Author : Uday Nagaraju

Published on Oct 27, 2021 Commentaries 0 Hours ago

उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये लोकांना सामाजिक-आर्थिक संधी मिळण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या इंटरनेटची गरज आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे.

डिजिटल समावेशकतेचे पुढले पाऊल

जग अजूनही महामारीचा धक्का सहन करत असताना, डिजिटल व्यासपीठे ही आशेचा किरण ठरत आहेत. मात्र, तंत्रज्ञान आपल्या आयुष्यामध्ये विनासायास सामावले जाऊ शकते हे तंत्रज्ञानातील अनेक प्रगतींनी सिद्ध केले असतानाच, सर्वांपर्यंत अर्थपूर्ण आणि समावेशक डिजिटल तंत्रज्ञान नेण्यामध्ये आपण मागे पडलो आहोत.

११ जून २०२० रोजी, संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरली अंतानियो गुटेरेस यांनी आंतरराष्ट्रीय समुदायासाठी शिफारस केलेल्या कृतीचा संच सादर केला, त्यामध्ये डिजिटल क्षमता मजबूत करून सर्वांसाठी वैश्विक डिजिटल समावेशकता साध्य करण्याची आणि ऑनलाईन जगतामध्ये मानवी हक्क सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी २०३० पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, यामुळे सर्वांना वांशिकता, राष्ट्रीयत्व, लिंग आणि दिव्यांगत्व यांचा विचार न करता निरोगी डिजिटल अवकाश मिळेल याची खात्री करण्यासाठी संबंधितांना नऊ वर्षे मिळणार आहेत.

डिजिटल क्षेत्रातील समावेशकतेचे पुढले पाऊल असेलल्या ‘समावेश 2.0’ चे काम सुरू आहे. त्यामुळे आता उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये लोकांना सामाजिक-आर्थिक संधी मिळण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या इंटरनेटची गरज आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. प्रवेश, परवडू शकेल अशी क्षमता आणि कार्यक्षमता असे महत्त्वाचे प्रश्न आपण सोडवले तर पुढील एक अब्ज इंटरनेट वापरकर्ते ऑनलाईन जातील तेव्हा त्यांना काय दिसेल? त्यांना कशामध्ये रस असेल? त्यांचे आयुष्य कशामुळे सुधारेल? इंटरनेट तसे करेल याची खात्री पटण्यासाठी ते इंटरनेटला आकार देऊ शकतील का?

समावेशक तंत्रज्ञानासमोरील अडथळे

‘समावेशक तंत्रज्ञान’ आपल्या वापरकर्त्यांना लाभ मिळवून देते, आणि डिजिटल अवकाशात त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार त्यांचा अनुभव सानुकूलित केलेला असतो.

शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांचा लाभ घेण्यासाठी कनेक्टिव्हिटी ही पूर्वअट असते – बहुसंख्य वेळा ती मोबाईल तंत्रज्ञानावर अवलंबून असते. डिजिटल जगतातून प्रभावीपणे प्रवास करण्यासाठी प्रतिभावन मुले आणि तरुणांना प्रशिक्षण देणाऱ्या ऑनलाईन शाळा प्रस्थापित करणे आणि त्याच वेळेला वेगवर्धक म्हणून काम करणए आणि सर्व सामाजिक-आर्थिक थरांमधील इच्छुक उद्योजकांना डिजिटल सेवा पुरवणे अतिशय महत्त्वाचे असते.

सर्वसमावेशक चष्मा म्हणजे सर्वांसाठी एकाच प्रकारच्या कृती असा अर्थ होत नाही हे तथ्य म्हणजे सर्वांचा समावेश करण्यासमोरील आणखी एक महत्त्वाचे आव्हान आहे. जिथे याची सर्वाधिक गरज आहे तिथे हे विशेषतः अवघड असते – विकसित देशांमध्ये, कारण ते मर्यादित साधनसामग्रीच्या मदतीने विकासाच्या अनेक ध्येयांशी झगडत असतात. ज्यांना लक्ष्यित आधाराची सर्वाधिक गरज आहे वंचित गट किंवा भागधारक ओळखणे तितकेच महत्त्वाचे आहे.

ऑनलाईन द्वेष स्वयंचलितपणे शोधू शकणारी, कृत्रिम बुद्धिमत्तेने सक्षम केलेल्या सामग्रीवरील नियंत्रणाची साधने लोकप्रिय होत आहेत. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सामग्री नियंत्रण साधने राखण्यामध्ये वापरकर्त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार अनुरूप आणि सानुकूलित ठेवण्यात लूपममध्ये मानवासह वेळोवेळी देखरेख, तक्रार आणि निवारण यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते, जेणेकरून ते भाषणाचे अतिनियमन करू शकणार नाहीत

ऑनलाईन प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल या धास्तीमुळेही अनेकजण व्यक्त होणे टाळतात. फ्लॅग करण्यासारखे काही उपाय निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले आहे आणि ते मोजणेही सोपे नाही. त्यामध्ये मानवी भाष्यकार व्यक्तिकेंद्रित मतमतांतरे व्यक्त करत असल्यामुळे अन्याय होण्याचीही भीती असते. त्यामुळे, ऑनलाईन द्वेष स्वयंचलितपणे शोधू शकणारी, कृत्रिम बुद्धिमत्तेने सक्षम केलेल्या सामग्रीवरील नियंत्रणाची साधने लोकप्रिय होत आहेत.

मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सामग्री नियंत्रण साधने राखण्यामध्ये वापरकर्त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार अनुरूप आणि सानुकूलित ठेवण्यात लूपममध्ये मानवासह वेळोवेळी देखरेख, तक्रार आणि निवारण यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते, जेणेकरून ते भाषणाचे अतिनियमन करू शकणार नाहीत. तसेच द्वेषपूर्ण मजकुराच्या सार्वत्रिक वर्गीकरणाचाही अभाव आहे, त्यामुळे वेगवेगळ्या सोशल मीडिया व्यासपीठांवरून डेटा वापरणाऱ्या प्रारुपांच्या चाचणीचाही अभाव आहे.

या कमतरतेमुळे प्रारूप विकासाचे कौशल्य नसलेल्या पण अन्वयार्थक ऑनलाईन द्वेष संशोधनामध्ये (ओएचआर) रस असलेल्या संशोधकांच्या “प्रवेशामध्ये अडथळे” निर्माण होतात. त्याबरोबरच विशिष्ट व्यक्तींनी प्रसिद्ध केलेल्या कन्टेंटवर त्यांना न कळवता सोशल मीडिया साईटकडून बंदी घालण्यासाठी डिजिटल व्यासपीठ तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो यासाठी प्लॅटफॉर्म आणि प्रदेशांमध्ये समान दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी टिकटॉकला कृष्णवर्णीय निर्मात्यांकडून टीका सहन करायला लागली, ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळीवरील आपला कन्टेंट काढून टाकला, म्यूट केला किंवा फॉलोअर्सपासून लपवला असे त्यांचा आरोप होता.

या प्रसंगापूर्वी टिकटॉकने शारिरीकदृष्ट्या दिव्यांग, स्थूल, आणि एलजीबीटीक्यू वापरकर्ते “सायबर गुंडगिरीसाठी असुरक्षित” असल्याचे मानून त्यांच्या पोस्ट दाबल्याची कबुली दिली होती. अशा घटना विचारात घेता, ते कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीसाठी महत्त्वाचे असते, जी समावेशाची पुनर्व्याख्या करण्यासाठी वापरकर्त्यांसाठी विशिष्ट गट आणि समुदायाविरोधातील पूर्वाग्रह सक्रियपणे दूर करण्यासाठी नेव्हिगेटर म्हणून काम करते.

समावेशासाठी मजबूत रचना तयार करणे

कल्पकतेचे लाभ अधिक समानतेने सामायिक करणे आवश्यक आहे, तसेच करताना ज्यांच्या गरजा कल्पकतेने पूर्ण केल्या जातात आणि कल्पकता, प्राधान्य ठरवणे, आणि कल्पकतेच्या शासनामध्ये व्यापक सहभागाचा प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करत वगळलेल्या सामाजिक गटांना अधिक चांगली सेवा कशी देता येईल ते विचारात घेतले जाते. तीन महत्त्वाचे गंभीर घटक आहेत ज्यांच्याभोवती सर्वसमावेशक डिजिटल साधनांसाठी एक मजबूत चौकट तयार केली पाहिजे.

ऐकणे आणि शिकणे: समुदाय, लिंग, आणि वांशिक रेषांवर आधारित वापरकर्त्यांसाठी सक्रियपणे वेदनांच्या मुद्द्यांचे निरीक्षण करणे आणि साधनावर प्रस्तावांचा समावेश करणे. जे वापरकर्त्याला तक्रार नोंदवण्यासाठी पूर्वअटीच्या पायऱ्यांची माहिती देणाऱ्या, सहज पालन करण्यासारख्या मार्गदर्शक सूचना आणि भाषिक दिशानिर्देश आणि वर्गीकरण यांचा समावेश या गोष्टी ऑनलाईन द्वेषपूर्ण कन्टेंटची समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

डिजिटल प्लॅटफॉर्मच्या विकासकांनी नियमाक सँडबॉक्सा वापर करावा, ज्यामुळे व्यवसायांना नियंत्रित वातावरणामध्ये वास्तविक ग्राहकांसह नाविन्यपूर्ण प्रस्तावांची चाचणी घेणे शक्य होते. विशिष्ट घटकांना अलग पाडणारे घटक नष्ट करणे किंवा कमी करणे हे येथील मुख्य ध्येय असेल.

सहयोगी तयार करणे: हे विविध मतमतांतरे आणि विश्वासनिर्मितीसह प्रभावी सहयोग निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्य करते. ‘मित्रत्व किंवा सहयोग’ ही संज्ञा उपेक्षित व्यक्ती आणि/किंवा लोकांच्या गटांशी विश्वास, सातत्य आणि दायित्व यावर आधारित नातेसंबंध निर्माण करण्याची आजीवन प्रक्रिया दर्शवते. प्राथमिक स्तरावर मित्रत्व निर्माण करण्याचा एक मार्ग म्हणजे डिजिटल साधनाच्या डिझाईन, विकास आणि व्यवस्थापन टप्प्यात विविध वांशिकता, समुदाय आणि लिंगाच्या लोकांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याचे सुनिश्चित करणे हा असेल.

२०१८ मध्ये मायक्रोसॉफ्टने एक्सबॉक्स अॅडॅप्टिव्ह कंट्रोलर (एक्सएसी) तयार केला, ज्यामुळे अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या, फारसे प्रतिनिधित्व न मिळणाऱ्या गटांना-अपंगाना गेमिंगचे जग खुले झाले. रोरी स्टील, यांच्या दोन मुलांना आनुवंशिक स्पास्टिक पॅराप्लेजियाचा त्रास होता, त्यांनी एक्सएसी आणि निन्टेन्डो स्विच एकत्र करून आर्केड-सारखे कंट्रोलर तयार केले. या उदाहरणामध्ये मायक्रोसॉफ्टने केवळ समावेशक उत्पादनच सुरू केले नाही तर स्टीलबरोबर मित्रत्वाच्या संबंधांचेही प्रदर्शन केले, कारण मायक्रोसॉफ्टला त्यांच्याबरोबर काम करून बदल केलेल्या एक्सएसी कंट्रोलरची आणखी सुधारित आवृत्ती काढायची होती.

संदर्भासह सहभाग घेणे: जर वापरकर्त्यांनी साधनाचा हेतू असलेले परिवर्तन मान्यच केले नाहीत किंवा त्यांना ते पूर्ण समजले नाहीत तर यश मिळणार नाही. अधिक मजबूत डिजिटल सक्षमता वाढवण्यासाठी लोक कोणकोणत्या मार्गाने जातात हे समजून घेणे आणि त्यांची संवाद साधण्याची पद्धत बदलण्यासाठी त्यांना कोणती गोष्ट प्रोत्साहित करेल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अल्पसंख्याकांना सक्षम करणाऱ्या आणि त्यांना सर्व संपर्क बिंदूंमध्ये मौल्यवान वापरकर्ता अनुभव देणाऱ्या मानव-केंद्रित डिझाईन दृष्टीकोनासाठी अंतरंग समजून घेण्यासाठी एथनोग्राफिक पद्धतींचा वापर करता येईल.

उदाहरणार्थ, भाषिक अडथळे मान्य करणे आणि ते दूर करण्यासाठी मार्ग स्वीकारणे महत्त्वाचे असते. या वर्षाच्या सुरुवातीला अॅपलने सिरीच्या इंग्रजी ऑफरिंगमध्ये दोन नवीन आवाजांचा समावेश केला आणि त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या सर्वात नवीन बीटा व्हर्जनमध्ये डिफॉल्ट “स्त्री आवाजाची” निवड काढून टाकली. याचा अर्थ असा की सिरी सेट अप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी आवाज निवडता येईल. आता यापुढे व्हॉइस असिस्टंट स्त्री असणे डिफॉल्ट असणार नाही, गेल्या काही वर्षांमध्ये व्हॉइस इंटरफेसमध्ये पूर्वग्रह असण्याबद्दल काहीशी चर्चा होत होती.

सिरीच्या संभाषण ओळखणाऱ्या प्रणालीला श्वेतवर्णीय समुदायातील व्यक्तींचा आवाज ओळखण्याच्या तुलनेत कृष्णवर्णीय समुदायातील व्यक्तींचा आवाज ओळखण्यात अधिक समस्या येत असल्याचे स्टँडफोर्डच्या अभ्यासात आढळून आल्यानंतर त्यावरून यावरून वाद निर्माण होऊन ‘कृष्णवर्णीय सिरी आवाजाचा’ समावेश झाला.

समावेश 2.0 पर्यंत पोहोचणारे धागे वापरकर्त्यांचा अभिप्राय सातत्याने एकत्रित करत असतानाच दडपशाहीचा इतिहास, स्त्रीवादी दृष्टीकोन आणि वांशिक दृष्टीकोन याविषयी एकत्र समज येईल तेव्हाच ते साध्य करता येईल.

(हा लेख लिहिताना लेखकाला एआय पॉलिसी लॅब्जच्या संपादक स्वाती सुधाकरन यांनी मदत केली.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.