Author : J. M. Vyas

Published on Oct 12, 2023 Commentaries 0 Hours ago

गुन्हेगारी तपासात फॉरेन्सिक सायन्सची भारताची वाढती गरज पूर्ण करत असताना, फौजदारी न्याय वितरण प्रणाली सुधारणे हे NFSU चे प्रमुख उद्दिष्ट आहे.

फॉरेन्सिक सायन्स आणि भारताच्या न्याय वितरण प्रणालींमध्ये समन्वय हवा

जगभरात, फौजदारी न्याय वितरण प्रणालीमध्ये फॉरेन्सिक सायन्सचे महत्त्व आता राष्ट्रीय शासनाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखले जात आहे. फॉरेन्सिकच्या मूल्याची इतरांनी प्रशंसा करण्याआधी, 2009 मध्ये, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुन्हेगारी न्याय वितरण प्रणाली सुधारण्यासाठी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे काम सुरू केले होते. आताच्या पंतप्रधानांचा असाच एक उपक्रम म्हणजे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी ही फॉरेन्सिक सायन्सेस आणि संबंधित विषयांसाठी उच्च शिक्षण देणारी एक अनन्य संस्था आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्ञान आणि नवनवीन कौशल्ये वाढवण्यासाठी संकल्पना मांडणे आणि तयार करणे या गोष्टींचा येथे समावेश आहे. देशाचे गृहमंत्री, अमित शहा यांनी गुजरातच्या फॉरेन्सिक सायन्स संचालनालयाच्या विद्यमान संकुलातून केवळ पाच कार्यक्रम सुरू करण्याच्या विनम्र सुरुवातीपासून ते एका प्रतिष्ठित राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेत विकसित करण्यासाठी नव्याने तयार केलेल्या फॉरेन्सिक विद्यापीठाला चालना देण्यासाठी तंत्रिक केंद्र म्हणून काम सुरू केले आहे.

अल्पावधीत ते वेगाने विकसित झाले आहे. आता त्याची व्याप्ती दिवसागणिक विस्तारत आहे. ज्यामध्ये विद्यापीठाने फॉरेन्सिक सायन्सच्या विस्तृत क्षेत्रात शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले आहेत. ‘स्किल इंडिया’ हा विषय बनण्याआधी विद्यापीठाने एक अभिनव दृष्टीकोन स्वीकारला होता. तो म्हणजे सुधारित कौशल्यांसाठी पर्यवेक्षणाखाली विद्यार्थ्यांद्वारे थेट प्रकरणे हाताळण्याची सुरुवात केली होती. फिंगरप्रिंट सायन्स, दस्तऐवज परीक्षा, फूड अॅनालिसिस आणि बॅलिस्टिक्स यासारख्या वारसा शाखांपासून ते फॉरेन्सिक सायन्सच्या प्रत्येक संभाव्य शाखेत ७० विशेष पोस्ट-ग्रॅज्युएट डिग्री/डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. सुमारे ५,००० विद्यार्थी आज विद्यापीठात अभिमानाने या अभ्यासक्रमाविषयी बोलत आहेत. डीएनए फॉरेन्सिक, फॉरेन्सिक फार्मसी, फॉरेन्सिक दंतचिकित्सा आणि फॉरेन्सिक सायकोलॉजी यासारख्या अधिक प्रगत फॉरेन्सिक फील्ड, डिजिटल फॉरेन्सिक्स, मल्टीमीडिया फॉरेन्सिक्स, फॉरेन्सिक नॅनो-टेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, मानवतावादी फॉरेन्सिक्स आणि फॉरेन्सिक पत्रकारिता यासारख्या नवीनतम अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेले आहेत. संबंधित विषयांमध्ये सायबर सुरक्षा, कायदा, होमलँड सिक्युरिटी, पोलिस, बिझनेस इंटेलिजन्स इत्यादी विषयांचे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार, विद्यापीठाने फॉरेन्सिक सायन्स, सायबर सुरक्षा कायदा आणि फॉरेन्सिक अकाउंटिंगमधील पाच वर्षांचे एकात्मिक अभ्यासक्रम देखील सुरू केले आहेत. R&D च्या विशेष प्रोत्साहनाने शिक्षणतज्ञांशी हातमिळवणी सुरू केली आहे. याशिवाय शैक्षणिक आणि तंत्रज्ञानातील प्रगतीशी ताळमेळ राखण्यासाठी, विद्यापीठाने जगभरात मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक सहकार्याची योजना आखली आहे. ज्याला जगभरातील 186 बहु-शिस्तबद्ध संस्थांचे सहकार्य मिळत आहे.

शैक्षणिक आणि तंत्रज्ञानातील प्रगतीशी ताळमेळ राखण्यासाठी, विद्यापीठाने जगभरात मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक सहकार्याची योजना आखली आहे. ज्याला जगभरातील 186 बहु-शिस्तबद्ध संस्थांचे सहकार्य मिळत आहे.

विद्यापीठाच्या इतर अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ते देशातील तसेच परदेशात विविध प्रयोगशाळांची स्थापना किंवा सुधारणा करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन आणि सल्ला देत आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातून आणि जवळपास ७० परदेशी देशांतील कार्यरत व्यावसायिकांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. ज्यामध्ये जवळपास 26,000 पेक्षा जास्त अधिकारी आहेत. ज्यात FSL, पोलीस, अशा विविध विभागांतील 4,300 परदेशी अधिकारी आहेत. सशस्त्र सेना, नागरी सेवा, न्यायव्यवस्था, बँकिंग, दक्षता, सीमाशुल्क, इमिग्रेशन इ.

अशा विलक्षण वेगवान विकासामुळे आणि 11 वर्षांच्या अल्प कालावधीत अतिशय विस्तारित असा दर्जा प्राप्त केला आहे. उत्कृष्टतेच्या उच्च दर्जासह, भारत सरकारने 1 ऑक्टोबर 2020 रोजी विद्यापीठाला राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ म्हणून घोषित केले आणि त्यांच्या श्रेणीमध्ये सुधार देखील केला आहे. तसेच ‘संस्थेचा प्रतिष्ठित दर्जा बहाल केला.

राष्ट्रीय महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेता तेव्हापासून NFSU ने मोठी प्रगती केली आहे. त्याचे पहिले कॅम्पस केवळ नवी दिल्लीतच सुरू झाले नाही तर गृह मंत्रालयाच्या मदतीने, NFSU ने गोवा, त्रिपुरा, भोपाळ, पुणे, मणिपूर, धारवाड आणि गुवाहाटी येथे सुरवातीपासून कॅम्पस स्थापन केले आहेत. इतर अनेक ठिकाणी देखील कॅम्पस सेट करण्याचे काम सुरू झाले आहे.इतर अनेक राज्यांमध्ये कॅम्पस घेतली जाणार आहे. याहूनही मोठी प्रगती म्हणजे NFSU ने युगांडातील जिन्जा येथे आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन केला आहे. अशा प्रकारे परदेशात कॅम्पस असलेले हे देशातील पहिले सार्वजनिक विद्यापीठ बनले आहे.

देशभरात फॉरेन्सिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या GOI च्या संकल्पनेनुसार आणि प्रत्येक जिल्ह्यात किमान एक NFSU ने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन (MFVs) डिझाइन करण्याचा अनोखा पुढाकार घेतला आहे. सतत संशोधन आणि अभ्यास केल्यानंतर, विद्यापीठाने दोन वेगवेगळ्या देशी बनावटीच्या वाहनांवर सर्वसमावेशक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनची रचना आणि विकास केला आहे. भारतातील परिस्थितीचा विचार केल्यास तपास किट, नमुना संकलन सुविधा आणि फॉरेन्सिक तज्ञांनी सुसज्ज आहेत. पायाभूत सुविधा वाढवण्याच्या दिशेने हे पहिले महत्त्वाचं पाऊल आहे.

एक सुपर-स्पेशलाइज्ड संस्था म्हणून NFSU ने उच्च-गुणवत्तेचे तांत्रिक शिक्षण देणे, उच्च दर्जाचे वैज्ञानिक संशोधन करणे आणि फॉरेन्सिक सायन्सेस आणि संबंधित विषयांच्या विविध क्षेत्रांमध्ये उच्च-कुशल तज्ञ विकसित करणे यासाठी आघाडी घेतली आहे.

याशिवाय, अंमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी मदत करण्यासाठी, NFSU येथे जुलै 2022 पासून नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या R&D साठी एक अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली आहे. त्याच उद्देशाने विद्यमान बॅलिस्टिक्स व्यतिरिक्त रेंज, NFSU ने ऑगस्ट 2022 मध्ये सायबर सिक्युरिटी, DNA फॉरेन्सिक्स आणि फॉरेन्सिक आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह सायकॉलॉजीसाठी सेंटर्स ऑफ एक्सलन्सची स्थापना केली आहे.

विद्यापीठाने तज्ज्ञ मनुष्यबळाच्या गरजेवरही भर दिला आहे. जेणेकरुन त्याचे विद्यार्थी प्रशिक्षणाद्वारे फॉरेन्सिक तज्ञ तयार करतील. विविध श्रेणीतील पोलीस कर्मचारी न्यायवैद्यक शास्त्राचे ज्ञान आणि कौशल्याने सुसज्ज आहेत. या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली जेव्हा NFSU ने दिल्ली पोलिसांसोबत तसेच चंदीगड पोलिसांसोबत NFSU-प्रशिक्षित फॉरेन्सिक तज्ञांना गुन्ह्याच्या वैज्ञानिक तपासात मदत करण्यासाठी महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. या दिशेने आणखी एक पाऊल म्हणजे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी गृह मंत्रालयाने चालवलेले इंटरएक्टिव्ह व्हर्च्युअल प्रशिक्षण मॉड्यूल. जे NFSU द्वारे राज्यभरातील पोलिस दलांच्या क्षमता वाढीसाठी विकसित केले जात आहे. याशिवाय, गृह मंत्रालयाने (MHA) नुकतेच दिल्ली पोलिसांना निर्देश दिले आहेत की दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी राष्ट्रीय राजधानीत सहा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक तपासणी अनिवार्य केली जावी. हा एक महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. जो राष्ट्रीय शासनाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून फौजदारी न्याय वितरण प्रणालीचे महत्त्व अधोरेखित करतो.

21 व्या शतकातील बदलत्या प्रतिमानांनी नवीन जटिल आव्हाने समोर आणली आहेत. विविध क्षेत्रांमध्ये पूर्णपणे नवीन धोके निर्माण झाले आहेत. एक सुपर- स्पेशलाइज्ड संस्था म्हणून, NFSU ने उच्च-गुणवत्तेचे तांत्रिक शिक्षण देणे, उच्च दर्जाचे वैज्ञानिक संशोधन करणे आणि फॉरेन्सिक सायन्सेस आणि संबंधित विषयांच्या विविध क्षेत्रांमध्ये उच्च-कुशल तज्ञ विकसित करणे यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुन्हेगारी तपास आणि फौजदारी न्याय वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी फॉरेन्सिकची भारताची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी हे विद्यापीठ शांतपणे परंतु वेगाने प्रगती कडे वाटचाल करत आहे.

जे. एम. व्यास हे राष्ट्रीय फोरेंसिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.