Published on Nov 06, 2023 Updated 0 Hours ago

इस्रायल आणि हमास यांच्यातील सध्याच्या संघर्षाची गुंतागुंत लक्षात घेतली तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे हा तणाव संपविण्यासाठी रशिया बहुतेक राजनैतिक प्रयत्न वाढविण्याची शक्यता आहे.

इस्रायल-हमास युद्धातील रशियाच्या प्रतिसादाच्या बारकाव्यांचे विश्लेषण

इस्रायलवर हमासच्या 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या अभूतपूर्व हल्ल्यामुळे उद्भवलेल्या मध्य पूर्व (पश्चिम आशिया) मधील सध्याच्या संकटाचा मॉस्को लाभार्थी आहे, असे म्हणणे एक निराधार वृत्त बनले आहे. यामागील एक युक्तिवाद असा आहे की, इस्रायलच्या हमासबरोबरच्या युद्धामुळे रशिया-युक्रेन लष्करी संघर्षावरून पाश्चात्यांचे लक्ष विचलित होते. दुसरीकडे कीवला लष्करी पुरवठा खंडित होऊ शकतो. हे खरे असले तरी या प्रदेशातील वाढत्या तणावाने रशियासाठी एक प्रकारे मोठे आव्हानच उभे केले आहे. कारण रशियाला एकमेकांचे शत्रू आणि विरोधक असलेल्या भागीदारांमध्ये काळजीपूर्वक नेव्हिगेट करणे भाग पडले आहे.

मध्यपूर्वेतील रशियाची भूमिका

रशियाने आपले हवाई दल आणि मर्यादित लष्करी तुकडी 2015 पासून पाठवून सीरियाच्या गृहयुद्धामध्ये एक प्रकारे हस्तक्षेप केलेला आहे. या प्रदेशातील प्रमुख शक्ती म्हणून त्यावेळी मास्को कडे पाहिले गेले आहे. याबरोबरच रशिया सीरियाच्या पलीकडे मध्यस्थ आणि स्थिर शक्ती म्हणून स्वतःचा प्रचार करत आहे. विशेषत: मश्रेक उप-प्रदेशात ज्या ठिकाणी तो पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्ष[१] आणि लेबनॉन [२] मधील परिस्थितीच्या निराकरणात सामील झालेला आहे.

एक युक्तिवाद असा आहे की, इस्रायलच्या हमासबरोबरच्या युद्धामुळे रशिया-युक्रेन लष्करी संघर्षावरून पाश्चात्यांचे लक्ष विचलित होते. दुसरीकडे कीवला लष्करी पुरवठा खंडित होऊ शकतो.

रशियाबरोबर सुदृढ संबंध राखण्यासाठी स्वतःच्या अत्यावश्यकता असल्याने मध्यपूर्वेतील शक्तींनी रशियन अर्थव्यवस्थेविरुद्ध युनायटेड स्टेटस(US) निर्बंधांचे पालन करण्यास दुर्लक्ष केले आहे. तर दुसरीकडे रशियाला महत्त्वपूर्ण वस्तू आणि सामग्रीच्या पुरवठ्यासाठी लॉजिस्टिक केंद्र म्हणून उदयास देखील आलेले आहे. तुर्कीशी रशियाचे आर्थिक संबंध वाढत आहेत. इराण एक सामरिक भागीदार बनला आहे. रशियाला अत्यंत आवश्यक संरक्षण उपकरणांचा पुरवठादार बनलेला आहे. सौदी अरेबिया तेल बाजार आणि किंमतींचे प्रभावीपणे नियमन करण्यासाठी तेल उत्पादनांवर जवळून समन्वय साधत आहे. तसेच संयुक्त अरब अमिरातीने (UAE) रशियन राजधानीसाठी सुरक्षित बंदर दिलेले आहे. रशिया युक्रेन यांच्यातील संघर्षावर इजिप्तने तटस्थता राखलेली आहे तर कीवला शस्त्र पाठविण्याचा मुद्द्यावर विरोध केलेला आहे.

याबरोबरच युक्रेन मधील संघर्षाचा या प्रदेशातील रशियाच्या भूमिकेवर देखील परिणाम झालेला आहे. इस्रायलसोबतचे द्विपक्षीय संबंध विशेषत: पंतप्रधान यायर लॅपिड यांच्या सरकारशी तणावाखाली होते. नेतान्याहू सत्तेवर परतल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी त्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे संबंध अधिक संतुलित झाले आहेत. युक्रेनमधील रशियाच्या कृतींबद्दल स्पष्टपणे बोलण्याच्या परंतु युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यास नकार देण्याच्या इस्रायलच्या दृष्टिकोनाचे मॉस्कोने कौतुक केले आहे. इस्रायल आणि रशिया यांच्यातील संबंधात आर्थिक सहकार्य आणि जवळचे लोकांचे संबंध महत्त्वाचे चालक आहेत. तरीही तेल अवीवची वॉशिंग्टनशी असलेली जवळीक ही भागीदारीसाठी एक प्रकारे मर्यादाच आहे.

नेतान्याहू सत्तेवर परतल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी त्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक संतुलित झाले आहेत.

फेब्रुवारी 2022 पासून रशियाच्या मध्यपूर्व धोरणामध्ये तेहरान बरोबर असलेले संबंध वाढविणे हा सर्वात मोठा परिणामकारक बदल म्हणावा लागेल. या प्रदेशातील इतर अनेक रशियन भागीदारांच्या विरोधात, इराण लष्करी आणि राजकीय दोन्ही समर्थन पुरवत आहे. ज्यामुळे भूतकाळातील द्विपक्षीय मतभेद कमी होण्यास मदत झाली असून धोरणात्मक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रगतीचा नवा मार्ग मोकळा झाला आहे. पश्चिम विरोधातील सामायिक स्पष्ट दृष्टिकोनामुळे रशिया आणि इराण यांना एकत्र आणणारा महत्त्वाचा संपर्क ठरला आहे.

सीरियासाठी, युक्रेनवर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे रशियाला या प्रदेशात आपले लष्करी अस्तित्व वाढवता आलेले नाही. पोर्ट सुदान येथे नौदल लॉजिस्टिक सुविधा स्थापन करण्याची मॉस्कोची योजना प्रत्यक्षात आलेली नाही. त्याने सिरियातील टार्टस येथे नौदल तळ विकसित केला आहे. S400 आणि S300 पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा सीरियातील हमीमिम एअरबेसवर तैनात करण्यात आली आहेत. याबरोबरच सीरियन राजवटीच्या लष्करी पायाभूत सुविधांवर इराणी समर्थक प्रॉक्सींना मारण्यापासून इस्रायलला प्रतिबंधित करण्यात आले आहे. मर्यादित स्वरूपातील लष्करी उपस्थिती राखून मॉस्कोने सीरिया वरील मुत्सद्देगिरीसाठी काही प्रमाणात जागा राखून ठेवलेली आहे. ‘अस्ताना फॉरमॅट’मध्ये तुर्की आणि इराणच्या संपर्कात आहे – जरी या तिघांना चर्चेसाठी नवीन ठिकाण शोधावे लागत असले तरी देखील.

पोर्ट सुदान येथे नौदल लॉजिस्टिक सुविधा स्थापन करण्याची मॉस्कोची योजना प्रत्यक्षात आलेली नाही.

याबरोबरच मास्कोच्या सहभागाशिवाय अनेक प्रादेशिक घडामोडी घडलेल्या आहेत. तेहरान आणि रियाध यांच्यातील राजनैतिक संपर्कांना अनुमती देऊन सौदी-इराण करारात चीनने दलाली केली आहे. यूएई, बहरीन, मोरोक्को आणि सुदान यांच्याशी इस्रायलचे संबंध सामान्य करून अब्राहम कराराची सोय अमेरिकेनेच केली आहे. यामुळे I2U2 (भारत-इस्रायल-यूएई-यूएस) गट आणि भारत-मध्य-पूर्व-युरोप कॉरिडॉर (आयएमईसी) चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यासारख्या प्रदेशातील विविध यूएस-नेतृत्वाखालील आर्थिक उपक्रमांचा मार्ग जो या भागातील निरोगी लोकांवर अवलंबून आहे, मोकळा झाला आहे. इस्रायल आणि आखाती राजे यांच्यातील संबंध अधिक दृढ झालेले दिसतात.

दहशतवादाचा सराव करणारे गैर-दहशतवादी

मास्को मध्ये सध्या निर्माण झालेल्या संकटावरील अधिकृत विधानांमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाचा संदर्भ देण्यात आला असून हमासच्या इस्रायल वरील प्रारंभिक हल्ल्याचा फारसा उल्लेख मात्र दिसत नाही. रशियन अधिकार्‍यांचा असा अर्थ आहे की 7 ऑक्टोबर रोजी झालेला हल्ला हा कधीही न संपणार्‍या संघर्षातील आणखी एक कृती होती जी द्वि-राज्य समाधानाचा फॉर्म्युला अंमलात आणल्याशिवाय सोडवता येणार नाही. या संघर्षाकडे पाहण्याचा मास्कोचा दृष्टिकोन त्यांच्या दीर्घकाळ टिकलेल्या दृष्टीवर आधारित आहे असे म्हणावे लागेल. ज्यामध्ये दोन्ही बाजू कायम हिंसाचारासाठी जबाबदार धरण्यात आलेल्या आहेत, असे मत रशियाचे माजी पंतप्रधान येवगेनी प्रिमाकोव्ह यांनी मांडले होते.  ज्यांचा वारसा अजूनही रशियन परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकतो: “…इस्रायली कृत्यांमुळे केवळ इस्रायली विरुद्धच्या दहशतवादी कृत्यांचाच नव्हे तर “सूड” म्हणून महिला आणि मुलांसह पॅलेस्टिनी नागरिकांचे प्राण गेले आहेत. परंतु व्याप्त प्रदेशात इस्रायली सैनिकांसोबत सशस्त्र चकमकींसाठी देखील […], [तर] पॅलेस्टिनी बाजू अनेकदा नागरिकांविरुद्ध इस्रायली लष्करी कारवाईला प्रतिसाद म्हणून दहशतवादी कृत्यांचे समर्थन केले जात आहे. याचा परिणाम म्हणजे दहशतवादी हिंसेचे एक दुष्ट वर्तुळ तयार झाले आहे जे जर एका प्रकारचा दहशतवाद गुन्हा मानला गेला आहे. दुसरा न्याय्य मानला गेला तर तो मोडता येणार नाही.” प्रिमाकोव्हच्या दृष्टिकोनाचे प्रतिध्वनीत व्लादिमीर पुतिन यांनी सध्याच्या इस्रायल-हमास युद्धाविषयीच्या त्यांच्या टिप्पण्यांमध्ये नमूद केले: “इस्राएलला इतिहासात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. त्याच्या अंमलबजावणीचे स्वरूप, त्याची क्रूरता […] इस्रायल मोठ्या प्रमाणावर आणि बर्‍याच क्रूर पद्धतींनी प्रतिसाद देत आहे.” उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रपतींच्या वेबसाइटवर पाहिले तर, जेव्हा रशियन राष्ट्राध्यक्षांनी इस्त्रायली पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला – शोकांतिकेच्या केवळ नऊ दिवसांनंतर – पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी त्यांच्या संभाषणात, त्यांनी हमासला जबाबदार म्हणून नाव देणे त्यांनी टाळलेले दिसते. या हल्ल्यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत रशियाने प्रस्तावित केलेल्या ठरावात हमासला ला देखील बोलावले गेले नाही जे अन्य सदस्यांकडून पाठिंबा मिळवण्यात यशस्वी होण्याचे एक मोठे कारण आहे.

मॉस्कोचा संघर्षाकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्याच्या दीर्घकाळ टिकलेल्या दृष्टीवर आधारित आहे ज्यामध्ये दोन्ही बाजू कायम हिंसाचारासाठी जबाबदार आहेत.

या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की अमेरिका, युनायटेड किंगडम (UK) युरोपियन युनियन (EU) इस्रायल आणि अन्य काही देशांप्रमाणेच रशिया अधिकृतपणे हमासला दहशतवादी संघटना मानत नाही. जरी त्याच्या गटाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात भिन्न  आहेत तरी देखील. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस रशिया-इस्रायल संबंध सुधारत असताना, रशियन प्रतिनिधींनी हमासला “इस्लामिक कट्टरपंथी” आणि “अतिरेकी” असे लेबल लावले होते.  त्यांच्या कृत्यांना “अमानवीय गुन्हे, “गुन्हेगारी आणि बेपर्वा चुकीचे कृत्य” म्हटले होते.

2006 च्या निवडणुकीमध्ये हमासने रशियाच्या दृष्टीने विजय मिळविल्यानंतर मॉस्कोचे वकृत्व बदललेले दिसत आहे. मुलगा आणि विरोधक बनवून कायदेशीर शक्तीमध्ये त्याचे परिवर्तन झालेले आहे. हमास पॉलिटिकल ब्युरोचे तत्कालीन नेते खालेद मशाल यांचे यजमानपद भूषविणारे रशिया देखील पहिले होते. त्यामुळे त्यांच्या चळवळीला एक प्रकारे आंतरराष्ट्रीय वैधता प्राप्त झाली आहे.  मे 2010 मध्ये सीरियाच्या भेटीदरम्यान, रशियाचे तत्कालीन अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी मशाल आणि सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांची भेट घेतली. तथापि, 2010 च्या दशकात सीरियामध्ये रशिया आणि HAMAS वेगळे झाले. कारण मॉस्को असादच्या बाजूने उभा राहिला तर हमासने विरोधी शक्तींची बाजू घेतली. हा एक मोठा फरक असूनही मॉस्कोने हमासचे दहशतवादी म्हणून वर्णन करणे टाळले आहे. राष्ट्रीय विधान मंडळ आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या सरकारमधील प्रतिनिधींसह पॅलेस्टिनी समाजाचा अविभाज्य भाग” आहेत यावर ठाम विश्वास ठेवलेला.

2022 पासून, अनेक प्रसंगी, मॉस्कोने राजकीय ब्युरो चीफ इस्माईल हनीयेह यांच्या नेतृत्वाखाली HAMAS शिष्टमंडळाचे आयोजन केले आहे ज्यांनी रशियन अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. ज्यात परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह आणि मध्य पूर्व प्रदेशाचे प्रभारी त्यांचे उप मिखाईल बोगदानोव्ह यांचा समावेश आहे. विविध पॅलेस्टिनी गटांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी मॉस्कोने दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नांबद्दल इस्रायलला सूचित करणे हे या संपर्कांचे उद्दिष्ट आहे. हमास आणि इस्रायलमधील संघर्ष तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना आणि हमासने दोन रशियन नागरिकांसह ओलिस ठेवले होते. या गटाच्या राजकीय शाखेची प्रस्थापित संबंध असल्यामुळे मास्कोला या लोकांची सुटका करण्यास फारशी मदत झाली नाही.

इस्रायल आणि आम्हास यांच्यातील सध्या सुरू असलेल्या संघर्षाची जटिलता लक्षात घेता संपूर्ण प्रदेशांमध्ये हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. रशिया कदाचित हा तणाव संपुष्टात आणण्यासाठी त्यांच्या राजकीय प्रयत्नांसह पुढे जाण्याची शक्यता आहे. सीरिया आणि लेबनॉनच्या प्रदेशापर्यंत युद्धाचा विस्तार करणे इस्रायल आणि इराण यांच्यात थेट संघर्ष घडवणे मास्कोच्या हितासाठी हानिकारक ठरेल. याचे कारण म्हणजे ते सध्या आपल्या सेमी पासून दूर होणाऱ्या कोणत्याही लष्करी कुरबोरीमध्ये स्वतःला गुंतविण्यास तयार नाहीत.

नंदन उन्नीकृष्णन हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे प्रतिष्ठित फेलो आहेत.

अलेक्सेई झाखारोव्ह हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामसह व्हिजिटिंग फेलो आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.