-
CENTRES
Progammes & Centres
Location
भारतास आपल्या सेमिकंडक्टर उद्योगाचा विस्तार करून जागतिक स्पर्धात्मकता साध्य करण्यासाठी अनुप्रयुक्त संशोधन आणि उत्पादन कार्यक्षमता हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Image Source: Getty Images
भारत आपले इंडिया सेमिकंडक्टर मिशन (ISM) - 2.0 सुरू करण्याच्या तयारीत आहे, ज्याचा उद्देश 2030 पर्यंत जागतिक सेमिकंडक्टर उत्पादनात 5 टक्के योगदान देण्याचा आहे. प्रारंभी परिपक्व तंत्रज्ञानांपासून सुरुवात केल्यानंतर, या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात मूल्यसाखळीत वरच्या स्तरावर जाण्यावर भर दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ‘मेक इन इंडिया’ चिप्सना मार्केटप्रमाणे तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच उद्योगक्षेत्राने निधी दुप्पट करून 20 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या मागणीवर ही विचार केला जाणार आहे. तसेच डिझाइन-आधारित इनोव्हेशन, प्रगत उत्पादनासाठी मनुष्यबळ विकास, आणि मटेरियल व गॅसेस साठी स्थानिक पुरवठा साखळीचे सशक्तीकरण यांनाही प्राधान्य दिले जाईल.
सेमिकॉन इंडिया 2025, हा देशाचा प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीय उपक्रम, ISM, सेमी, आणि विविध उद्योग संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी डिझाइन आणि उत्पादनातील स्थानिक क्षमतांचा विकास, सेवा क्षमता, आणि कौशल्यविकास यासाठी 12 सामंजस्य करार (MoUs) स्वाक्षरीत करण्यात आले. या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश स्वच्छ ऊर्जा (क्लीन एनर्जी), क्वांटम तंत्रज्ञान आणि अग्रगण्य क्षेत्रांतील अनुप्रयोगांना चालना देणे हा आहे, ज्यासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या ‘डीप टेक अलायन्स’ची स्थापना करण्यात आली आहे. हा अमेरिकन आणि भारतीय व्हेंचर कॅपिटल तसेच प्रायव्हेट इक्विटी कंपन्यांचा समूह आहे, जो देशातील डीप टेक परिसंस्था उभारणे आणि विस्तार करणे, विशेषतः सेमिकंडक्टर क्षेत्रावर प्रारंभिक लक्ष केंद्रित करणे या उद्देशाने कार्यरत आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘मेक इन इंडिया’ चिप्ससाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारपेठांचे महत्त्व अधोरेखित केले असून, या चिप्स जागतिक मानकांच्या तुलनेत 15–30 टक्के अधिक किफायतशीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोठ्या प्रमाणावर उत्पादनाकडे वाटचाल ही सेमिकंडक्टर उद्योगाच्या इतिहासातील सर्वात सुरुवातीच्या नवकल्पनांपैकी एक होती, ज्यामुळे पुढील स्तरावर नवोन्मेषांना चालना मिळाली.
सध्या भारतात मूल्यसाखळीच्या विविध टप्प्यांवर 10 मान्यताप्राप्त सेमिकंडक्टर प्रकल्प आहेत, तसेच कौशल्यविकास, डिझाइन आणि प्रतिभा म्हणजेच टॅलेंट विकासासाठीही अनेक उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांनी अप्लाइड रिसर्चवर लक्ष केंद्रित केल्यास मोठी गती मिळू शकते. अलीकडच्या काही वर्षांत फॅबलेस (फॅबलेस कंपन्या म्हणजे त्या कंपन्या ज्या सेमीकंडक्टर डिझाइन करतात आणि विकतात, पण पण त्यांचे प्रत्यक्ष उत्पादन करण्याचे काम थर्ड-पार्टीला आउटसोर्स करतात.) कंपन्यांचा बाजारातील हिस्सा वाढत आहे, कारण त्या उत्पादनातील नवकल्पनांवर (इनोव्हेशन) लक्ष केंद्रित करत आहेत, तर त्यांच्या उत्पादन भागीदारांनी प्रक्रिया नवकल्पनांवर लक्ष केंद्रित केले आहे. हा भांडवल-प्रधान उद्योग असून उत्पादन प्रक्रिया गुंतागुंतीची आणि जागतिक पुरवठा साखळ्या विस्तृत असल्यामुळे, स्पर्धात्मक आघाडी मिळवण्यासाठी उत्पादन कार्यक्षमतेइतकीच मूलभूत संशोधन आणि मूल्यसाखळीत गुंतवणूकही महत्त्वाची ठरते.
मोठ्या प्रमाणावर उत्पादनाकडे वाटचाल ही सेमिकंडक्टर उद्योगाच्या इतिहासातील सर्वात सुरुवातीच्या नवकल्पनांपैकी एक होती, ज्यामुळे पुढील स्तरावर नवोन्मेषांना चालना मिळाली. उत्पादन अभियंत्यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची पण अनेकदा दुर्लक्षित भूमिका बजावली आहे. त्यांनी उत्पादनाचे प्रमाण वाढवणे, स्टँडर्डाइझ करणे आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य करणे यात मोलाची कामगिरी बजावली. मॉरिस चँग, ज्यांनी 1990 च्या दशकात तैवानच्या सेमिकंडक्टर क्रांतीचे नेतृत्व केले, त्यांनी टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स मध्ये कार्यरत असताना उत्पादन प्रक्रियेची कार्यक्षमता आणि उत्पन्न (yield) म्हणजेच उत्पादन प्रक्रियेतून तयार होणाऱ्या कार्यक्षम चिप्सचा हिस्सा सुधारून सेमिकंडक्टर उत्पादनात आमूलाग्र बदल घडवला. अशा क्रमिक नवकल्पनांनी (इन्क्रिमेंटल इनोव्हेशन) नंतर शैक्षणिक संशोधनातील मूलभूत शोधांचे रूपांतर जगभर पसरलेल्या उद्योगात केले, जो रॉकेटपासून रेडिओपर्यंत सर्वकाही चालवतो.
सेमिकंडक्टर उद्योगात मूलभूत किंवा प्राथमिक संशोधन हे प्रामुख्याने काही प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपन्यांपुरते मर्यादित असते, ज्यामुळे अमेरिकेने मूल्यसाखळीच्या उच्च टप्प्यांवर नियंत्रण मिळवले आहे. प्राथमिक नवकल्पनांपलीकडे, इतर नवकल्पनांना मोठ्या प्रमाणावर उत्पादनाच्या आव्हानांचा विचार करावा लागतो. जसे की उत्पादन तंत्रे आणि कार्यक्षमता सुधारणा. सेमिकंडक्टर उद्योगाची काही मूलभूत पायाभरणी ही कार्यक्षम उत्पादन प्रक्रियेवर आधारित आहे, ज्यामुळे उत्पादनादरम्यान होणाऱ्या अकार्यक्षम चिप्सची संख्या कमी करून उत्पन्न दर वाढवता येतो.
ज्या प्रकारे फार्मा उद्योगात मूलभूत आणि अप्लाइड रिसर्च एकत्र चालते, त्याच्या विरोधात सेमिकंडक्टर उद्योग पूर्णपणे अप्लाइड रिसर्चवर अवलंबून असतो, विशेषतः बाजारातील स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने.
ज्या प्रकारे फार्मा उद्योगात मूलभूत आणि अप्लाइड रिसर्च एकत्र चालते, त्याच्या विरोधात सेमिकंडक्टर उद्योग पूर्णपणे अप्लाइड रिसर्चवर अवलंबून असतो, विशेषतः बाजारातील स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने. सेमिकंडक्टर उद्योगाच्या संदर्भात, मूलभूत संशोधन नेहमीच मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी नवकल्पना निर्माण करत नाही, कारण सेमिकंडक्टरचे उत्पादन अत्यंत गुंतागुंतीचे आहे, ज्यासाठी स्पर्धात्मक चिप तयार करण्यासाठी संपूर्ण परिसंस्था ऑप्टिमाइझ करणे आवश्यक असते.
तैवानमध्ये, सार्वजनिक निधीत चालणाऱ्या इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट (ITRI) ने केंद्रीकृत अप्लाइड रिसर्च आणि इनोव्हेशन सपोर्ट पुरवला ज्यामुळे देशातील सेमिकंडक्टर परिसंस्था उभारण्यात मोलाची मदत झाली. TSMC, जगातील आघाडीची चिप उत्पादन कंपनी, ही ITRI ची स्पिन-ऑफ आहे. ITRI अजूनही उद्योगातील नवकल्पनांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, कारण ते प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि ज्ञान नवीन उद्योगांमध्ये हस्तांतरित करत असते. अप्लाइड नवकल्पनांमध्ये सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे, तैवानला उत्पादन खर्च सतत कमी करण्याची आणि उद्योगातील आपले नेतृत्व टिकवण्याची संधी मिळाली आहे, दोन्ही खर्च आणि उत्पादन क्षमतेच्या दृष्टीने.
जपानमधील सेमिकंडक्टर उद्योगाचा मार्ग तैवानच्या मार्गापेक्षा भिन्न असला तरी, प्रारंभीची प्रगती देखील अप्लाइड रिसर्चामुळेच शक्य झाली. जपानच्या सेमिकंडक्टर उद्योगाच्या प्रारंभिक वर्षांमध्ये, म्हणजेच 1970 आणि 1980 च्या दशकात, सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूक जोरात वाढली आणि संशोधन व विकासासाठी मोठ्या निधीचे वाटप झाले. निधी खाजगी कंपन्यांच्या संघटनेमार्फत संयुक्त सार्वजनिक-खाजगी R&D (रिसर्च आणि डेव्हलपमेंट) मध्ये गुंतवला गेला, ज्यात Fujitsu, Hitachi, NEC, Mitsubishi Electric, NTT, आणि Toshiba यांसारख्या खाजगी खेळाडूंनी संयुक्त संशोधन केंद्र व्यवस्थापित केले. विद्यापीठांपेक्षा अप्लाइड रिसर्च हे या उद्योगाचे मुख्य आधारस्थान राहिले आहे. उदाहरणार्थ, दक्षिण कोरियातील सॅमसंगने विद्यापीठांतील संशोधनाऐवजी त्यांच्या पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यापीठ कार्यक्रमांना निधी दिला.
ह्या अर्थव्यवस्था केवळ महत्त्वाच्या तंत्रज्ञानांच्या औद्योगिक उत्पादनामुळेच नाही, तर त्या तंत्रज्ञानांच्या मागील शिकवण, संशोधन आणि नवकल्पना आत्मसात करण्यानुसारही वाढल्या आहेत. भारत आपल्या सेमिकंडक्टर प्रवासाला सुरुवात करत असताना, या देशांच्या औद्योगिक इतिहासातून अप्लाइड रिसर्च आणि विकासाची भूमिका शिकणे महत्त्वाचे आहे, जे सेमिकंडक्टरच्या आकांक्षा वाढविण्यात मदत करतात. अप्लाइड रिसर्च ही स्पर्धात्मकतेची महत्त्वाची कडी आहे, जी भारताने पुढे जाऊन अंगीकारली पाहिजे.
अप्लाइड रिसर्च ही स्पर्धात्मकतेची महत्त्वाची कडी आहे, जी भारताने पुढे जाऊन अंगीकारली पाहिजे.
भारतीय सरकारने न्यू एज मेकर्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NAMTECH) सोबत प्रतिभाविकास आणि अप्लाइड रिसर्च यासाठी एक सामंजस्य करार (MoU) केला आहे. मात्र, वर नमूद केलेल्या धड्यांनुसार, उत्साही आणि गतिशील संस्थाना अप्लाइड रिसर्चासाठी सल्लागार आणि इनक्युबेटर म्हणून नेमणे फायदेशीर ठरते, ज्यातून संशोधन उद्योगाला हस्तांतरित करता येईल आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेता येईल. जपानच्या सेमिकंडक्टर उद्योगाच्या घटण्यामागील एक कारण म्हणजे तैवान आणि दक्षिण कोरियाच्या आक्रमक वाढीसोबत त्याचे सुसंगत न होणे आणि उद्योगातील बदलांशी जुळवून घेण्यात आलेले अपयश.
एका स्वतंत्र कंपनीची मूलभूत संशोधन आत्मसात करून ते उत्पादनात आणण्याची क्षमता त्याच्या स्वतंत्र संशोधन, विकास आणि वैज्ञानिक क्षमतेवर अवलंबून असते. जेव्हा कंपन्या ही अंतर्गत क्षमता विकसित करतील, तेव्हा अप्लाइड R&D (अप्लाइड रिसर्च आणि विकास) यासाठी दिलेले केंद्रीकृत समर्थन देशाच्या सेमिकंडक्टर परिसंस्थेला स्पर्धात्मक फायदा करून देईल, कारण हे उपक्रम ISM अंतर्गत आधीच सुरू असलेल्या योजनांसोबत जुळवले जातील.
अनुलेखा नंदी ह्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील सेंट्र फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीच्या फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr. Anulekha Nandi is a Fellow - Centre for Security, Strategy and Technology at ORF. Her primary area of research includes digital innovation management and ...
Read More +