-
CENTRES
Progammes & Centres
Location
ऑस्ट्रेलियाच्या ‘संरक्षणविषयक धोरणात्मक आढावा २०२३’ अहवालात मूलभूत बदल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे बदल ऑस्ट्रेलियासाठी आवश्यक आहेतच, शिवाय भारत-प्रशांत क्षेत्रातील त्याच्या भागीदारांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहेत.
ऑस्ट्रेलियाचा २४ एप्रिल रोजी जाहीर झालेला ‘संरक्षणविषयक धोरणात्मक आढावा २०२३’ पाहता ऑस्ट्रेलियाच्या गेल्या किमान ५० वर्षांमधील संरक्षण धोरणामध्ये बदल झाल्याचे सूचित झाले आहे. हा आढावा देशाच्या नव्याने निवडून आलेल्या अल्बानिज यांच्या नेतृत्वाखालील लेबर सरकारने २०२२ मध्ये घेतला होता. या आढाव्यातून वेगाने बदलणाऱ्या धोकादायक वातावरणावर उपाययोजना म्हणून देशाचे प्राथमिक संरक्षण धोरण आणि क्षमता यांची तातडीने पुनर्रचना करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलाची सद्य स्थिती व सज्जता ही ‘उद्दिष्ट साध्य करणारी नाही,’ असे आढावा अहवालात नमूद करण्यात आले असून ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण रणनीतीत आणि स्थितीत मूलभूत बदलाची शिफारस या अहवालाने केली आहे. या सर्व शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत.
आढावा अहवालामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण रणनीतीत आणि एकूण संरक्षण स्थितीत खालीलप्रमाणे प्रमुख बदल सुचवण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या लष्करामध्ये काही स्पष्ट बदल होणार असल्याचे संकेत आढावा अहवालामध्ये देण्यात आले आहेत. लष्कर आपल्या दीर्घकालीन संतुलित दलाच्या स्वरूपाचा त्याग करून समुद्रतटावरील मोहिमांची संख्या वाढवेल (काही प्रकारे समुद्राच्या जवळ). अनेक गटांना ऑस्ट्रेलियाच्या उत्तरी तटावर तैनात केले जाईल.
ऑस्ट्रेलियाच्या लष्करात काही महत्त्वाचे बदल केले जातील. त्यामध्ये यांचा समावेश आहे.
नौदल म्हणजे अधिक शस्त्रास्त्रांनी युक्त लष्करच
ऑस्ट्रेलियाचा बहुतांश संरक्षण खर्च हा समुद्री क्षमता वाढवण्यावर होत असतो. भविष्य काळात या खर्चात आणखी वाढ होईल.
अमेरिका आणि ब्रिटनकडून ३६८ अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंतच्या खर्चावर अणुशक्तीवर आधारित (आणि पारंपरिक शस्त्रसज्ज) पाणबुड्यांचा ताफा घेण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता. या निर्णयावर आढावा अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे. हे प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावरील फ्रेमंटल येथे अमेरिकी आणि ब्रिटिश आण्विक पाणबुड्यांसमवेत तैनात असतील. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर आणुशक्तीवर चालणारा आणखी एक पाणबुडी तळ उभारण्याची शिफारस आढावा अहवालात करण्यात आली आहे.
अमेरिका आणि ब्रिटनकडून ३६८ अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंतच्या खर्चावर अणुशक्तीवर आधारित (आणि पारंपरिक शस्त्रसज्ज) पाणबुड्यांचा ताफा घेण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता.
नौदलाच्या जमिनीवरील ताफ्यात संभाव्य महत्त्वपूर्ण बदलांचे संकेतही आढावा अहवालातून मिळतात. नौदलाच्या जमिनीवरील ताफ्याचे निवृत्त व्हाइस ॲडमिरल विल्यम हिलराइड्स यांनी घेतलेल्या आढाव्याचाही यात समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये रचना केलेल्या नियोजित नऊ हंटर क्लास लढाऊ जहाजांमध्ये कपात केली जाईल, अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे. या जहाजांवर कमी शस्त्रांनी युक्त छोटे संरक्षण जहाज असल्याची टीका करण्यात येत आहे.
विखुरलेल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी उत्तर ऑस्ट्रेलियातील हवाई तळांचे जाळे (हिंद महासागर कोको बेटांच्या प्रदेशांसह) अधिक मजबूत करण्याचे आदेश ऑस्ट्रेलियाच्या हवाई दलाला देण्यात येतील.
अमेरिकेत उत्पादित झालेले बी-२१ बॉम्बर ऑस्ट्रेलिया या टप्प्यावर घेणार नाही. मात्र वैमानिकयुक्त विमानांसह वैमानिकविरहीत संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ‘लॉयल विंगमन’ ड्रोनच्या उत्पादनात वाढ करण्याला आढावा अहवालात मान्यता देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाला आपल्या संरक्षण क्षमतेत वाढ करण्यासाठी उत्तर-पूर्व हिंद महासागरातून आग्नेय आशियामार्गे प्रशांत महासागरापर्यंतचे क्षेत्र अधिक महत्त्वपूर्ण वाटते. त्यामध्ये उत्तरेचाही समावेश होतो. या संरक्षण धोरण सुधारणा २०२२ मधील निवेदनामध्ये नोंदवलेल्या भूमिकेवरही या आढावा अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे. भारताच्या दृष्टीने याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाचे संरक्षण दल हिंद महासागराच्या पूर्वेकडे आपले लक्ष केंद्रित करील आणि पश्चिमेकडील हिंद महासागराच्या क्षेत्राला प्राधान्य देणार नाही.
हा आढावा अहवाल प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या क्षमतांवर केंद्रित करण्यात आला असून प्रादेशिक संबंधांविषयी त्यात फारसे भाष्य नाही. मात्र हिंद महासागर क्षेत्रामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण सहकार्य कार्यक्रमाचा विस्तार व्हावा, अशी शिफारस त्यात करण्यात आली आहे. त्यामध्ये संभाव्यतः ऑस्ट्रेलियाच्या प्रशांत सागरी सुरक्षा कार्यक्रमाच्या विस्ताराचा समावेश असू शकतो (या कार्यक्रमाला पॅसिफिक पेट्रोल बोट प्रोग्राम असे ओळखले जाते).
आढावा अहवाल २०२३ हे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण कार्यक्रमातील एक प्रमुख वळण आहे. ऑस्ट्रेलियाची संरक्षण रणनीती आणि स्थिती यांच्यात मूलभूत बदल घडवून आणण्याचे अहवालात करण्यात आलेले आवाहन हे केवळ ऑस्ट्रेलियासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारत-प्रशांत क्षेत्रातील भागीदारांसाठी इशारा देणारे आहे. वेळ आपल्या बाजूने नाही, हे त्यातून सूचित होते.
(हा लेख ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागाच्या साह्याने हाती घेतलेल्या ऑस्ट्रेलिया भारत संस्थेच्या संरक्षण कार्यक्रमाचा एक भाग आहे. या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत.)
________________________________________________________________________________________
डेव्हिड ब्रूस्टर ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिट्यूटच्या संरक्षण कार्यक्रमाचे नेतृत्व करतात आणि राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालय, ANU येथे वरिष्ठ संशोधन फेलो देखील आहेत.
सॅम्युअल बॅशफिल्ड हे ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिट्यूटच्या संरक्षण कार्यक्रम, ऑस्ट्रेलियाचे संरक्षण संशोधक आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
David Brewster is one of Australias leading experts on Australias security relationships in South Asia and the Indian Ocean region. He leads the Australia India ...
Read More +