Author : Sauradeep Bag

Published on Jan 03, 2024 Updated 0 Hours ago

तांत्रिक प्रगती आणि परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून चीन जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवत असताना, डिजिटल युआनचे या क्षेत्रातील त्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणावा लागणार आहे.

डिजिटल युआनचा विस्तारणारा ठसा

शांघाय पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस एक्सचेंज (SHPGX) ने प्रथमच तेल व्यवहार करण्यासाठी डिजिटल युआन, चीनची मध्यवर्ती बँक डिजिटल चलन (CBDC), e-CNY वापरण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या घोषणे बरोबरच 19 ऑक्टोबर रोजी पेट्रो चायना इंटरनॅशनलने डिजिटल युआन वापरून 1 दशलक्ष बॅरल क्रूड खरेदी देखील केले आहे. हा व्यवहार करत असताना शांघाय म्युनिसिपल पार्टी कमिटी आणि म्युनिसिपल सरकारने आंतरराष्ट्रीय व्यापारात e-CNY च्या वापरास प्रोत्साहन देणार्‍या निर्देशांचे पालन केले आहे. 

या संदर्भामध्ये SHPGX ने विक्रेत्याचे तपशील आणि व्यवहाराची किंमत उघड केली नसली तरी देखील हा टप्पा अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आहे. त्याबरोबरच युआनचा जागतिक अवलंब वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल देखील आहे.

डिजिटल युआनच्या वाढीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. चीन अनेक वर्षांपासून त्याच्या डिजिटल चलनाचा विकास आणि अवलंब करण्यावर सक्रियपणे काम करत आहे. अलीकडच्या काळामध्ये झालेला हा व्यवहार या उपक्रमाच्या या क्षेत्रातील प्रगतीचे प्रतिबिंबच म्हणावे लागेल.

राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी चीनने चौदाव्या पंचवार्षिक योजनेसाठी फ्रेमवर्कची आखणी केलेली आहे. चीनच्या या ब्लू प्रिंट मध्ये देशाने एक मजबूत आणि समकालीन आर्थिक प्रणाली तयार करण्यासाठी दृढ वचनबद्धता दर्शविली आहे. ज्यामध्ये अनुकूलता, तीव्र स्पर्धात्मकता आणि सार्वत्रिक लागूता आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा पाया म्हणजे डिजिटल चलन असून या परिवर्तनाच्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी चीन हा देश सज्ज झालेला आहे. 

चीन अनेक वर्षांपासून त्याच्या डिजिटल चलनाचा विकास आणि अवलंब करण्यावर सक्रियपणे काम करत आहे. अलीकडच्या काळामध्ये झालेला हा व्यवहार या उपक्रमाच्या या क्षेत्रातील प्रगतीचे प्रतिबिंबच म्हणावे लागेल.

फ्रेंच ऊर्जा कंपनी TotalEnergies ने चायना नॅशनल ऑफशोर ऑइल कॉर्पोरेशन (CNOOC) ला LNG विकण्यास सहमती दर्शवली, तेव्हा युआनने मार्चमध्ये द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) बाजारात पदार्पण केले. युआनमधील आणखी एक LNG करार गेल्या आठवड्यात झाला आहे. ज्यामध्ये CNOOC आणि फ्रेंच कंपनी Engie यांचा समावेश होता. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे की हे व्यवहार करताना डिजिटल युआनचा वापर करण्यात आलेला नाही.

याव्यतिरिक्त 19 ऑक्टोबर रोजी फर्स्ट अबू धाबी बँकेने सरकारी मालकीच्या व्यावसायिक बँक, बँक ऑफ चायनासोबतचा डिजिटल चलन करार उघड केला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी तिसऱ्या बेल्ट अँड रोड फोरमदरम्यान ही घोषणा करण्यात आली होती. CBDCs सह सीमापार व्यवहार सुलभ करण्याच्या उद्देशाने चीन आणि संयुक्त अरब अमिराती हे दोघेही mBridge प्लॅटफॉर्ममध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. आगामी वर्षात किमान व्यवहार्य उत्पादन म्हणून MBbridge लाँच करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

त्वरित स्वीकारण्याची तयारी

चीनमधील पीपल्स बँक ऑफ चायना ने जानेवारी 2022 मध्ये एक अहवाल दिला की, 261 दशलक्ष लोकांकडे डिजिटल युआन वॉलेट आहेत. तथापि, चीनमधील मोबाईल पेमेंट वापरणाऱ्या 903.6 दशलक्ष लोकांच्या तुलनेत हा केवळ 28.89 टक्के अपटेक रेट दर्शवतो आहे. याव्यतिरिक्त केवळ वॉलेट असणे सक्रिय वापराची हमी देत ​​नाही. विनामूल्य रोख जिंकण्याच्या आशेने अनेकांनी डिजिटल युआन वॉलेट तयार केले आहेत. 2022 मध्ये पायलट शहरांमध्ये 340 दशलक्ष RMB च्या एकूण बक्षीस पूलसह डिजिटल युआन लॉटरी आयोजित करण्यात आल्या होत्या. 

CBDCs सह सीमापार व्यवहार सुलभ करण्याच्या उद्देशाने चीन आणि संयुक्त अरब अमिराती हे दोघेही mBridge प्लॅटफॉर्ममध्ये सक्रियपणे सहभागी आहेत.

चीनमधील मोठ्या बँकांनी डिजिटल युआनच्या वापराला चालना देण्यासाठी तसेच मोठ्या व्यावसायिक व्यवहारांसाठी CBDCs सक्रियपणे आणि एकत्रित काम करण्यास सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, चायना कन्स्ट्रक्शन बँकेने संपत्ती व्यवस्थापन उत्पादन खरेदीसाठी डिजिटल युआन स्वीकारले आहे. कृषी वाणिज्य बँकेने 500,000 RMB चे पहिले डिजिटल युआन कर्ज जारी करून एक महत्त्वपूर्ण टप्पा या क्षेत्रात गाठला आहे.  ज्यांनी डिजिटल युआनचा व्यापक अवलंब करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशा बँकांमध्ये लाखो व्यक्तींवर तसेच देशांतर्गत असंख्य आंतरराष्ट्रीय व्यवसायांवर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे.

चीनमधील स्थानिक सरकारे देखील त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डिजिटल युआनचा समावेश वाढवत आहेत. उदाहरणार्थ, एप्रिल 2022 पर्यंत, झेजियांग प्रांतातील रहिवाशांनी कर, मुद्रांक आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी देयके देण्यासाठी डिजिटल युआनचा वापर करण्यात आला आहे. डिजीटल युआनला गुआंगझो मधील दहा मार्गांवर सार्वजनिक बस प्रवासासाठी आणि निंगबोमधील 125 स्थानकांवर सार्वजनिक सबवे राइड्ससाठी देयक पद्धत म्हणून अनुप्रयोग आढळला आहे. ही रणनीती डिजिटल युआनला चीनची सर्वोच्च पेमेंट पद्धत बनवण्याच्या उद्देशाने संरेखित करते.

चीनमधील अधिकारी अनेक धोरणांच्या माध्यमातून ई-सीएनवायच्या सीमापार दत्तक घेण्यास सक्रियपणे प्रोत्साहन देत आहेत. DBS बँक आणि BNP पारिबा सारख्या आंतरराष्ट्रीय बँकांच्या चीनी उपकंपन्या पीपल्स बँक ऑफ चायना सह सहयोग करत आहेत, जेणेकरून चीनमधील त्यांच्या परदेशी ग्राहकांना डिजिटल युआन वापरण्यास सोपे जावे. पीपल्स बँक ऑफ चायना (PBOC) प्रकल्प mBridge नावाच्या उपरोक्त सहयोगी प्रयोगाचा एक भाग आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट कार्यक्षम आणि रिअल-टाइम व्यवहार सेटलमेंटसाठी क्रॉस-बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर स्थापित करणे हा आहे. 2022 मध्ये चार देशांमधील 20 बँकांसह भागीदारीत 164 व्यवहार करून या प्रकल्पाने यश मिळवले, परिणामी एकूण US $22 दशलक्ष सेटलमेंट झाले आहेत. 

DBS बँक आणि BNP पारिबा सारख्या आंतरराष्ट्रीय बँकांच्या चीनी उपकंपन्या पीपल्स बँक ऑफ चायना सह सहयोग करत आहेत जेणेकरून चीनमधील त्यांच्या परदेशी ग्राहकांना डिजिटल युआन वापरता यावे.

हा अभिनव दृष्टीकोन करस्पॉंडंट बँकिंग नेटवर्कवरील अवलंबित्व दूर करणारा आहे. ज्यामुळे बँकांना विविध आर्थिक ऑपरेशन्स, ज्यात पेमेंट, परकीय चलन सेटलमेंट, रिडेम्प्शन आणि जारी करणे समाविष्ट आहे.  त्यांच्या विदेशी समकक्षांशी थेट संपर्क देखील साधता येतो. या ठिकाणी उल्लेखनीय म्हणजे, या सर्व व्यवहारांपैकी जवळपास निम्म्या व्यवहारांमध्ये e-CNY समाविष्ट होते. एकूण अंदाजे US$1,705,453 जारी करताना, US$3,410,906 पेमेंट आणि परकीय चलन सेटलमेंटमध्ये वापरले गेले. तसेच US$6,811,812 रिडीम केले गेले आहेत. ई-सीएनवाय व्यवहारांसाठी प्राधान्य किरकोळ ई-सीएनवाय प्रणालीचे अखंड एकत्रीकरण, प्रादेशिक व्यापार सेटलमेंटमध्ये आरएमबीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला कारणीभूत ठरू शकणार आहे.

डिजिटल प्रगतीचे निरीक्षण

सप्टेंबर 2022 मध्ये हाँगकाँग सीमापार पेमेंट प्रयोगांसाठी डिजिटल युआन पायलट क्षेत्रांच्या यादीत सामील झाले आहेत. हाँगकाँग हा चीनचा बीजिंगच्या नियंत्रणाखाली असलेला विशेष प्रशासकीय प्रदेश असल्याने ही कारवाई धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या प्रयत्नातील यशामुळे रॅन्मिन्बीचे जागतिक महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, 2022 च्या अखेरीस, RMB अधिकृत परकीय चलन साठ्यात जगातील तिसरी-सर्वात मोठी मालमत्ता बनली होती.

डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देत असताना, चलनाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना नवीन पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याबरोबरच इतर राष्ट्रांना डिजिटल चलन स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन आवश्यक आहे.

बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) रॅन्मिन्बीच्या आंतरराष्ट्रीय वापराला चालना देण्याची संधी देत आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दत्तक घेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या BRI प्रकल्पांमध्ये चीनला डिजिटल युआन वापरण्याची आवश्यकता असू शकते. या बदलामुळे ग्लोबल साउथमधील मर्यादित डॉलर-आधारित व्यवहार क्षमता असलेल्या देशांना फायदा होण्याची शक्यता आहे. BRI च्या डिजिटल सिल्क रोड अंतर्गत डिजिटल युआनचा प्रचार करताना डॉलरवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. ऑक्टोबर 2021 मध्ये PBOC अध्यक्षांनी असे सांगितले की BRI प्रकल्पांसाठी डिजिटल युआनला प्रोत्साहन देण्याची सध्याची कोणतीही योजना नाही.

CBDCs च्या परिचयाद्वारे चीनमधील डिजिटल युआनचा  उदय जागतिक, आर्थिक परिदृश्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल दर्शविणारा आहे. चीन सारख्या उद्योगमुख असलेल्या शक्तीकडून डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान दिले जात असताना डिजिटल युआनच्या विकासावर बारकाईने लक्ष ठेवणे अत्यावश्यक बनले आहे. डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या आणि चलनाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना नवीन पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे, इतर राष्ट्रांना डिजिटल चलन स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन  देणे आवश्यक आहे. परराष्ट्र धोरण आणि तांत्रिक प्रगतीच्या माध्यमातून चीन जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवत राहिल्याने,  डिजिटल युआन लाँच करणे हा त्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे डिजिटल युआनच्या उत्क्रांतीकडे जागरूकपणे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे, कारण यामुळे जागतिक आर्थिक व्यवस्थेमध्ये परिवर्तनीय बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सौरदीप बाग हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.