Author : Aravind Yelery

Published on Nov 30, 2021 Commentaries 0 Hours ago

गेल्या दोन दशकात जागतिक आर्थिक व्यवस्थेतील एकात्मतेविरोधातील वादविवादाच्या केंद्रस्थानी बहुराष्ट्रीय कंपन्या असणे वाढले आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जागतिक आव्हाने

बहुराष्ट्रीय कंपन्या या जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रमुख खेळाडू आहेत आणि त्यातील काही ‘सुपरस्टार कंपन्या’ म्हणूनही उदयास आल्या आहेत. हे खेळाडू परिसंस्थेला आकार देतात, ज्यामध्ये इतर त्यांचे जगणे शोधतात. जागतिक आर्थिक घडामोडींचे स्वरूप, व्यापार युद्धे आणि तीव्र स्पर्धेने जागतिकीकरणाला जिवंत करीत आणि त्याला नवा आकार देत वस्तू, सेवा आणि भांडवलाच्या प्रवाहावर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नियंत्रण पुन्हा निर्माण केले. अत्यावश्यक वस्तूंपासून बाह्य-अंतरिक्ष उपक्रमांसाठीच्या सेवांपर्यंत, बहुराष्ट्रीय कंपन्या पुरवठा साखळींची मालकी अथवा नियमन करतात आणि जगातील बहुतांश बौद्धिक संपत्तीच्या मालकीचा दावा करतात.

गेल्या दोन दशकांमध्ये, जागतिक व्यापारात येणाऱ्या व्यत्ययांच्या आवर्तनांमुळे आर्थिक एकात्मता, सीमापल्याड होणारी लोकांची ये-जा आणि ज्ञानाच्या आदानप्रदानाच्या सोनेरी आठवणी धोक्यात आल्या आहेत. जागतिक आर्थिक एकात्मतेच्या गुणवत्तेसंदर्भातील वादविवादाच्या केंद्रस्थानी बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत.

गतिमानतेने पुनर्बदल झालेल्या जागतिक आर्थिक घडामोडींमध्ये, बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांची आउटसोर्सिंगची कृती, बाजारपेठा किंवा जगभरातील उत्पादन आणि पुरवठा सूक्ष्म-व्यवस्थापनापर्यंत मर्यादित ठेवत नाहीत. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्तनात विविध दिशा बदल झाले आणि त्यामुळे त्यांनी उदारमतवादी जागतिकीकृत व्यापार पद्धतींचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक राहिले नाही.

बहुराष्ट्रीय कंपन्या जागतिक व्यापार धोरणाला महत्त्व देतात आणि त्यावर प्रभाव टाकतात यात शंका नाही, परंतु बहुराष्ट्रीय कंपनी त्यांचा व्यवसाय चालवताना विकसित होत असलेल्या भेदांचे विश्लेषण आणि वर्णन करण्याची गरज आहे.

हे स्पष्ट आहे की, बहुराष्ट्रीय कंपन्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र आहेत. भूतकाळात, अधिक स्थिर व्यापार प्रणालीने बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हित साधले होते, परंतु वाढत्या जागतिक अस्थिरतेने बहुराष्ट्रीय कंपन्यांना निश्चित धडे शिकवले. जागतिक आर्थिक अडचणींचा कालावधी, व्यापार युद्ध आणि साथीच्या रोगाला तोंड देत, बहुराष्ट्रीय कंपन्या जागतिक व्यापार व्यवस्थेच्या प्रमुख खेळाडूंवर त्यांचे नियंत्रण राखू शकतात परंतु त्याची किंमत कमी नफा आणि वाईट कामगिरी ही असते. भू-आर्थिकदृष्ट्या प्रेरित स्पर्धांमागे बहुराष्ट्रीय कंपन्यांची माघार हे कारण आहे. उदाहरणार्थ, ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कमाईतील घट हे इंग्लंडच्या देयकांचा समतोल बिघडण्यामागचे कारण आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्या वाढत्या अनिश्चिततेशी जुळवून घेऊन आंतरराष्ट्रीय व्यापार स्थितीच्या केंद्रस्थानी राहण्यासाठी धडपडत आहेत. आर्थिक संकटापासून सुरुवात करून आणि व्यापार युद्धामुळे त्रस्त झालेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या दुसऱ्यावर अधिक परिणाम करण्याचे नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्या धोरणांची पुनर्रचना करत आहेत. चिंताजनक गोष्ट अशी आहे की, बहुराष्ट्रीय कंपन्या संकुचित भांडवलशाही आणू शकतात आणि जिथे स्पर्धा कमी होते आणि किमती वाढतात अशा अशांततेत अडकू शकतात.

या कंपन्या आता अति वृद्धी योजनांचा पाठपुरावा करत नाहीत परंतु लहान आणि अनुकूल पुरवठा साखळीची पुनर्रचना करण्यावर अवलंबून आहेत. अशा पुनर्रचनांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे. व्यापाराचे जाळे आणि तत्संबंधित पुरवठा साखळी मर्यादेपलीकडे जबरदस्तीने वाढविण्याची धोरणे आता लहान आणि अरुंद होऊ लागल्याचे दिसत असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांना जागतिक व्यापारावर कठोर नियंत्रण ठेवण्याचे कारण देऊ केले आहे.

उत्पादन आणि पुरवठा साखळीच्या मर्यादेपलीकडे जबरदस्तीने वाढविण्यासंबंधातील वाढते प्रश्न हे सूचित करतात की, बहुराष्ट्रीय कंपन्या निर्धारित निकषांवर आधारित व्यवसाय निवडण्याचा सराव आणि कंपनीच्या घडामोडींच्या विशेष अटींची आवश्यकता कशी वेगळी करतात. हे बहुराष्ट्रीय कंपन्यांना काही सरकारांचे प्रतिबंधात्मक सौदे आणि उपायांना अधिक नीटपणे सामोरे जाण्यास मदत करते. दुसरीकडे, आणि आजच्या संदर्भात, काही अर्थव्यवस्थांनी गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या भावना आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणे सुरू ठेवले आहे.

अमेरिकेसारख्या विकसित अर्थव्यवस्थांनी किंवा चीनसारख्या उदयोन्मुख आशियाई अर्थव्यवस्थांनी जागतिक स्तरावर स्वीकृत विवाद-निपटारा यंत्रणेला अयोग्य आणि कुचकामी ठरविण्याचा प्रयत्न केला आहे आणि व्यापार भागीदारांविरुद्ध आयात शुल्क आकारण्याचे समर्थन केले आहे तसेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी व्यापार निर्बंध लादले आहेत. याचा बहुराष्ट्रीय कंपन्यांसह आंतरराष्ट्रीय कंपन्यांकरता उरलेल्या निवडींवर मोठा प्रभाव पडला आहे.

आर्थिक संघर्षाच्या वाढत्या प्रकरणांतून आधीच कमकुवत झालेल्या बहुपक्षीय व्यवस्थेसाठी आव्हाने दिसून येतात. भू-राजकीयदृष्ट्या उद्भवलेल्या व्यापार युद्धांमुळे जागतिक कंपन्यांना त्यांच्या संभाव्यतेबद्दल सावधगिरी बाळगण्यास भाग पाडले जात आहे, त्यांना खोडून काढण्याच्या योजना राहू द्या, परंतु काही देश आणि निहित हितसंबंध असलेल्या कंपन्यांच्या वाढत्या एकतर्फी व्यापार कृतीमुळे सहयोगी देशांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

यामुळे कंपन्यांमधील उदारमतवादी आणि मुक्त व्यापार संबंधांवर परिणाम झाला आहे. परिस्थिती अधिक बिघडवण्यासाठी, व्यापारातील अडथळे वाढत आहेत. हे स्पष्ट होते की, बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील नियंत्रणाचे बंधन केवळ व्यापार आणि सुरक्षितता आणि गोपनीयतेशी संबंधित संवेदनशीलतेपुरते मर्यादित नव्हते तर साथीच्या काळात, अनेक देशांनी वैद्यकीय पुरवठ्याची निर्यात प्रतिबंधित केली होती.

बहुराष्ट्रीय कंपन्या कोठूनही आउटसोर्स आणि कामकाज करू शकत नाहीत. अनेक सरकारे जागतिक व्यापार संघटनेमध्ये इतर देशांविरुद्ध तक्रारी करत असताना, यातील बहुतांश तक्रारी जागतिक कंपन्यांच्या विरोधात आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांचे भागीदार निवडण्यात आणि या समस्या सोडवण्याचे मार्ग चोखाळण्याविषयी अधिक जागरूक होत आहेत. निवडक आणि आकारहीन व्यापार विस्तारामध्ये फरक करण्याचे प्रयत्न, हे जागतिक कंपन्यांचे प्राधान्यक्रम बनले आहेत.

विशिष्ट देशावरील जोखमीची संकल्पना ही लष्करी शत्रुत्वाच्या संकुचित चिंतेतून आणि विशिष्ट देशाच्या तांत्रिक नेतृत्वाचा समावेश करण्यासाठी बुद्धिमत्ता गोळा करण्यापासून व्यापक झाली आहे. तंत्रज्ञान आणि सेवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना उज्ज्वल भविष्याचे आश्वासन देत असताना, यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांवर त्यांच्या पुरवठा साखळ्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आधुनिकीकरणासाठी प्रगत नवकल्पना आणि ग्राहकांच्या पसंती विकसित करण्याचा प्रचंड दबाव येतो.

जागतिकीकरणामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भूमिकेला आव्हान दिले जात असताना, सेवांमधील डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञानयुक्त व्यापार या कंपन्यांना अन्नसाखळीच्या वरच्या स्थानी ठेवेल. जरी आंतरराष्ट्रीयीकरणाने, आंतरराष्ट्रीय आर्थिक अवकाशात गुणात्मक बदल घडवून आणला, तरीही राष्ट्र-राज्ये वर्चस्व राखण्यासाठी अधिक बळकट झाली आणि जागतिकीकरणाचा प्रयत्न करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या जेव्हा राष्ट्रीय किंवा प्रादेशिक स्तरावर काम करतात तेव्हा त्या सर्वोत्तम कार्य करतात असे दिसते.

काही वर्षांपूर्वी, तो सामान्यतः स्वीकारल्या जाणार्‍या विश्वासांशी असहमत असलेला विचार होता. जागतिक स्तरावर व्यवसायांना मदत करण्यासाठी रचलेल्या नियमांचा पोत बदलत आहे आणि बहुराष्ट्रीय कंपन्या जशा प्रकारे मात करतील आणि त्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करतील, त्याचा जागतिक वाणिज्य आणि संबंधित धोरणांवर खोलवर परिणाम होईल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Aravind Yelery

Aravind Yelery

Aravind Yelery is a Senior Research Fellow at the Peking University Beijing: Visiting Faculty at Fudan University Shanghai and Indian Institute of Management Shillong. At ...

Read More +