Authors : Tom Kerr | Dhriti Pathak

Expert Speak Terra Nova
Published on Jul 31, 2024 Updated 0 Hours ago

हवामान बदलांशी जुळवून घेण्याच्या कृतीकरता वर्गीकरणाचा विकास, हा हवामान बदल कमी करण्यासाठीच्या वित्त पुरवठ्यातील 'उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेल्या विकास निधी’च्या वापराच्या समस्येवर उपाय असू शकतो.

हवामान बदलांशी जुळवून घेताना...

मान्सूनला विलंब झाल्याचे आपण अनुभवत आहोत व त्यानंतर मुसळधार पाऊस आणि त्यानंतर पूर येणे, तसेच जगातील बहुतांश भागांमध्ये उन्हाळ्यात तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणे असे, हवामान बदलाचे वेगवान परिणाम आपण प्रथमच अनुभवत आहोत. ‘पॅरिस करारा’तील निर्धारित १.५ अंश सेल्सिअस तापमानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर, या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा २ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होईल, असा अंदाज आहे. विकसनशील देश या प्रभावांना सामोरे जाण्यासाठी मानवी आणि आर्थिक संसाधने अशा दोन्हींशी झगडत असताना, अहवाल असे दर्शवतो की, या देशांमधील सर्वात असुरक्षित समुदायांना परिस्थितीचा फटका सहन करावा लागत आहे.

व्यवस्थापन विषयक सिद्धांतकार पीटर ड्रकर यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, "जे मोजले जाते, त्यावर नियंत्रण राखता येते", ज्यात त्यांनी असा युक्तिवाद केला आहे की, एखाद्या गोष्टीचा मागोवा घेण्याची, त्यावर देखरेख करण्याची आणि/अथवा ती मोजण्याची क्षमता, अशा त्या गोष्टीसंबंधी केलेल्या कृतींमुळे त्यात सुधार व्हावा, याकरता कृती योजण्याबाबत लक्ष वेधले जाण्याची अधिक शक्यता निर्माण होते. हे बऱ्याच प्रकरणांत खरे ठरल्याचे दिसून आले आहे, जिथे अमूर्त आणि अस्पष्ट संकल्पनेपासून उत्तम तऱ्हेने परिभाषित आणि परिमाणवाचक लक्ष्याकडे जाण्याने इच्छित परिणाम प्राप्त झाले आहेत. १९८७च्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचे उदाहरण घेतल्यास; वातावरणातील ओझोन कमी करणाऱ्या पदार्थांचे प्रमाण मोजण्यासाठी एक मजबूत देखरेख यंत्रणा विकसित केली गेली, ज्यातून जागतिक समुदायाने सामूहिक कृती केली. अलीकडच्या अहवालांतून दिसून येते की, ओझोन स्तर पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहे, संयुक्त राष्ट्रांचे समर्थन लाभलेल्या वैज्ञानिक मूल्यांकन पॅनेलने ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ऑन ओझोन’ कमी करणाऱ्या पदार्थांविषयक चार वर्षांनी केल्या जाणाऱ्या मूल्यमापन अहवालात- प्रतिबंधित ओझोन कमी करणारे पदार्थ जवळपास ९९ टक्के कमी झालेल्या टप्प्याची पुष्टी करण्यात आली आहे. येथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा आवश्यक आहे, आणि उत्तम प्रकारे परिभाषित व मोजता येण्याजोगे उद्दिष्ट असले तर वित्तपुरवठा योजणे सोपे होते, कारण त्यातून गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचा जो अंतिम परिणाम साधला जाणार आहे, त्याबाबत अधिक स्पष्टता येते.

येथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा आवश्यक आहे, आणि उत्तम प्रकारे परिभाषित व मोजता येण्याजोगे उद्दिष्ट असले तर वित्तपुरवठा योजणे सोपे होते.

आज जगासमोर हवामान बदल कमी करण्याकरता आवश्यक ठरणाऱ्या वित्तपुरवठ्याच्या बाबतीत असेच आव्हान उभे ठाकले आहे. ओझोन थर कमी करण्याचे आव्हान आणि हवामान बदल रोखण्याचे आव्हान यांच्यात फरक असला तरी, आंतरराष्ट्रीय समुदायाला यांवर एकत्र आणण्यासाठी, आवश्यकतेनुसार परिमाणात्मक दृष्टीने केलेल्या प्रगतीचे मोजमाप करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. वातावरणात विषारी वायूंच्या वाढत्या उत्सर्जनाशी हवामान बदलाचा मुद्दा जोडला गेला आहे, ज्यामुळे पृथ्वीच्या हवामानात लक्षणीय तापमान वाढ होते. ‘क्लोरोफ्लोरोकार्बन्स’सारख्या ओझोन कमी करणाऱ्या पदार्थाच्या बदली ओझोन थरावर परिणाम न करणारे इतर वायू आढळून आले असले तरी, पृथ्वीच्या हवामानावर कमी अपायकारक परिणाम घडून येतील आणि जे वापरण्यासाठी किफायतशीर आणि व्यवहार्य असतील असे उत्सर्जित होणाऱ्या विषारी वायूंवरील पर्याय आपल्याला अद्याप सापडलेले नाहीत. विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करण्यातील मोठे आव्हान असे आहे की, ते उत्पादनाशी जोडले गेलेले आहेत.

हवामान बदलाच्या समस्येला संबोधित करण्याकरता दोन महत्त्वपूर्ण पैलू आवश्यक आहेत- एक म्हणजे विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करून समस्या कमी करण्याच्या दिशेने काम करणे; आणि दुसरा म्हणजे आर्थिक प्रणाली व समुदायांवर हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी काम करणे. हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी कृती करण्याच्या दृष्टीने, हवामान बदल रोखण्यासाठी उपाय योजण्याकरता वित्त पुरवठा हा एक महत्त्वाचा घटक आहे- जो आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये अत्यंत विवादास्पद आहे. २०२३ मध्ये ‘क्लायमेट पॉलिसी इनिशिएटिव्ह’च्या अहवालात असे दिसून आले आहे की, हवामान बदल रोखण्यासाठीचा जागतिक वित्त पुरवठा २०१९/२०२० मध्ये ६५३ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत २०२१/२०२२ मध्ये वार्षिक सरासरी १.३ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. मात्र, लक्षणीयरीत्या बरेच काही करणे अद्याप बाकी आहे.

हवामान बदल कमी करण्यासोबत आर्थिक साधनांचा अवलंब करणे

‘क्लायमेट फायनान्स’विषयी आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमधील देशा-देशांमधील वाद हे प्रामुख्याने 'हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेला विकास निधी’ या संकल्पनेभोवती आहेत. ‘क्लायमेट फायनान्स’मधील 'हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेला विकास निधी’ हा इतर समस्या, विशेषत: सामाजिक-आर्थिक समस्या सोडवण्यासाठी वळवला जाऊ नये या विचाराचे संदर्भ देतो. 'हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेल्या विकास निधी’चे मापन नंतर हवामान बदल कमी करण्याच्या दिशेने जोडला जाण्यासाठी आवश्यक उपक्रमांकरता सुकर ठरते, कारण त्यामुळे वातावरणातील विषारी वायूंच्या उत्सर्जनातील घट या एका सामायिक मेट्रिकद्वारे मोजली जाते. परंतु हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्या बाबतीत, त्याचे स्थानिकीकरण आणि संदर्भ यांच्या विशिष्ट स्वरूपामुळे कोणते उपक्रम योजायचे, यावर एकमत होणे कठीण असते. हवामान बदलाशी जुळवून घेणे हे एक बदलते लक्ष्य आहे; जे सध्यातरी उत्तमरीत्या परिभाषित करण्यात आलेले नाही. ‘यूएनईपी अॅडाप्टेशन गॅप रिपोर्ट’नुसार, वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या वित्तपुरवठ्यातील सध्याची तफावत ही प्रति वर्षी १९४-३६६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज आहे. २८व्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत, हवामान बदलांना जुळवून घेण्यासाठी आणि तो कमी करण्यासाठी ५०:५० गुणोत्तरासह, जागतिक बँकेने त्यांचा ‘क्लायमेट फायनान्स’ सर्व वित्तपुरवठ्याच्या ४५ टक्के वाढविण्यास वचनबद्धता दर्शवली. मात्र, हे लक्षात घ्यावे लागेल की, हवामान बदलांशी जुळवून घेण्याकरता वाढत्या वित्तपुरवठ्यासाठी सर्व विकसनशील देशांना सुधारित अनुदान-आधारित किंवा सवलतीने वित्तपुरवठा उपलब्ध होणे आवश्यक आहे, तसेच खासगी क्षेत्रासह गैर-सवलतीच्या स्त्रोतांकडून वित्तपुरवठ्यात लक्षणीय वाढ व्हायला हवी.

‘क्लायमेट फायनान्स’मधील 'हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेला विकास निधी’ हा इतर समस्या, विशेषत: सामाजिक-आर्थिक समस्या सोडवण्यासाठी वळवला जाऊ नये या विचाराचा संदर्भ देतो.

या क्षेत्रातील वित्तपुरवठ्यासाठी गैर-सवलतीच्या निधीचे स्रोत वाढवणे हे वरदान ठरू शकते, मात्र हवामान बदलांशी जुळवून घेणे आणि विकास हे एकात एक गुंतले गेले असल्याने हा स्रोत आतापर्यंत अत्यंत मर्यादित राहिला आहे. गुंतवणूकदारांचा असा दावा आहे की, गुंतवणुकीच्या परिणामाची स्पष्टता नसणे अथवा 'हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेला विकास निधी’ ही या बाबतीत मोठी मर्यादा ठरत आहे. यानंतर कदाचित बदलांशी जुळवून घेण्याच्या कृतीकरता वर्गीकरण विकसित करून त्यावर उपाय योजले जाऊ शकतात. परंतु, आधी सांगितल्याप्रमाणे, बदलांशी जुळवून घेण्याची कृती, हे या समस्येचे सोपे किंवा सार्वत्रिक उत्तर नाही. याचे विविध पैलू असतात, जे स्थानिंक संसाधनांची उपलब्धता, स्थानिक व पारंपरिक ज्ञान आणि इतर गोष्टींसह स्थानिक असुरक्षितता यांसारख्या पैलूंमुळे प्रभावित होतात, ज्यामुळे ही यादी न संपणारी बनते. हवामान बदल कमी करण्यासाठी, अनेक पद्धतीही होत्या, परंतु त्या सर्वांमध्ये एक गोष्ट सामायिक होती, ती म्हणजे 'अंतिम' परिणाम- अर्थात विषारी वायूंच्या उत्सर्जनात घट. त्याचप्रमाणे, मॅकियाव्हेलियन दृष्टीकोन, जो त्याच्या 'साधनां'पेक्षा बदलांशी जुळवून घेण्याच्या 'परिणामांवर' लक्ष केंद्रित करतो, हा एक संभाव्य मार्ग असू शकतो. हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्या अचूक व्याख्येवर किंवा त्याच्या कक्षेत कोणत्या कृती येतात, या बाबतीत एकमताचा अभाव असताना, त्याच्या प्राथमिक उद्दिष्टाची सामान्यत: समज आहे- ती म्हणजे समुदाय आणि प्रणालींवरील हवामान बदलांच्या धोक्यांचा प्रभाव कमी करणे. याचा अर्थ असा की, हवामान बदलांशी जुळवून घेण्याचे परिणाम काय असू शकतात यावर एक करार करणे जागतिक स्तरावरही शक्य आहे. बदलांशी जुळवून घेण्याचे परिणाम मापन करता येण्याजोग्या अटींमध्ये मोजण्यावर लक्ष केंद्रित करणे हा या क्षेत्राला आवश्यक असलेला ‘गेम चेंजर’ असू शकतो.

हवामान बदल रोखण्यासाठी ‘परिणाम आधारित वित्तपुरवठा’ (आरबीएफ) मूलत: पूर्व-संमत परिणामांच्या प्राप्तीसाठी पेमेंट जोडणे सूचित करते. ‘परिणाम आधारित वित्तपुरवठ्या’ची संज्ञा एकाच साधनाचा संदर्भ देणाऱ्या अनेक संज्ञांनी वैविध्यपूर्ण आहे, परंतु ते सर्व पेमेंट हे परिणामांशी जोडलेले असायला हवे आणि ते मिळविण्याच्या प्रक्रियेशी नाही. जागतिक बँकेने ‘परिणाम आधारित हवामान वित्त’ (आरबीसीएफ) अशी व्याख्या केली आहे की, जी परिणाम साध्य झाल्यावर आणि कधीकधी अंतरिम टप्पे गाठल्यावर दिली जाते. बहुतांश निधी, अनुदाने आणि जागतिक भांडवली बाजाराचा एक मोठा भागही परिणामांच्या प्राप्तीशी निगडीत असल्याने; हवामान कृतीसाठी ‘परिणाम आधारित वित्तपुरवठ्या’चा विकास हा खासगी वित्तपुरवठा प्राप्त करण्याचा मार्ग खुला करू शकतो. बदलांशी जुळवून घेण्यातून, हे सूचित होते की, निकालांच्या आणि परिणामांच्या परिमाणवाचक अटींमधील मोजमापामुळे, परिणाम-आधारित वित्तपुरवठा यंत्रणा एकत्रित आणणे शक्य होईल. केवळ बहुपक्षीय विकास बँका आणि द्विपक्षीय स्त्रोतांकडूनच नव्हे, तर जागतिक भांडवली बाजार आणि खासगी क्षेत्राकडून, मूलत: मिश्र वित्त पुरवठा आणि अधिक नाविन्यपूर्ण साधनांच्या निर्मितीद्वारे हे शक्य होईल.

बहुतांश निधी, अनुदाने आणि जागतिक भांडवली बाजाराचा एक मोठा भागही परिणामांच्या प्राप्तीशी निगडीत असल्याने; हवामान बदलांवरील कृतीकरता ‘परिणाम आधारित वित्तपुरवठ्या’चा विकास खासगी वित्त प्राप्त करण्याचा मार्ग खुला करू शकतो.

‘परिणाम आधारित वित्तपुरवठ्या’मुळे रोख्यासारखी वित्तपुरवठा साधने आणता येतील, ज्यात खासगी क्षेत्र पदार्पण करून आर्थिक साधनांचा अवलंब करीत बाजारपेठेचा लाभ घेता येण्याची क्षमता आहे. कोणत्याही बहुपक्षीय संस्थेला बदलांशी जुळवून घेण्यासाठी ‘परिणाम आधारित वित्तपुरवठा’ विकसित करण्याच्या कामाचे नेतृत्व करण्याची ही एक मोठी संधी आहे. अकार्यक्षम खर्चाचा आणि प्रकल्पातील प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी काय वापरता येईल, याची समज नसण्यासारख्या समस्यांत काही अडथळे समाविष्ट आहेत, ज्यांनी बदलांशी जुळवून घेण्यासाठी दीर्घकाळ वित्तपुरवठा केला आहे. ‘परिणाम-आधारित वित्तपुरवठा’ यंत्रणेच्या वापराद्वारे याचे निराकरण केले जाऊ शकते, कारण पूर्व-संमत निकालाच्या किंवा परिणामांच्या प्राप्तीवर पेमेंट केली जातील. या वित्तपुरवठ्याच्या चौकटीमागील तर्क म्हणजे इनपुट आणि प्रक्रियांऐवजी, पेमेंट आऊटपुट आणि कृतींच्या परिणामांशी जोडणे. ‘परिणाम आधारित वित्तपुरवठ्या’मुळे रोख्यासारखी वित्तपुरवठा साधने आणता येतील, ज्यात खासगी क्षेत्र आणून आर्थिक साधनांचा अवलंब करीत बाजारपेठेचा लाभ घेण्याची क्षमता आहे. कोणत्याही बहुपक्षीय संस्थेला बदलांशी जुळवून घेण्याकरता ‘परिणाम आधारित वित्तपुरवठा’ विकसित करण्याच्या कार्याचे नेतृत्व करण्याची प्राप्त झालेली ही एक मोठी संधी आहे.

‘परिणाम आधारित वित्तपुरवठा’ खासगी क्षेत्राला पदार्पण करण्यास सहाय्यकारी ठरेल. याशिवाय, एकदा तो सुरू झाल्यावर, जागतिक बँक गट आणि जागतिक आर्थिक मंचाने अनुक्रमे असे नमूद केले आहे की, हवामान बदलांशी जुळवून घेण्याच्या कार्यात गुंतवणूक केल्याने ४:१ च्या लाभाच्या किमतीच्या गुणोत्तरासह परतावा मिळू शकतो आणि २०२६ पर्यंत बदलांशी जुळवून घेण्याची बाजारपेठ २ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सची असू शकते. ‘परिणाम आधारित वित्तपुरवठ्या’ने प्रदान केलेली पारदर्शकता खासगी गुंतवणूकदारांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यात गुंतवणूक करण्यासाठी एक मोठी संधी सादर करते, कारण त्यांच्या गुंतवणूकीचा अंतिम परिणाम सुस्पष्ट आहे.


टॉम केर जागतिक बँक समूहातील दक्षिण आशियाचे प्रमुख हवामान विशेषज्ञ आहेत.

धृती पाठक जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाई क्षेत्राच्या हवामान विषयक गटात हवामान बदल विश्लेषक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.