Published on Jan 20, 2024 Updated 0 Hours ago

असे दिसते की, अमेरिकेतील दोन्ही पक्षांतील व्यक्तिमत्त्वांचा मर्यादित प्रभाव पाहता २०२४ ची अमेरिकेतील निवडणूक ही मुद्दा-केंद्रित मोहिमेवर लढली जात आहे.

अमेरिकेची २०२४ ची अध्यक्षीय निवडणूक: एक पडताळणी

येत्या वर्षात मार्च आणि सप्टेंबरच्या कालावधीत अमेरिकेत निवडणुका होत असून, अमेरिकेने अध्यक्षीय निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण वर्षात प्रवेश केला आहे. अमेरिकेमधील थोड्याच प्रौढांना २०२४ मध्ये बायडेन-ट्रम्प आमनेसामने यावेत ही इच्छा असली तरी, ती सर्वात शक्तिशाली तर्कसंगतता दिसून येते. रिपब्लिकन छावणीत, ट्रम्प यांनी ४६-टक्क्यांच्या फरकाने त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी रॉन डीसॅंटिस यांच्यावर आघाडी मिळवली आहे. रिपब्लिकन शर्यतीत दुसऱ्या स्थानासाठी लवकरच डीसॅंटिसला मागे टाकणारी उत्साही निक्की हेली असल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व वादविवादांमध्ये ट्रम्प यांच्या अनुपस्थितीचा त्यांच्या संभाव्यतेवर अद्याप परिणाम झालेला नाही. काहीही असले तरी, यामुळे रिपब्लिकन पक्षात कपटीपणे ‘ट्रम्पविना ट्रम्पवाद’ निर्माण झाला आहे. डेमोक्रॅट छावणीत, बायडेन एकाकी लढाई लढत आहेत आणि ते विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतिकार करण्यासाठी लढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुद्द्यांबाबत, रिपब्लिकनने दक्षिणेकडील सीमांच्या खराब हाताळणीसाठी आणि विशेषत: हवामान विषयक व पायाभूत सुविधा सौद्यांमधून आणि 'वोकिझम'द्वारे फेडरल खर्चाची दिशाभूल केल्याबद्दल बायडेन प्रशासनावर हल्ला केला आहे. बायडेन यांनी ‘बायडेनॉमिक्स’द्वारे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी, कामगार वर्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि जगभरातील सहयोगींना व भागीदारांना आश्वस्त करण्यासाठी आपली मोहीम आखली आहे.

रिपब्लिकन लोकांनी दक्षिणेकडील सीमांच्या खराब हाताळणीसाठी आणि विशेषत: हवामान विषयक व पायाभूत सुविधांच्या सौद्यांमधून आणि 'वोकिझम'द्वारे फेडरल खर्चाची दिशाभूल केल्याबद्दल बायडेन प्रशासनावर हल्ला केला आहे.

दोन्ही पक्षांतील व्यक्तिमत्त्वाचा मर्यादित प्रभाव पाहता, २०२४ ची अमेरिकेतील निवडणूक मुद्दा-केंद्रित मोहिमांवर आधारित आहे. बायडेन आणि ट्रम्प यांच्यात, ट्रम्प यांच्यात प्रतिमेवर आधारित मते मिळविण्याची अधिक क्षमता असू शकते. एक सत्तरीतील व्यक्ती एका ऐशीतील वयाच्या व्यक्तीशी लढत आहे आणि दोघांवरही तितके ‘स्वच्छ’ नसल्याबाबत टीका केली जात आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांना संभाव्य दोषारोपांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेला कलचाचणीत फटका बसेल आणि बायडेन यांनी त्यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्यावरील अनेक आरोपांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक वर्षांमध्ये वाढलेल्या नोंदणीकृत स्वतंत्र मतदारांची मोठी संख्या दर्शवते की, २०२४ मध्ये मुद्दे व्यक्तिमत्त्वांपेक्षा महत्त्वाचे ठरतील. तरीही, अध्यक्षीय व्यक्तिमत्त्वे अमेरिकी निवडणुकांमध्ये राजकीय कथानकाचा प्रमुख घटक आहेत. १९९३ च्या निवडणुकीत, तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश ज्यांनी पूर्वीच्या सोव्हिएत युनियनच्या पतनाची देखरेख केली आणि १९९१च्या आखाती युद्धात विजय मिळवला, त्यांचा तुलनेने नवे डेमोक्रॅट बिल क्लिंटन यांनी पराभव केला. सद्य निवडणुकीत, अनेक बाबतीत यश मिळवले असतानाही बायडेन यांच्या ‘कमकुवत’ नेतृत्वावर लक्ष केंद्रित आहे. मतदारांमध्ये, अध्यक्ष बायडेन यांच्या दुसर्‍यांदा निवडणुकीकरता उभे राहण्याच्या क्षमतेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. न्यूयॉर्क टाईम्स आणि सिएन्ना कॉलेज यांनी केलेल्या सर्वेक्षणात ओहायो, जॉर्जिया आणि अरिझोना या राज्यांत- जिथे दोन प्रमुख राजकीय पक्षांना समान पातळीचे समर्थन आहे, तिथे दुसर्‍या कलचाचणीत, मतदारांनी अध्यक्ष बायडेन यांच्या वयाबद्दल चिंता व्यक्त केली. अरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन या ७ राज्यांमध्ये- जिथे दोन प्रमुख राजकीय पक्षांना समान पातळीचे समर्थन आहे, तिथे बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा पिछाडीवर आहेत.

 अमेरिकेतील राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावरील प्रश्न हे २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत, जरी राष्ट्राध्यक्ष बायडेन ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ आणि ६ जानेवारीच्या कॅपिटल हिल दंगलीच्या रेंगाळणाऱ्या छायेविरोधात सावधगिरी बाळगत आहेत. निवडणुकीतील फसवणूक आणि निवडणुकीतील घोटाळा याबाबतची भाषणबाजी तसेच ६ जानेवारीचे बंड व लसीकरणाच्या विरोधात घेतलेली भूमिका ट्रम्प यांच्या मोहिमेवर वर्चस्व गाजवत आहेत. रिपब्लिकनांनी अशाच मुद्द्यांवर बायडेन यांना प्रश्न केला आहे. २०१६ आणि २०२० सालच्या निवडणुकांमध्ये या मुद्द्यावर झालेली विभागणी ही राजकीय पक्षांत परस्परांशी असलेल्या तीव्र मतभेदांमुळे उद्भवलेली तीव्र ध्रुवीकरण परिस्थिती मानली जाते. वांशिक हत्या, बेकायदेशीर स्थलांतरितांच्या शहरांमधील जलद वाढणारी गुन्हेगारी आणि टोळी हिंसाचार यांवरून मतदारांमध्ये झालेल्या तीव्र विभाजनामुळे या शहरी विकृतीच्या समस्यांनी अमेरिकेतील राजकीय समस्या वाढवली आहे. बायडेन यांनी आपली मोहीम ‘राष्ट्राच्या सत्त्वासाठी लढाई’ या मुद्द्यावर चालवली आहे. गाझामधील इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्लॅक लाइव्ह्ज् मॅटर’ विरूद्ध ‘ऑल लाइव्ह्ज् मॅटर’सारख्या विरोधी मोहिमा आणि सार्वजनिक जागांवर व विद्यापीठांमध्ये ज्यूविरोधवादाचा उदय अमेरिकी समाजाला खीळ घालत आहे. वाढत्या प्रमाणात, या मुद्द्यांनी अमेरिकेच्या देशांतर्गत राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे आणि त्यांचा २०२४ च्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, एका कलचाचणीत असे आढळून आले आहे की, गाझामधील युद्धबंदीला विलंब केल्यामुळे २०२४ मध्ये बायडेन यांनी युवकांची मते गमावण्याचा धोका पत्करला आहे. डेमोक्रॅटिक पक्ष- विशेषत: गर्भपातासारख्या पुरोगामी स्थानिक मुद्द्यांवर भर देत आहे. २०२२ च्या मध्यावधी निवडणुकांदरम्यान, गर्भपाताच्या अधिकाराचा मुद्दा हा विविध महत्त्वाच्या राज्यांमध्ये केंद्रबिंदू बनला. हे ओहायोमध्ये स्पष्ट झाले की, जिथे मतदारांनी गर्भपात आणि पुनरुत्पादनाविषयीच्या अधिकारांची हमी देण्यासाठी घटनात्मक दुरुस्ती मंजूर केली आणि जॉर्जिया व पेनसिल्व्हेनियाच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा केंद्रस्थानी राहिला.

वांशिक हत्या, बेकायदेशीर स्थलांतरितांच्या शहरांमध्ये जलद वाढणारी गुन्हेगारी आणि टोळी हिंसाचार यांवरून मतदारांमध्ये झालेल्या तीव्र विभाजनामुळे या शहरी विकृतीच्या समस्यांनी अमेरिकेतील राजकीय समस्या वाढवली आहे.

अमेरिकेत येणारा स्थलांतरितांचा ओघ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यामध्ये दक्षिणेकडील सीमेवर मोठ्या प्रमाणात आश्रय शोधणाऱ्यांची संख्या विक्रमी आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स यांच्यातील निर्णायक मुद्दा म्हणून इमिग्रेशनचा मुद्दा परतला आहे आणि सध्या युक्रेन मदत विधेयकाची फरफट होण्याचे ते मुख्य कारण आहे. बायडेन यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या सुरूवातीस ट्रम्प यांची इमिग्रेशन धोरणे उलटवली, जो एक संस्कृती, राजकीय मूल्ये आणि परकीय धोरणे वापरून बदल घडवून आणण्याचा दृष्टिकोन मानला गेला आणि त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बायडेन प्रशासनाने भिंतीचा काही भाग बांधण्याचा निर्णय घेतल्याने आणि सीमेवर एजंट्सची संख्या वाढल्याने परिस्थिती खूप तीव्र आणि सामोरे जाणे कठीण बनली आहे.

बायडेन प्रशासन द्विपक्षीय पायाभूत सुविधा करार, अमेरिकन बचाव योजना आणि चिप्स व विज्ञान कायदा यांसह प्रमुख धोरणात्मक उपक्रम पार करण्यास सक्षम आहे. मात्र, चलनवाढ आणि परराष्ट्र धोरणाच्या निर्णयांचा मुद्दा, विशेषत: अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्याने, बायडेन यांच्या मतदान विषयक कल चाचणीवर मोठा परिणाम झाला आहे. ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीवर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे, कदाचित सर्वात जास्त परिणाम म्हणजे १९८० च्या निवडणुकीत जिमी कार्टर यांना त्यांच्या अध्यक्षपदाची किंमत मोजावी लागली आणि रोनाल्ड रेगन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मध्य पूर्व आणि युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्धांसह आणि रिपब्लिकन बायडेन यांच्या हरित कराराबद्दल संशयास्पद दृष्टिकोन ठेवून ऊर्जा राजकारण पुन्हा एकदा आघाडीवर आणि केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.

परराष्ट्र धोरण

अमेरिकेतील देशांतर्गत समस्या या परराष्ट्र धोरणाशी जवळून संबंधित आहेत, ज्यात चीन ही प्रमुख चिंता आहे. ही चिंता केवळ धोरणविषयक उच्चभ्रू लोकांमध्येच नाही तर अमेरिकी जनतेमध्येही निर्माण झाली आहे, जिथे लक्षणीय ५९ टक्के नागरिक चीनकडे नकारात्मकतेने पाहतात, ते एकतर शत्रू किंवा वाढत्या लष्करी आणि आर्थिक तणावादरम्यान मित्र नसलेले राष्ट्र म्हणून पाहतात. चिनी धोक्याला संबोधित करणे हा एक निर्णायक मुद्दा बनला आहे, ज्यामुळे दोन्ही पक्षांना अधिक कठोर दृष्टिकोनाची वकिली करण्यास प्रवृत्त केले जाते.

अमेरिकेच्या शिखर परिषदेत अधोरेखित केलेल्या चिनी नेतृत्वाखालील गुंतवणुकीला पर्याय उपलब्ध करून देणे हे प्रमुख आव्हानांपैकी एक आहे.

रिपब्लिकन वादविवादांमध्ये, विशेषत: दक्षिण चीन समुद्र आणि तैवानवरील वाढत्या तणावादरम्यान, चीनचा सामना करण्यासाठी युद्धनौकांची संख्या वाढवून नौदल शक्ती वाढवण्याभोवती चर्चा फिरली आहे. अमेरिकेच्या शिखर परिषदेत अधोरेखित केलेल्या चिनी नेतृत्वाखालील गुंतवणुकीला पर्याय उपलब्ध करून देणे हे प्रमुख आव्हानांपैकी एक आहे. हा प्रयत्न ‘बिल्ड बॅक बेटर’ योजना अथवा इंडो-पॅसिफिक आर्थिक चौकट पुढे सुरू ठेवण्याशी जोडलेला आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत चीनच्या विरोधात सुरू केलेले जकात शुल्क मुख्यत्वे बायडेन प्रशासनात टिकून आहे, मजबूत द्विपक्षीय समर्थनाचा आनंद घेत आहे आणि राजकीय पक्षांमध्ये एकसंध भूमिका दर्शवत आहे. चीनसोबतच्या असंख्य समस्यांदरम्यान फेन्टानिल या वेदनाशामकाची वाढती चिंता दिसून येते, काही राजकारण्यांनी याला एक भयंकर धोका म्हटले आहे. डेमोक्रॅट्स एक ठोस भूमिका म्हणून या वेदनाशामकाच्या मुद्द्यावर चीनशी केलेल्या अलीकडच्या करारावर भर देतात, तर रिपब्लिकन्स चीनचा प्रतिकार करण्यात बायडेन यांची भूमिका कमकुवत असल्याची टीका करतात. ही भावना सभागृहाच्या सदस्यांनी व्यक्त केली.

युक्रेन आणि इस्रायलला बायडेन यांचा भक्कम पाठिंबा असूनही, त्यांच्या पक्षातील पुरोगामींनी पाठिंबा काढून घेत, गाझामध्ये युद्धविराम मागितला आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे युवा मतदारांमध्ये बायडेन यांचा पाठिंबा आधीच कमी झाला आहे. ते पुढे ट्रम्प यांच्या हातात खेळू शकतात. नोव्हेंबरमधील तिसऱ्या रिपब्लिकन प्राथमिक चर्चेत, बहुतेक प्रश्न राष्ट्रीय सुरक्षा, नोकऱ्या, व्यापार आणि लष्करी शक्ती याभोवती फिरले. बायडेन प्रशासनाकडून सुरू असलेल्या युद्धांना जोरदार प्रतिसाद असूनही, त्यांचे मतदान रेटिंग कमी राहिले आहे. बायडेन प्रशासनाकडून सुरू असलेल्या युद्धांना जोरदार प्रतिसाद असूनही, त्यांचा मतदानातील लोकप्रियता निर्देशांक कमी राहिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत मतचाचणीत आघाडी मिळवली असेल, परंतु कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे त्यांना कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यापासून रोखणारा धक्का बसला आहे. यामुळे विशेषत: इतर राज्यांत अशाच प्रकारचे खटले आणि निकाल येऊ शकतात. ट्रम्प यांनी इस्त्रायलला दिलेला आपला भक्कम पाठिंबा आणि शाश्वत राजधानी जेरुसलेममध्ये राजधानी हलविण्यास आणि त्यांच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या टप्प्यात मध्यभागी शांतता योजना तयार करण्याचे त्यांचे श्रेय मतदारांनी अधोरेखित केले. 

आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदानात नेतृत्व केले असेल, परंतु कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे त्यांना कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यापासून प्रतिबंधित केले गेले आहे, त्यामुळे इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारचे खटले आणि निकाल येऊ शकतात.

या मुद्द्यांव्यतिरिक्त, आगामी निवडणुकांमध्ये अमेरिकी काँग्रेसचे राजकीय नियंत्रण केंद्रस्थानी असेल, ज्यामध्ये सभागृहात तसेच सिनेटमध्ये जागा रिक्त असतील.  अलिकडच्या इतिहासातील बहुतेक अध्यक्षांनी विभाजित काँग्रेसशी मुकाबला केला आहे. निवडणुकीसाठी सिनेटच्या ३३ जागा आहेत, ज्यामध्ये १० रिपब्लिकन, २० डेमोक्रॅट्स आणि ३ अपक्ष आहेत. प्रतिनिधीगृहात, ११९व्या काँग्रेससाठी सर्व ४३५ जागा द्विवार्षिक निवडणुकांसाठी असतील. सदनातील सद्य रचना रिपब्लिकन यांच्या नेतृत्वाखाली आहे तर सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सचे थोडेसे मताधिक्य आहे. बायडेन आणि ट्रम्प दोघेही विभाजित सिनेट टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.

विवेक मिश्रा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राम’चे फेलो आहेत.

सचिन तिवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अमेरिकी स्टडीज प्रोग्रामसह डॉक्टोरल उमेदवार आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Vivek Mishra

Vivek Mishra

Vivek Mishra is a Fellow with ORF’s Strategic Studies Programme. His research interests include America in the Indian Ocean and Indo-Pacific and Asia-Pacific regions, particularly ...

Read More +
Sachin Tiwari

Sachin Tiwari

Dr. Sachin Tiwari is a research associate(honorary) at the Kalinga Institute of Indo-Pacific Studies, New Delhi. He has earned his PhD in International Relations specializing ...

Read More +