Expert Speak Raisina Debates
Published on Jul 30, 2024 Updated 0 Hours ago

रवांडाचा GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 2023 च्या पहिल्या तीन तिमाहीत 7.6 टक्क्यांवर आला. व्यवसाय करण्याच्या दृष्टीने आफ्रिकेतला दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून रवांडाची ख्याती झाली आहे. तसेच मानवी विकास निर्देशांकातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने या देशाचे भविष्य आशादायी आहे. 

पॉल कागामे यांचा विजय आणि रवांडाचे भविष्य

यावर्षी 18 जुलैला रवांडा मुक्तीचा 30 वा वर्धापन दिन साजरा झाला. 18 जुलै 1994 रोजी रवांडन देशभक्ती आघाडीने (RPF) नरसंहाराचा अंत म्हणून एकतर्फी युद्धविराम घोषित केला होता. त्यानंतर राष्ट्रीय एकता सरकारची स्थापना झाली. या जुलै 2024 मध्ये पॉल कागामे हे आणखी एक निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झाले. यात त्यांचा विजय झाल्याने आता त्यांची 24 वर्षांची राजवट आणखी पाच वर्षांनी वाढली आहे.

पॉल कागामे यांना 99 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नव्हते. खरेतर ही 2017 च्या राष्ट्रीय निवडणुकीची पुनरावृत्ती आहे. कागामे यांनी पर्यावरणवादी फ्रँक हॅबिनेझा आणि माजी पत्रकार आणि सरकारी सल्लागार फिलिप मपेइमाना यांना समान फरकाने पराभूत केले. डियान रविगारा हे त्यांचे कट्टर विरोधक. यावेळी अपुऱ्या कागदपत्रांचे कारण देऊन त्यांची उमेदवारी अपात्र ठरवली गेली. हेदेखील 2017 च्या पॅटर्नचे अनुकरण आहे.   

रवांडाने 1994 मध्ये आधुनिक काळातील सर्वात वाईट नरसंहार पाहिला. हौथी अतिरेक्यांनी सुमारे 8 लाख नागरिकांची कत्तल केली. यात प्रामुख्याने तुत्सींची समावेश होता. हा नरसंहार 100 दिवसांहून अधिक काळ सुरू होता. 1994 मधला हा नरसंहार संपल्यानंतर कागमे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. ते संरक्षण मंत्रा झाले. तेव्हा ते फक्त 36 वर्षांचे होते. तेव्हापासून आजपर्यंत कागामे हेच रवांडाचे सर्वेसर्वा आहेत. 2000 साली त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर ते कधीही निवडणूक हरले नाहीत आणि अध्यक्षपदी कायम राहिले.

रवांडाने 1994 मध्ये आधुनिक काळातील सर्वात वाईट नरसंहार पाहिला. हौथी अतिरेक्यांनी सुमारे 8 लाख नागरिकांची कत्तल केली. यात प्रामुख्याने तुत्सींची समावेश होता. हा नरसंहार 100 दिवसांहून अधिक काळ सुरू होता.

2015 मध्ये कागामे यांच्या सरकारने एक नवीन घटनादुरुस्ती केली. यानुसार त्यांना 2017 मध्ये आणखी सात वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडणूक लढवण्याची अनुमती मिळाली. या दुरुस्तीनुसार कागामे हे 2029 मध्येही निवडणूक लढवण्यास पात्र असतील आणि 2034 पर्यंत सत्तेवर राहू शकतील. गंमत म्हणजे 30 वर्षाखालील लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक तरुण कागामे यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्याला ओळखतही नाहीत. आता हे अगदी स्पष्ट आहे की 66 वर्षांचे कागामे पुन्हा चौथ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. त्यामुळेच त्यांच्या पुढील कार्यकाळाचा वेध घेणे महत्त्वाचे आहे.  

देशांतर्गत पातळीवर मजबूत आणि स्थिर सरकार

गेल्या तीन दशकांमध्ये कागामे सरकारने जोरदार विकासकामे केली आहेत. देशातली राजकीय परिस्थिती स्थिर ठेवण्यात त्यांना यश आले. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकास झाला. इथल्या नरसंहाराच्या भयंकर घटनेनंतर अनेकांनी रवांडाला मोडीत काढले होते. तरीही हा देश या प्रदेशातील नवकल्पनांचे केंद्र म्हणून उदयास आला आहे. 2012 ते 2022 दरम्यान, रवांडाची सरासरी 7.2 टक्के वाढ झाली. कागामे यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले. ‘व्हिजिट रवांडा’ असे म्हणत पर्यटनाला प्रोत्साहन दिले. आर्सेनल फुटबॉल क्लबला प्रायोजित करून देशाची प्रतिमा सुधारली. हजार टेकड्यांचा देश म्हणून ओळखले जाणारे रवांडा हे आफ्रिकेतील प्रमुख पर्यावरण पर्यटन स्थळ म्हणूनही उदयास आले आहे. रवांडामधल्या पर्वतांमध्ये गोरिला पर्यटन प्रसिद्ध आहे. आफ्रिकन खंडातील हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यातही रवांडा आघाडीवर आहे.

असे असले तरी कागामे यांचे विरोधक त्यांच्यावर देशात दहशत निर्माण करणे, धमकी देणे, मनमानीपणे ताब्यात घेणे, हत्या करणे आणि जबरदस्तीने बेपत्ता करणे असे आरोप करतात. 2020 मध्ये हॉटेल रवांडाचा प्रसिद्ध नायक पॉल रुसेसबागिना याला दहशतवादाशी संबंधित आरोपांवरून अटक झाली. रवांडामध्ये हे प्रकरण खूपच गाजले. पॉल रुसेसबागिना याला गेल्या वर्षी त्याच्या 25 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेतून मुक्ती देण्यात आली. ही माफी राष्ट्राध्यक्ष कागामे यांनीच दिली होती. 

कागामे यांचे विरोधक त्यांच्यावर देशात दहशत निर्माण करणे, धमकी देणे, मनमानीपणे ताब्यात घेणे, हत्या करणे आणि जबरदस्तीने बेपत्ता करणे असे आरोप करतात.

1990 च्या दशकात रवांडाने न्याय मिळवून देण्यासाठी आणि केलेल्या नरसंहाराच्या प्रकरणांमध्ये समेट करण्यासाठी अनेक गाकाका न्यायालये स्थापन केली. विशेष म्हणजे या गाकाका न्यायालयांनी रवांडामध्ये आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयांपेक्षा कितीतरी जास्त प्रकरणे हाताळली. या न्यायालयांनी सामान्य रवांडन नागरिकांना सत्य आणि न्यायावर विचारविनिमय करण्याची परवानगी दिली. त्यामुळे देशाच्या कायदेशीर व्यवस्थेला बळकटी मिळाली आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण तयार होऊ लागले.

प्रादेशिक राष्ट्र म्हणून रवांडाची भूमिका

रवांडाचे सैन्य संपूर्ण आफ्रिका खंडात शांतता राखण्यासाठी नेतृत्वाची भूमिका बजावते. तरीही या सैन्यावर रवांडाच्या शेजारी असलेल्या काँगो देशात अस्थिरता निर्माण केल्याचा आरोप आहे. हजारो रवांडन सैनिक पूर्व काँगोमध्ये M23 बंडखोरांसोबत लढले आणि त्यांचे या मोहिमेवर प्रत्यक्ष नियंत्रण होते, असा आरोप संयुक्त राष्ट्रांच्या अनेक तज्ज्ञांनी जाहीरपणे केला आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या काही अहवालांनुसार 3 हजार ते 4 हजार रवांडा सैनिक काँगोमध्ये अजूनही M23 सोबत लढत आहेत. या अहवालांचे थेट खंडन करण्याऐवजी रवांडाने काँगोवरच उलटे आरोप केले. कागामे विरोधी रवांडन बंडखोर गट असलेल्या FDLR चे समर्थन काँगोने केले, असा रवांडाचा आरोप होता. परंतु रवांडावर खनिजांनी समृद्ध असलेल्या पूर्व काँगोमधून सोने आणि इतर खनिजांची तस्करी केल्याचा आरोपही आहे. 

स्रोत: अल जझीरा

या आरोप-प्रत्यारोपांच्या परिस्थितीत हा संघर्ष नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे. याचे परिणाम पूर्ण प्रदेशावरच होऊ शकतात. काँगोमधल्या दोन युद्धांच्या आठवणी अजूनही विरलेल्या नाहीत. त्यातच आणखी एक युद्ध झाले तर ते प्रादेशिक स्थिरतेच्या दृष्टीने विनाशकारी असेल. शिवाय या संघर्षामुळे काँगोच्या हजारो लोकांना आधीच रवांडा सोडून पळून जाण्यास भाग पाडले गेले आहे. सध्या रवांडामध्ये सुमारे 1 लाख 35 हजार निर्वासित आहेत. त्यात आता निर्वासितांची संख्या वाढली तर इथला सामाजिक सलोखा बिघडू शकतो.  

रवांडाचे इतर देशांशी संबंध आणि वादग्रस्त स्थलांतर करार

पॉल कागामे 2000 साली सत्तेवर आले तेव्हा त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट हे देशाला स्थैर्य देणे आणि त्यांची शक्ती मजबूत करणे हे होते. त्यांच्यासमोर नवीन राजकीय व्यवस्था स्थापित करण्याचेही आव्हान होते. या कामगिरीत त्यांना यश आले. विविध आंतरराष्ट्रीय संस्था, युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम (यूके), स्कॅन्डिनेव्हियन आणि जर्मन भाषक देणगीदार देश आणि अमेरिका यांनी दिलेल्या प्रचंड आणि उदार निधीमुळे कागामे यांना हे शक्य झाले. रवांडा सरकारने एक विकास योजना तयार केली. महत्त्वाच्या सुधारणा केल्या. पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले. तुलनेने प्रभावी प्रशासकीय व्यवस्था आणली छोट्या स्तरावरचा भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांत रवांडा हा आंतरराष्ट्रीय विकास सहकार्यासाठी महत्त्वाचा मित्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. प्रादेशिक संघर्षात थेट सामील होण्यास तयार नसलेले पाश्चात्य देश रवांडाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. रशियाच्या इथल्या वॅगनर गटाच्या कारवायांमध्ये थेट हस्तक्षेप न करता हा प्रश्न हाताळण्यासाठी पाश्चात्य देशांची भिस्त रवांडावर होती. 

एप्रिल 2022 मध्ये रवांडाने ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी एक करार केला. यानुसार रवांडाने 37 कोटी GBP च्या मोबदल्यात 50 हजार आश्रितांना सामावून घेतले. रवांडाला यापूर्वीच 24 कोटी GBP चा निधी मिळाला आहे. ब्रिटनचे नवे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रवांडाने ब्रिटनला अंशतः परतावा देण्यास नकार दिला. कारण मूळ करारात अशी कोणतीही तरतूद नव्हती. यापूर्वी रवांडाने इस्रायलशी असाच करार केला होता. आता ब्रिटनचे सरकार रवांडाचा हा नकार कसा पचवते हे पाहणे महत्त्वाचे असेल.

एप्रिल 2022 मध्ये रवांडाने ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी एक करार केला. यानुसार रवांडाने 37 कोटी GBP च्या मोबदल्यात 50 हजार आश्रितांना सामावून घेतले.रवांडाला यापूर्वीच 24 कोटी GBP चा निधी मिळाला आहे.

कागामे पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा रवांडा नरसंहाराच्या परिणामांमुळे उद्धवस्त झाला होता. तरीही आता हाच देश तीन दशकांनंतर स्थिर, समृद्ध आणि एकसंध आहे. एक राजकारणी म्हणून नव्हे तर कॉर्पोरेट व्यवस्थापक म्हणून देश चालवणारे नेते सध्या तिथे आहेत. लाखो तरुण आणि वृद्धांसाठी, कागामे हे एकत्रित शक्तीचे प्रतिनिधित्व करतात आणि रवांडाच्या आर्थिक वाढीचे तेच प्रमुख शिल्पकार आहेत. लाखो मतदारांना सीमेपलीकडील समस्या या त्यांच्या प्रमुख चिंता वाटत नाहीत. महागाई आणि चलनवाढ हे प्रश्न नक्कीच आहेत. राहणीमानाचा वाढता खर्च हेही सर्वात मोठे आव्हान आहे. परंतु 2023 च्या पहिल्या तिमाहीत रवांडाचा जीडीपी 7.6 टक्क्यांवर गेला आहे. मानवी विकासामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. रवांडा हा आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. हे सगळे निर्देशांक पाहता कागामे यांच्या रवांडाचे भविष्य आशादायी वाटते आहे. 


समीर भट्टाचार्य हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.