-
CENTRES
Progammes & Centres
Location
नैसर्गिक, मानवी, भौतिक आणि सामाजिक संसाधनांव्यतिरिक्त, सृजनशीलता ही महत्त्वाचे ‘पाचवे भांडवल’ म्हणून उदयास येत आहे अर्थात विचारांची आणि नवकल्पनांची संपत्ती जी मानववंशाच्या अँथ्रोपोसीन काळातील समाज टिकवून ठेवते.
Image Source: Getty Images
शास्त्रीय राजकीय अर्थशास्त्राने उत्पादनाचे तीन मुख्य घटक ठळक केले ते म्हणजे जमीन, श्रम आणि भांडवल आणि नंतर उद्योजकता किंवा उद्योग यास चौथा घटक म्हणून जोडले. जमीन म्हणजे सर्व नैसर्गिक संसाधने जी वस्तू आणि सेवा निर्मितीसाठी वापरली जाऊ शकतात. श्रम म्हणजे उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणार्या मानवी प्रयत्नांचे प्रमाण, शारीरिक आणि मानसिक दोन्ही. भांडवल, जे सहसा ‘उत्पादित उत्पादन साधने’ म्हणून ओळखले जाते, यात यंत्रसामग्री, उपकरणे, कारखाने आणि इतर पायाभूत सुविधा यांचा समावेश होतो, जे विविध वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी वापरले जातात. उद्योजकता या घटकांना एकत्र आणून, नियमन करून आणि व्यवस्थापित करून उत्पादन प्रक्रियेसाठी संस्थात्मक चौकट प्रदान करते.
रुचीपूर्ण बाब म्हणजे, शास्त्रीय राजकीय अर्थशास्त्र (क्लासिकल पॉलिटिकल इकॉनॉमी) आणि नंतरच्या विचारसरणीने अर्थव्यवस्थेच्या उत्पादक क्षमता वाढवून आर्थिक वाढ साधणे हा भांडवलशाही प्रणालीचा प्राथमिक उद्देश मानला. तथापि, दोन अडथळे समोर आले. पहिला म्हणजे मार्क्सीय आणि नव-मार्क्सीय विचारसरणी, ज्यांनी या भांडवलशाही लाटेत वितरण आणि समतोल याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. दुसरा अडथळा क्लासिकल शाळेपासूनच आला, ज्याने संसाधनांची (विशेषतः जमीन) कमतरता ही या असमाधानी वाढीच्या कथेत एक मर्यादा असल्याचे मान्य केले. संसाधनांच्या कमतरतेची संकल्पना अर्थशास्त्रात मध्यवर्ती केली गेली जेव्हा लायनल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची प्रसिद्ध व्याख्या दिली: “...स्पर्धात्मक उद्दिष्टांसाठी दुर्मिळ संसाधनांचे वाटप.” कालांतराने, क्लब ऑफ रोमच्या संकल्पनेने नवा भयवृत्तीचा संदेश दिला, ज्यात नव-माल्थुशियन तत्वावर भर देण्यात आला की नैसर्गिक संसाधनांचा अतिरेक केवळ वाढ थांबवणार नाही तर पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक सेवा पुरवण्याच्या क्षमतेत मोठी घट होऊ शकते. दुर्दैवाने, आर्थिक विकासाच्या अभ्यासात कपातवाद (रीडक्शनिज्म) दीर्घकाळ टिकला, जिथे जमीन (किंवा नैसर्गिक संसाधने) निश्चित मानली जात असे, आणि अर्थशास्त्रज्ञांनी सतत श्रम आणि भांडवल यांच्या तांत्रिक बदलाच्या दरांचा अभ्यास केला.
मूळतः सृजनशीलता ही समाजाची ती क्षमता आहे जी त्यांना जटिल परिस्थितींमध्ये समायोजित होणे, नवकल्पना करणे आणि प्रतिसाद देणे यास सक्षम बनवते. ती केवळ मानवी भांडवल (कौशल्ये आणि शिक्षण) किंवा सामाजिक भांडवल (विश्वास आणि संस्था) इतकी मर्यादित नाही, तरीही ती या दोन्ही स्रोतांवर अवलंबून असते. ती प्रणालीचे उदयोन्मुख वैशिष्ट्य आहे - मर्यादांच्या बदलत्या परिस्थितीत समृद्धी टिकवण्यासाठी सतत नवीन मार्ग शोधण्याची क्षमता.
क्लब ऑफ रोमच्या संकल्पनेवर टीका केल्या गेल्या असल्या तरीही, नैसर्गिक संसाधनांच्या महत्त्वावर लक्ष वेधण्यासाठी ती महत्त्वाची ठरली, जी ‘जमीन’ या नावाखाली येतात. 1992 मधील अर्थ समिटमध्ये या संकल्पनेला विशेष महत्त्व मिळाले, जिथे ब्रुंडटलँड कमिशन अहवालातील ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ ची व्याख्या स्वीकारली गेली जी पुढील प्रमाणे आहे “सध्याच्या गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेवर परिणाम न होणे.” 2015 मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (SDGs) स्वीकारल्यानंतर, विकास आणि संवर्धन यातील पूर्वनिर्धारित तडजोडींना टाळून जागतिक विकास शासनात त्यांना परस्पर पूरक मानले गेले.
रोचक बाब म्हणजे, SDGs च्या चर्चेत अशा विविध प्रकारच्या भांडवलाला मान्यता देण्यात आली आहे, जे उत्पादक कार्यक्षमता आणि पिढ्यानपिढ्यांच्या कल्याणासाठी आधारस्तंभ आहेत. 2006 मध्ये वर्ल्ड बँक आणि नंतर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) इनक्लूसिव्ह वेल्थ रिपोर्ट्समध्ये उत्पादन, मानवी आणि नैसर्गिक भांडवल हे दीर्घकालीन समृद्धी टिकवणारे मूळ त्रिकुट मानले गेले आहेत. कालांतराने, विद्वानांनी सामाजिक भांडवल या घटकाला राष्ट्राच्या एकूण किंवा समावेशक संपत्तीच्या चौकटीत समाविष्ट केले, जे संस्थांचा, विश्वासाचा आणि नेटवर्कचा वापर करून इतर भांडवलाच्या कार्यक्षम तैनातीस चालना देते.
येथे आपण क्लासिकल राजकीय अर्थशास्त्रात ओळखलेल्या उत्पादन घटकांचा प्रत्यय पाहू शकतो, जमीन नैसर्गिक भांडवल म्हणून, श्रम मानवी भांडवल म्हणून (भलेही फरक आहे, श्रम हा प्रवाह मानला जातो तर मानवी भांडवल हा साठा), भांडवल तयार केलेले किंवा भौतिक भांडवल म्हणून, आणि उद्योजकतेत किंवा उद्योगात संस्थात्मक यंत्रणा सामाजिक भांडवलाने बदलल्या जातात, ज्यात अधिक समग्र दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. असा बहुआयामी दृष्टीकोन असूनही, 21व्या शतकात टिकून राहण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी ठराविक महत्त्वाचा पैलू अद्याप अधोरेखित झाला नाही: सृजनशीलता.
थॉमस होमर-डिक्सन यांनी त्यांचा प्रभावशाली ग्रंथ ‘द इनजेन्युइटी गॅप’ यामध्ये ‘सृजनशीलता’ म्हणजेच इनजेन्युइटी ही संकल्पना अशी मांडली की सृजनशीलता म्हणजे कल्पना, नवकल्पना आणि संस्थात्मक यंत्रणा, ज्या जटिल आणि उदयोन्मुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक आहेत. त्यांनी तांत्रिक सृजनशीलता (ज्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील प्रगती समाविष्ट आहे) आणि सामाजिक सृजनशीलता (ज्याचे दर्शन शासन प्रणाली, सामाजिक करार आणि संस्थात्मक नवकल्पनांद्वारे होते) यात फरक दाखवला. होमर-डिक्सनचे मुख्य तत्त्व असा होते की आधुनिक समाज “सृजनशीलतेच्या तफावतीत” (इनजेन्युइटी गॅप) अडकले आहेत. पर्यावरणीय, सामाजिक आणि राजकीय आव्हानांसाठी नव्या उपायांची मागणी ही ते उपाय तयार करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे.
मूळतः सृजनशीलता ही समाजाची ती क्षमता आहे जी त्यांना जटिल परिस्थितींमध्ये समायोजित होणे, नवकल्पना करणे आणि प्रतिसाद देणे यास सक्षम बनवते. ती केवळ मानवी भांडवल (कौशल्ये आणि शिक्षण) किंवा सामाजिक भांडवल (विश्वास आणि संस्था) इतकी मर्यादित नाही, तरीही ती या दोन्ही स्रोतांवर अवलंबून असते. ती प्रणालीचे उदयोन्मुख वैशिष्ट्य आहे - मर्यादांच्या बदलत्या परिस्थितीत समृद्धी टिकवण्यासाठी सतत नवीन मार्ग शोधण्याची क्षमता.
इथला प्रश्न असा आहे की सृजनशीलता भांडवल म्हणून का मानली जावी? आर्थिक अर्थाने एखाद्या संपत्तीला भांडवल म्हणून ओळखण्यासाठी, ती अशी साठा असावी ज्यातून वेळोवेळी लाभाचा प्रवाह निर्माण होतो. सृजनशीलता निर्माण करणे हा प्रवाह आहे- हि अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये नियंत्रित वातावरणात किंवा प्रत्यक्ष अटींच्या अंतर्गत केलेल्या प्रयोगांमधून वैज्ञानिक शोध आणि सामाजिक नवकल्पना घडतात. अशा कल्पना किंवा सृजनशीलता, जे साठा म्हणून तयार होतात, त्या वैज्ञानिक संस्था, संशोधन व विकास प्रणाली, ज्ञान नेटवर्क, थिंक टँक, सृर्जनशील उद्योग आणि सांस्कृतिक खुलेपणात साठवल्या जातात. हा साठा, म्हणजे सृजनशीलता भांडवल, जे इतर भांडवलांच्या उत्पादक क्षमतेला खालीलप्रमाणे वाढवते:
या दृष्टिकोनातून, सृजनशीलता हे इतर भांडवलांना मदत करणारे असे पाचवे भांडवल आहे. इतर भांडवलाच्या उत्पादक क्षमतेला प्रोत्साहन देणारी एक शक्ती. सृजनशीलता नसल्यास उत्पादित, मानवी आणि नैसर्गिक संपत्तीवरील परतावा स्थिर राहतो; सृजनशीलता असली तर तो गतीने वाढतो.
21 व्या शतकातील समस्या पारंपरिक एकसंध विचारसरणीने हाताळणे कठीण होत चालले आहे. हवामान बदल, महामारी, आर्थिक अस्थिरता आणि तंत्रज्ञानातील विघटन ह्या फक्त भांडवल घटण्याच्या समस्या नाहीत; त्या अनुकूलतेच्या अपुऱ्या क्षमतेच्या समस्या आहेत. एखाद्या देशाजवळ विपुल नैसर्गिक संपत्ती आणि कौशल्य संपन्न श्रम असले तरी, जर तो पाण्याची कमतरता व्यवस्थापित करण्यासाठी संस्थाची नवकल्पना करू शकत नसेल किंवा लस जलद तयार करण्याची क्षमता ठेवत नसेल, तर त्याचे कल्याण बाधित होते. ग्लोबल साऊथच्या काही भागांमध्ये दिसणारा “संसाधन शाप” हा नैसर्गिक भांडवलाचा परिणामकारक वापर न करता येण्याची समस्या दर्शवतो. इथे महत्त्वाचे म्हणजे अनिश्चिततेच्या परिस्थितीत नवीन उपाय निर्माण करण्याची क्षमता. हेच सृजनशीलता भांडवल म्हणून ओळखण्याचे कारण आहे: ती केवळ क्षमता नाही, तर समाज जिचा साठा निर्माण करून जतन करू शकतो आणि वापर करू शकतो.
तथापि, सृजनशीलतेचे मापन करणे हे एक आव्हान आहे. जरी संशोधन व विकासावर खर्च, पेटंट सादर करण्याचे प्रमाण, तंत्रज्ञानाचा स्वीकार, थिंक टँक, विद्यापीठे आणि संशोधन संस्था यांची संख्या, तसेच संस्थात्मक नवकल्पना निर्देशांक यासारख्या प्रतिनिधी घटकांचा विचार उपयुक्त ठरू शकतो असे सुचवले गेले आहे, तरी सृजनशीलतेच्या भूमिकेचे अचूक मूल्यांकन दोन अर्थव्यवस्थांमधील एकूण घटक उत्पादकतेतील (टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी) फरकाच्या माध्यमातून केले जाऊ शकते. ही पद्धत शास्त्रीय (मेथोडोलॉजिकल) ब्रेकथ्रूसाठी सुरुवातीचा टप्पा ठरू शकतो.
उदयास येत असलेल्या जटिलतेच्या पार्श्वभूमीवर, सृजनशीलता भांडवल हे शाश्वततेसाठी अपरिहार्य आहे. शाश्वतता म्हणजे फक्त समाजाने पुढील पिढीला पुरेसे उत्पादित, मानवी आणि नैसर्गिक भांडवल देण्यावर अवलंबून नाही, तर भविष्यातील समस्या सोडविण्याची क्षमता देण्यावरही अवलंबून आहे. तंत्रज्ञानातील बंधन, संस्थात्मक शिथिलता आणि ज्ञानातील अडथळे हे भांडवल कमी करू शकतात. उलट, जे समाज सृजनशीलता, बहुलता (प्लुरालिस्म) आणि नवकल्पना प्रणालींमध्ये गुंतवणूक करतात, ते त्यांची अनुकूलन क्षमता वाढवतात. या दृष्टीकोनातून, मानवतेस धोका फक्त संसाधनांचा अभाव नाही, तर सृजनशीलतेचा अभाव देखील आहे. जेव्हा जटिलता वाढते तेव्हा समस्या सोडविण्याची क्षमता घटते. पाचव्या भांडवलाच्या रूपात सृजनशीलता समावेशक संपत्तीच्या चौकटीला अनुकूलन आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात विस्तार देते. सृजनशीलता मानवी वंशाच्या म्हणजेच अँथ्रोपोसीनच्या जटिल समस्यांशी सामना करण्यासाठी आवश्यक आहे.
निलांजन घोष हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीजचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr Nilanjan Ghosh heads Development Studies at the Observer Research Foundation (ORF) and is the operational head of ORF’s Kolkata Centre. His career spans over ...
Read More +