Published on Oct 30, 2023 Updated 0 Hours ago

या वर्षाच्या शेवटी एक नवा शब्द मेरियम-वेबस्टरच्या शब्दकोशात एन्ट्री करू शकतो. विशेष म्हणजे 2023 चा एक नवा शब्द बनण्याची यात क्षमता आहे. त्याचं नाव आहे - "जिओशॅमिटिक्स."

भडकलेल्या भूराजकारणाचा नवा शब्दसंग्रह

या वर्षाच्या शेवटी एक नवा शब्द मेरियम-वेबस्टरच्या शब्दकोशात एन्ट्री करू शकतो. विशेष म्हणजे 2023 चा एक नवा शब्द बनण्याची यात क्षमता आहे. त्याचं नाव आहे – “जिओशॅमिटिक्स.”

20 शब्दांमध्ये याची व्याख्या करायची झालीच तर, “एखाद्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रामध्ये भू-राजकीय फायदा मिळवण्यासाठी सार्वजनिक कलंकाचा वापर एका साधन स्वरूपात वापर करणे.”

प्रामुख्याने स्थानिक राजकीय मतदारसंघांना सेवा देण्यासाठी वापरला जाणारे, जिओशामिटिक्स हे एक असं साधन आहे ज्यात वर्चस्व निर्माण केलं जातं. यात गुंतलेल्या लोकांची गुन्हेगारी प्रवृत्ती लपविण्यासाठी अनेकदा जिओशॅमिटिक्स हे हत्यार म्हणून वापरलं जातं. आपल्या लाजिरवाण्या कथनांना सामर्थ्य देण्यासाठी सखोल स्थितीचा वापर करून जिओशामिटिक्स लोक माध्यम आणि थिंक टँकची ‘विश्वसनीयता’ वापरून स्वतःच्या सरकारची फसवणूक करतात. परिणामी देशाची छाप एक कमकुवत आणि अपरिपक्व राष्ट्र अशी पडते.

आपल्या लाजिरवाण्या कथनांना सामर्थ्य देण्यासाठी सखोल स्थितीचा वापर करून जिओशामिटिक्स लोक माध्यम आणि थिंक टँकची विश्वसनीयतावापरून स्वतःच्या सरकारची फसवणूक करतात.

बहुधा, जिओशामिटिक्सचा दिखावा करणारे नेते बालिश असतात, ते लोकांसमोर भव्यतेचा भ्रम उभा करतात. पण काहीवेळा, हे सत्तेचा वर्णद्वेषीपणा अधोरेखित करते. सत्ताप्रमुखाकडून झालेला अपमान यात केंद्रबिंदू ठरतो. त्यानंतर मग आजूबाजूच्या लांडग्यांची टोळी सक्रिय होते. हे सगळे एकत्र येऊन त्या सत्ताप्रमुखावर हल्ला चढवतात. यात त्यांचा संदेश स्पष्ट असतो की, आम्ही वाइल्ड व्हाईट वेस्ट आहोत आणि तुम्ही काळया लोकांनी एकत्र एका ओळीत थांबायचं नाहीतर निघून जायचं.

जिओशॅमिटिक्सच्या कल्पनेचा उगम बहुधा शीतयुद्धाच्या काळात झाला असावा. कारण त्याकाळात वाटाघाटीऐवजी एखाद्या सत्ताप्रमुखावर आरोप करणं मोठं साधन बनलं होतं. त्यावेळी राजनैतिक माध्यमांच्या कमतरतेमुळे बनावट गोष्टी रचून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रमाण वाढलं होतं. आरोप-प्रत्यारोप हे नवीन माध्यम बनलं.

टीप : खोट्या कथा रचणं आणि त्या प्रसिद्ध करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तर जिओशॅमिटिक्स ही वेगळी गोष्ट आहे. पुढच्या टप्प्यात हा खेळ राष्ट्रांद्वारे खेळला जाऊ लागला. खोट्या कथनाचे एकमेव बळी अशा व्यक्ती किंवा मीडिया कंपन्या असतात ज्या थोड्या काळासाठी विश्वासार्हता गमावतात.

जिओशॅमिटिक्स एक जटिल संकल्पना आहे. उदाहरणार्थ एखाद्या देशाच्या प्रवक्त्याने, परराष्ट्र मंत्री आणि क्वचित प्रसंगी सरकार प्रमुखाने दुसऱ्या देशाच्या हेतूवर किंवा कृतीवर केलेला थेट आरोप म्हणजे जिओशॅमिटिक्स म्हणता येईल. जिओशॅमिटिक्सची क्रूरता मुत्सद्देगिरीची सुसंस्कृतता स्पष्ट करते.

मुत्सद्दीपणा एक परिपक्व आणि अदृश्य संभाषण असतं. म्हणजे यात दोन राष्ट्र आडमार्गाने बोलत असतात. कारवाईची दिशा स्पष्ट करत असतात. जर बैठक सार्वजनिक असेल, जसं की जी – 20 सारखी परिषद तर त्यात मोठे मुद्दे चर्चेसाठी घेतले जातात. रीडआउट्समध्ये एम्बेड केले जातात. पण खरी चर्चा तर कार्यक्रम संपल्यानंतरही चालूच असते. जेव्हा एखादा नेता देशांतर्गत मतदार संघातून पाठिंबा मिळवण्यासाठी या नियमांचे उल्लंघन करतो आणि ही चर्चा सार्वजनिक करतो, त्याला भूशास्त्रीय राजकारण म्हणता येईल.

खोट्या कथनाचे एकमेव बळी अशा व्यक्ती किंवा मीडिया कंपन्या असतात ज्या थोड्या काळासाठी विश्वासार्हता गमावतात.

जिओशॅमिटिक्स हे बऱ्याचदा पाश्चिमात्य देशांकडून अवलंबिलं जाणारं धोरण आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताविरोधात काढलेले उदाहरण त्याचंच एक ताजं उदाहरण आहे. भारताचा शेजारी पाकिस्तान, चीन, कॅनडा यांनी भारताविरुद्ध दहशतवादाचा वापर करून स्वत:ला हायफन केलं आहे. पाकिस्तानने 1947 पासून काश्मीरभोवती भू राजकारण खेळलं आहे. उत्तर कोरिया, इराण, रशिया आणि चीन नियमितपणे अमेरिकेसोबत भू-राजकीय खेळ खेळत आहेत. दक्षिण चीन समुद्राच्या आसपासचे देश आणि चीन, जपान आणि चीन, तैवान आणि चीन, क्युबा व्हेनेझुएला आणि अमेरिका, रशिया आणि युक्रेन, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ही सगळी याचीच उदाहरणं आहेत. ही यादी भली मोठी आहे आणि यात सातत्याने भर पडतच आहे.

या सर्व नाटकांना जोडणारी एक गोष्ट म्हणजे संवादाच्या राजनैतिक माध्यमांची अनुपस्थिती कमालीची कमकुवत आहे. राजनैतिक प्रतिनिधी उपस्थित तर असतात, पण केवळ निकष पूर्ण करतात. संभाषण पुढे नेण्यासाठी कोणत्याच हालचाली करत नाहीत तेव्हा भू-राजकीय गतिरोधाची स्थिती उत्पन्न होते. यात राष्ट्रीय हितसंबंध राष्ट्रीय अहंकारापेक्षा मोठे असतात. उदाहरणार्थ अमेरिका आणि चीन, युरोपियन युनियन आणि रशिया यांच्यात सुरू असलेले वाद. काही देश त्यांच्या निवडणुकीतील रशियाचा हस्तक्षेप पुरावा म्हणून देतात.

लोकशाहीच्‍या समुदायात स्‍वातंत्र्याला महत्त्व देणाऱ्या राष्‍ट्रांच्या समुहामध्‍ये जिओशामिटिक्सला जागा नाही. हे संबंध आहेत. याचा अर्थ असा नाही की कोणत्याही समस्या नाहीत. भारताच्या अमेरिका आणि युरोपीय संघासोबत अनेक समस्या आहेत आणि भारताने त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा इंडोनेशियाशी तणाव होता, तो निवळला आहे. ऑस्ट्रेलियाचे संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. सौदी अरेबियासारख्या गैर-लोकशाही राष्ट्रांमध्ये, भारत इस्लामिक दहशतवादाला मिळणारी आर्थिक मदत तोडण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाबरोबर तेल आणि शस्त्रास्त्रांचे हितसंबंध आहेत. उघड शत्रू राष्ट्र असलेल्या चीनसह भारत सीमेवर तणाव असला तरी व्यापार वाढतोच आहे. या वाटाघाटींच्या आसपासचा तणाव कुठेही सार्वजनिक केलेला नाही. जिओशॅमिटिक्स हे भारताची चाल नाहीये. पण एकदा हल्ला केल्यावर आरोपांचा प्रतिकार करण्यासाठी भारत देखील पुरावे मागतो.

सौदी अरेबियासारख्या गैर-लोकशाही राष्ट्रांमध्ये, भारत इस्लामिक दहशतवादाला मिळणारी आर्थिक मदत तोडण्याचा प्रयत्न करत आहे.

पाश्चिमात्य देशांसाठी भूतकाळात जिओशामिटिक्सने चांगलं काम केलंय म्हणून आज किंवा भविष्यात ते चांगलंच काम करेल हे त्यांचं अज्ञान आहे. एक समूह म्हणून, पश्चिम अजूनही राष्ट्रांचा सर्वात श्रीमंत गट असू शकतो. पण ते स्वतःच्याच बनवलेल्या विरोधाभासांमध्ये अडकलेले आहेत. त्यांची आत्म – विध्वंसक इमिग्रेशन धोरणे, कमी होत जाणारा प्रजनन दर यामुळे सॅन फ्रान्सिस्को जरी एक वैभवशाली शहर असेल तरी ते आत्ममग्न राजकारण करणारं नरक ठरू लागलंय.

भारतासारख्या देशांसोबत संबंध ठेवताना पाश्चिमात्य देश जर जिओशॅमिटिक्स हे एकमेव चलन वापरत असतील तर भविष्य खराब झालंच म्हणून समजा. कारण कायद्याच्या राजवटीचा हसतमुख मुखवटा घालून दहशतवादाला पाठिंबा देणं आता चालण्यासारखं नाही. दहशतवाद्यांच्या द्वेषयुक्त भाषणाचं समर्थन करण्यासाठी भाषण स्वातंत्र्याची ढाल दाखवणं देखील काम करणार नाही. कारण असं जर केलं तर त्यांच्यासमोर चीन आणि रशियाची उदाहरणं आहेत. कदाचित, हा वेक-अप कॉल आहे.

जेव्हा पाश्चिमात्य देश आपले अंतर्गत राजकारण व्यवस्थापित करू शकत नाहीत मात्र जिओशॅमिटिक्स करून मते विकत घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते देशांतर्गत राजकारणासाठी कचरापेटी बनतात, जे उर्वरित जग स्पष्टपणे पाहू शकते. उपदेश मूल्ये आणि हितसंबंधांमधले द्वंद्व यापुढे टिकणार नाही. ओंगळ दहशतवाद्यांना खूश करणे आणि सत्तेत राहणे ही एक गोष्ट आहे. पण त्या दहशतवाद्यांनी त्यांना खाऊ घालणाऱ्याच्या हातावर सापासारखा फडा काढणं ही वेगळी गोष्ट आहे. पाकिस्तानला तो धडा मिळाला आहे. आता कॅनडाला देखील तो मिळेल.

जेव्हा पाश्चिमात्य देश आपले अंतर्गत राजकारण व्यवस्थापित करू शकत नाहीत मात्र जिओशॅमिटिक्स करून मते विकत घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते देशांतर्गत राजकारणासाठी कचरापेटी बनतात, जे उर्वरित जग स्पष्टपणे पाहू शकते.

जसजसं पाश्चिमात्य आतून कमकुवत होत जातील जिओशॅमिटिक्स आणि त्याची पिल्लं ‘शूट अँड स्कूट’ करत भारतासारख्या राष्ट्रांवर हल्ले करणं चालूच ठेवतील. त्यांच्या दहशतवादी कारवाया वाढतच राहतील. पण आज ट्रूडो यांनी जे आरोप केले आहेत त्यावर भारतीय अजिबात विश्वास ठेवणार नाहीत किंवा पाठिंबाही देणार नाहीत. पण ट्रूडो हे जिओशॅमिटिक्सचे शेवटचे प्रकरण असेल का? पाश्चिमात्य देशांमध्ये काही समज उरली असेल तर ते हे बंद करतील. अन्यथा दहशतवादाचे समर्थन करणारे नेते जिओशॅमिटिक्स खेळण्यास तयारच आहेत.

तोपर्यंत, कदाचित मेरियम-वेबस्टरचा शब्दकोष त्याला वर्ड ऑफ द इयर 2023 म्हणून मान देईल.

गौतम चिकरमाने हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.