Published on Oct 02, 2023 Commentaries 0 Hours ago

‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’चा वाढता जागतिक धोका कमी करण्यासाठी धोरणे आणि अनुकूल हस्तक्षेपांचा अवलंब करणे आवश्यक आहे

अनिश्चित प्रणालींमध्ये ‘प्रतिजैविक प्रतिकारा’चा सामना करणे

प्रतिजैविकांचा प्रतिकार (जीवाणू आणि बुरशीसारख्या जंतूंना मारण्यासाठी निर्माण  केलेल्या औषधांचा पराभव करण्याची क्षमता जेव्हा जीवाणू आणि बुरशीसारखे जंतू विकसित करतात, तेव्हा प्रतिजैविकांचा प्रतिकार होतो.)  हा सार्वजनिक आरोग्यासाठी वाढणारा जागतिक धोका आहे. अंदाजानुसार २०५० सालापर्यंत, यामुळे दर वर्षी १ कोटी मृत्यू होऊ शकतात आणि १०० ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत एकत्रित आर्थिक खर्च होऊ शकतो. ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’च्या मुख्य चालकांपैकी एक म्हणजे प्रतिजैविकांचा अतिवापर आणि गैरवापर, ज्यामुळे जीवाणूंचे प्रतिरोधक उद्भवू शकतात. ही समस्या विशेषतः विकसनशील देशांमध्ये प्रचलित आहे, जिथे प्रतिजैविक प्रिस्क्रिप्शनशिवाय काउंटरवर उपलब्ध असतात. असुरक्षित लोकसंख्येमध्ये, विशेषत: मुलांमध्ये प्रतिजैविकांच्या अयोग्य वापराने समस्या वाढते.

जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’चा सामना करण्यासाठी काही लक्षात आलेली प्रमुख आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत:

  • मुलांमध्ये प्रतिजैविकांचा अयोग्य वापर: अनेक संसर्ग हे विषाणूंमुळे होतात आणि त्यांना प्रतिजैविकांची आवश्यकता नसते, असे असूनही, प्रतिजैविक हे मुलांसाठी सर्वसामान्यपणे लिहून दिलेल्या औषधांपैकी एक आहे. प्रतिजैविकांचा अवाजवी आणि अयोग्य वापर केल्याने प्रतिजैविक-प्रतिरोधक जीवाणूंचा विकास होऊ शकतो. अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की, बाह्यरुग्ण विभागातील मुलांकरता ४१ टक्के प्रतिजैविक औषधे अनावश्यक किंवा अयोग्य आहेत.
  • नवीन प्रतिजैविकांच्या विकासातील अंतर: गेल्या काही दशकांमध्ये नवीन प्रतिजैविकांचा विकास मंदावला आहे आणि काही नवीन प्रतिजैविके दाखल होत आहेत. यामुळे प्रतिजैविक-प्रतिरोधक जीवाणूंच्या नवीन जातींचा सामना करणे कठीण होते.
  • प्रतिजैविके डॉक्टर कशी लिहून देतात आणि रूग्ण कशी वापरतात, याचे मोजमाप नीट नसणे: ‘अँटिबायोटिक स्ट्युअर्डशिप’ म्हणजे प्रतिजैविकांची परिणामकारकता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा जबाबदार वापर होय. त्यामुळे, आरोग्यसेवा प्रदात्यांनी या जीवरक्षक औषधांची निरंतर परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये ‘अँटिबायोटिक स्ट्युअर्डशिप’ला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे.

त्यामुळे, ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’विरोधातील लढ्यात एक महत्त्वाची प्राथमिकता म्हणजे वयोमानानुसार प्रतिजैविके विकसित करणे, जी प्रभावी आणि मुलांसाठी सुरक्षित आहेत. या गरजेला अनुसरून, जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर जागतिक आरोग्य संघटनेने काही संशोधन आणि विकास प्राधान्यक्रम मांडले आहेत:

मानव आणि प्राणी दोहोंमध्ये प्रतिजैविकांचा वापर आणि प्रतिकार यांचा मागोवा घेण्याकरता पाळत ठेवण्याची प्रणाली बळकट करणे. अशा प्रकारे, मानव आणि प्राणी दोहोंमध्ये प्रतिजैविकांच्या जबाबदार वापरास प्रोत्साहन देणे.

जागतिक स्तरावर, वयोमानानुसार प्रतिजैविकांच्या संशोधन आणि विकासासाठी तीन प्रमुख प्राधान्यक्रम रेखाटण्यात आले होते. सर्वप्रथम, मानव आणि प्राणी दोहोंमध्ये प्रतिजैविकांचा वापर आणि प्रतिकार यांचा मागोवा घेण्याकरता पाळत ठेवण्याची प्रणाली बळकट करणे. अशा प्रकारे, मानव आणि प्राणी दोहोंमध्ये प्रतिजैविकांच्या जबाबदार वापरास प्रोत्साहन देणे. दुसरे म्हणजे, मुलांमध्ये प्रतिजैविकांचे फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनामिक्सची समज वाढवणे आवश्यक आहे, ज्यामुळे वयानुसार डोस आणि प्रशासनाची रणनीती असणे महत्त्वाचे आहे. विशेषत: लहान मुलांसाठी तयार केलेल्या नवीन प्रतिजैविकांचा विकास हे संशोधनाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. या वयोगटांमध्ये प्रतिजैविक प्रभावी आणि सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करण्यात याची मदत होऊ शकते. अखेरीस, मुलांसाठी योग्य असलेल्या फॉर्म्युलेशनमध्ये विद्यमान प्रतिजैविकांची उपलब्धता वाढवण्याची गरज आहे. प्रौढांमध्ये सामान्यतः वापरल्या जाणार्‍या अनेक प्रतिजैविके मुलांसाठी योग्य असलेल्या फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध नसतात, ज्यामुळे प्रभावी उपचार प्रदान करणे कठीण होते.

राष्ट्रीय स्तरावर, वयोमानानुसार प्रतिजैविकांची उपलब्धता आणि वापर सुधारण्याकरता अनेक बाबी आहेत- सर्वप्रथम, मुलांमध्ये प्रतिजैविक वापराचे नियमन सुधारण्याची गरज आहे, ज्यामध्ये योग्य विहित पद्धतींचा प्रचार आणि काउंटरवरील सरळसोट विक्रीवर निर्बंध समाविष्ट आहेत. दुसरे म्हणजे, मुलांसाठी असलेल्या प्रतिजैविकांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुधारण्याची गरज आहे. शेवटी, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वयोमानानुसार प्रतिजैविकांची उपलब्धता आणि सुलभता सुधारण्याची गरज आहे. पुरवठा साखळी सुधारणे, किमती कमी करणे आणि प्रतिजैविकांच्या स्थानिक उत्पादनास प्रोत्साहन देणे यांसह अनेक उपायांद्वारे हे साध्य केले जाऊ शकते.

शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सरकार यांच्यातील सहकार्याने त्यांची शक्ती आणि संसाधने एकत्र येऊन वयानुसार-योग्य प्रतिजैविकांचा विकास सुलभ होऊ शकतो. उदाहरणार्थ, ‘ड्रग्ज फॉर निग्लेक्टेड डिसीजेस’ या उपक्रमाने नवीन प्रतिजैविक, फेक्सिनिडॅझोल विकसित करण्यासाठी भागीदारांसोबत काम केले आहे, ज्याचा वापर आता टी.बी गॅम्बियन्स झालेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. याला आफ्रिकेत झोपेचा आजार म्हणूनही ओळखले जाते. दुसरे उदाहरण म्हणजे ‘इनोव्हेटिव्ह मेडिसिन इनिशिएटिव्ह’- जी एक सार्वजनिक-खासगी भागीदारी आहे, जी नवीन औषधे आणि लसींच्या विकासाला गती देण्यासाठी कार्य करते. त्यांनी मुलांसाठी नवीन प्रतिजैविक विकसित करण्याच्या उद्देशाने अनेक प्रकल्पांना निधी दिला, ज्यात ‘ड्राइव्ह-एबी’ प्रकल्पाचा समावेश आहे, ज्यात प्रतिजैविक विकासासाठी नाविन्यपूर्ण प्रारूप विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

जग कोणत्या दिशेने जाऊ शकते हे लक्षात घेत, भारत आणि दक्षिण आफ्रिकेने ऑक्टोबर २०२० मध्ये जागतिक व्यापार संघटनेत पेटंट माफ करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु जागतिक संस्थेने यावर कृती करण्यास खूप उशीर केला आणि खूप कमी कृती केली.

‘कृतीत असलेले समुदाय: आरोग्य समतेचे मार्ग’ चौकट वापरून, आपण समुदायांना गुंतवून आणि त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केलेल्या हस्तक्षेपांची अंमलबजावणी करून ‘प्रतिजैविकांचा प्रतिकार’ या समस्येचे निराकरण करू शकतो. हे आरोग्याच्या समानतेला चालना देण्यासाठी आणि असुरक्षित लोकांवरील ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’चे ओझे कमी करण्यास मदत करू शकते. या चौकटीची अंमलबजावणी करण्याचे काही मार्ग पुढीलप्रमाणे आहेत: (१) जागरूकता वाढवणे; (२) प्रतिजैविकांच्या योग्य वापरास प्रोत्साहन देणे; (३) सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देणे; (४) संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणास प्रोत्साहन देणे; (५) संशोधन आणि विकासाला सहाय्य करणे; (६) बहु-क्षेत्रीय सहयोग आणि भागीदारी वाढवणे.

‘जी-२०’ आणि ‘आयबीएसए’ ची भूमिका:

‘जी-२०’ आणि ‘आयबीएसए’ (भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका) ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’चा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. हे बहुपक्षीय गट- निधी वाढवून, खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन, जबाबदार वापराला प्रोत्साहन देऊन, पाळत ठेवून आणि देखरेख मजबूत करून, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवून आणि धोरणे विकसित करून आणि अंमलबजावणी करून हे सुनिश्चित करण्यात मदत करू शकतात की, त्यांच्याकडे सर्व वयोगटातील संक्रमणांवर उपचार करण्यासाठी प्रभावी प्रतिजैविक आहेत. उदाहरणार्थ, भारत अलिकडच्या वर्षांत ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’चा सामना करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. भारताने ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’वर राष्ट्रीय कृती योजना विकसित केली आहे, ज्यात जागरूकता वाढवणे, संसर्ग नियंत्रण सुधारणे आणि प्रतिजैविकांच्या जबाबदार वापरास प्रोत्साहन देणे याकरता धोरणे आखण्यात आली आहेत. भारताने ‘प्रतिजैविकांचा प्रतिकारा’च्या प्रतिबंधावर एक राष्ट्रीय उपक्रमही सुरू केला आहे. तो असा की, प्रतिरोधक जीवाणूंच्या प्रसारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या प्रसाराचा मागोवा घेण्यासाठी प्रतिजैविक प्रतिरोधकतेवर दर्जेदार माहिती तयार करण्यासाठी देशात प्रयोगशाळा-आधारित ‘प्रतिजैविकांचा प्रतिकार’ देखरेख प्रणालीची स्थापना केली आहे. या व्यतिरिक्त, सरकारने आरोग्यसेवा व्यावसायिकांना आवश्यक असेल तेव्हाच प्रतिजैविक लिहून देण्यासाठी आणि योग्य उपचार मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैविकांची काउंटर विक्री प्रतिबंधित करण्यासह प्रतिजैविकांच्या विक्री आणि वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने नियम लागू केले आहेत. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेनेही ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’ला संबोधित करण्यात प्रगती केली आहे. दोन्ही देशांनी ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’वर त्यांच्या राष्ट्रीय कृती योजना विकसित केल्या आहेत, ज्यात पाळत ठेवणे, संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण आणि आरोग्यसेवा व्यावसायिक व जनतेला योग्य प्रतिजैविक वापराचे शिक्षण देणे यांवर भर दिला आहे.

साथीच्या रोगाने तयार केलेले भविष्य म्हणजे जेव्हा उद्रेक होतो तेव्हा क्लिनिकल चाचण्यांनी मानक ‘मास्टर प्रोटोकॉल’चे पालन करायला हवे आणि प्रत्येक क्लिनिकल चाचणीचे परिणाम एका डेटाबेसमध्ये उपलब्ध झाले पाहिजेत, जेणे करून प्रत्येक देशाला तो उपलब्ध राहील आणि ते देश योग्य निर्णय घेऊ शकतील.

ऑस्ट्रेलियन रुग्णालयांमध्ये राबविण्यात येणारे ‘अँटिमाइक्रोबियल स्टुअर्डशिप प्रोग्राम्स’ हे ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’विरुद्धच्या लढ्याचे आणखी एक आवश्यक घटक आहेत. प्रतिजैविकांचा योग्य वापर सुधारणे आणि प्रतिरोधक जीवाणूंचा विकास आणि प्रसार कमी करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. प्रतिजैविकांच्या जबाबदार वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची परिणामकारकता टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये विविध धोरणे समाविष्ट आहेत, जसे की शिक्षण आणि प्रशिक्षण, पाळत ठेवणे, लेखापरीक्षण आणि अभिप्राय. जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखालील उपक्रम जसे की- ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’वरील चतुष्पक्षीय करार. या करारावर संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना (एफएओ), जागतिक प्राणी आरोग्य संघटना (डब्ल्यूओएएच), संयुक्त राष्ट्र संघटनेचा पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी स्वाक्षरी केली आहे. जागतिक स्तरावर ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’चा सामना करण्यासाठी समन्वित दृष्टिकोनाचे हे उदाहरण आहे. या कराराद्वारे, पशूपालनामध्ये प्रतिजैविकांच्या जबाबदार वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, ‘प्रतिजैविकांचा प्रतिकारा’चा माग काढण्याकरता पाळत ठेवणारी प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि नवीन प्रतिजैविकांच्या संशोधन आणि विकासास समर्थन देण्यासाठी संस्था एकत्र काम करत आहेत. ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’चा सामना करण्यासाठी जी-२० देशांमधील विविध क्षेत्रांतील समन्वय- एक व्यापक, सहयोगी दृष्टिकोन (सर्वोत्तम पद्धती विकसित करणे, संसाधने शेअर करणे आणि कौशल्य विकसित करणे) विकसित करू शकतो. नवीन तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण रणनीतींमध्ये गुंतवणूक करण्याचा समन्वित प्रयत्न-जसे की- जलद निदान आणि ‘फेज थेरपी’सारख्या पर्यायी उपचारांमुळे, ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’विरुद्धच्या जागतिक लढ्याला आणखी बळ मिळू शकते. हे केवळ त्यांच्या लोकसंख्येलाच लाभदायक ठरेल असे नाही तर जागतिक आरोग्य सुरक्षेलाही हातभार लावेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रतिजैविकांची निरंतर परिणामकारकता सुनिश्चित करेल.

निष्कर्षाअंती, ‘प्रतिजैविकांचा प्रतिकार’ ही एक जटिल समस्या आहे, ज्यामध्ये अनेक घटकांच्या परस्परसंवादाचा समावेश आहे. व्यवस्थेच्या विचार करण्याच्या दृष्टिकोनातून या घटकांची परस्परसंबंध आणि बहुक्षेत्रीय आणि बहुविद्याशाखीय प्रतिसादाची आवश्यकता मान्य केली जाते. यामध्ये एक-आरोग्य दृष्टिकोन, आरोग्य सेवेत प्रतिजैविकांचा जबाबदार वापर आणि ‘स्ट्युअर्डशिप प्रोग्राम्स’ यांचाही समावेश आहे. म्हणून, प्रिस्क्रिप्शन पद्धती सुधारणे, आरोग्य सेवा प्रदाते आणि सामान्य लोकांमध्ये ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’च्या जोखमींबद्दल जागरूकता वाढवणे, ‘प्रतिजैविकांच्या प्रतिकारा’वर पाळत ठेवणे आणि देखरेख करणे आणि नवीन प्रतिजैविकांच्या संशोधन आणि विकासास समर्थन देणे तसेच मानव, प्राणी आणि पर्यावरणाचे आरोग्य हे परस्परांशी जोडलेले आहे, हे ओळखणे. या धोरणांची अंमलबजावणी करून, आम्ही अशा भविष्यासाठी काम करू शकतो, जिथे प्रतिजैविक जीवाणू संसर्गाच्या उपचारांमध्ये प्रभावी राहतील आणि धोरणे तयार करण्यासाठी आणि ‘प्रतिजैविकांचा प्रतिकार’  कमी करण्याकरता अनुकूल हस्तक्षेप विकसित करण्यासाठी ते वापरले जाऊ शकतील.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Viola Savy Dsouza

Viola Savy Dsouza

Miss. Viola Savy Dsouza is a PhD Scholar at Department of Health Policy Prasanna School of Public Health. She holds a Master of Science degree ...

Read More +
Helmut Brand

Helmut Brand

Prof. Dr.Helmut Brand is the founding director of Prasanna School of Public Health Manipal Academy of Higher Education (MAHE) Manipal Karnataka India. He is alsoJean ...

Read More +