Author : Harsh V. Pant

Published on Aug 18, 2023 Commentaries 0 Hours ago

अलीकडच्या काळामध्ये चीनमधील सेलिब्रिटी बेपत्ता होण्याच्या घटना अचानक वाढल्या आहेत. त्यातही चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांचे प्रकरण वेगळे आहे. ते केवळ गायबच नाही झाले तर त्यांच्या सार्वजनिक नोंदी देखील पुसण्याचा उद्योग सुरू झाला आहे.

शी यांच्या नेतृत्वाखालील चीन मधील ‘असामान्य’ राज्य

सामान्यपणे विचार केल्यास एखाद्या देशाचा परराष्ट्रमंत्री अचानकपणे गायब झाल्यास त्या देशांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण होते. पण चीन मात्र याला अपवाद दिसत आहे, कारण तेथील परराष्ट्रमंत्री गायब झाल्यानंतर देखील चीनमध्ये या घटनेकडे सर्वसामान्य म्हणून पाहिले जात आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग (लेखात वापरलेले छायाचित्र) यांना गेल्या महिन्यात औपचारिकपणे पदावरून पाठवण्यात आले होते. राजकीय कृपेपासून तर त्यांची पतन सत्तेच्या कॉरिडॉर मध्ये भरपूर प्रसिद्धी मिळविण्याइतके झटपट घडलेले होते. गँग यांच्या जागेवर घाई घाईने परराष्ट्रमंत्री म्हणून वांग यी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अलीकडच्या काळामध्ये चीनमधील सेलिब्रिटी बेपत्ता होण्याच्या घटना अचानक वाढल्या आहेत. त्यातहीचीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांचे प्रकरण वेगळे आहे. ते केवळ गायबच नाही झाले तर त्यांच्या सार्वजनिक नोंदी देखील पुसण्याचा उद्योग सुरू झाला आहे. चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या अतिविश्वासाने जगाला हे ठासून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की गँग कधीही अस्तित्वात नव्हते. आतापर्यंतच्या इतिहासाकडे पाहिले असता कम्युनिस्ट राजवटीमध्ये टीकाकारांची नेहमीच दुर्दशा होत असल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी ही गोष्ट नवीन नाही. तरीसुद्धा एका उच्चस्तरीय सक्रिय असलेल्या अधिकाऱ्याच्या बाबत घडलेली ही घटना म्हणजे जिनिंग राजवटी भवती अपारदर्शकपणा असल्याचे सूचक आहे असे म्हणता येईल.

चीनचे परराष्ट्र मंत्री गँग हे चीनमधील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते असेच म्हणावे लागेल. दुसरीकडे ते अमेरिकेतील चीनचे राजदूतही होते. गँग यांनी युएस आणि चीन यांच्यातील संबंध अत्यंत तणावाच्या अवस्थेत हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काही आठवड्यांपूर्वी त्यांचे अमेरिकन समकक्ष अँटोनी ब्लिंकन यांचीही भेट घेतली होती. या सगळ्या गोष्टी होत असताना गँग यांचे परराष्ट्र मंत्री पदावरून अल्पकाळातच निघून जाणे अनेक प्रश्न निर्माण करून गेले आहे. या घटनेमुळे मात्र शी यांच्या राजवटी बाबत चीनमध्ये अस्थिरतेची धारण अधिक दृढ झाली आहे.

गँग यांनी युएस आणि चीन यांच्यातील संबंध अत्यंत तणावाच्या अवस्थेत हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

परराष्ट्र मंत्री गॅंग यांची चीनमध्ये लोकप्रियता वाढत असल्याने त्यांना या पदावरून हटविण्यात आल्याची अटकळ सध्या चीनमध्ये पसरली आहे. चीनमधील काही जाणकारांनी असे देखील सुचवले आहे की गँग जेव्हापासून यूएसमध्ये राजदूत झाले आहेत तेव्हापासून त्यांचे वॉशिंग्टनशी संबंध अधिक मजबूत झाले आहेत. त्यामुळे चीनमधील आस्थापना त्यांच्याकडे संशयाने पाहू लागली आहे. परराष्ट्र मंत्री गॅंग यांचे हॉंगकॉंग मधील एका महिला पत्रकारासोबत असलेल्या कथीत अफेअर चे कारण पुढे करून त्यांना पदावरून काढून टाकल्याचे मानले जात आहे. ही गोष्ट खरी ही असेल आणि नसेलही. पण एक गोष्ट मात्र निश्चित होणार आहे या संपूर्ण नाट्यमय घटनेचा चीनच्या जागतिक प्रतिमेवर नकारात्मक परिणाम

झाल्याशिवाय राहणार नाही. याचे आणखी एक कारण असे म्हणता येईल गँग यांच्या जाण्याने कोविड महामारीच्या अडचणीतून बाहेर पडलेल्या चीनच्या उन्मादी राजनैतिकतेवर विपरीत परिणाम होणार आहे. सध्याचे वातावरण पाहता चीन विविध अंतर्गत आणि बाह्य समस्यांना तोंड देत आहे, अशा परिस्थितीत गँग यांची झालेली हकालपट्टी बीजिंगच्या अडचणीमध्ये भर घालणारीच आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेकडे पाहता सध्या तिला फारशी गती दिसत नाही. चीनचे प्रमुख निर्यात केंद्र असलेल्या अमेरिका आणि युरोपमध्ये सध्या आर्थिक वाढ मंदावली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला आहे की सध्या चीनमध्ये तरुणांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अमेरिकेसोबत तणावाचे संबंध झाल्यामुळे चीनला युरोपला आकर्षित करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पण युरोपीय देशांना अमेरिकन छावणीपासून दूर करण्यात ते अपयशी ठरले आहे. तसे पाहायला गेले तर युरोप चीनच्या विरोधात वेगवेगळ्या मार्गांनी जात असल्याचे समोर आलेले आहे, यामध्ये चीन बद्दल जर्मनची अलीकडील रणनीती आणि इटलीचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा पुनर्विचार करण्यास भाग पाडतो.

अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावामुळे चीनलाही चिंता सतावत आहे. बीजिंगला भारताचे व्यवस्थापन कसे करायचे याची खात्री नाही. एकीकडे बाली येथे झालेल्या G20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेचा हवाला देऊन चीन द्विपक्षीय संबंधांवर टीका करत आहे. दुसरीकडे, ते अरुणाचल प्रदेशातील भारतीय खेळाडूंसाठी स्टेपल्ड व्हिसा जारी करत आहे. यातून चीनचा दुटप्पीपणाचा चेहरा समोर आला आहे.

चीनच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता कमी असल्याचे नवी दिल्लीने स्पष्ट केले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन संबंध फार चांगल्या स्थितीत नसल्याचा पुनरुच्चार अलीकडेच केला आहे. सीमेच्या संदर्भामध्ये चीनने पूर्वी दिलेल्या वचनाचे पालन करणे हे त्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. जोपर्यंत चीन सीमेवर पूर्वीसारखी स्थिती करत नाही तोपर्यंत रचनात्मक संवाद होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नवी दिल्लीने घेतलेली आहे.

हे भाष्य मूळतः टेलिग्राफमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Harsh V. Pant

Harsh V. Pant

Professor Harsh V. Pant is Vice President – Studies and Foreign Policy at Observer Research Foundation, New Delhi. He is a Professor of International Relations ...

Read More +