Author : Oommen C. Kurian

Published on Sep 24, 2021 Commentaries 0 Hours ago

भारत आणि चीनची मिळून असलेली लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे ४० टक्के आहे. त्यामुळे कोरोनाशी ते कसे लढले ते पाहणे महत्त्वाचे आहे.

भारत आणि चीन कोरोनाशी कसे लढले?

जगात विशिष्ट कालावधीत विशिष्ट ठिकाणी उद्रेक झालेले कोरोना विषाणू- २२९ इ, एनएल ६३, ओसी ४३, आणि एचकेयू १ अशा चार प्रकारचे आहेत. विविध देशांमधल्या लोकांमध्ये या विषाणूंचा संसर्ग होताना दिसून येतो. तज्ज्ञांच्या मते, सार्स-कोव्ही-२ विषाणू हा लवकरच विशिष्ट कालावधीत विशिष्ट ठिकाणी उद्रेक झालेला पाचवा कोरोना विषाणू बनत आहे. एकदा का कोविड-१९ लशींच्या पुरवठ्यातील अडथळे दूर झाले की, सार्स-कोव्ही-२ विषाणूचा धोकाही आटोक्यात येऊ शकेल. मात्र, गेले १८ महिने एका भयाण दु:स्वप्नासारखे होते, जेव्हा एक नवा जीवघेणा विषाणू दुबळी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांचे एकामागोमाग एक बळी घेत पुढे सरकत होता.

भारत आणि चीनची मिळून जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे ४० टक्के लोकसंख्या आहे आणि अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता असतानाही या दोन्ही देशांनी कोविड-१९ संकटाचा सामना करण्यासाठी लवकर कडक लॉकडाउन लादण्याचे पाऊल उचलले. मात्र, ज्या देशात कोविड-१९चा सर्वप्रथम उद्रेक झाला, त्या चीनने या विषाणूवर भारतासकट इतर बहुतांश देशांच्या तुलनेत अधिक कार्यक्षम पद्धतीने नियंत्रण मिळवले आणि प्रतिबंधक लशीची प्रतीक्षा असतानाच्या- दरम्यानच्या काळात कोविड-१९ साथीतील मृत्यू चीन कमी करू शकला. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीच्या आधारे, जर लोकसंख्येची अंदाजे तुलना केली तर, चीन आणि भारत या दोन्हीही देशांमध्ये कोविड-१९च्या साथीने जसे वळण घेतले होते, ते खूप वेगळे होते.

चीनमधील कोविड-१९ ची साथ आणि त्याचा सामना करण्यासाठी चिनी सरकारने योजलेले उपाय यासंबंधीच्या माहितीवर असलेल्या निर्बंधांमुळे चीनमधील कोविड-१९ संकटाच्या परिणामाची गणना करणे हे एक कठीण काम आहे. तेथील हुकूमशाही राजवट आणि माहितीवर असणारी कडक नियंत्रणे लक्षात घेता, चीनमधील परिस्थितीची इतर देशांशी तुलना करण्याच्या कोणत्याही प्रयत्नात आव्हाने खच्चून भरलेली आहेत; मात्र तरीही, भारताच्या तुलनेत अफाट आणि वैविध्यपूर्ण लोकसंख्या असूनही, कोविडची लागण झालेल्यांची संख्या आणि रुग्णांचे मृत्यू यांवर चीनने लक्षणीयरीत्या नियंत्रण प्राप्त केले. (आलेख क्र. १) त्याच वेळी, वर्षभरात दोन विनाशकारी लाटा पसरल्यानंतर, अनेकांना वाटत आहे की, भारतातील कोविड संसर्गात पुन्हा वाढ होईल.

आलेख क्र. १: गेल्या १८ महिन्यांत कोविड-१९ मुळे झालेले मृत्यू आणि नव्याने लागण झालेली प्रकरणे: भारत आणि चीन


आलेख क्र. १  :  स्त्रोत: जागतिक बँक डेटा पोर्टल

कोविड-१९ साथीत मृत्यूमुखी पडलेल्यांची तुलना केल्यास भारत आणि चीनमध्ये मोठा तफावत दिसून आली आहे. जानेवारी २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत, कोविड-१९ मुळे दररोज नोंदल्या गेलेल्या मृत्यूने गाठलेले टोक पाहता, भारतातील सर्वाधिक मृत्यू कोविडमुळे झाले (इस्केमिक हृदयविकार- ज्यात शरीराच्या एका भागात रक्त प्रवाह (आणि त्यामुळे ऑक्सिजन) प्रतिबंधित किंवा कमी होतो.) आणि चीनमध्ये मृत्यू होण्याचे २३ वे कारण कोविड आहे (मेंदू आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेचा कर्करोग).

आलेख क्र. २ मध्ये, ७ दिवसांची सरासरी लक्षात घेता, २०१९ मध्ये सर्व कारणांमुळे झालेले मृत्यू आणि त्या प्रमाणात २०२०-२०२१ मध्ये कोविड-१९ ने झालेले मृत्यू यांतून कोविड-१९च्या तीव्रतेचे गुणोत्तर दर्शवले आहे. कार्यपद्धतीनुसार, २०१९ साली सर्वाधिक मृत्यू ज्या कारणामुळे झाले ते प्रमाण लक्षात घेता, त्या वर्षातील सर्व कारणांमुळे झालेल्या मृत्यूंची सरासरी लक्षात घेता, २०१९ मध्ये एखाद्या विशिष्ट कारणामुळे मृत्यूदर वाढलेला दिसून येतो.

आलेख क्र. २: २०१९ साली कोविड-१९ मुळे वाढलेल्या मृत्यूंचे प्रमाण आणि मृत्यूचे मुख्य कारण

आलेख क्र. २ : स्त्रोत: जागतिक बँक माहिती विश्लेषण

देशाची केंद्रीकृत प्रणाली-

गमतीची गोष्ट अशी की, चीनमध्ये सामान्यत: स्वातंत्र्यांचा अभाव आहे, मात्र जगातील बहुतेक भाग लॉकडाऊनमध्ये असताना चिनी नागरिकांना मात्र जा-ये करण्याचे लक्षणीय स्वातंत्र्य देण्यात आले होते. सुरुवातीला, साथीच्या उत्पत्तीबद्दलचे तथ्य दडपल्याबाबत आणि त्याच्या प्रसाराविषयीच्या माहितीत सुस्पष्टता नसल्याने चीनवर जगभरातून मोठी टीका होऊ लागली.

मात्र, अभ्यासात असे दिसून आले आहे की, एकदा धोका स्पष्ट दिसून आल्यानंवर, चिनी प्राधिकरणांनी लॉकडाउन केले आणि आधुनिक युगात कधीही झाले नव्हते, इतक्या प्रमाणात हालचालींची गती कमी केली. लोकसंख्येच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याव्यतिरिक्त, चाचण्यांची सामग्री, मास्क, आणि वैयक्तिक संरक्षक उपकरणे या सर्व गोष्टींचा अभाव हे चिनी सरकार समोरचे आणखी एक मोठे आव्हान होते.

कमी फटका बसलेल्या चीनमधल्या प्रदेशांतून इतर प्रदेशांमध्ये मानवी संसाधनांसह इतर संसाधने त्वरित कशी उपलब्ध करता येतील, हे चीनमधील अत्यंत केंद्रीकृत राजकीय व्यवस्थेने पाहिले. वैद्यकीय स्वयंसेवकांना मोठ्या संख्येने कोविड-१९च्या संसर्गाचे प्रमाण वाढलेल्या ‘हॉटस्पॉट’मध्ये नेण्यात आले, ज्यामुळे तुलनेने कमी वेळेत विषाणूचा संसर्ग रोखणे शक्य झाले. सुरुवातीच्या कोविड-१९च्या लाटेदरम्यान संसर्ग रोखण्यासाठी काय करावे, याचे मिळालेले धडे जून महिन्यात चीनमधील कोविडचा आणखी एक उद्रेक दडपण्यासाठी प्रभावीपणे वापरले गेले.

अमर्याद आणि अत्यंत केंद्रीकृत शक्तीचा स्त्रोत असताना, पक्ष आणि सरकारी संरचना यांच्यातील सहजीवी संबंध लक्षात घेत, सरकारी यंत्रणेचे तळागाळातील नेटवर्क अत्यंत प्रभावीपणे तैनात करण्यात चिनी कम्युनिस्ट पार्टी सक्षम ठरली. विश्लेषकांनी असे निरीक्षण नोंदवले आहे की, निवासी समित्यांनी सरकारी यंत्रणेला पूरक अशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रभावी शासन आणि राजकीय नियंत्रण सुनिश्चित करणारी ही साधने हे कोविड-१९ संकटाचा प्रत्यक्ष मुकाबला करणारे प्रमुख घटक होते.

चीन आणि भारताने सार्वजनिक आरोग्यविषयक कठोर उपायांचा वापर करून कोविड-१९ साथीला रोगाला कणखरपणे तोंड दिले. गेली अनेक दशके हुकूमशाही सरकारने लोकसंमतीशिवाय घेतलेले निर्णय नम्रपणे स्वीकारायचे चीनच्या नागरिकांना अंगवळणी पडले आहे, कोविडचा मुकाबला करताना सरकारला याची मोठी मदत झाली. त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे तेथील नागरिकांना अंगवळणी पडले आहे. दोन आठवड्यांत एक भलेमोठे रुग्णालय बांधणे, त्याच्या कारखान्यांना ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेन्ट’ उत्पादन वाढवण्याचे आदेश देणे, कायदे अथवा नियमांचे पालन करणे आणि कोविड-१९ च्या उपचारांना सरकारी अर्थसहाय्य करणे यासह ताकदीचे आणि संकल्पांसारखे प्रतिकात्मक उपाय चिनी सरकारने योजले.

संशोधकांनी असे सुचवले आहे की, चीनमध्ये लोकांच्या हालचालींवर आणि वर्तनावर अधिक कठोरपणे नियंत्रण लागू केले गेले, याचे कारण तेथील जनतेला हुकूमशाहीसह जगण्याची सवय आहे आणि ते सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक नियंत्रण यांच्यात समतोल साधण्यास अधिक इच्छुक आहेत. ‘इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज’च्या संशोधनात असे आढळून आले की, प्रामुख्याने सरकारी निर्देशांद्वारे तिथे आर्थिक घडामोडी पुन्हा सुरू झाल्या, चीनच्या अर्थकारणास पहिल्यासारखी गती प्राप्त होण्यातील हा सर्वात उल्लेखनीय पैलू आहे. हुकूम आणि नियंत्रण या चौकटीत सार्वजनिक आरोग्याचे उपाय अचूकपणे अमलात आणले गेले.

दुसरीकडे, भारताच्या आरोग्यसेवेत पायाभूत सुविधांचा तुटवडा आहे तसेच गेली अनेक दशके भारतातील सामाजिक क्षेत्रांना निधीची चणचण भासते. हे लक्षात घेता, जनतेला सहाय्यकारी यंत्रणा उपलब्ध करून देण्यास सरकार समर्थ ठरेल, अशा विश्वासाचा अभाव जनतेत असल्याकारणाने कोविड-१९शी लढा देताना योजलेल्या उपायांच्या अंमलबजावणीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला. लोकांच्या हालचालींवर जशा पद्धतीने नियंत्रण ठेवण्यात आले, त्यातून भारतातील अराजकता आणि हुकूमशाहीतील सुस्पष्टता यांच्यातील तफावत ठळकपणे दिसून येते.

कोविडचा संसर्ग झालेली प्रकरणे वाढत असतानाही, भारतातील केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील प्राधिकरणे मोठ्या प्रमाणावर राजकीय किंवा धार्मिक संमेलनांवर नियंत्रण ठेवण्यास तयार नव्हते किंवा ते असमर्थ होते. भारत आणि चीनमधील सार्वजनिक आरोग्य नियंत्रण उपायांची तुलना करणाऱ्या अलीकडील संशोधनातही हेच दिसून आले आहे. चीनमध्ये लसीकरण सुरू होण्याआधी, शहर बंद करण्याचे कठोर उपाय, आग्रही तपासणी आणि शोधलेल्या प्रकरणांचा मागोवा घेणे यांमुळे जनतेत संसर्ग पसरण्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली.

याउलट, भारतात कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी परिणामकारकरीत्या झाली नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, चीनमध्ये सार्वजनिक आरोग्य उपायांचे पालन जनतेसाठी अनिवार्य होते, तर भारतात नियमांचे पालन करणे स्वेच्छिक होते आणि त्या कारणास्तव, अशा उपायांचे यश नेतृत्वाच्या तसेच नागरिकांच्या वैयक्तिक धोका पत्करण्याच्या धारणांवर अवलंबून असते.

भारतात, राजकीय कारणांमुळे उपायांची अमलबजावणी कुचकामी ठरली; तर चीनमध्ये राजकारणाचा उपयोग करून हाँगकाँगच्या नागरिकांचा प्रक्षोभ दडपून टाकण्यासाठी केला गेला. कोरोना विषाणूचे संक्रमण कमी करण्यासाठी हाँगकाँगने चलाखीने पाळत ठेवणे, अलग ठेवणे आणि सामाजिक-अंतर राखणे या उपायांचा वापर केला- उदाहरणार्थ- तोंडावर मास्कचा वापर करणे आणि शाळा बंद करणे अशा उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या. मात्र, संसर्ग कमी असतानाही, कोविड-१९ साथीवर नियंत्रण राखण्यासाठी योजलेल्या उपायांचा बहाणा करून जनतेचे आंदोलन चिरडण्याचा आरोप चीनवर करण्यात आला.

अभ्यास असे दर्शवतात की, इतर देशांच्या तुलनेत चीनच्या हुकूमशाही राजकीय व्यवस्थेमुळे आणि माहितीवरील कठोर नियंत्रणामुळे कोविड-१९च्या साथीच्या उद्रेकादरम्यान बनावट बातम्या/अफवा पसरणे शक्य झाले नाही. सेन्सॉरशिप आणि सरकारी कारवाईला चिनी जनतेने ‘सामाजिक जबाबदारी’, ‘सार्वजनिक सुरक्षा’ आणि ‘सामाजिक व्यवस्था’ असे संबोधले.

चिनी प्राधिकरणांनी माहितीच्या साथीदरम्यानच्या अनिर्बंध माहितीच्या वावराला यशस्वीपणे रोखले आणि त्याच वेळेस प्रत्यक्ष सार्स-कोव्ही-2 विषाणूच्या संक्रमणाची साखळीही त्यांनी तोडली. भारतात, विषाणू आणि वेगाने पसरणाऱ्या अविश्वसनीय माहितीच्या विरोधातील उपाययोजना किती प्रभावी ठरल्या हे सरकारने कठोरपणे योजलेल्या उपायांपेक्षा प्रामुख्याने नागरिकांनी नियमांच्या स्वेच्छेने केलेल्या पालनावर अधिक होत्या.

लस उत्पादन

देश पुन्हा रुळावर आणण्यासाठी लशींचा पुरवठा वाढवणे महत्त्वाचे आहे. जरी कोरोना-१९ची साथ येण्याआधी भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश असला, तरीही भारत वेळेत उत्पादन वाढविण्यात अपयशी ठरला, तर चीनने काही महिन्यांत लशींचे उत्पादन कित्येक पटींनी वाढवले, लशींच्या बाबतीत आक्रमक मुत्सद्दीपणाच्या प्रयत्नांतून देशात तसेच परदेशांत लशींचा मोठा पुरवठा चीन करू शकला.

७ सप्टेंबरपर्यंत, जगातील लोकसंख्येच्या १७.७ टक्के लोकसंख्या भारताची आहे, त्या लोकसंख्येपैकी १२.७ टक्के जनतेचे लसीकरण भारताने केले आहे, तर जागतिक लोकसंख्येच्या १८.२ टक्के लोकसंख्या असलेल्या चीनने त्यापैकी ३७.७ टक्के लोकसंख्येचे लसीकरण केले आहे. भारतात लसीकरणाची सुरुवात मंद गतीने झाली आहे आणि दैनंदिन लसीकरणाचा दर एक कोटीच्या आसपास यायला सप्टेंबर महिना उजाडला.

चीनने कित्येक महिन्यांपूर्वी १ कोटी दैनंदिन लसीकरणाची पातळी गाठली होती (आलेख क्र. ३). भारताने लशींच्या उत्पादनात येणाऱ्या अडथळ्यांवर मात केल्यामुळे या वर्षी सर्व प्रौढ व्यक्तींच्या लसीकरणाचा मार्ग सोपा झाला असावा. स्वारस्यपूर्ण बाब अशी की, लशींविषयी माहिती नसतानाही, ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान १५ देशांतील युवा प्रौढांच्या मुलाखतीवर आधारित सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, जगभरात चीनसह भारत लसीकरणाविषयी वाटणाऱ्या विश्वासाच्या बाबतीत सर्वोच्च स्थानावर आहे.

आलेख क्र. ३: लसीकरणाचे दैनंदिन डोस: भारत आणि चीन

आलेख क्र. ३ : स्रोत: ‘ब्लूमबर्ग’ने घेतलेला कोविड-१९ लसीचा माग

तुलनात्मक संशोधनात असे आढळून आले आहे की, लशींच्या प्रतीक्षेदरम्यान, कोविडचा प्रसार रोखण्याचे धोरण हे उपचारांद्वारे तीव्रता कमी करण्याच्या धोरणापेक्षा लागू पडते. भारतात कोविड-१९ साथीच्या सुरुवातीच्या दिवसांत नियंत्रण मिळविण्याच्या धोरणाच्या अमलबजावणीमुळे विषाणूचा प्रसार रोखणे अल्प प्रमाणात शक्य झाले, याचा अर्थ असा होतो की, धोरणाचे औपचारिकपणे लक्ष तीव्रता कमी करण्याकडे होते, जे सुसज्ज नसलेल्या, अपुऱ्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून होते. सुदैवाने, भारत एक युवा देश असल्याने, देशाची सुमारे निम्मी लोकसंख्या २५ वर्षांहून कमी वयाची आहे, याची एकूण लोकांना जितके नुकसान होऊ शकले असते, त्यापेक्षा ते कमी राखण्यात नक्कीच मदत झाली.

आलेख क्र. ४ : सरकारने कोविड-१९ची साथ चांगल्या प्रकारे हाताळली असा विचार करणाऱ्या लोकांची टक्केवारी

आलेख क्र. ४ : स्रोत: YouGov COVID-19 Tracker UK

सर्व घटकांचा विचार केल्यास, भारत आणि चीन यांच्यात कोविड-१९च्या संकटाला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनांची तुलना केल्यास, संसर्गाची प्रकरणे आणि वेगवेगळ्या वयानुसार होणाऱ्या मृत्यूदराचे प्रमाण याबाबत पूर्णपणे विरोधाभास आढळतो. परिणामस्वरूप, कोविड-१९ संकटामुळे भारताच्या अत्यंत कमकुवत प्रशासकीय रचनेतील- अत्यंत तुटपुंजा निधी उपलब्ध असलेल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला कमालीच्या तणावाला सामोरे जावे लागले.

चीनमध्ये हुकूमशाही व्यवस्थेने सुरुवातीला जरी कोविड साथीच्या आजाराविषयीची माहिती दडपली, तरी लशींचा पुरवठा पूर्ण होईपर्यंत विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि ते त्यात यशस्वी झाले. हे निर्विवाद आहे की, भारतात कोविड-१९ साथीमुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, विरोधाभास असा की, विनाशकारी लाटांदरम्यानचा काही काळ वगळता, सरकार ‘खूप चांगल्या प्रकारे’ किंवा ‘थोड्याफार चांगल्या प्रकारे’ कोविड-१९ची साथ हाताळत आहे, असा विचार करणार्‍या नागरिकांची टक्केवारी भारतात सातत्याने खूप मोठी आहे, (आलेख क्र. ४). अर्थातच, आलेखात चीनकडून आलेली कोणतीही माहिती नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.