Image Source: Getty
25 सप्टेंबर रोजी झालेल्या रशियाच्या सुरक्षा परिषदेत आण्विक प्रतिबंधावरील द्विवार्षिक स्थायी परिषदेत, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी "रशियन फेडरेशनच्या आण्विक प्रतिबंधाच्या क्षेत्रात राज्य धोरणाच्या मूलभूत तत्त्वांमध्ये’’ ज्याला रशियाच्या आण्विक सिद्धांत देखील म्हंटले जाते, त्यामध्ये बदल सुचवले. आण्विक तत्वाबरोबरच लष्करी सिद्धांत देखील अद्ययावत करण्याचा प्रस्ताव ह्यामध्ये होता. या प्रस्तावित बदलाचे कारण म्हणजे लष्करी-राजकीय क्षेत्रातील नवीन बदल. रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी उदयास आलेल्या नवीन धोके; ज्यामध्ये रशियन भूमीवरील युक्रेनियन हल्ल्यांची वाढती तीव्रता आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेनस्की यांची युनायटेड स्टेट्स (यूएस) आणि युनायटेड किंगडम (यूके) ला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करून रशियाच्या आत खोलवर हल्ला करण्यासाठी विनंती ह्यांचा समावेश होतो.
गेल्या वर्षापासून, रशियाच्या संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि सुरक्षा परिषदेच्या कार्यालयातील तज्ञांमध्ये रशियाच्या आण्विक सिद्धांतामध्ये सुधारणा करण्यावर चर्चा झाली आहे. ही नवीन पद्धत मॉस्कोच्या लाल रेषा अधोरेखित करते ज्यामुळे युक्रेनच्या रशियन हद्दीत हल्ले करण्याच्या पर्यायांना आणखी मर्यादित केले जाईल आणि युक्रेनियन थिएटरमध्ये कीवच्या प्रति-हल्ल्याला मर्यादित करून युक्रेनच्या समर्थनात संयम राखण्यासाठी नाटो देशांना एक सिग्नल मिळेल.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, ड्रोन, स्ट्रेटेजीक आणि ट्याकटीक लढाऊ विमाने, आणि क्रूझ क्षेपणास्त्राचे रशियन सीमेवर वाढलेले हल्ले, आणि रशियन फेडरेशनच्या हद्दीत प्रवेश करणे ही प्रामुख्याने आण्विक क्षेपणास्त्रांच्या वापरामागची मुख्य कारणे आहेत.
नवीन प्रस्तावित बदल
प्रस्तावित बदल हे 2020 मधील आण्विक सिद्धांत अद्ययावत करतील, तसेच राज्ये आणि युतींची यादी विस्तृत करण्याचे उद्दिष्ट ठेवतील ज्यांच्याविरूद्ध प्रतिबंध करणे गरजेचे आहे. ह्यामध्ये वापरलेली भाषा विकसित करून अण्वस्त्र नसलेल्या राज्याने अण्वस्त्र देशाच्या पाठिंब्याने रशियावर आक्रमण केले आहे- अगदी पारंपारिक शस्त्रे वापरूनही त्याला देखील रशियाविरूद्ध संयुक्त हल्ला म्हणून ग्राह्य धरले जाईल असे नमूद करण्यात आले आहे. दुसरे म्हणजे, त्यामुळे रशियाच्या आत लष्करी हल्ल्यांची संख्या कमी होईल. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, ड्रोन, स्ट्रेटेजीक आणि ट्याकटीक लढाऊ विमाने, आणि क्रूझ क्षेपणास्त्राचे रशियन सीमेवर वाढलेले हल्ले, आणि रशियन फेडरेशनच्या हद्दीत प्रवेश करणे ही प्रामुख्याने आण्विक क्षेपणास्त्रांच्या वापरामागची मुख्य कारणे आहेत. तिसरे म्हणजे, पूर्वीच्या सिद्धांतांमध्ये रशियाने मित्रपक्षाच्या संरक्षणासाठी अण्वस्त्र प्रतिबंधकतेचे आवाहन केले होते, तर नवीन प्रस्तावित सिद्धांत बेलारूसवर हल्ला झाल्यास अण्वस्त्र प्रत्युत्तर देण्याचे आवाहन करते, आणि मिन्स्क हे रशियाचे आणि बेलारूस चे संघराज्य स्थापन करणाऱ्या कराराचा पक्ष असल्याचे नमूद करते. पुढे, पुतिन यांनी रशियाच्या अस्तित्वाची हमी आणि जगातील समतोल राखण्यासाठी एक साधन म्हणून आण्विक ट्रायडच्या महत्त्वावर भर दिला.
सध्याच्या भूराजनीतीला अनुकूल असा आण्विक सिद्धांत
रशियन आण्विक सिद्धांतांची भाषा सामान्यतः रशियाच्या भू-राजकीय आकांक्षांच्या तुलनेत जागतिक व्यवस्थेच्या भौगोलिक-राजकीय परिस्थितीच्या थेट प्रमाणात असते. 2010 पासून; वापरलेली भाषा अधिक आक्षेपार्ह बनली आहे. याचे समर्थन पुतिन यांनी पाश्चात्य देशांच्या अण्वस्त्र सिद्धांतांचा हवाला देऊन केले, जे त्यांच्या मते, रशियाशी युद्धात आहेत आणि रशियापेक्षा जास्त नसले तरी आक्षेपार्ह आण्विक सिद्धांत आहेत. 2020 च्या प्रस्तावाने याचेच अनुसरण केले, परंतु त्यात बरीच संदिग्धता होती. सेर्गेई कारागानोव्ह, हायर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मॉस्को येथील प्राध्यापक एमेरिटस, रशियामधील आण्विक राजकारणावरील एक प्रमुख आवाज जो आक्षेपार्ह आण्विक सिद्धांताचा पुरस्कर्ता आहे, त्यांच्या मते, भूतकाळातील रशियन अणु सिद्धांत कालबाह्य आहेत, ज्यात 2020 अणु सिद्धांताचा सुद्धा समावेश आहे, जो रशियासाठी प्रभावी प्रतिबंधाचे कार्य करत नाही आणि प्रभावी प्रतिबंधासाठी- अशी रचना करणे आवश्यक आहे ज्यामुळे रशियाकडे अण्वस्त्रे आहेत किंवा ते त्यांचा वापर करू शकतात हा समज निर्माण होईल, ज्यामुळे सामूहिकरित्या पाश्चिमात्य देशांना रशियाला सहकार्य करावे लागेल (तक्ता 1 पहा).
अण्वस्त्रे वापरण्याच्या रशियाची चिथावणी असूनही, पश्चिमेने मॉस्कोच्या ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून युक्रेनला लांब पल्ल्याची शस्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा पुरवठा सुरू ठेवला आहे.
2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यापासून, संघर्षाच्या विविध टप्प्यांवर रशियाकडून अण्वस्त्रे वापरण्याचा धोका वाढला आहे. अण्वस्त्रे वापरण्याच्या रशियाची चिथावणी असूनही, पश्चिमेने मॉस्कोच्या ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून युक्रेनला लांब पल्ल्याची शस्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा पुरवठा सुरू ठेवला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून, युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी रशियामधील ऊर्जा स्त्रोतांना लक्ष्य केले आहे. मे 2024 मध्ये, युक्रेनियन ड्रोनने दोन पूर्व चेतावणी दिलेल्या रडार स्टेशनवर हल्ला केला, जे पश्चिमेकडून लॉन्च होणारी अण्वस्त्रे शोधण्यासाठी स्थापित केले गेले होते. पुढे, ऑगस्टमध्ये, युक्रेनने कुर्स्कमध्ये घुसखोरी सुरू केली; त्याच्या जवळजवळ एक महिन्यानंतर, रशियाने कुर्स्कमध्ये प्रतिआक्रमण सुरू केले. आता, युक्रेनसाठी मर्यादित पर्याय असल्याने, झेलेन्स्कीने रशियन शहरांमध्ये खोलवर हल्ला करण्यासाठी लांब पल्ल्याची शस्त्रे वापरण्याची परवानगी देण्यासाठी यूके आणि यूएसकडे विनंती केली आहे. या परवानगीबाबत पश्चिमेकडे चर्चा होत असल्याचे पाहून, रशियाचे प्रेस सेक्रेटरी दिमित्री पेस्कोव्ह यांनी नंतर रशियाविरुद्धच्या हल्ल्यात सहभागी होण्याच्या परिणामांविषयी चेतावणी देणारा विशिष्ट संकेत स्पष्ट केला.
टेबल 1 - ज्या परिस्थितीत शत्रूविरूद्ध अण्वस्त्रे वापरली जातील
|
2020 आण्विक प्रस्ताव
|
नवीन सूचित 2024 आण्विक प्रस्ताव
|
परिस्थिती ज्यामध्ये आण्विक शस्त्रास्त्रे वापरली जाऊ शकतात
|
अ) रशियन फेडरेशनच्या प्रदेशांवर आणि (किंवा) त्याच्या मित्र देशांवर हल्ला करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणाबद्दल विश्वसनीय माहितीची पावती ब) शत्रूने रशियाविरूद्ध अण्वस्त्रे आणि शस्त्रे त्याच्या (किंवा) त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध वापरली असता, क)मोठ्या प्रमाणावर विनाश करणारी शस्त्रे, ज्याने राज्याचे अस्तित्व धोक्यात असते तेव्हा; तसेच पारंपरिक शस्त्रे रशियन फेडरेशनच्या विरोधात वापरणे ड) रशियन फेडरेशनच्या गंभीर राज्य किंवा लष्करी सुविधांवर शत्रूचे हल्ले, ज्यामुळे आण्विक सैन्याच्या प्रतिसाद क्रियांमध्ये व्यत्यय येईल;
|
अ) अण्वस्त्र नसलेल्या राज्याने आण्विक राज्याच्या जोरावर केलेली आक्रमकता रशियन फेडरेशनवर संयुक्त हल्ला मानली जाईल ब) क्रूझ क्षेपणास्त्रे, ड्रोन, हायपरसॉनिक आणि इतर विमाने रशियन फेडरेशनच्या सीमा ओलांडून मोठ्या प्रमाणावर प्रक्षेपित केली तर क) पारंपारिक शस्त्रे असूनही रशियाच्या सार्वभौमत्वाला गंभीर धोका उत्पन्न झाला तर ड) बेलारूसविरुद्ध आक्रमकता
|
आमूलाग्र बदल नाहीत
चर्चेत असूनही, प्रस्तावित बदल हे पूर्वीच्या आण्विक सिद्धांतांपासून मूलगामी बदलेले नाहीत. प्रचलित आण्विक सिद्धांत रशियन भूमीवर पारंपारिक हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून अण्वस्त्रांचा वापर करण्यास परवानगी देतो, परंतु नवीन प्रस्तावित सिद्धांतामध्ये वापराच्या उद्देशाच्या अटी अधिक स्पष्ट करणे भाग आहे. उदाहरणार्थ, क्रेमलिनच्या आण्विक छत्रीचा बेलारूसपर्यंत विस्तार करणे ही प्रतीकात्मक सद्गुणांनी चाललेली खेळी नाही; हे समाविष्ट करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 2020 च्या प्रस्तावात असे नमूद केले आहे की रशियन मित्र पक्षाविरुद्ध हल्ला हे रशियन आण्विक प्रतिशोधाचे कारण असेल, ज्याचा सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत पूर्णपणे भिन्न अर्थ आहे. या वर्षी जूनमध्ये मैत्री करारात परिपक्व झालेल्या उत्तर कोरियासोबत रशियाची वाढत्या मैत्रीचा अर्थ रशिया उत्तर कोरियाला देखील त्याच्या आण्विक छत्रात समाविष्ट करेल असा होतो. आणि जरी मॉस्को सामूहिक पश्चिमात्य देशांद्वारे अधिकाधिक अलग होत असले तरी, उत्तर कोरियाशी व्यवहार करण्याची जटिलता, ही रशियाच्या पथ्यावर पडते. मॉस्कोने अशा प्रकारे एक भाषा वापरली आहे जी प्रतिबिंबित करते की रशियाच्या आण्विक वाढीचा ईशान्य आशियाच्या भूराजनीतीवर फारसा प्रभाव नाही. म्हणून बदलले असले तरी, आण्विक सिद्धांताची मूळ रचना अपरिवर्तित राहते.
या वर्षी जूनमध्ये मैत्री करारात परिपक्व झालेल्या उत्तर कोरियासोबत रशियाची वाढत्या मैत्रीचा अर्थ रशिया उत्तर कोरियाला देखील त्याच्या आण्विक छत्रात समाविष्ट करेल असा होतो.
आंतरराष्ट्रीय प्रतिसाद
पुतिन यांनी अधिकृतपणे सध्याच्या सिद्धांतामध्ये बदल प्रस्तावित करण्यापूर्वीच युक्रेनला लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास संमती देण्यास वॉशिंग्टन सावध आहे, कारण युक्रेनला रशियामध्ये खोलवर हल्ला करण्याची परवानगी दिल्यास मॉस्कोकडून घातक प्रतिसाद मिळण्याची गोपनीय माहिती होती. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी हे पाऊल बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. पुढे, पुतीन यांनी बदलांचा प्रस्ताव दिल्यानंतर 26 सप्टेंबर रोजी, यूएसने युक्रेनला 20 किमी ते 130 किमी अंतराचे ग्लाईड बॉम्ब पाठविण्याची घोषणा केली. तथापि, युक्रेनला रशियामध्ये खोलवर हल्ला करण्यास परवानगी देण्याचा उल्लेख केलेला नाही. तसेच EU परराष्ट्र सेवेचे प्रवक्ते पीटर स्टॅनो यांनी पुतिनच्या घोषणेमुळे युक्रेनला पाठिंबा देण्याचे EU धोरण बदलणार नाही यावर पुन्हा एकदा जोर दिला.
रशिया त्याच्या 2024 आण्विक सिद्धांताचा मसुदा तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, असे दिसून येते की रशियामध्ये खोलवर हल्ला करण्याच्या युक्रेनच्या महत्त्वाकांक्षा ठप्प झाल्या आहेत आणि युद्धभूमीवरच त्याचे पर्याय मर्यादित आहेत. मॉस्कोचा धोरणात्मक प्रतिसाद प्रभावी होताना दिसतो; त्याने त्याच्या मर्यादा पुन्हा परिभाषित केल्या आहेत आणि भविष्यातील धोका कमी केला आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणतेही महत्त्वपूर्ण बदल आता आगामी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहेत.
राजोली सिद्धार्थ जयप्रकाश हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे संशोधन सहाय्यक आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.