-
CENTRES
Progammes & Centres
Location
जनरेटिव्ह एआयमुळे माहिती निर्मिती आणि प्रसारणाबाबतची किंमत कमी होते. परिणामी, माहितीचा ओव्हरलोड आणि माहितीमध्ये फेरफार करता येऊ शकतो. यामुळे शाश्वत विकास मुल्यांनुसार इन्फॉर्मेशन ॲक्सिसमध्ये (माहितीचा प्रवेश) नागरी सहभाग कमी होतो.
हा लेख “द फ्रिडम टू नो : इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल एक्सेस टू इन्फोर्मेशन २०२४” या लेख मालिकेचा भाग आहे.
१९९२ मध्ये रिओ डिक्लरेशन स्वीकारल्यापासून माहितीमधील प्रवेश हा शाश्वत विकास उद्दिष्टांचा (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स - एसडीजी) प्रमुख घटक मानला गेला आहे. तेव्हापासून, एसडीजी १६.१० अंतर्गत सहभागात्मक प्रशासन आणि मजबूत संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१५ मध्ये एसडीजी २०३० अजेंडामध्ये अक्सिस टू इन्फोर्मेशनने जागा मिळवल्यामुळे ते आता आंतरराष्ट्रीय विकास उपक्रमांचा केंद्रबिंदू ठरत आहे. मानवी हक्क परिषदेने मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील २०२० च्या ठरावामध्ये सार्वजनिक संस्थांना माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे. रेडिओसारख्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक संधी, विकास प्रकल्प आणि त्यांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठीच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल संबंधित माहिती प्रदान करण्याचा उद्देश असलेल्या विकासाच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी माहिती प्रवेश राहिलेला आहे.
तंत्रज्ञान आणि सामाजिक विकासामुळे माहिती प्रवेशाच्या मुल्यांना अडथळा आलेला आहे. त्यामुळे, विकास आणि संशोधनातील खर्च कमी होऊन माहितीचा ओव्हरलोड आणि माहितीत हेराफेरी होण्याची शक्यता अधिक आहे. लोकांसमोर आता माहिती आणि कृत्रिम सामग्रीचा महापूर येत आहे. जनरेटिव्ह एआयने सोशल मीडियाची क्षमता वाढवल्यामुळे अनेक वेळा जगाच्या विविध भागांमध्ये हिंसाचारास हे तंत्रज्ञान कारणीभूत झाले आहे. मोठ्या प्रमाणावर माहिती आणि मीडिया तयार करण्याच्या सोशल मिडीयाच्या क्षमतेमुळे संज्ञानात्मक ओव्हरलोड आणि पक्षपातीपणाचे नवीन परिमाण समोर आले आहेत. या पूर्वी अस्तित्वात असलेल्या विश्वास प्रणालींशी सुसंगत असलेल्या माहितीवर अवलंबून राहणे हा माहितीच्या ओव्हरलोडला सामोरे जाण्याचा एक मार्ग आहे.
सिंथेटिक सामग्री आणि सोशल मीडियाच्या दुहेरी संकटाने जोखीम आणि हानींचे नवीन आणि अधिक व्यापक परिमाण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
एआय सिस्टीममध्ये ज्याप्रमाणे व्यक्त किंवा अव्यक्त पुर्वग्रह झिरपतात त्याप्रमाणे त्यांच्या आऊटपुटमुळे लोकांच्या मनातही पक्षपातीपणा अधिक रूजत जातो. त्यामुळे समाजामधील ध्रुवीकरणाविषयीच्या चिंता अधिक गडद होत जातात. सामाजिक बाबींमध्ये तसेच आर्थिक क्रियाकलापांमध्ये लोकांचा सहभाग वाढावा म्हणून माहितीमधील प्रवेश महत्त्वपुर्ण भुमिका निभावत असला तरी त्यामुळे अनेकदा हिंसक व दुर्देवी घटना झाल्याची उदाहरणे आहेत. लोकांची मते, आणि निवडणुकीचे निकाल बदलण्यात आणि डीपफेकद्वारे लोकांबाबत खोट्या आणि अपमानास्पद बातम्या प्रसारित करण्यात एआयचा मोठा हात आहे. सिंथेटिक सामग्री आणि सोशल मीडियाच्या दुहेरी संकटाने जोखीम आणि हानींचे नवीन आणि अधिक व्यापक परिमाण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पूर्वीच्या काळात, माहितीचा प्रवेश हा प्रसारणाच्या पद्धतीवर अवलंबून होता. विकास परिणामांसाठी रेडिओ किंवा टेलिव्हिजनमध्ये अनेक प्रारंभिक विकास हस्तक्षेपांद्वारे ट्रान्समिशन उपकरणांना उत्प्रेरक मानण्यात आले होते. डिजिटल आणि इंटरनेट प्रवेश आणि जनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्मच्या सुलभ प्रवेशामुळे, माहितीचे उत्पादन आणि प्रसार या दोन्हींच्या खर्चात घट झाली आहे. याशिवाय, डिजिटलायझेशनवर आधारित मोठ्या टेक कंपन्यांनी उभारलेल्या डेटा पुरवठा पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे आता तयार करण्यात आलेला डेटा कालांतरानेही कायम राहण्याची शक्यता आहे. जनरेटिव्ह एआय मॉडेल्सद्वारे लाइव्ह डेटा अंतर्भूत केला जातो तसेच त्याची अंदाज क्षमता वाढविण्यासाठी अल्गोरिदमद्वारे अशा डेटाचा वापर केला जाण्याची शक्यताही वाढते. सोशल मीडियाच्या प्रसार क्षमतेने आणि पूरक सामग्री निर्मितीच्या कमी खर्चामुळे समाजविरोधी मोहिमांचा धोका वाढला आहे. अशा प्रकारचा धोका आज जगासमोरील सर्वात मोठा अल्पकालीन धोका म्हणून ओळखला जात आहे.
डिजिटल आणि इंटरनेट प्रवेश आणि जनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्मच्या सुलभ प्रवेशामुळे, माहितीचे उत्पादन आणि प्रसार या दोन्हींच्या खर्चात घट झाली आहे.
सामग्री निर्मिती व्यतिरिक्त, सोशल मीडिया बॉट्स सारख्या एआय क्षमता या सोशल मीडियाची प्रसार क्षमता वाढवू शकतात. सध्याची एआय मॉडेल्सही वेबवरील कंटेन्टवरून तयार करण्यात आली आहेत. तसेच भविष्यातील एआय हे सिंथेटिक कंटेन्टवर आधारित असणार आहेत. त्यामुळे माहिती आणि सत्याचा पाया तसेच सार्वजनिक जीवनातील त्याची क्षमता याला धक्का लागण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे अतिरिक्त गुंतागुंत निर्माण झाली आहे. सिंथेटिक डेटा वापरल्याने पूर्वाग्रह प्रसाराची शक्यता वाढू शकते आणि मॉडेल एररमध्ये वाढ होऊ शकते. डेटा पॉइंट्सचे डिजिटल लाइफ हे वादातीतपणे अनंत असते, याचा अर्थ म्हणजे, डेटा हा विविध संदर्भात किंवा विविध प्रकाराद्वारे आणि अनंत वेळा वापरला जाऊ शकतो. हे लोकसहभाग आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी माहितीपर्यंत पोहोचण्याचे एसडीजी उद्दिष्ट आणि जनरेटिव्ह एआय व सोशल मीडियाच्या एकत्रित परिणामामुळे होणारे माहिती ओव्हरलोड यांच्यातील विरोधाभास अधोरेखित करते ज्यामुळे समुदायांमधील सामाजिक स्थिती अस्थिर होण्याचा धोका कायम राहतो.
इंफ्ल्युएंसर्स, अल्गोरिदम आणि क्राऊड यांच्या संयोजनाद्वारे माहितीमध्ये फेरफार, प्रसार आणि प्रवर्धन होते. रेकमेंडेशन इंजिनद्वारे सामग्रीसाठी दृश्यमानता निर्माण करण्यात अल्गोरिदम महत्त्वपूर्ण भुमिका बजावतात. म्हणून, इंफ्ल्युएंसर्स हे सामग्री तयार करतात व ती त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशिष्ट अल्गोरिदमिक क्षमतांचा वापर केला जातो. कोअलिशन फॉर कंटेन्ट प्रोव्हेनंन्स अँड ऑथेन्टिसीटी (सीटूपीए) हा अडोब, आर्म, इंटेल, मायक्रोसॉफ्ट आणि ट्रुपीक यांच्यातील युतीवर आधारित संयुक्त विकास प्रकल्प आहे. मीडिया सामग्रीचे स्त्रोत, इतिहास आणि मूळ प्रमाण प्रमाणित करण्यासाठी खुली तांत्रिक मानके विकसित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, भारत आणि युरोपियन युनियनसारख्या अधिकारक्षेत्रातील नियमांनुसार, उपयोजकांना एआय-जनरेटेड माहितीस लेबल करणे आवश्यक आहे. जेणेकरून वापरकर्ते सामग्रीच्या सत्यतेबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील. याबाबतची जबाबदारी विशिष्ट विकासक आणि तंत्रज्ञानाच्या उपयोजकांवर असते. याच पार्श्वभुमीवर या महत्त्वाच्या घडामोडी जोखीम व्यवस्थापित करण्याच्या संभाव्यतेवर प्रकाश टाकतात. परंतू, ज्या वेगाने द्वेषयुक्त सिंथेटिक मीडिया सामग्री प्रवास करते त्यामुळे अल्गोरिदममध्ये पूर्वग्रह समाजातील पूर्वाग्रहाशी जोडले जातात. माध्यम आणि माहिती साक्षरता उपक्रम हे बहुपक्षीय संस्थांद्वारे एक महत्त्वाचे धोरण म्हणून पुढे आणले जात असताना, एआय तंत्रज्ञानाच्या विकसित होत असलेल्या अत्याधुनिकतेशी आणि मोठ्या प्रमाणावर खोटी आणि फेरफार माहिती तयार करण्याच्या त्यांच्या क्षमतेशी सामना करणे आवश्यक आहे.
अनुलेखा नंदी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr. Anulekha Nandi is a Fellow - Centre for Security, Strategy and Technology at ORF. Her primary area of research includes digital innovation management and ...
Read More +