Hours ago

नवीन माहिती गोपनीयता कायद्यांच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमे आणि नेटवर्किंग यांचीही छाननी केली जात आहे.

विकेंद्रित समाजमाध्यमांचे जाळे आणि ग्राहक संरक्षण संस्था

सध्या चर्चाविश्वात माहितीच्या गोपनीयतेबाबत सामान्यपणे चिंता व्यक्त केली जाते. ऑनलाइन जगतात बड्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या वर्चस्वाचा मुकाबला करण्यासाठी जगभरातील सरकारे माहितीच्या गोपनीयतेचे विधेयक, बाजारपेठ नियमन आणि अविश्वास ठराव सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना,  समाजमाध्यमे आणि नेटवर्किंगही चिंतेच्या कक्षेत आले आहेत. मात्र, गूगल, फेसबुक, ट्विटर इत्यादी समाज माध्यमांच्या मर्यादित पर्यायांमुळे ग्राहक केंद्रीकृत समाज माध्यमांवर अवलंबून आहेत[१].

समाज माध्यमे आणि समाजमाध्यमांचे जाळे आता वैयक्तिक अस्तित्वाचा एक अटळ भाग बनले आहे. फेसबुक आणि गूगल यांसारख्या नेटवर्क्सच्या सेवा या केवळ एखाद्याला सेवा उपलब्ध होण्याबाबत वर्चस्व गाजवतात असे नाही, तर खासगी बँकिंग, ऑनलाइन डेटिंगपासून, अथवा कोणताही उद्योग असो, कामासाठी ऑनलाइन साधनांमध्ये प्रवेश करण्यापासून इतर अनेक सेवांसंबंधीची ऑनलाइन पडताळणीदेखील करतात.

खरे पाहता, सामाजिक नेटवर्कचे उद्दिष्ट लोकांना जोडणे आणि सामाजिक साधने म्हणून काम करणे हे आहे. तरीही, वाढता डेटाबेस आणि वापरकर्त्यांसह, समाजमाध्यमांची नेटवर्क्स ही समाजीकरणाच्या ऑनलाइन प्रतिनिधित्वापेक्षा बरेच अधिक काही बनली आहेत. खरे तर ती सामाजिक नेटवर्क माहिती संकलन आणि बाजारपेठ विश्लेषणाची साधने बनली. परिणामी, ही व्यासपीठे वापरकर्त्यांचा आवाका वाढवण्यासाठी आणि वापरकर्त्यांच्या पोस्ट वाढवण्याकरता असलेल्या उर्वरित माध्यम व्यासपीठासारखी न राहता, त्यांच्यावर नमूद केल्या गेलेल्या माहितीचे मालक बनले.

व्यक्तींच्या या ‘डेटाबेसिंग’ने वापरकर्त्यांना त्यांच्या विस्तारित मंडळांशी जोडले जाण्याची, परस्परसंवादाची, मित्राच्या- मित्राशी- जोडले जाणे यांवर आधारित जोडणी शोधण्याची आणि वैयक्तिक प्रासंगिकता असलेली माहिती आणि जाहिराती उपलब्ध होण्याची मुभा दिली आहे.

विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांचे नेटवर्क एका संस्थेच्या केंद्रीकृत माहितीऐवजी माहिती आणि परस्परसंवाद संचयित करण्यासाठी नेटवर्किंगची सामूहिक शक्ती (पीअर-टू-पीअर इन्फ्रास्ट्रक्चर) वापरते.

मात्र, समाज माध्यमांनी वापरकर्त्यांचे ते काय पोस्ट करू शकतात आणि कोणत्या पोस्ट त्यांना उपलब्ध असतात, यासंबंधीची वेब सामग्री उपलब्ध करून देणारे सॉफ्टवेअरही काढून टाकले आहे. या व्यतिरिक्त, समाज माध्यमे विद्यमान विचारांना बळकटी देण्यात आणि वापरकर्त्यांच्या पोस्टची अधिकृतपणे तपासणी करून, आवश्यकता वाटल्यास कोणतीही माहिती काढून टाकण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतात.

विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्क्सचे लाभ  

या कमतरतांमुळे अनेकजण, विशेषत: ‘डिजिटल लेजर टेक्नॉलॉजी’मध्ये दृढ विश्वास ठेवणारे- विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्क्सवर स्थलांतरित होण्यासाठी प्रोत्साहित झाले आहेत. विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांचे नेटवर्क एका संस्थेच्या केंद्रीकृत माहितीऐवजी माहिती आणि परस्परसंवादाकरता नेटवर्किंगची सामूहिक शक्ती (पीअर-टू-पीअर इन्फ्रास्ट्रक्चर) वापरते.

विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्कच्या सभोवताली अनेक आव्हाने आहेत, जसे की वापरकर्ते आणि सर्व्हरच्या संख्येवर हवामानाची चिंता, अल्पवयीन मुलांच्या अनियंत्रित प्रवेशाची समस्या इत्यादी, बहुतांश विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांचे मुख्य आव्हान वापरकर्ते शोधणे हे आहे. केंद्रीकृत समाज माध्यमे लोकांना मनोरंजन आणि लोकांशी संवाद साधण्याची क्षमता देऊन त्यांना आकर्षित करतात. म्हणून, संपर्क शोधणे, संपर्कात राहणे आणि विविध सेवा उपलब्ध होणे यांसारख्या इतर पैलूंचा विचार करता, माहितीची गोपनीयता बहुतांश ‘सामान्य’ वापरकर्त्यांसाठी प्राथमिक चिंता नाही.

अशा प्रकारे, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि माहितीची गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्कने स्वतःला एक चांगला पर्याय म्हणून स्थापित करायला हवे.

मास्टोडॉन आणि प्लेरोमा यांसारख्या अनेक विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्क्सनी केंद्रीकृत मालकीच्या समस्यांशिवाय ट्विटर आणि फेसबुकसारख्या मायक्रोब्लॉगिंग साइट्सचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र, या व्यासपीठांमध्ये त्रुटी आहेत, ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.

बर्‍याच विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्क्सवर, वापरकर्ते त्यांचे सर्व्हर स्थापित करू शकतात, मालकी प्राप्त करू शकतात आणि व्यवस्थापित करू शकतात, या संदर्भात स्वतंत्र प्रकरण म्हणता येईल. अशा संरचनेसाठी वापरकर्त्यांना समुदायामध्ये सहभागी होण्याची आणि व्यासपीठावर संवाद साधण्याची आवश्यकता असते, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या माहितीच्या मालकीची मुभा दिली जाते.

माहितीच्या गोपनीयतेच्या समर्थकांसह, पारंपरिक समाज माध्यमांवर सेन्सॉर करण्यात आलेल्या अनेक वाईट प्रवृत्तीही विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्कमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत.

अशा घटनांमधील वापरकर्त्यांना परस्परांसह काम करण्यास सक्षम करण्यासाठी, ‘फेडरेशन प्रोटोकॉल’ (संस्थेशी संबंधित विश्वासाचा शिष्टाचार अथवा डिजिटल स्वाक्षरी) एक मोठा परस्परसंबंधित समुदाय तयार करण्यासाठी माहिती आणि परस्परसंवादांना, विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्कच्या घटनांमध्ये प्रवाहित करण्यास मुभा देतो. ही प्रक्रिया पारंपरिक समाज माध्यमाप्रमाणेच परंतु भौतिकदृष्ट्या स्वतंत्र सर्व्हरवर परस्परसंवादाला आकार देणारी सामग्री तयार करते.

बड्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या नियंत्रणापलीकडचे मुक्त भाषण हे या प्रणालीचे एक वैशिष्ट्य आहे. केंद्रीकृत सोशल मीडियाच्या त्रुटींपैकी ही एक असली तरी, बड्या तंत्रज्ञान कंपन्यांची सेन्सॉरशिप काढून टाकल्याने विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्कमधील आव्हानांची व्याप्ती वाढेल. पारंपरिक सेन्सॉरशिप अंतर्गत, द्वेष, वर्णद्वेष, लिंगवाद आणि हिंसाचार सहसा संबोधित केले जातात. मात्र, माहिती गोपनीयतेच्या समर्थकांसह, पारंपरिक समाज माध्यमांवर सेन्सॉर केलेल्या अनेक वाईट प्रवृत्तीदेखील विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्कमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत.

अशा प्रकारे, बर्‍याच विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्कना आता सामग्री निरीक्षणाची आणि नियंत्रणाची आवश्यकता आहे, जे प्रकरणविषयक प्रशासक स्वतंत्रपणे एकेका उदाहरणाच्या आधारे संबोधित करतात.

विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांचे नेटवर्कसंदर्भातील चिंता

या ‘इन्स्टन्स अॅडमिनिस्ट्रेटर’ना मात्र, संघर्षाच्या क्षेत्रावर कोणताही अधिकार किंवा ज्ञान असू शकत नाहीत, सामान्यतः इतर वापरकर्ते शांतता राखण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रकरणांवर वापरकर्ते वाढवतात. जेव्हा असे प्रशासक वाढीव सहभागाच्या निकषावर सामग्री साखळी किंवा इतर वापरकर्त्यांना अवरोधित करतात, तेव्हा पुढील प्रश्न आणि चिंता उद्भवतात, जसे की:

  • कोणती धोरणे तयार करायला हवी आणि लागू करायला हवी आणि कोणत्या प्रकरणांवर?
  • सेन्सॉरशिपमध्ये न जाता ऑनलाइन व्यासपीठाच्या विशिष्ट नियमांच्या आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारावर वापरकर्त्याने व्युत्पन्न केलेल्या सामग्रीची तपासणी करण्यास आणि परीक्षण करण्यास किती वाव आहे?
  • वाईट प्रवृत्ती म्हणून लक्ष्यित सरकारी धोरणे मोठ्या वापरकर्त्यांच्या तळावर कसा परिणाम करतील?

या प्रश्नांची उत्तरे देणे महत्त्वाचे आहे, कारण काही वाईट प्रवृत्तींच्या कृतींवर आधारित मोठ्या वापरकर्ता तळाच्या हानीचे प्रकार हे सेन्सॉरशिप आणि वापरकर्ते गमावण्याच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात, ज्याचा आधीपासूनच केंद्रिकृत समाज माध्यमांना त्रास होत आहे.

वापरकर्त्यांना पोहोचणाऱ्या हानीचे प्रकार हे नवीन वापरकर्त्यांना विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्कमध्ये सामील होण्यासाठी प्रतिबंधक ठरू शकतात. आधी सांगितल्याप्रमाणे, सहसा, वापरकर्ते सामाजिक व्यासपीठांवर सामील होतात, जेथे त्यांचे मित्र आधीपासूनच आहेत, म्हणजेच नेटवर्कचा प्रभाव. काही विकेंद्रित नेटवर्क्सना ‘नॉन-फ्लोटिंग यूजर बेस’ जमा करण्यासाठी मदतीची आवश्यकता असण्याचे हे एक प्राथमिक कारण असू शकते. समजा एखाद्या वापरकर्त्याची पोस्ट किंवा उदाहरण अयोग्यरित्या टॅग केली गेली किंवा नाकारली गेली. अशा प्रकरणात, याच्या परिणामी वापरकर्त्याच्या असंतोषात वाढ होऊ शकते, विशेषत: जर त्यांचे मित्र दुसर्‍या ‘प्रकरणा’वर सक्रिय असतील तर त्यांना अनुसरण करण्यास बंदी घातली जाते. यांसारख्या व्यासपीठांवरील नकारात्मक अनुभव वापरकर्त्यांमध्ये अविश्वास आणि असंतोष निर्माण करू शकतात आणि वापरकर्त्यांना गमावण्यास हातभार लावू शकतात.

उपाययोजनांची व्याप्ती

नवीन आवश्यकता सुव्यवस्थित आणि अंतर्भूत करण्यासाठी पुन:पुन्हा परीक्षण करून अद्ययावत करता येईल, अशी रचना केलेल्या वापरकर्ता-चालित धोरणांना अॅडमिनिस्ट्रेटरनी त्यांची प्रकरणे नियंत्रित करण्यासाठी सक्षम करण्यास प्राधान्य द्यायला हवे. याचे एक उदाहरण म्हणजे टॅगिंग धोरण लागू करणे, वापरकर्त्यांना टॅग वाटप करणे किंवा सामग्रीचा अहवाल देणे. म्हणून, वैयक्तिक वापरकर्त्यांना टॅग करणे सोपे करण्यासाठी तयार केलेला एक सुव्यवस्थित ‘मॉडरेशन इंटरफेस’ (संभाव्यपणे स्वयंचलित वर्गीकरणाच्या सहाय्याने) हा एक उपाय आहे, जो दोन्ही टोकांवरील वापरकर्त्यांना सक्षम करतो.

मास्टोडॉनच्या (एक लोकप्रिय विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यम नेटवर्क)च्या सहकार्याने युरोपीय युनियन- अनुदानित नवकल्पना आणि संशोधन प्रकल्पांतर्गत सुचवलेली आणखी एक चौकट म्हणजे ‘युनोमिया चौकट’. ही संकल्पना गोलाकार माहिती-चालित दृष्टिकोनावर आधारित आहे.

निर्धारित सुरक्षा आणि गोपनीयता चौकटीसह माहिती संकलित आणि सामायिक केली जाते. ही गोपनीयता चौकट ‘ह्युमन अॅज ट्रस्ट सेन्सॉर’ घटक असलेल्या विश्लेषणात्मक प्रणालीवर आधारित आहे.

नवीन आवश्यकता सुव्यवस्थित आणि अंतर्भूत करण्यासाठी पुन:पुन्हा परीक्षण करून अद्ययावत करता येईल, अशी रचना केलेल्या वापरकर्ता-चालित धोरणांना अॅडमिनिस्ट्रेटरनी त्यांची प्रकरणे नियंत्रित करण्यासाठी सक्षम करण्यास प्राधान्य द्यायला हवे.

‘ह्युमन अॅज ट्रस्ट सेन्सॉर’ घटक ‘युनोमिया’सारख्या चौकटीमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रतिमानांपैकी एक आहे. यात विश्वासार्हतेचे मूल्यमापन करण्यासाठी, मानवी वापरासाठी मूळ माहिती गोळा करणे आणि त्याचे प्रतिनिधित्व करणे यांवर आधारित निर्णय घेणे आणि वापरकर्त्यांना मतदान साधनांचा वापर करून त्यांच्या निर्णयासह माहिती प्रमाणित करण्याची परवानगी देणे, दृश्य आणि तार्किकदृष्ट्या माहिती वापरण्याच्या व्यक्तीच्या क्षमतेचा लाभ घेणे समाविष्ट आहे. ही प्रणाली नंतर पुन:पुन्हा परीक्षण करून अद्ययावत करावा लागणाऱ्या मशीन लर्निंगद्वारे स्वीकारली जाते आणि समर्थित केली जाते, स्थानिक पातळीवर (वापरकर्त्यांच्या उपकरणांवर) किंवा दूरस्थपणे (युनोमिया सर्व्हरवर) केली जाते आणि युनोमिया आणि इतर ‘ह्युमन अॅज ट्रस्ट सेन्सॉर’-आधारित चौकट पूर्णपणे तृतीय-पक्ष केंद्रीकृत क्लाउड सर्व्हरपासून स्वतंत्र होऊ शकतात.

शासन आणि विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांचे नेटवर्क

विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांचे नेटवर्क केंद्रीकृत शासन प्रणालींवर अवलंबून नाही. पारंपरिक समाज माध्यमांहून वेगळे असे विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांचे नेटवर्क   वापरकर्ता-केंद्रित आणि वापरकर्ता नियंत्रित असल्याने, कोणतेही एकल अधिकारक्षेत्र सोशल नेटवर्कवर नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा प्रकारे, वापरकर्ते सरकारच्या किंवा सरकारी यंत्रणेच्या नाही, तर केवळ त्यांच्या प्रकरणांच्या फेडरेशन धोरणांनुसार संरक्षित आहेत.

जरी ही मुक्त नेटवर्कची खरी व्याख्या आहे आणि भाषण व प्रवेश स्वातंत्र्याच्या कोणत्याही पैलूला वृद्धिंगत करते, पण यामुळे वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती अशा व्यासपीठांचा वापर करण्यास बळकटी मिळू शकेल, ज्यांची संख्या या व्यासपीठाच्या लोकप्रियतेसह वाढेल.

या कारणास्तव, विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्कसाठी केवळ प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे लक्षात घेत त्या आधारे फेडरेशन धोरण तयार करणे आवश्यक नाही तर द्वेषयुक्त भाषण आणि कट्टरतावादाच्या भोवती धोरण आखणे आवश्यक आहे, जे प्रकरणांच्या अॅडमिनिस्ट्रेटरवर नाही तर व्यासपीठावरच अवलंबून असतात.

येथे पाया आणि प्रभावाचे क्षेत्र संबोधित करण्याचा नियम कोणत्याही वाईट प्रवृत्तीच्या किंवा कट्टरपंथी वापरकर्त्यांना संबोधित करण्यात मदत करेल, ज्यांचा समकालीन समस्यांना संबोधित करणार्‍या धोरणांऐवजी, सूक्ष्म तपशिलात व्यत्यय निर्माण करण्याचा उद्देश असतो.

नवी व्यापक आणि पायाभूत धोरणे, जी फेडिव्हर्समधील (विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्कमधील मानक फेडरेशन धोरणांसाठी वापरला जाणारा बोलचालीचा शब्द) प्रसिद्ध उदाहरणांच्या विश्वासार्ह/ काळजीपूर्वक संकलित केल्या गेलेल्या सूचीवर अवलंबून असतात, रेखांकित केले जाऊ शकते. अॅडमिनिस्ट्रेटर संबंधित याद्या निवडू शकतो आणि आवश्यक असल्यास, समजल्या जाणार्‍या सामान्य सहमतीनुसार त्या लागू करू शकतो.

विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांचे नेटवर्क ही तंत्रज्ञान-जाणकार आणि माहितीची गोपनीयता आणि मुक्त भाषणावर विश्वास ठेवणाऱ्यांद्वारे समर्थित जागा असताना, हे अस्सल, सुरक्षित व्यासपीठ व्हावे याकरता यांतील अनेक क्षेत्रांत अंतर्गत प्रशासन आवश्यक आहे; जी ‘सर्वांना प्रवेशाची’ मुभा देतात आणि भाषण स्वातंत्र्य देतात, इतकेच नाही, तर सर्वांना प्रवेश देतानाच ‘सर्वांच्या सुरक्षितते’ ची खातरजमा करतात.

अशा प्रकारे, केंद्रीकृत मालकी किंवा सरकारी अधिकारक्षेत्रावर वैयक्तिक सक्षमीकरणावर अवलंबून असलेल्या विकेंद्रित ऑनलाइन समाजमाध्यमांच्या नेटवर्ककडे अधिक व्यापक वापरकर्ते जाण्यापूर्वी वाईट प्रवृत्तीच्या वापरकर्त्यांचा प्रभाव, सर्वसामान्य वापरकर्त्यांची होणारी हानी, वापरकर्ता आधार गमावणे आणि अंतर्गत प्रशासन या समस्यांचे निराकरण करणे महत्वाचे आहे.

—————————————————————————————

[१]एकाच संस्थेच्या किंवा समूहाच्या मालकीची समाज माध्यमे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Shravishtha Ajaykumar

Shravishtha Ajaykumar

Shravishtha Ajaykumar is Associate Fellow at the Centre for Security, Strategy and Technology. Her fields of research include geospatial technology, data privacy, cybersecurity, and strategic ...

Read More +