चीनच्या अंतराळातील महत्वाकांक्षेकडे बायडन यांनी दुर्लक्षत केले तर, ती मोठी चूक ठरणार आहे, कारण चीनने अमेरिकेसोबतची अंतराळातील स्पर्धा कधीच सुरु केली आहे.
अमेरिकेत नुकत्याच अस्तित्वात आलेल्या बायडन यांच्या प्रशासनाने मोठ्या प्रमाणात धोरणात्मक बदल करायला घेतले आहे. त्यांनी अलिकडेच एक नवे अवकाश धोरण जाहीर केले. हे धोरण तसे फारसे हानीकारक वाटत नसले, तरी त्यातून आधुनिक स्वरुपाची लष्करी ताकद दाखवण्याचा प्रयत्न मात्र दिसतो आहे. तसे पाहिले तर या अवकाश धोरणातून असे दिसते आहे की, बायडन यांनी अनेक आघाड्यांवर बायडन ट्रम्प यांच्या धोरणांपासून फारकत घेतलेली आहे, किंवा त्याविरुद्ध त्यांचे धोरण आहे.
बायडन यांच्या अवकाश धोरणात हवामान बदलाच्या समस्येविरोधात लढा देण्यासाठी, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या अधिकाधिक गुंतवणूकीला प्राधान्य दिले आहे. महत्वाचे म्हणजे ट्रम्प यांनी या सगळ्या बाबी दुर्लक्षित केल्या होत्या, किंवा ही प्राधान्यक्रमावर घ्यायला हवी अशी आव्हानात्मक बाब आहे, अशा विचारांनाही कधीच महत्व दिले नव्हते. बायडन यांनी मांडलेल्या अवकाश धोरणात मात्र हवामान बदलामुळे तापमान आणि वातावरणात किती तीव्र स्वरुपाचे बदल होतील, तसेच समुद्राच्या पाणी पातळीत कशा प्रकारची वाढ होऊ शकेल यावरच्या संशोधनाला प्राधान्य दिले आहे.
ट्रम्प यांनी आर्टेमीस लुनार एक्स्प्लोरेशन प्रोग्रॅम (Artemis Lunar Exploration Programme)हा चंद्राविषयीचा संशोधन कार्यक्रम सुरु केला होता. अर्थात हा प्रकल्प ट्रम्प यांनी सुरु केला असला, म्हणून तो थांबवायचा कोणताही निर्णय बायडन यांनी घेतलेला नाही. याअंतर्गतच्या चांद्रमोहीमेत चंद्रावर पहिली स्त्री आणि पुरुष उतरवण्याचा तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले अस्तित्व प्रस्थापित करायचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या ठिकाणाला आर्टेमिस बेस कॅम्प म्हणून ओळखले जाईल. अर्थात ट्रम्प यांनी मांडलेल्या अवकाश धोरणातल्या सर्वच बाबी जशाच्या तशा पुढे सुरु ठेवण्याचा बायडन यांचा कोणताही मानस नसणारच आहे.
आर्टेमीस लुनार एक्स्प्लोरेशन प्रोग्रॅमला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ठरवलेली २०२४ सालापर्यंतची महत्वाकांक्षी कालमर्यादा २०३० सालापर्यंत वाढवली जाईल अशी शक्यता दिसते. अर्थात काहीही असले, तरी अमेरिकेने पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवणे ही अवकाश संशोधनातली मोठी घटना ठरणार आहे, आणि त्यामुळे अंतराळात खोलवर दडलेली रहस्ये शोधण्याच्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात मोठी चालना आणि वेग मिळू शकणार आहे.
परिस्थिती काहीही असली तरी बायडन यांच्या प्रशासनाने मांडलेल्या अवकाश धोरणातल्या लष्करी बाजुचाही विचार व्हायला हवा. त्यादृष्टीने पाहिले तर, अमेरिकेचे अवकाश लष्करी दल ( US Space Force – USSF) सुरु करण्यासाठी ट्रम्प यांच्या प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना बळ मिळाले नाही, तर या विचारच मागे पडायचा मोठा धोका मात्र दिसतो. अशा दलाची स्थापना करण्याबाबत ट्रम्प यांनी मांडेलेले धोरण, अमेरिकेतल्या याआधीच्या प्रशासनांनी मांडलेल्या धोरणापेक्षा कितीतरी वेगळे होते. या माध्यमातून अवकाश कार्यक्रम आणि मोहीमांसाठी नवे तंत्रज्ञान, नव्या कार्यान्वयन क्षमता, नवे सिद्धांत आणि धोरणांचा अवलंब केला जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
याअंतर्गतची सगळी उद्दिष्टे एकत्रित करून पाहिली तर, अल्पकाळात ती प्रत्यक्षात उतरवली जातील असा विचार करणे, अतिमहत्वाकांक्षी होते हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. इथे ब्लेडीन बोवेन यांनी ठामपणे मांडलेले मत समजून घ्यायला हवे. ते म्हणतात अमेरिकेच्या अवकाश लष्करी दलाची ( US Space Force – USSF) परिकल्पना करत बसण्यापेक्षा, अशा प्रकारचे दल स्थापन करायच्या विचारावर आक्षेप घ्यायचा असेल, तर त्यामागे काय ठोस कारणे आहेत, ती सांगायला हवीत असे म्हटले आहे. बायडन प्रशासनातले व्हाईट हाऊसचे माध्यम मंत्री (Press Secretary) जेन साकी यांनीही याबतच्या प्रश्न विचारला गेला होता. त्यावर त्यांनी “व्वा, स्पेस फोर्स. हे म्हणजे आजचं विमानच” असे उत्तर दिले.
खरे तर त्यांनी त्यावेळी या प्रश्नाची तुलना अगदी याआधी अध्यक्षांच्या एअर फोर्स वन या जेट विमानाच्या नव्या रंगाबद्दल विचारलेल्या प्रश्नांशी केली. रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी मायकल वॉल्ट्झ यांनीही लागलीच निषेध व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली. वॉल्ट्झ यांनी म्हटले आहे की, “या सगळ्यातून प्रशासन चीनला गांभीर्याने घेत नसल्याचेच दिसते आहे, तसेच यातून स्पेस फोर्सच्या जवानांनी केलेल्या अतुलनीय कामाबद्दलही अनादर व्यक्त होतो आहे.” खरे तर अशा बोवेन यांनी म्हटल्याप्रमाणे सर्वच लष्करी दलांना युद्धाचा विचार करायला हवा, महत्वाचे म्हणजे युद्ध ज्या क्षेत्रात आणि वातावरणात लढली जातात त्याचा विचार करायला हवा.
अमेरिकेच्या धोरण व्यवस्थापकांनी, या दलाच्या कार्यक्षमतेविषयीच्या ज्या कल्पना केल्या आहेत, त्या कसोटीवर टिकण्यासाठीच्या चाचण्या पार करण्याच्यादृष्टीने अमेरिकेचे अवकाश लष्करी दल (US Space Force – USSF) तितके सक्षम किंवा लवचिक आहे का हे समजून घेणे इथे निश्चितच महत्वाचे ठरते. विशेषतः ऑक्टोबर २०१९ मध्ये एअरफोर्स स्पेस कमांडने (एएफएससी) ज्या चाचण्या मांडल्या होत्या त्याबाबतीत हे महत्वाचेच ठरते. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की ब्लू वॉटर नेव्हल फोर्स किंवा ब्राऊन वॉटर नेव्हल फोर्स प्रमाणेच जागा निर्माण करायची की नाही, यावरून अमेरिकेत आता चर्चा झडू लागल्या आहेत.
आधीच्या नेतृत्वानुसार अमेरिकेच्या अवकाश लष्करी दलाची (US Space Force – USSF) कार्यकक्षेचा विस्तार पृथ्वीच्या भ्रमण कक्षेच्याही पुढे चंद्रापर्यंत आणि त्याच्याही पुढे केला जाऊ शकतो. चंद्राच्या कोणत्याही ध्रुवावर किंवा कोणत्याही पृष्ठभागावर कोणत्याही देशाचे अधिराज्य निर्माण होऊ या अमेरिकेचा हेतू आहे हे इथे समजून घ्यायला हवे. म्हणजेच पृथ्वी आणि चंद्राच्या भ्रमण कक्षाच्या काहीशा पलिकडल्या जागेपर्यंत, तसेच चंद्र आणि पृथ्वी भ्रमण करत असतना, त्यांच्यामधल्या स्थीर स्थितीचे दर्शक असलेल्या पाच लॅग्रांगे (Lagrange) बिंदूंपर्यत चांद्रीय अंतराळाच विस्तार आहे किंवा होऊ शकतो.
थोडक्यात जेव्हा सूर्य आणि पृथ्वी तसेच पृथ्वी आणि चंद्रापासून मध्यवर्ती शक्ती एकसमान परिमाणात असतील, (आकृती -१ मध्ये दाखवल्याप्रमाणे) तेव्हा L1 हा बिंदू चंद्रासमोर तर L2 हा बिंदू चंद्राच्या मागे असेल, आणि या दोघांमधे सुमारे ६०,००० किलोमीटरचे अंतर असेल. हीच स्थिती पृथ्वी आणि सूर्याच्या बाबतीतही दिसून येईल (आकृती २ मध्ये दाखवल्याप्रमाणे). यात आपल्याला पाच वेगवेगळे लॅग्रांगे (Lagrange) बिंदूंही दिसून येतात. मात्र सूर्य आणि पृथ्वीचे दोन लॅग्रांगे (Lagrange) बिंदूं मात्र पृथ्वी आणि सुर्यापासून प्रत्येकी १० लाख मैलाच्या अंतरावर आहेत. इथे लॅग्रांजीअन (Lagrangian) बिंदू महत्वाचे आहेत, कारण अशाच ठिकाणी अंतराळ स्थानकासारखी (space station) महत्वाची मोठी ठिकाणे आहेत.
उदाहरणच घ्यायचे तर L1 या सूर्य-पृथ्वीच्या लॅग्रांजीअन (Lagrangian) बिंदूवर सुर्याविषयीचं संशोधन करण्यासाठीची वेधशाळा सोहो म्हणजेच सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्झरव्हेटरी (SOHO – Solar and Heliospheric Observatory) आहे, तर L2 या लॅग्रांजीअन (Lagrangian) बिंदूवर अंतरळाचं खोलवर संशोधन करणारी डीप स्पेस क्लायमेट ऑब्झरव्हेटरी (Deep Space Climate Observatory) आहे. याशिवायदेखील अतिरिक्त लॅग्रांगे (Lagrange) बिंदू आहेत. मात्र L3 हा बिंदू नेमका कशासाठी उपयुक्त ठरू शकतो, याचे नेमके वैज्ञानिक उत्तर अजूनही कळायचे आहे.
L4 आणि L5 हे बिंदु तुलनेने अत्यंत स्थिर समजले जातात. महत्वाचे म्हणजे ते पृथ्वीपासून जवळ आहेत, आणि त्यामुळेच तिथे लघुग्रहांसह इतर खगोलीय वास्तूंच्या सहकार्याने, त्याचा वापर अंतराळातली किंवा भ्रम कक्षांतर्गची वसाहत म्हणूनही नक्कीच होऊ शकतो. त्याचप्रमाणे, पृथ्वी आणि चंद्राच्या L1 आणि L2 या शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या अत्यंत महत्वाच्या लॅग्रांगे (Lagrange) बिंदूंवरही अंतराळ स्थानक ठेवले जाऊ शकते. त्याचे कारण म्हणजे हे बिंदू स्थीर आहेत आणि कोणत्याही अंतराळ वाहनांच्या वाहतूक आणि पुरवठ्याच्या किंवा संबंधित मोहीमांच्यादृष्टीने पाहीले तर त्यासाठी, अशी वाहने उतरवण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वस्तू वा उपकरणांची गरजही भासत नाही. महत्वाचे म्हणजे या बिंदूंवर उर्जा स्थानकेही उभारली जाऊ शकतात.
आकृती क्र. १ – पृथ्वी-चंद्र जोडीची व्यवस्था
आकृती क्र. २ – पृथ्वी-सुर्य जोडीची व्यवस्था
पृथ्वी आणि चंद्र तसेच पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधले लॅग्रांजीअन (Lagrangian) बिंदू महत्वाची असण्यामागे आणखी इतरही कारणे आहेत. आणि ती म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण. त्यामुळेच तर याबाबतीत इतर कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला वर्चस्व दाखवता येऊ नये अशीच अमेरिकेची इच्छा आहे. मात्र याबाबतीत चीन म्हणजेच पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) हा आज एक मुख्य दावेदार देश आहे. स्वतःसाठी जास्तीत जास्त फायदा करून घेण्याच्यादृष्टीने या लॅग्रांगे (Lagrange) बिंदूंचा उपयोग करून घेण्याकरता चीनने अत्यंत महत्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रम आखला आहे. पृथ्वी-चंद्र तसेच पृथ्वी-सूर्याच्या प्रत्येक जोडीत हे हे ५ लॅग्रांगे (Lagrange) बिंदूं अत्यंत महत्वाचे आहेत, कारण या बिंदूंमुळेच अंतराळ याने किंवा उपकरणांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करणे तसेच उर्जेवरच्या खर्चात बचत करणे शक्य होते.
थोडक्यात काय तर या लॅग्रांजीअन (Lagrangian) बिंदूवरचे वर्चस्वाचा दुसरा अर्थ म्हणजेच उपग्रहविरोधी यंत्रणा प्रत्यक्षात येण्याची शक्यता अधिकाधिक वाढणे हाच आहे. पृथ्वी-सुर्याच्या जोडीमधल्या ५ लॅग्रांजीअन (Lagrangian) बिंदूचा विचार केला केला, तर आपल्या सौरमालेअंतर्गतच्या कार्यान्वयावर स्वतःचे वर्चस्व निर्माण करणे हाच अमेरिकेसारख्या देशाकडून इथे प्रगत तंत्रज्ञानाधारीत अंतराळवाऱ्या घडवून आणण्यामागचा उद्देश आहे. लॅग्रांजीअन (Lagrangian) बिंदूच्या लष्करी महत्वाविषयी सध्या अमेरिकेत ज्या चर्चा किंवा वाद प्रतिवाद सुरु आहेत, त्यात नाविन्यपूर्ण असे काहीच नाही.
दुसरी बाब अशी की शीतयुद्धाच्या काळात या चर्चा आणि वादप्रतिवादांना जे महत्व मिळाले होते, तसे आता मिळते आहे अशीही स्थिती दिसत नाही. शीतयुद्धाच्या काळानंतर आजपर्यंत असंख्य वैज्ञानिक शोध लागले आहेत, प्रगती झाली आहे आणि त्याच बरोबर चीनचाही उदय झाला आहे.. मात्र त्यामुळे जशा लष्करविषयक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, तसेच त्यापासूनचे धोकेही निर्माण झाले आहेत हे ही समजून घ्यावे लागेल. थोडक्यात काय तर अमेरिकेचे अवकाश लष्करी दलाच्या (US Space Force – USSF) स्थापनेतून, अंतरळातल्या वर्चस्वाशी संबंधित काहीएक गोष्टींची, थोड्याफार प्रमाणत खातरजमा होते.
पृथ्वी-सूर्य आणि पृथ्वी-चंद्रामधील लॅग्रांजीअन (Lagrangian) बिंदू उपयोग करून घेऊ शकणारा विशेषतः चीनसारखा कोणताही मोठा प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये, जो कदाचित अमेरिका आणि अंतराळवाऱ्या करणाऱ्या इतर देशांच्या दृष्टीने धोकादायक स्थिती निर्माण करू शकतो, यासाठी अमेरिकेचे अवकाश लष्करी दल (US Space Force – USSF) सज्ज ठेवण्याच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याचेही यातून काहीएक प्रमाणात स्पष्ट होते. अर्थात सध्याच्या परिस्थिती चीन अशा प्रकारचे काहीएक नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरेल की नाही, याबाबत अजुनही स्पष्ट असे काहीच सांगता येणार नाही. पण त्याचवेळी या दिशेनेही काहीएक घडू शकते ही बाब, आणि अंतराळ लष्कराच्या बाबतीत चीनच्या महत्वाकांक्षेला बायडन यांच्या प्रशासनाने जर दुर्लक्षित केले किंवा हलक्यात घेतले, तर ती मोठी चूक ठरणार आहे, कारण चीनने अमेरिकेसोबतची स्पर्धा कधीचीच सुरु केली आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Kartik Bommakanti is a Senior Fellow with the Strategic Studies Programme. Kartik specialises in space military issues and his research is primarily centred on the ...