इस्रायली सुरक्षा दले आणि पॅलेस्टाइन आंदोलकांमधील किरकोळ झडपी या नित्याच्याच आहेत. पण गेल्याच आठवड्यात या किरकोळ संघर्षाने गंभीर वळण घेतले. कारण इस्रायली पोलीस अल-अक्सा मशिदीच्या परिसरात गेले. तेथे जमलेल्या गर्दीला नियंत्रणात आणताना हिंसाचार उफाळला. त्यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली. उत्तरादाखल ‘हमास’ने इस्रायलमधील अनेक शहारांमध्ये रॉकेट हल्ले चढवले. दुसरीकडे इस्रायली लष्कराने गाझा पट्टीवर रॉकेट डागून प्रत्युत्तर दिले.
गाझा पट्टीवर बालके आणि महिलांसह डझनभर पॅलेस्टिनी मारले गेले. तर हमासच्या रॉकेट हल्ल्यात लहान मुलांसह सहा इस्रायली नागरिक मारले गेले असल्याचे सांगण्यात आले. इस्लामिस्ट पॅलेस्टिनी गट, ज्याला इस्रायली एक दहशतवादी संघटना म्हणून संबोधते, त्या संघटनेने आतापर्यंत हजारांहून अधिक रॉकेट डागले असून, इस्रायलच्या संरक्षण ‘आयर्न डोम’ संरक्षण यंत्रणेला नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
गाझा पट्टीवरील आकाश हे धुराच्या लोटांनी काळवंडून गेले होते. कारण इस्रायलने हमासचे कमांडर आणि अनेक इमारतींना लक्ष्य केले. आणि तेल अविवच्या ढगांना रॉकेटद्वारे अक्षरशः छिद्र पाडले गेले. तेथील लोकांनी घरे रिकामी केली आणि लपण्यासाठी जागा शोधत होते. दोन्ही बाजूंनी घेरले गेलेले रहिवासी प्रचंड भीतीच्या छायेखाली आहेत. पण ना नेत्यानाहू सरकार, ना हमास हा संघर्ष संपुष्टात आणण्यास तयार होताना दिसत नाहीत. त्यामुळे हा संघर्ष आता युद्धात बदलेल अशी दाट शक्यता आहे.
आपण पूर्णपणे युद्धाच्या दिशेने पुढे जात आहोत. हे त्वरित थांबवा, असा इशारा मध्य पूर्व शांतता प्रक्रियेचे समन्वयक टोर वेनसलँड यांनी दिला. सर्व नेत्यांनी जबाबदारी घेऊन शांतता कायम राखावी. गाझामधील युद्ध हे विनाशकारी असून, येथील सर्वसामान्य लोकांना त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल. संयुक्त राष्ट्र शांतता पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सध्या हा हिंसाचार थांबवावा, असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले होते.
त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगार न्यायालयाच्या मुख्य वकील फतोऊ बेनसौदा म्हणाल्या की, संभाव्य युद्धाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जे होण्याची दाट शक्यता आहे. तज्ज्ञांना आशा आहे की त्यांनी दिलेला इशारा प्रतिबंधक म्हणून काम करू शकतो. पूर्व जेरूसलेम, गाझासह आजूबाजूचा परिसर आणि रोम कायद्यांतर्गत गुन्हेगारीचा संभाव्य कमिशनसह वेस्ट बँकमधील वाढलेल्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करतानाच गंभीर दखल घेतली आहे, असे बेनसौदा म्हणाल्या.
हिंसाचाराच्या दुसऱ्या दिवशीही तो संपुष्टात आलेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली. हा हिंसाचार लवकरच संपुष्टात येईल, अशी आशा आहे, असे ते म्हणाले. ”मी अशी आशा करतो की, लवकरच हे सर्व बंद होईल. पण जर तुमच्या हद्दीत हजारो रॉकेट डागले जात असतील तर इस्रायलला आपला बचाव करण्याचा अधिकार आहे,” अशी पुष्टीही बायडन यांनी जोडली.
पण, वास्तवात इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की, गाझाच्या आतमध्ये घुसण्याचे आमच्याकडे आदेश आहेत. आणि हमासला तसा कठोर संदेश मिळाल्याशिवाय आम्ही हवाई हल्ले थांबवणार नाहीत. इस्रायलच्या संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनथन कोन्रीकस यांनी ब्रिटिश वृत्तवाहिनी स्काय न्यूजला सांगितले की, ‘हमासने रॉकेट डागणे बंद केले तर हा संघर्ष थांबेल असे सांगतानाच, ते म्हणाले की, हमास आणि इस्लामिक जिहाद या दोघांपर्यंत कठोर अद्याप संदेश पोहोचलेला नाही.’
जेव्हा हमासने इस्रायलवर रॉकेट डागले त्यावेळी त्यांना पूर्वकल्पना होती की, याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे, मग ती दोन्ही पातळीवर, ती म्हणजे गाझा पट्टीचा विनाश आणि मोठी जीवितहानी. तरीही त्यांनी अधिक ताकदीने हल्ले चढवले. त्याचे अंशिक कारण म्हणजे, अल-अक्सा हे मुस्लिमांचे पवित्र स्थळ आहे आणि तेथील घटनेवर प्रतिसाद दिला नसता तर विश्वासार्हता गमावली असती. पण प्रामुख्याने ते अजूनही पॅलेस्टिनींच्या संघर्षाशी संबंधित असल्याचे दाखवायचे होते. काहींना वाटते की हमासने हल्ल्यांमुळे आपली ताकद सिद्ध केली आहे. तर काहींच्या म्हणण्यानुसार, ही एकप्रकारची आत्महत्याच आहे आणि त्यांनी या कृत्यातून पॅलेस्टिनी नागरिकांना कधीही न संपणाऱ्या वेदना दिल्या आहेत.
एकूणच काय तर, हमासच्या रॉकेट हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा इस्रायलला पूर्ण अधिकार आहे, हे जगानेही मान्य केले. परंतु असमान युद्धाच्या बाबतीत. इस्रायलचे लष्कर सर्वश्रेष्ठ मानले जाते. आंतरराष्ट्रीय प्रतिसाद इस्रायलच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झुकल्याचे पाहायला मिळत आहे.
बऱ्याच काळापासून प्रचंड प्रमाणात बळाचा वापर करणे हा इस्रायलच्या नीतीचा एक भाग आहे. पारंपरिकदृष्या संघर्षमय असलेल्या या भागात या धोरणाने इस्रायलला तग धरून राहण्यास मदत केलेली आहे, असे अनेक जण मानतात. तथापि काळाच्या सोबत राहून इस्रायलने जॉर्डन आणि इजिप्तसोबत शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अलीकडेच त्यांनी संयुक्त अरब अमिरात, बहरीन, मोरोक्को आणि सुदानसोबत सामान्यीकरण करारावर स्वाक्षरी केली आहे. सौदी अरबही शांततेच्या या मार्गावर वाटचाल करत आहे, असे व्यापकदृष्या मानले जाते आहे.
तथापि, आपल्या अरबी भाऊबंदांनी वाऱ्यावर सोडल्याची भावना पॅलेस्टिनींमध्ये आहे. विशेषतः अंतिम करारावर त्यांनी स्वाक्षरी केल्यापासून. तज्ज्ञांमधील व्यापक करार हा आहे की, जर हा न संपणारा संघर्ष निवळायचा असेल तर, अमेरिकेने दोन्ही बाजूंनी चर्चा सुलभ केली पाहिजे. शांतता प्रक्रियेचे नुतनीकरण करायला हवे. तसेच पॅलेस्टिनींच्या मागण्यांमधील तथ्य लक्षात घ्यायला हवेत. अन्यथा रॉकेट हल्ले आणि हवाई हल्ल्यात फक्त मोठी जीवितहानी होईल.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.