Author : Chetan Khanna

Published on May 10, 2019 Commentaries 0 Hours ago

कृषी आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवाउद्योग उभे करत, आफ्रिकेने ‘धूरविरहीत विकास’ कराणारा भूभाग अशी नवी ओळख निर्माण केली आहे.

आफ्रिकेची ‘धूरविरहीत’ विकासगाथा

आफ्रिका खंडातील सब-सहारा हे देश त्यांच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वतःची नवी ओळख निर्माण करत आहेत. या मार्गाक्रमणात त्यांना नैसर्गिक स्रोतांची निश्चितच मदत झाली, पण नैसर्गिक स्रोतांनी समृद्ध देशांच्याही पुढे जात ही वाटचाल सुरु आहे. १९९० सालापासूनच युथोपिया आणि रवांडासारख्या देशांच्या विकासाचा वेग, पूर्व आशियायी देशांच्या विकास दराइतकाच राहिला आहे. कृषी आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवाउद्योग उभे करत, आफ्रिकेने ‘धूरविरहीत विकास’ कराणारा भूभाग अशी नवी ओळख निर्माण केली आहे.

आता अशा परिस्थितीत महत्वाचा प्रश्न उभा ठाकतो, तो म्हणजे की सध्याच्या कामगिरीत सातत्य ठेवता येणे शक्य आहे का, किंवा ती शाश्वत राहू शकेल का? अर्थात जागतिक पातळीवरचा व्यापार तेजीत असून, व्याजदरही कमी आहेत. बाह्य जगतातल्या अशा अनुकुल घडामोडींचा लाभ आफ्रिकेला आतापर्यंत होत आला आहे. खासगी भांडवली गुंतवणुकीचा ओघही सातत्याने वाढत असून, अधिकृत यंत्रणांकडून मिळणारं सहकार्य त्याला पुरक ठरत आहे. सातत्याने वाढते आहे.

एकीकडे वेगाने विकास करत असलेल्या चीनमुळे या क्षेत्रातल्या नैसर्गिक स्रोतांना प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. परिणामी आफ्रिकेच्या अर्थव्यस्थेत थेट गुंतवणूक करण्याण्यालाही प्रोत्साहन मिळू लागलेय. मात्र, गेल्या काही काळातली चीन आणि उर्वरीत जगात दीर्घकाळ टिकलेल्या मंदीमुळे, दीर्घकालीन कसोटीवर आफ्रिकेचा विकासाचा हा वेग टिकून राहील किंवा नाही याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केलेय.

बाह्यजगतातल्या अशा अनुकुल घडामोडींचा लाभ आफ्रिकेला आतापर्यंत होत आला आहे. खासगी भांडवली गुंतवणूकीचा ओघही सातत्याने वाढत असून, अधिकृत यंत्रणांकडून मिळणारं सहकार्य त्याला पुरक ठरत आहे.

इथल्या अर्थविषयक व्यवस्था बदल स्वीकारण्यात कमकुवत ठरताहेत, ही इथली खरी समस्या आहे. औद्योगिक क्रांतीनंतर विकसित देशांनी स्वतःच्या वाढीसाठी जे काही केले, त्याचे अनुकरण करत पूर्व आशियायी देशांनी अगदी अल्पकाळातच स्वतःचा वेगाने विकास केला. त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांना उत्पादक कामगारांमध्ये परिवर्तित केले. अर्थव्यवस्थेत विविधता आणली आणि महत्वाचे म्हणजे त्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले ते अत्याधुनिक वस्तुंच्या मोठ्या प्रमाणावरील निर्यातीला.

हळूहळू आफ्रिकेतही अशाच प्रकारची प्रक्रिया जम धरू लागली आहे. अलिकडच्या काळातल्या काही संशोधनांमध्ये असे दिसून आलंय की, की आफ्रिकेतील अर्थव्यवस्थेच्या स्वरुपातील बदलांचे प्रमाण तसे कमी आहे, त्यामुळे खरे तर धोरणकर्त्यांसमोरची आव्हाने अधिकच वाढली आहेत. आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक, संयुक्त राष्ट्रसंघाचा आफ्रिकेतील आर्थिक आयोग, आफ्रिकन युनियन आणि आणि आफ्रिकेचे आर्थिक परिवर्तन केंद्र अशा सगळ्याच महत्वाच्या संस्थांनी या क्षेत्रातील अर्थव्यवस्थेच्या बदलाचे स्वरुप आणि पद्धतीबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे.

इतिहासात डोकावून पाहिले तर  कोणत्याही देशांच्या अर्थव्यवस्थेच्या संरचेनतील बदल हे औद्योगिक क्षेत्रामुळे, विशेषतः उत्पादन क्षेत्रामुळेच झाले आहेत. मात्र औद्योगिकरणाबाबतीतला आफ्रिकेतला आजवरचा अनुभव असमाधानकारकच आहे. २०१४ मधील आकडेवारीनुसार सब-सहारा आफ्रिकी देशांमधील उत्पादन क्षेत्राचा वाटा हा १९७० इतकाच म्हणजेच १० टक्के इतकाच होता, त्यात कोणतेही बदल झालेले नव्हते. त्यामुळे अनेक तज्ज्ञ आता अगदी स्वाभाविकपणे इथल्या औद्योगिकरणाच्या धिम्या गतीबद्दल प्रश्न विचारू लागले आहेत, आणि त्यासोबतच आफ्रिकेच्या विकासाचा वेग टिकून राहील किंवा नाही याविषयी शंकाही व्यक्त करू लागले आहेत.

त्याचवेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने होत असलेले बदल आणि वाहतुकीचा वाढत्या खर्च यामुळे इथले अनेक उद्योग आता बाहेर जाऊ लागले आहेत. जेव्हा सध्याच्या अर्थव्यवस्थेविषयीची सांख्यिकी मांडली जात होती, त्यावेळी इथल्या खाण उद्योग, उत्पादन उद्योग, सेवा क्षेत्र आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्राला असलेल्या संधीचे प्रमाण नेमके काय याबाबत साशंकता होतीच. यांपैकी उत्पादन उद्योग क्षेत्र हे मोठ्या धुरांड्यासारखेच मानले गेले, महत्वाचे म्हणचे उत्पादन उद्योग क्षेत्र इथल्या अर्थव्यवस्थेतल्या संरचनात्मक बदलांच्या प्रक्रियेमधील मोठे कारण असेल अशीच अनेकांची धारणाही होती.

अलिकडच्या काळात या क्षेत्रामध्ये औद्योगिक कृषी उत्पादने आणि विविध प्रकारच्या सेवाक्षेत्रातले उद्योग व्यवसाय वाढू लागले आहेत. महत्वाचे म्हणजे यां उद्योगांमध्ये उत्पादन क्षेत्रातील उद्योगही असून, हे सर्व उद्योग वैशिष्ट्यपूर्ण आहेत. व्यापारयोग्य उत्पादने, प्रत्येक कामकामगारांमधली विविधांगी वैशिष्ट्ये, आणि आधुनिक कौशल्याचे किमान ज्ञान असलेला कामगारवर्ग ही या उद्योगक्षेत्रांची महत्वाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. या सर्वक्षेत्रांना कृषी क्षेत्रातील वाढ आणि तंत्रज्ञानातील बदलांचाही फायदा मिळत आहे. केवळ इतकेच नाही, तर या घडामोडींमुळे धुरांड्याशिवाय साधलेल्या विकास अशी आपली नवी ओळख आफ्रिकेने निर्माण केली आहे.

अलिकडच्या काळात या क्षेत्रामध्ये औद्योगिक कृषी उत्पादने आणि विविध प्रकारच्या सेवाक्षेत्रातले उद्योग व्यवसाय वाढू लागले आहेत. या सर्व क्षेत्रांना कृषी क्षेत्रातील वाढ आणि तंत्रज्ञानातील बदलांचाही फायदा मिळत आहे. केवळ इतकेच नाही, तर या घडामोडींमुळे धुरांड्याशिवाय साधलेल्या विकास अशी आपली नवी ओळख आफ्रिकेने निर्माण केली आहे.

अलिकडेच एका अभ्यासात असं दिसून आलंय की, आफ्रिकेत माहिती संपर्क तंत्रज्ञानावर आधारलेले सेवा उद्योग, पर्यटन आणि वाहतूक अशा नव्याने वाढत असलेल्या  व्यवसाय उद्योगांमध्ये संचरचनात्मक बदलांचं नवं स्वरुप दिसून येतंय. महत्वाचे म्हणजे या उद्योगांच्या वाढीचा दर उत्पादन उद्योगक्षेत्राच्या वाढीच्या दरापेक्षाही जास्त आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर १९९८ ते २०१५ या सेवा उद्योगांची निर्यातीतली वाढ, ही या क्षेत्रातल्या विक्रीयोग्य मालाच्या निर्यातीच्या वाढीपेक्षा सहापट अधिक वेगाने झाली आहे.

याशिवाय दुसऱ्या एका अभ्यासात असे दिसून आलंय की रवांडा, केनिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी माहिती संपर्क तंत्रज्ञानावर आधारलेले बहुआयामी सेवा उद्योगक्षेत्र विकसित केले आहे. रवांडाच्या एकूण महसुली उत्पन्नात पर्यटनामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा हा निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ३० टक्के इतका आहे. एका अर्थाने पर्यटन क्षेत्र हे रवांडाच्या अर्थकारणीय घडामोडींमध्ये सर्वाधिक योगदान देणारे क्षेत्र ठरले आहे. २०१४ मध्ये पर्यटन क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नाने दक्षिण आफ्रिकेच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नात ३ टक्के इतकी भर टाकली होती. त्यावेळी सुमारे ९.५ दशलक्ष पर्यटकांनी देशाला भेट दिली होती. युथोपिया, घाना, सेनेगल आणि केनिया हे देश आता जागतिक फलोत्पादनाच्या मुल्यवर्धीत साखळीत सक्रीयपणे सहभागी होत आहेत.

अलिकडेच झालेल्या एका अभ्यासत असं दिसून आलंय की, व्यापारयोग्य सेवा, कृषी आधारीत उद्योग तसंच इतर उद्योगसमूह आणि उत्पादनक्षेत्रांचे बरेच गुणधर्म एकसारखेच आहेत. उत्पादन क्षेत्राचा जगभरातील विस्ताराचं स्वरुप हे खरे तर काही महत्वाच्या बाबींवर आधारलेले आहे, त्या म्हणजे गुंतवणूकीच्यादृष्टीने असलेले पर्यावरण आणि निर्यातीची क्षमता. आणि अशावेळी संचरचनात्मक बदलांसाठीच्या धोरणात्मक आखणीची शक्यताही वाढते.

पायाभूत सोयी-सविधा, कौशल्य आणि स्पर्धा हे गुंवणुकीसाठीच्या पर्यावरणातले महत्वाचे घटक आहेत. हे लक्षात घेऊन विचार केला तर सध्या तिथल्या सरकारांनी पायाभूत सोयीसुविधांसदर्भातल्या समस्या ततडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याशिाय या सरकारांनी आफ्रिकेमधल्या अनेक उद्योगधंद्यांच्या उत्पादकतेत वाढ व्हावी यासाठीचे सहकार्य करण्याची भूमिका वठवायला हवी. इथल्या सरकारांनी निर्यात वाढीला चालना देणारी धोरणं मोठ्या प्रमाणात राबवायला हवीत, आणि त्याचवेळी या संपूर्ण क्षेत्रात निर्यातवाढीत बाधा ठरणारे अनेक नियम आणि तत्सम बाबी संपुष्टात आणायला हवे आहेत.

आफ्रिकेतील देशांनी जर विशेष आर्थिक क्षेत्राच्या निर्मिती आणि वाढीसाठी गुंतवणूक केली, तर त्यामुळे कृषी मालावरील प्रक्रिया उद्योग सेवा, बागायती तसेच उत्पादनक्षेत्रासारख्या माहिती संपर्क तंत्रज्ञानावर आधारीत सेवा उद्योगांना मोठे पाठबळ मिळू शकेल. याच अनुषंगाने पाहीले तर केनिया रोजगारनिर्मितीसाठी विशेष माहिती संपर्क तंत्रज्ञान क्षेत्राच्या निर्मिती आणि वाढीसाठी केलेला प्रयत्न हे चांगले उदाहरण आहे. मात्र जर का इथल्या तरुणांसाठी चांगल्या अर्थपूर्ण  रोगजगाराच्या संधी निर्माण करायच्या असतील तर, गरज आहे ती इथल्या सरकारांनी माहिती संपर्क तंत्रज्ञानासाठी विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करण्याकरता अधिकाधिक गुंतवणूक करण्याची.

एकूणात आपण असं समजून घेऊ शकतो की, धुरांडे नसलेल्या उद्योगजगतासाठी संपूर्ण आफ्रिकेत सध्या जे वैशिष्ट्यपूर्ण संरचनात्मक परिवर्तन सुरु आहे, त्यातून काही अर्थपूर्ण निष्पत्ती हवी असेल, तर या सगळ्याचा एका व्यापक दृष्टीकोनाने विचार व्हायला हवा. नव्या क्षेत्रांच्या वाढीमुळे, संरचनात्मक परिवर्तनासाठी नवे आणि पुरक मार्गही तयार होत असतात. अशा अनेक नव्या व्यवसाय आणि उद्योगधंद्यांनी आफ्रिकेतल्या तरुणवर्गाला सामावून घेण्याची प्रक्रिया याआधीच सुरु केली आहे. खरे तर यापुढची जबाबदारी अर्थव्यवस्थेचे नियोजन करणाऱ्यांची आहे. निर्णय प्रक्रिया अर्थपूर्ण असावी यासाठीही त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आफ्रिकेतल्या संरचनात्मक परिवर्तनाच्या नव्या पद्धतींची योग्य चिकीत्सा करण्यावर आणि विकसित अर्थव्यवस्थांमधील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.