Author : Anirban Sarma

Published on Aug 07, 2023 Commentaries 0 Hours ago

भारताला आर्थिक विकासाच्या युगात जोमाने प्रवास करायचा असेल तर ५ जी तंत्रज्ञानाच्या बाबतीत सध्याच्या कौशल्यातील तफावत कमी करणे आवश्यक आहे.

5G – नव्या युगाची नवी कौशल्ये

भारताच्या ५ जी स्पेक्ट्रम लिलावाची अंतिम फेरी ऑगस्ट २०२२ च्या पहिल्या आठवड्यात वेगाने पार पडली. त्यानंतर सरकारने विक्रमी वेळेत विजेत्या बोलीदारांना स्पेक्ट्रम असाइनमेंट पत्रे जारी केली आहेत. दूरसंचार सेवा ऑपरेटर आता पहिल्या टप्प्यात १३ शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू करण्यासाठी तयारी करत आहेत, त्यानंतर देशव्यापी रोलआउट सुरू होईल.

५ जी वर शिफ्ट झाल्याने अनेक प्रमुख फायदे मिळण्याची शक्यता आहे. या फायद्यांमध्ये वारंवार चर्चेत असणारी डाउनलोडची सर्वाधिक गती ही सेल्युलर आणि इतर उपकरणांवर आणली जाणार आहे. ५ जी तंत्रज्ञानात तुलनेने कमी आढळणारी लॅटन्सी ही कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), आभासी वास्तविकता, रोबोटिक्स आणि क्लाउड कॉंप्युटिंग यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि सेवांना अधिक चांगला सपोर्ट देईल. तसेच ब्राउझिंगसारख्या कामांमध्येही उत्तम सुविधा देईल. वाढलेल्या बँडविड्थसह, ५ जी डेटाचे अखंड इंटर डिव्हाइस ट्रांसफर सुलभ करेल आणि वाय-फाय वापरून डिव्हाइसेसचा परफॉर्मंस सुधारेल अशी अपेक्षा आहे.

सध्या नोकरभरती आणि अपस्किलिंगला वेग आला आहे; हेड हंटर्सनी २०२२ मध्ये ५ जी फेसिंग हायरिंग मॅन्डेटमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १०० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.

५ जीच्या येण्याने डिजिटल आणि तांत्रिक कौशल्यांच्या नवीन पिढीसाठी मागणीची लाट पसरली आहे. एकट्या २०२२-२३ मध्ये, ५जीची सेवा भारतातील ४० ते ५० दशलक्ष ग्राहकांना आकर्षित करण्याची शक्यता आहे. २०२५ पर्यंत, भारताला ५जी शी संबंधित क्षमता असलेल्या अंदाजे २२ दशलक्ष कुशल कामगारांची आवश्यकता असेल. यामध्ये सुरक्षा आणि नेटवर्क आर्किटेक्चर डिझाइन,  एआय आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम, ओपन रेडिओ ऍक्सेस नेटवर्क डेव्हलपमेंट, आयओटी, बिग डेटा अॅनालिटिक्स, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि सायबर सिक्युरिटी यामधील विशेष कौशल्यांचा समावेश असणार आहे. परिणामी, टेक कॉर्पोरेशन, सल्लागार कंपन्या आणि स्टार्ट-अप्समध्ये टॅलेंट वॉर आधीच सुरू झाले आहे. देशभरात ही भरती मोहीम वेगाने सुरू आहे.

२०२० चा बराच काळ घोंगवणाऱ्या चिंताजनक मंदीच्या पार्श्वभुमीवर पुढील वर्षी पुनर्प्राप्तीची उत्साहवर्धक चिन्हे दिसल्यानंतर व २०२२ मध्ये ५ जी ची सुरुवात झाल्यापासून भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात तेजी दिसून आली आहे. सध्या नोकरभरती आणि अपस्किलिंगला वेग आला आहे; हेड हंटर्सनी २०२२ मध्ये ५ जी फेसिंग हायरिंग मॅन्डेटमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १०० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. ऑनलाइन जॉब पोर्टल्सच्या अलीकडील सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की गेल्या दोन महिन्यांत ‘टेलीकम्यूनिकेशन इंजिनीअर’ सारख्या पदांच्या पोस्टिंगमध्ये १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि सर्वसाधारणपणे ५जी आणि टेलिकॉम नोकऱ्यांसाठी सप्टेंबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ दरम्यान जवळपास ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण ५ जी-केंद्रित कौशल्यांसाठी भारतातील मागणी-पुरवठ्यातील तफावत वाढल्याने चिंता वाढली आहे. टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल (टीएसएससी) नुसार ही तफावत २८ टक्के आहे.

या योजनेची विशेष बाब म्हणजे खाजगी दूरसंचार कंपन्यांना यापैकी किमान १२ लॅब दूरसंचार इनक्यूबेटरमध्ये कव्हर करण्यासाठी सरकारने आमंत्रण दिले आहे. ह्या लॅब्स विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील आणि प्रयोगही करतील.

खरेतर ही कौशल्याची कमतरता प्राधान्याने भरून काढायला हवी. या महिन्याच्या सुरुवातीला, केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्र्यांनी जवळपास १०० ५ जी  लॅब स्थापन करण्याची योजना जाहीर केली. या लॅब्समध्ये ५जी तंत्रज्ञानाच्या वापरावर प्रयोग करता येतील आणि संबंधित प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेची विशेष बाब म्हणजे खाजगी दूरसंचार कंपन्यांना यापैकी किमान १२ लॅब दूरसंचार इनक्यूबेटरमध्ये कव्हर करण्यासाठी सरकारने आमंत्रण दिले आहे. ह्या लॅब्स विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील आणि प्रयोगही करतील. याशिवाय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या प्रमुख तांत्रिक संस्थांमध्ये यापैकी किमान काही प्रयोगशाळा स्थापन केल्यास सरकार, उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यात संवाद वाढवण्यासाठी नवीन शक्यता निर्माण होऊ शकणार आहे. तसेच पुढच्या पिढीतील अभियंत्यांची क्षमता निर्माण करणे; स्टियरिंग उत्पादन यातील नवीन संकल्पना वास्तवात आणणे आणि ५जीच्या सेक्टर-विशिष्ट तैनातीसाठी सँडबॉक्स प्रदान करणे यासारख्या कामातही याचा फायदा होणार आहे.

५ जी कौशल्य कार्यक्रमांच्या यशासाठी खाजगी व्यावसायिकांसोबत धोरणात्मक भागीदारी आणि कोर्स डिझाइन व सामग्रीसह नंतरचा सहभागही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उद्योगाच्या गरजा समजून घेण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारे पावले उचलणे कठीण आहे. उदाहरणार्थ, टीएसएससी सध्या भारताच्या आगामी ५जी तज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकास आणि खाजगी व्यावसायिकांसोबत सहकार्य करत आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे सिस्को, आयबीएम आणि इतरांच्या भागीदारीत ५ जी शी संलग्न तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम चालवते आहे. जसजसा भारतीय ५जीचा प्रवास उलगडत जाईल, तसतसे तो देशाच्या भविष्यकालीन मोठ्या कौशल्य उपक्रमांसाठी अधिकाधिक महत्त्वाचा होत जाणार आहे. उदाहरणार्थ, सध्या ५जी इकोसिस्टमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी १० दशलक्ष भारतीयांना उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षित करण्याचा देश स्टॅक ई-पोर्टलद्वारे कौशल्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

५जी आणि त्याचा पुढील प्रवास व्यवस्थापित करण्यासाठी प्रशिक्षित व्यावसायिकांचे एक केडर तयार करणे गरजेचे आहे, अर्थात त्यामुळे आर्थिक वाढीचे नवीन युग टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.

तांत्रिक क्षमतांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु सॉफ्ट स्किल्स आणि मूलभूत मानवी गुणांकडे देखील लक्ष द्यायला हवे. क्लाऊस श्वाबने द फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे, “ कामगारांना तांत्रिक प्रणाली डिझाइन करणे, तयार करणे आणि काम करणे किंवा या तांत्रिक नवीन कल्पनांमधील रिक्तता भरणे हे कौशल्यांतील मागणीतील वाढीमूळे शक्य होईल. खरेतर, भारतीयांच्या डिजिटल कौशल्यांच्या अभ्यासात अनेकदा अधिक सर्जनशीलता, सामाजिक बुद्धिमत्ता, सांघिक कार्य आणि कामगारांमधील सुधारित संभाषण कौशल्य यांच्या गरजांकडे लक्ष वेधले गेले आहे. (1) २०३० पर्यंत,  ५जी तंत्रज्ञान जागतिक जीडीपीमध्ये १.३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर आणि भारताच्या जीडीपीमध्ये ४२ अब्ज अमेरिकन डॉलर इतके योगदान देईल असा अंदाज आहे. ५जी आणि त्याचा पुढील प्रवास व्यवस्थापित करण्यासाठी प्रशिक्षित व्यावसायिकांचे एक केडर तयार करणे गरजेचे आहे, अर्थात त्यामुळे आर्थिक वाढीचे नवीन युग टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. असे केल्यास सर्वांसाठी उत्पादन, रोजगार आणि काम” सुनिश्चित करण्याच्या २०३०च्या अजेंडाच्या अत्यावश्यकतेमध्ये भारत एक प्रमुख योगदानकर्ता म्हणून उदयास येऊ शकेल आणि तांत्रिक अपग्रेडिंग आणि इनोव्हेशनद्वारे आर्थिक उत्पादकता उच्च पातळी गाठण्याचे लक्ष्यही पार करू शकेल.

____________________________________________________________________

[१] क्लॉस श्वाब, चौथी औद्योगिक क्रांती (लंडन: पोर्टफोलिओ, २०१७)

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.