Published on Apr 17, 2023 Commentaries 29 Days ago

सैनिक हेच सैन्य आहे आणि कोणतीही सेना आपल्या सैनिकांपेक्षा श्रेष्ठ नाही, असे एक प्रसिद्ध जनरल एकदा म्हणाला होता आणि याच स्वयंसिद्धतेवर चिनी कम्युनिस्ट पक्ष (सीसीपी) वावरताना दिसत आहे. वास्तविक जीवनातही असे योद्धे तयार करण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत.

भविष्यातील युद्ध जिंकण्यासाठी चीनची आयकॉन रणनिती

२०२० मध्ये भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकींनी या उपक्रमाला नवसंजीवनी दिल्याचे दिसते. सध्या चिनी अर्थव्यवस्था कोरोनामुळे निर्माण झालेल्या दबावाखालून जात आहे आणि या नियंत्रणाचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये  असंतोषाची भावना तीव्र झाली आहे. दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत झालेल्या संघर्षात मारला गेलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सैनिकाच्या एका कवितेचा संदर्भ कम्युनिस्ट युथ लीगला संबोधित करताना, सीसीपीचे सरचिटणीस क्षी जिनपिंग यांनी दिला आहे. बीजिंगमध्ये फेब्रुवारीच्या हिवाळी ऑलिंपिक दरम्यान, भारत-चीन संघर्षात सहभागी असलेल्या एका सैनिकाची टॉर्च रिलेसाठी निवड करण्यात आली होती. सीसीपीने आपल्या जनरल नेक्स्टचे सैन्यीकरण करण्याच्या प्रयत्नात भारतीय राजनैतिक कॉर्प्सद्वारे खेळांवर बहिष्कार टाकण्याचा धोका पत्करला होता, हे विसरता कामा नये.

देशभक्ती, एकता आणि शिस्त यांसारख्या लष्करी मूल्यांना नागरी समाजात ओतणे अशी सैन्यवादाची व्याख्या केली जाते. भविष्यातील पिढ्यांसमोर आदर्श म्हणून लढाऊ नायक तयार करण्याचा सीसीपी प्रयत्न करत आहे. आपल्या दशकभराच्या कारकिर्दीत, क्षी यांनी खाजगी क्षेत्रावरील अंकुश कडक केले आहेत तसेच सामाजिक अधिकारांवरील आलेले  निर्बंध मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिले आहेत. चीनच्या मीडिया नियामक, नॅशनल रेडिओ आणि टेलिव्हिजन प्रशासनाने अलीकडेच सीसीपी पक्षाच्या मर्दानी मानकांशी न जुळणाऱ्या कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. हे करत असतानाच “पारंपारिक चीनी संस्कृती आणि क्रांती संस्कृती” यांवर भर देण्यात आल्याचे सेन्सॉरने म्हटले आहे. तरुणांच्या जीवनशैलीशी संबंधित अशा बाबींमध्ये बदल केल्याचा परिणाम राजकीय उद्दिष्टांवर होऊन अपेक्षित परिणाम साधला जाईल, अशी सीसीपीला अपेक्षा आहे.

पीएलएला २०२७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत याचेच निमित्त धरून २०२७ पर्यंत मजबूत व आधुनिक सैन्याची उभारणी करणे हे २०२० च्या प्लेनममध्ये घोषित केलेल्या मुख्य ‘विकास उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे. अशाच प्रकारे अनेक धोरणात्मक बाबींवर सीसीपीच्या केंद्रीय समितीचा वार्षिक मेळाव्यात चर्चा केली गेली आहे.

चीनचा व्हिएतनाम सिंड्रोम

सैन्याची ताकद त्याच्या सैनिकांवरून ठरते. पण सध्या क्षी एका वेगळ्या प्रश्नाशी झगडत आहे. व्हिएतनामविरुद्धची शेवटची कारवाई पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) १९७९ मध्ये केली होती. त्या लढाईत लढलेले सैनिक आता निवृत्त झाले आहेत. परिणामी आता चीनला अनुभवी सैनिकांची अधिक गरज आहे. पीएलएच्या जीवितहानीबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी नसली तरी त्या युद्धात पीएलएच्या सैन्यातील ६५०० हून अधिक लोक मारले गेले आणि सुमारे ३१००० सैनिक जखमी झाले, असा अंदाज आहे. व्हिएतनाममधील पराभवामुळे सीसीपीला प्रदीर्घ सशस्त्र संघर्षाबाबत उदासीनता वाटू लागली आहे. चीनच्या लष्करी इतिहासकारांनी १९५० च्या कोरियन युद्धात चायनीज पीपल्स व्हॉलंटियर आर्मीच्या भूमिकेचे पुष्कळ कौतुक केले आहे, तर व्हिएतनामी संघर्ष मोठ्या प्रमाणात स्मृतीतून पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु या पराभवामुळे सीसीपीला “विजय” किंवा “युद्ध नायक” निर्माण करण्याची इच्छा तसूभरही कमी झालेली नाही.

लष्करी वीरांचा चीनी शोध

दक्षिण चीन समुद्रावर चिनी फायटर क्राफ्ट आणि अमेरिकेचे हेर विमान यांच्यात झालेल्या टक्करीला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या अपघातातील अमेरिकन क्रूला ताब्यात घेण्यात आले होते. बीजिंगमधील अमेरिकन राजदूताने माफी मागितल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. परंतु याच घटनेचे चीनकडून उदात्तीकरण करण्यात आले. या प्रकरणात मृत्यूमुखी पाडलेल्या लेफ्टनंट कमांडर वांग वेई यांना शहिदांचा दर्जा देण्यात आला. अलिकडच्या वर्षांत, “क्रांतिकारक हुतात्मा” वांगच्या आख्यायिकेला एक नवीन वळण मिळालेले आहे. यात त्याने सीसीपी सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला आपले जीवन समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे बोलले जात आहे. सीसीपीच्या शताब्दी वर्षानिमित्त अमेरिकेची आक्रमकता रोखणार्‍या आणि कोरियाला मदत करण्यासाठी झालेल्या युद्धाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त एक उच्च-प्रोफाइल स्मरणोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये चिनी पीपल्स व्हॉलंटियर आर्मीने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सध्या प्रत्येक चित्रपटगृहाने युद्ध चित्रपटांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि १२ चित्रपटांच्या अधिकृत सूचीमधून किमान दोन चित्रपट दाखवणे सीसीपीने आदेशाद्वारे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कोरियन संघर्षात चीनचा सहभाग असलेला पहिला चित्रपट, ‘बॅटल ऑन शांगनलिंग माउंटन’ सहा दशकांहून अधिक काळानंतर पुन्हा देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीत हा अमेरिकन सैन्याविरुद्ध चीनचा एकमेव विजय असल्याचे दाखवण्यात केले आहे. या चित्रपटाबाबत बोलताना “चायनीज पीपल्स व्हॉलंटियर आर्मीने चांगल्या सशस्त्र प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले व अमेरिकेचे सैन्य अजिंक्य आहे हा समज मोडला, असे क्षी म्हणाले. चीनकडून जरी असा प्रचार करण्यात येत असला तरी वस्तुस्थिती काहीशी वेगळी असली तर वावगे वाटण्याचे कारण नाही.  आर्थिक समृद्धीमुळे मानवी संसाधन आणि मनोबल कमजोर झाले आहे आणि त्याला ‘शांतता रोग’ म्हणून संबोधले जात आहे असे अलीकडच्या काळात लष्कराचे मुखपत्र, ‘ असलेल्या पीएलए डेली’ ने निदान केले आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती सैन्यात भरती होण्यासाठी तयार असते , तेव्हा ती व्यक्ती प्रत्यक्षात आपले जीवन सैन्याच्या स्वाधीन करते. पीएलए ही सीसीपीचे सैन्य म्हणून काम करते परिणामी ती एक प्रबळ राजकीय शक्ती ठरली आहे. म्हणजेच सोपे करून सांगायचे झाले तर पीएलएचे अधिकारी राष्ट्राची नव्हे तर नेत्याची सेवा करतात. २०१४ पासून  पीएलए जनरल्सने क्षी यांच्याशी निष्ठेने राहण्याची शपथ घेण्यास सुरुवात केली आहे. यातूनच करियरवादाला चालना मिळाली आहे. आपल्या सचोटीवर भविष्यातील विकासाच्या संधी वाढवणे हे करियरवादाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

निवृत्तीनंतरची थकबाकी आणि चांगल्या परिस्थितीसाठी आंदोलन करणार्‍या लष्करातील जुन्या जाणत्या अधिकार्‍यांनी नव्या दमाच्या तरुणाईसमोर चुकीचा पायंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ही प्रतिमा सुधारण्यासाठी चिनी राजवटीने काही संस्थात्मक बदल सुरू केले आहेत. थकबाकीबाबत १ वर्ष आंदोलन झाल्यानंतर २०१८ मध्ये, या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेटरन्स अफेयर्स मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. माजी सेवा कर्मचार्‍यांना समर्थन देण्यासाठी तसेच विविध उपक्रमांसाठी कर्ज मिळवण्यासंबंधी प्राधान्यपूर्ण वित्तपुरवठा धोरणे आणि त्यांना कामावर ठेवणार्‍या कंपन्यांसाठी कर सवलत अनिवार्य करणारा एक नवीन कायदा २०२१ पासून अंमलात आणण्यात आला. भ्रष्टाचार आणि नफेखोरीचे आरोप असलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सध्या सेवेतून काढून टाकण्यात येत आहे. राष्ट्रीय भरतीवरील कायद्यात सुधारणा करण्याच्या योजना अंमलात आणल्या जात आहेत. सक्रिय-कर्तव्य दलात सामील होण्यासाठी पात्र तरुणांची याद्वारे भरती केली जात आहे. अर्थात यासाठी राष्ट्रीय स्तरावरील वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. अशाप्रकारे, तरुणांना लष्करातील करिअरला एक व्यवहार्य पर्याय म्हणून पाहण्यासाठी आणि या बदलत्या परिस्थितीबाबत काळजी वाटणाऱ्या लोकांच्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी असे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

युक्रेन लढ्यातून शिकवण

युक्रेनबाबत रशियाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर अधिक तरुणांना प्रेरित करण्याच्या प्रयत्नांना चीनकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. कधीकाळी नाझी जर्मनीला चिरडून टाकलेल्या सैन्याशी युक्रेन सैन्य नेटाने लढा देत आहे, हे संघर्षाच्या विश्लेषणावरून सप्रमाण सिद्ध झाले आहे. पीएलएची रचना सोव्हिएत रेड आर्मीच्या धर्तीवर करण्यात आली होती आणि आताही ती रशियन सिद्धांतांनी प्रभावित आहे, असा युक्तिवाद आर्मी वॉर कॉलेजमधील मेजर जनरल मंदिप सिंग यांनी केला आहे. चीन या युद्धाच्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि पुतिन यांच्या चुकांमधून धडा घेत आहे.

अशाप्रकारे, चिनी समाजात लष्करशाही इंजेक्ट करण्यासाठी क्षी यांच्या अलीकडील प्रयत्नांना या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे.

२०२२ च्या राईसीना डायलॉग दरम्यान चीनच्या महत्त्वाकांक्षेबाबत चर्चा करण्यात आली. राईसीना डायलॉग ही भू-राजकारण आणि भू-अर्थशास्त्रावरील भारताची प्रमुख परिषद आहे. सॉलोमन बेटांसोबतच्या चीनच्या करारामुळे पॅसिफिकमध्ये चिनी संरक्षण उपस्थिती वाढण्याची शक्यता उघड झाल्याचा युक्तिवाद ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय गुप्तचर कार्यालयाचे महासंचालक अँड्र्यू शियरर यांनी या परिषदेत केला आहे.

चीनच्या इतिहासात तैवानचे एकीकरण करणारे नेते म्हणून क्षी यांची नोंद व्हावी यासाठी ते उत्सुक आणि आग्रही आहेत. ते २०२७ पर्यंत सोलोमान बेटाचे जबरदस्तीने एकीकरण करण्याचा प्रयत्न करतील, असा अंदाज रेनमिन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्राध्यापक जिन कॅनरॉन्ग यांनी मांडला आहे. मुख्यभूमीपलीकडील बेटांमध्ये अशाप्रकारे कारवाया करून बाहेरील आव्हांनाशी दोन हात करण्याची सैनिकांची तयारी होईल, असे कदाचित क्षी यांना वाटत असावे. यासाठी ते प्रभावीपणे पीएलएचा वापर करून घेत आहेत. अशाप्रकारे, नवीन लष्करी आदर्श तयार करणे हा तैवानला खिळखिळी करण्यासाठी क्षी यांच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा असू शकेल.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.