Authors : Neha Sinha | Sumit Roy

Expert Speak India Matters
Published on Mar 30, 2024 Updated 0 Hours ago

वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पीक उत्पादनाचा समतोल साधण्याचा विचार ज्या वेळी प्रामुख्याने केला जातो, तेव्हा भारत या मार्गाने नेतृत्व करू शकतो, ही बाब स्पष्ट होते. 

वन्यजीव-अनुकूल उत्पादनांसाठी योग्य फ्रेमवर्कच्या दिशेने

नुकताच उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये एका वाघिणीचा भिंतीवर बसलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही वाघीण शेतं ओलांडून गावात पोहोचली होती; तिला पाहण्यासाठी गर्दी जमली म्हणून ती भिंतीवर बसली. गेल्या वर्षी जुलै महिन्यातही याच परिसरात एका शेतातून वाघ गेला होता. त्याच्या मागे एक शेतकरी ट्रॅक्टर चालवताना दिसला. स्थानिक समुदायांसाठी, वाघ आणि इतर मोठे सस्तन प्राणी त्यांच्या शेतात दिसणे सामान्य आहे - हे कृषी क्षेत्र धोक्यात आलेल्या वन्यजीवांसाठी निवासस्थान किंवा हालचालींचे मार्ग आहेत. तरीही, काही चकमकींमुळे जमिनी आणि संसाधनांसाठी तीव्र स्पर्धा निर्माण होते, ज्याची शेतकऱ्यांना मानसिक किंमत मोजावी लागते.

स्थानिक समुदायांसाठी, वाघ आणि इतर मोठे सस्तन प्राणी त्यांच्या शेतात दिसणे सामान्य आहे - हे कृषी क्षेत्र धोक्यात आलेल्या वन्यजीवांसाठी निवासस्थान किंवा हालचालींचे मार्ग आहेत.

प्राण्यांद्वारे पिकाचे नुकसान सध्या वनविभागांद्वारे भरपाईच्या उपाययोजनांद्वारे संबोधित केले जाते. परंतु ते फॉर्म भरणे आणि नुकसान सिद्ध करणे यावर अवलंबून आहे. शेतकऱ्याने नुकसान सिद्ध करण्यावर भर देण्याऐवजी, आम्ही एक बाजार-आधारित उपाय सुचवतो ज्यामध्ये शेतकऱ्याला वन्यप्राण्यांनी पिकांच्या शेताचा वापर केल्यामुळे होणारे नुकसान भरून काढता येईल. आम्ही वन्यजीव-अनुकूल उत्पादनांसाठी एक आराखडा सुचवितो आहोत, ज्यात बाजार-आधारित पध्दतीने मदत केली जाते ज्यामुळे बाजारातील शेतकऱ्याच्या सहभागाला चालना मिळते आणि वन्यजीव-अनुकूल उत्पादनांसाठी प्रीमियम ऑफर होतो.

WWF-India द्वारे सुरू केलेल्या अप्रकाशित बाजार-आधारित ग्राहक धारणा अभ्यासाने उपयुक्त परिणाम दिले आहेत. हे सर्वेक्षण गुरुग्राम, बेंगळुरू आणि मुंबई (त्यांच्या उच्च-मूल्याच्या बाजारपेठेसाठी निवडलेले), इंदूर (सुप्रसिद्ध मध्य भारतीय जंगलांजवळ स्थित) आणि कोची (जे निसर्गावर आधारित किंवा सेंद्रिय उत्पादनांसाठी विद्यमान बाजारपेठ आहे) येथे केले गेले. असे आढळून आले की उच्च श्रेणीचे ग्राहक एका प्रमाणपत्राच्या संचाला अधिक महत्त्व देतात. उदाहरणार्थ अभ्यास प्रतिसादकर्त्यांनी उघड केले की ते वन्यजीव-अनुकूल उत्पादनांसाठी प्रीमियम भरण्यास तयार आहेत जे सेंद्रिय देखील आहेत. अभ्यासात असेही आढळून आले की लोक डाळी/संत्री यांसारख्या उत्पादनांमध्ये अधिक रस घेतात. उच्च श्रेणीचे ग्राहक वन्यजीव-अनुकूल उत्पादनांसाठी भरण्यास इच्छुक असलेले प्रीमियम विशिष्ट उत्पादन श्रेणीनुसार प्रमाणित सेंद्रिय किमतींपेक्षा 13 टक्के ते 40 टक्क्यांपर्यंत बदलते. गैर-सेंद्रिय उत्पादनांच्या तुलनेत 30 ते 70 टक्क्यांपेक्षा जास्त आकडे सह हे पैसे देण्याच्या इच्छेची लक्षणीय क्षमता दर्शवीणारे आहे. 

डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या जैवविविधतेवरील संयुक्त राष्ट्र संघाच्या पक्षांच्या 15 व्या अधिवेशनात भारताने जागतिक जैवविविधता फ्रेमवर्क (GBF) ला सहमती दर्शवली आहे. या सर्वसमावेशक फ्रेमवर्कमध्ये निसर्ग संवर्धन आणि शाश्वत शेतीसाठी नवीन वचनबद्धतेचा समावेश आहे. 2030 पर्यंत आपण प्रजातींचा नाश थांबवला पाहिजे. आपली 30 टक्के जमीन आणि पाण्याचे संरक्षण केले पाहिजे. शेती अधिक शाश्वत केली पाहिजे आणि अतिरिक्त कीटकनाशके 50 टक्के कमी केली पाहिजेत. प्रजातींचे संवर्धन हे केवळ संरक्षित क्षेत्रातील प्राण्यांसाठी नाही; हे शेतात आणि मोठ्या लँडस्केपमध्ये वन्यजीवांशी संवाद व्यवस्थापित करण्याबद्दल देखील आहे. एका अंदाजानुसार 20 टक्क्यांहून अधिक वाघ भारतातील संरक्षित क्षेत्राबाहेर आहेत. हत्तींसाठी ही संख्या आणखी जास्त आहे—हत्तींच्या श्रेणीतील ६० ते ८० टक्के भाग संरक्षित क्षेत्राबाहेर आहे. कृषी क्षेत्र हे मोज़ेकचा भाग आहेत जे वन्य प्राणी सुरक्षित अधिवासाकडे जाताना वापरतात. ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा सोन चिडिया सारख्या काही गंभीरपणे धोक्यात आलेल्या प्रजातींसाठी, कृषी भूदृश्ये त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा एक महत्त्वाचा भाग बनतात. त्यामुळे वन्यजीवांचे रक्षण करणे आणि शेती करणाऱ्या समुदायांना मदत करणे ही मुख्य गोष्ट म्हणजे वन्यजीव-अनुकूल, संघर्षमुक्त कृषी क्षेत्रे राखणे. वन्यजीव-अनुकूल उत्पादन दृष्टीकोन जागतिक जैवविविधता फ्रेमवर्क अंतर्गत अनेक लक्ष्ये साध्य करण्यात मदत करेल.

वन्यजीव-अनुकूल उत्पादन फ्रेमवर्कचे उद्दिष्ट आहे की, वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पीक उत्पादन अशा प्रकारे कसे साध्य केले जाऊ शकते जे वन्यजीवांना होणारी हानी कमी करून उपजीविका सुनिश्चित करते. वन्यजीव-अनुकूल उत्पादनांसाठी प्रमाणपत्रे अस्तित्वात आहेत. उदाहरणांमध्ये कंबोडियन आयबिस तांदूळ आणि चहा यांचा समावेश होतो जे हत्तींसाठी अनुकूल अशा पद्धतीने तयार केले जातात. ही पिके उत्पादन प्रक्रियेत जनावरांना हानी पोहोचवत नाहीत आणि प्रीमियमवर विकली जातात. तरीही, तत्सम पद्धती भारतात पूर्णपणे मुख्य प्रवाहात येणे बाकी आहे. खालील परिच्छेद आणि तक्त्यामध्ये, आम्ही वन्यजीव-अनुकूल उत्पादनांसाठी व्यावहारिक दृष्टिकोनाची रूपरेषा दिली आहे.

वन्यजीव-अनुकूल उत्पादन फ्रेमवर्कचे उद्दिष्ट आहे की वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पीक उत्पादन अशा प्रकारे कसे साध्य केले जाऊ शकते जे वन्यजीवांना होणारी हानी कमी करून उपजीविका सुनिश्चित करते.

वन्यजीव-अनुकूल उत्पादने कशी तयार केली जातात?

यासाठी एक कृषी-पर्यावरणीय दृष्टीकोन वापरला जाईल, ज्यामुळे मानवी आरोग्य, जैवविविधता आणि वन्यजीवांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जास्त रासायनिक वापर टाळता येईल. सेंद्रिय पद्धतीने किंवा कमीत कमी रासायनिक वापराने पिकांची वाढ केल्यास उत्पादनाचे आरोग्य आणि फायदे वाढतील. वन्यजीवांना विषबाधा होण्याची शक्यता कमी होईल. उत्पादनाचा प्रीमियम-विक्रीची किंमत—कमी रासायनिक वापरापासून ते पूर्णपणे सेंद्रिय उत्पादनापर्यंतच्या स्पेक्ट्रमवर आधारित ठरवता येते. मातीच्या पुनरुत्पादनासाठी आणि विविध परागणांना मदत करण्यासाठी पीक विविधतेला प्रोत्साहन दिले जाईल. ही संकल्पना खालील तक्ता 1 मध्ये स्पष्ट केली आहे.

संसाधन किंवा उत्पादनाचे कोणतेही अतिउत्पादन होणार नाही याची खात्री करणे हे पुढील ध्येय असेल; त्याऐवजी, वाजवी व्यापार पद्धतींचा वापर करून लहान-प्रमाणात परंतु शाश्वतपणे उत्पादित केलेल्या वस्तूंचे उद्दिष्ट असेल (कृपया तक्ता 1 मधील मुद्दा 4 पहा).

तक्ता 1. वन्यजीव अनुकूल उत्पादनांसाठी संकल्पना मॅट्रिक्स.

Concept Criteria Limitations and assumptions
  1. ‘Wildlife friendly’
  • No poisoning, and no animal was actively harmed
  • No traps, or baits were set
  • Some amount of ecological integrity is maintained—water sources are not cut off for wildlife    
Animals may be chased from fields   In the beginning, this will be for select areas with high wildlife populations
2. Sustainable
  • Can be a spectrum from organic (no chemicals) to low chemical use
  • Is regenerative—soil health is insured  
Is process-based, and timelines or outcomes cannot be fully predicted. Regenerative agriculture can be time-consuming.
3. Fields as Habitat/wildlife corridor
  • Farmer plants diverse, native species to provide wildlife habitat
  • Coffee estates with more native, shade trees  leads to more biodiversity
  • Plantations/fields allow for wildlife permeability
  • No major alteration was done to natural features  
Focus will be on already biodiverse areas, such as tiger reserve fringes and biodiversity hotspots. In effect, may not cover other regions.    
4. Trade is fair/ community friendly concept
  • Fair practices
  • Goods are small-scale and sustainable
  • Premium helps them cover losses + grow socially  
Requires a certification and monitoring scheme.    

दुसरे म्हणजे, ज्या भौगोलिक स्थानांवर धोक्यात असलेल्या प्राण्यांची लोकसंख्या आहे किंवा संवर्धनासाठी प्राधान्य दिलेली ठिकाणे समाविष्ट आहेत, अशा भौगोलिक स्थानांवर लक्ष केंद्रित करून ही संकल्पना चालविली जाऊ शकते. उदाहरणार्थ, ही संकल्पना व्याघ्र प्रकल्पांच्या बफर भागात, संरक्षित क्षेत्रांचे इको-सेन्सिटिव्ह झोन आणि दोन व्याघ्र अभयारण्यांमधील वन्यजीव कॉरिडॉरमध्ये लागू केली जाऊ शकते.

नैतिक आणि शाश्वत उपभोगाची वाढती जागतिक जागरूकता वन्यजीव-अनुकूल उत्पादनांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारी आहे. जागरूक ग्राहक सक्रियपणे त्यांच्या मूल्यांशी संरेखित वस्तू शोधतात, नैतिक पद्धती आणि वन्यजीव संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढवतात. हे वैध वन्यजीव-अनुकूल गुणधर्मांची पडताळणी करण्यावर चर्चा करण्यास आणि उत्पादनांचे वास्तविक संवर्धन परिणाम जाणून घेण्याचा ग्राहकाचा अधिकार मान्य करण्यावर चर्चा करण्यास प्रवृत्त करणारे आहे.

शेवटी, शेतकऱ्यांना हँडहोल्डिंग आणि मार्केट लिंकेज प्रदान करणे आणि त्रयस्थ पक्षाद्वारे मूल्यमापन केले जाऊ शकणारे निर्देशक आणणे अत्यावश्यक असेल. लोक आणि वन्यजीव दोघांनाही अनुकूल अशी हिरवीगार शेतं असणे शक्य आहे का? या दृष्टिकोनामुळे परिणाम येण्यास वेळ लागेल आणि हे सर्व ठिकाणांसाठी उपयोगी ठरणार नाही. तरीही, आम्हाला विश्वास आहे की हे शक्य आहे आणि भारत या संदर्भात नेतृत्व करण्यासाठी योग्य ठिकाणी आहे.


नेहा सिन्हा या WWF इंडियाच्या पॉलिसी आणि कम्युनिकेशनच्या प्रमुख आहेत.

सुमित रॉय हे WWF इंडियाचे प्रौडक्शन लँडस्केप प्रमुख आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.