Author : Soumya Bhowmick

Published on Aug 22, 2023 Commentaries 0 Hours ago

पुराव्यावर आधारित युवा धोरणांना प्रोत्साहन देऊन, समाज सर्व स्तरांवर एसडीजी लागू करण्याच्या दिशेने काम करू शकतात, ज्यामुळे तरुणांना फायदा होतो आणि एकूणच सामाजिक कल्याण वाढते.

SDGs लागू करून तरुणांच्या कल्याणाचा विचार आवश्यक

मानवी भांडवलाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास तरुणांमध्ये केलेली गुंतवणूक ही प्रगती करण्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणून पाहिली जाते. आर्थिक विकासाच्या दृष्टिकोन बाजूला ठेवून आंतरिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून तरुणांमधील गुंतवणुकीकडे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. समकालीन युवा विकास प्रेम वर्क चा विचार केल्यास त्यामध्ये किशोरवयीन मुलांच्या कल्याणाची विविध क्षेत्रे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. शारीरिक आरोग्य, पोषण, कौशल्य आणि रोजगार क्षमता ही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. या घटकांबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्य युवा कल्याण मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. व्यापक व्याख्येचा विचार केल्यास व्यक्तिनिष्ठ वैयक्तिक अनुभव आणि जीवनाच्या एकूण गुणवत्तेचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन यामध्ये समाविष्ट आहे.

Table 1: Youth Well-being Framework

Source: Ross et al. (2020), “Adolescent Well-Being: A Definition and Conceptual Framework

युवकांच्या कल्याणासाठी शाश्वत विकास उद्दिष्टे

2018 मध्ये युनायटेड नेशन्स चा जागतिक युवा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. ज्यामध्ये शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि युवकांचे कल्याण याबाबत काही गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत. हा अहवाल शाश्वत विकासाची उद्दिष्टे (SDGs) 2030 चा अजेंडा आणि सध्या सुरू असलेल्या युवकांच्या विकासाच्या प्रयत्नांमधील परस्परावलंबी भूमिकांचा शोध घेणारा आहे. प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित युवा धोरणांना चालना देऊन, युवकांच्या विकासासाठी प्रयत्न तीव्र करून, समाज सर्व स्तरावर SDG ची अंमलबजावणी करण्यासाठी कार्य केले जाऊ शकते. यामुळे तरुणांना फायदा आणि सामाजिक कल्याण वाढीसाठी हातभार लागणार आहे.

SDG 3 (चांगले आरोग्य आणि कल्याण) हे सर्व वयोगटातील आरोग्य आणि कल्याण वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. भावंडावस्था बालपण आणि प्रौढत्वामधील संक्रमणकालीन टप्पा एका तरुण व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा पण गंभीर असा काळ म्हणता येईल. तरुणांसाठी विशेषता पौगंडावस्थेतील काळ दीर्घकालीन कल्याणाच्या दृष्टिकोनातून पायाभरणी म्हणून पाहिला जातो. त्यानंतर एक निर्णय काळ तयार होत असतो. निरोगी विकासाच्या केंद्रस्थानी शारीरिक आरोग्य आणि योग्य पोषण मिळणे हे महत्त्वाचे घटक मानले जातात.

पौगंडावस्थेत येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मानसिक आरोग्य आणि भावनांचा विकास यातील लवचिकता वाढविणे आणि त्यांच्या क्षमतांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण भूमिका बजावतात. अलीकडच्या काळामध्ये आलेल्या covid-19 च्या साथीच्या आजाराने जगभरातील तरुण व्यक्तीसमोर मानसिक आरोग्य विषयक समस्यांची एक नवीन श्रेणी समोर आणलेली दिसत आहे. 2021 हे वर्ष युनायटेड स्टेटस (यूएस) साठी मानसिक आरोग्याचे संकट म्हणून ओळखले गेले आहे. त्याचबरोबर साथीच्या रोगाच्या आधी देखील जवळपास 40 टक्क्यांनी मानसिक आरोग्याच्या संकटात लक्षणीय वाढ झालेली होती. आत्महत्यांच्या घटनांसह दुःख आणि निराशेच्या भावनांमध्ये त्याचबरोबर वर्तणुकीतील तफावत मोठ्या प्रमाणात यु एस मधील तरुण वर्गात पाहायला मिळत आहे.

भविष्याचा विचार करता तरुण व्यक्तींना सक्षम करण्यासाठी दर्जेदार शिक्षण कौशल्य विकास या गोष्टी अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करणे गरजेचे आहे.

याशिवाय युवा कल्याणाचा विचार करता केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य पेक्षा देखील बरेच काही समाविष्ट आहे. यात सामाजिक संबंध, शैक्षणिक संधी आणि आर्थिक सक्षमीकरण देखील समाविष्ट आहे. भविष्याचा विचार करता तरुण व्यक्तींना सक्षम करण्यासाठी दर्जेदार शिक्षण कौशल्य विकास या गोष्टी अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करणे मूलभूत आहे. SDG 3 तरुणांच्या कल्याणा संबंधी संबोधित करत आहे, तर SDGs हे तरुणांच्या कल्याणाची लक्ष्य साध्य करण्यासाठी तितकेच महत्त्वपूर्ण मानले गेले आहे.

SDG 4 (गुणवत्तापूर्ण शिक्षण) तरुणांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मानले गेले आहे. दर्जेदार शिक्षण तरुण व्यक्तींना आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांनी तयार करतो पर्यायाने त्यांच्या रोजगाराच्या शक्यता अधिक वाढवतो. अशा तरुणांना त्यांच्या जीवनाबद्दल आरोग्य विषयक माहिती पूर्ण निर्णय घेण्यास अधिक सक्षम बनवतो. युनेस्कोच्या मते अजेंडा 2030 मध्ये नमूद केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी 2015 ते 2030 पर्यंत वार्षिक शैक्षणिक खर्च US$ 149 अब्ज वरून US$ 300 अब्ज पर्यंत वाढण्याची अपेक्षित गरज आहे. शिवाय SDG 8 (सभ्य काम आणि आर्थिक वृद्धी) रोजगाराच्या संधी निर्माण करून, आर्थिक सक्षमीकरणाला चालना देऊन तरुणांच्या कल्याणाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून

कॉमनवेल्थ युथ प्लॅन ऑफ ऍक्शन युवकांच्या विकासासाठी मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून कल्याण साधने या संकल्पनेवर अधिक जोर देताना दिसते. हा दृष्टिकोन उपेक्षित गटांच्या हक्कांची वकिली करून वैयक्तिक वाढ, सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक कौशल्याच्या माध्यमातून तरुणांना एक प्रकारे संधी देऊन त्यांना सक्षम बनविण्यास सहकार्य करते. त्याबरोबरच शक्तीचा असमतोल आणि भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न करतो. युवकांच्या विकासासाठी अर्थसंकल्पीय वाटप करणे, संबंधित सरकारी विभागांना तरुणांच्या दृष्टीकोनाची ओळख करून देणे, धोरणनिर्मितीमध्ये तरुणांचा सहभाग अधिक सुलभ करणे, तरुणांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे आणि युवकांच्या सशक्तीकरणाशी संबंधित ज्ञान निर्माण करण्याचा समावेश आहे. याबरोबरच “तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी” मध्यस्ताची भूमिका बजावते.

मानवी हक्क दृष्टिकोनाची तत्वे समाविष्ट केल्याने तरुणांच्या कल्याणाची अधिक व्यापकपणे समज प्राप्त झालेली आहे. ज्यांना वंचित पार्श्वभूमी लाभलेली आहे, त्याचबरोबर मानसिक अल्पसंख्यांक अपंग या असुरक्षित तरुण व्यक्तींना सातत्याने भेडसावणाऱ्या आव्हानांना ओळखून आहे. या प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी संरचनात्मक असमानता दूर करून आणि अपेक्षित समर्थन प्राप्त करून समाज आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करून तरुणांचे कल्याण साधले जाऊ शकते.

संरचनात्मक असमानता दूर करून आणि अपेक्षित समर्थन प्राप्त करून समाज आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करून तरुणांचे कल्याण साधले जाऊ शकते.

शेवटी, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आणि धोरणनिर्मितीमध्ये तरुणांना गुंतवून ठेवल्याने त्यांच्या दृष्टीकोनांचा आणि गरजांचा विचार केला जाईल याची खात्री यानिमित्ताने अधिक स्पष्ट झाली आहे. युवकांना सामुदायिक विकास प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे त्यांच्या उद्देशाची भावना वाढवते आणि सकारात्मक सामाजिक बदलास हातभार लावते. याव्यतिरिक्त, किशोरवयीन तरुणांच्या कल्याणाची विविध क्षेत्रे ओळखून, जागतिक समुदायाने युवा-विशिष्ट SDGs मध्ये वर्णन केलेली लक्ष्ये साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिवाय, पुराव्यावर आधारित धोरण आराखडा आणि शिक्षण, आरोग्य, सर्वांगीण युवा विकासामध्ये वाढलेली आर्थिक गुंतवणूक ही तरुणांच्या कल्याणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उचललेली महत्त्वपूर्ण पावले आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.