Authors : Ariel Conn | Ingvild Bode

Published on Feb 21, 2024 Updated 0 Hours ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर कोणतेही नियम बनवताना, एआयच्या सर्वात धोकादायक उपयोगांचा विचार करणे आवश्यक आहे.

शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये एआयची सुरक्षा कशी ठरवायची?

हा लेख AI F4: Facts, Fiction, Fears and Fantasies या मालिकेचा भाग आहे.

जरी नैतिक मार्गदर्शक तत्त्वे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (AI) नवीन नियम आणि नियमांबद्दल चर्चा होत असली तरी, धोरण निर्माते आणि या उद्योगाशी संबंधित लोकांनी शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये एआयचे नैतिक आणि कायदेशीर परिणाम समाविष्ट करणे टाळले आहे. एआयच्या गव्हर्नन्ससाठी काही शिफारशींमध्ये स्पष्टपणे एआयचा लष्करी वापर समाविष्ट नाही, जसे की युरोपियन युनियन (EU) चा एआय मसुदा कायदा. इतर काही शिफारशींमध्ये, त्याच्या वापराचा उल्लेख न करता, अप्रत्यक्षपणे लष्करात एआयचा वापर न करण्याबद्दल सांगण्यात आलं आहे. 

मात्र, लोकांनी जर एआयशी संबंधित आव्हानांच्या पूर्ण व्याप्तीकडे लक्ष दिले नाही तर विविध एआय प्रशासन उपक्रम यशस्वी होण्याची अपेक्षा करू शकत नाही. शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये एआयचा सर्वात धोकादायक वापर लक्षात घेतल्याशिवाय आपण एआय समस्यांचे निराकरण करू शकत नाही. 

एआय सक्षम शस्त्रे कोण वापरत आहे?

शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये एआयला एक विषय म्हणून हाताळण्याची प्रवृत्ती आहे जी पूर्णपणे लष्करी क्षेत्रात आहे आणि त्यामुळे याची लष्करी किंवा आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळाबाहेर चर्चा केली जाऊ शकत नाही. बऱ्याच लष्करी चर्चेतील विचार असा आहे की शस्त्रास्त्र प्रणालींमधील एआय फक्त सैन्याद्वारेच वापरला जाऊ शकतो. तरीही लष्कर आणि सरकारी अधिकारी अनेक वर्षांपासून अशा हल्ल्यांचे लक्ष्य आहेत. 2018 मध्ये सीरियातील रशियन लष्करी तळांवर झालेला हल्ला आणि 2021 मध्ये इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधिमी यांच्या हत्येचा प्रयत्न ही त्याची उदाहरणे आहेत. 

याशिवाय, एआयच्या मदतीने विकसित किंवा प्रगत शस्त्रास्त्रे केवळ देशाचे सैन्य किंवा त्याचे लष्करी कंत्राटदार बनवू शकतात असा विश्वास आंतरराष्ट्रीय चर्चेत आहे. मात्र मानवरहित एरिअल व्हेईकल्स (UAVs) चे प्रकरण हे आधीच एक उदाहरण आहे की नागरी भागात या तंत्रज्ञानाची व्यापक उपलब्धता त्यांचा प्रसार कसा वाढवते आणि घातक शस्त्रे प्रणालींमध्ये ऑफ-द-शेल्फ यूएव्हीचा पुनर्प्रयोग करण्यास कारणीभूत ठरते. 

याशिवाय, एआयच्या मदतीने विकसित किंवा प्रगत शस्त्रास्त्रे केवळ देशाचे सैन्य किंवा त्याचे लष्करी कंत्राटदार बनवू शकतात असा विश्वास आंतरराष्ट्रीय चर्चेत आहे.

दरम्यान, स्वायत्त शस्त्र प्रणाली आणि ड्रोनला शस्त्र बनवू शकणाऱ्या एआय सॉफ्टवेअरसारख्या लहान प्रणालींच्या प्रसाराविषयी वाढत्या चिंता, संभाव्य गुन्हेगारी वापर आणि सार्वजनिक सुरक्षेवर परिणाम करण्याच्या बाबतीत याचा अर्थ काय याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.

एआयची क्षमता

हे लक्षात घेणं महत्वाचं ठरेल की नागरी वापरासाठी एआय विरुद्ध लष्करी वापरासाठी एआय अशी कोणतीही गोष्ट नाही. एआय ही एकच गोष्ट आहे आणि स्वायत्ततेचा विचार करता वेगळ्या तंत्रज्ञानाऐवजी विद्यमान प्रोग्राम आणि सिस्टममध्ये जोडल्या जाणाऱ्या क्षमता म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो.  

'एआय' हा शब्द विविध प्रकारच्या तांत्रिक क्षमतांचे प्रतिनिधित्व करतो ज्याचा वापर अगणित प्लॅटफॉर्म आणि सॉफ्टवेअरवर केला जाऊ शकतो. पण मूळत: एआयचं डिझाइन हे संरक्षण वापर लक्षात घेऊन केलेला नाहीये. एआयचे दूरगामी आणि अनेकदा अप्रत्याशित परिणाम होऊ शकतात, युद्धापासून भूराजनीतीपर्यंत. जसं की अल्फागोचा चीनच्या एआय धोरणाच्या विकासावर झालेला प्रभाव, नोकरीच्या बाजारपेठेपासून मानसिक आरोग्यापर्यंत याचे परिणाम दिसून आलेत. जसं की अल्गोरिदमचा किशोरवयीन मुलांच्या आरोग्यावर झालेला परिणाम असेल किंवा मुलांमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणारी सामग्री वाढवणं असेल, येणंकेन प्रकारे याचा परिणाम होताना दिसतोय.

एआयच्या लष्करी वापराच्या (म्हणजे शस्त्र नसलेल्या वापराच्या) दृष्टीने बघायचं तर त्यापैकी बरेच वापर हे नागरी वापरासारखे आहेत. जगभरातील सैन्य भविष्यसूचक विश्लेषणाद्वारे रसद आणि नियोजन सुधारण्याचा प्रयत्न करतात, प्रतिमा ओळख तंत्रज्ञान वापरून जलद युद्ध विश्लेषण करतात, पुनरावृत्ती होणारी प्रशासकीय कार्ये स्वयंचलित करतात आणि स्वायत्त ड्रायव्हिंग विकसित करतात, क्षमता विकसित करतात, नेव्हिगेशन सुधारतात.  मोठ्या, महागड्या, नोकरशाही लष्करी ऑपरेशनला अधिक प्रभावीपणे मदत करू शकणाऱ्या एआय क्षमतेच्या दृष्टीकोनातून एआयच्या लष्करी उपयोगांचा विचार करणे अर्थपूर्ण आहे. 

'एआय' हा शब्द विविध प्रकारच्या तांत्रिक क्षमतांचे प्रतिनिधित्व करतो ज्याचा वापर अगणित प्लॅटफॉर्म आणि सॉफ्टवेअरवर केला जाऊ शकतो. पण मूळत: एआयचं डिझाइन हे संरक्षण वापर लक्षात घेऊन केलेला नाहीये.

तथापि, ही एआय-सक्षम शस्त्रे आहेत ज्यांचा लष्करी आणि नागरी वापरावर सर्वाधिक परिणाम होईल. सध्या तंत्रज्ञान ज्या प्रकारे विकसित होत आहे ते पाहता, वर वर्णन केल्याप्रमाणे, नागरिक आणि इतर घातक लोकांद्वारे ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि प्रसार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

क्वाडकॉप्टर ड्रोन : एआय क्षमतेच्या दुसऱ्या वापराचे उदाहरण आणि प्रशासनासाठी पर्याय

व्यावसायिक क्वाडकॉप्टर ड्रोनचे शस्त्रीकरण समस्येच्या संपूर्ण व्याप्तीचा विचार करण्यासाठी एक उदाहरण म्हणून बघता येईल. पोलीस, सुरक्षा दल, लष्कर आणि दहशतवादविरोधी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून या वाढत्या समस्येचा सामना करत आहेत. ही एक जटिल समस्या म्हणून एआयचा वापर शस्त्र म्हणून विचार करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. हे सैन्याच्या पलीकडे विस्तारलेले आहे, ज्याचा वापर स्वायत्तपणे करण्याच्या हेतूने, हानी पोहचवण्याचा हेतूने केला जातो. आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी जे या शस्त्रांसह केलेल्या गुन्ह्यांचे निराकरण करतात, तसेच स्वतःला मोठ्या जोखमीत घालतात.  

पहिलं म्हणजे आपण व्यावसायिक ड्रोनशी जोडलेल्या हँडगन आणि फ्लेमेथ्रोअर्ससारख्या शस्त्रांची उदाहरणे पाहिली आहेत. यूएस मध्ये, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने ड्रोनचा शस्त्रे म्हणून वापर करण्यावर बंदी घातली आहे. परंतु असे वापर थांबवण्यासाठी हे पुरेसे नाही. याव्यतिरिक्त, तोफा उत्पादकांनी याकडे एक समस्या म्हणून पाहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, ते त्यांचे तंत्रज्ञान बदलू शकतात जेणेकरून ड्रोनला मागे टाकता येईल. कायदेशीर दृष्टीकोनातून, याचा अर्थ असा होऊ शकतो की ट्रिगर खेचण्यासाठी फिंगरप्रिंट आयडी किंवा इतर प्रकारचे अद्वितीय मार्ग शोधणं या घडीला आवश्यक झालं आहे.

दुसरं म्हणजे ड्रोन उत्पादकांनी विचार करणे आवश्यक आहे की लोक त्यांची उत्पादने शस्त्रे म्हणून वापरण्याचा प्रयत्न करू शकतात. ड्रोन उत्पादक असं म्हणू शकत नाहीत की, हा त्यांचा प्रश्न नाही, किंवा ते सोडवण्याची जबाबदारी त्यांची नाही. त्यांना ड्रोनसाठी नवीन सेन्सर किंवा इतर उपकरणे तयार करण्याची आवश्यकता असू शकते, जसे की ड्रोनला परवानगी नसलेली उपकरणे बसवल्यास वापरकर्त्याला उड्डाण करण्यापासून प्रतिबंधित करता येईल.  

तिसरं म्हणजे नागरी आणि व्यावसायिक वापरासाठी डिझाइन केलेले रोबोट आणि ड्रोनचे शस्त्रीकरण रोखणारे कायदे प्रगत करण्याची गरज आहे. 

पोलीस, सुरक्षा दल, लष्कर आणि दहशतवादविरोधी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून या वाढत्या समस्येचा सामना करत आहेत.

हे उदाहरण एआयच्या आव्हानांकडे एक वेगळे तंत्रज्ञान म्हणून बघण्याऐवजी त्यांच्याकडे समग्रपणे पाहण्याचे महत्त्व अधोरेखित करते. यामध्ये त्याचे संपूर्ण जीवनचक्र, त्यातील अंतर्निहित गुंतागुंत आणि इतर आव्हानांसह ते लोक आणि समाजाशी अधिक व्यापकपणे संवाद साधण्याचा मार्ग विचारात घेतात. जागतिक नियम-कायद्याच्या दृष्टीकोनातून समस्येचे बहुआयामी स्वरूप समजून घेणे आणि संपूर्ण टप्प्यात सहभागी असलेल्या विविध भागधारकांना ओळखणे महत्त्वाचे आहे. 

सायबर तंत्रज्ञानाचे धडे 

सायबर तंत्रज्ञानाच्या समस्येत आणखी एक भर पडते. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि इंटरनेटच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये, अभियंत्यांनी सरकार आणि सैन्य इतर देशांविरुद्धच्या असुरक्षिततेचे शोषण कसे करू शकतात याचा विचार केला नाही. या निष्क्रियतेमुळे सायबर सुरक्षा ही आता समाधानाच्या दृष्टीने मोठी समस्या बनली आहे. आपण एआय बाबतीतही अशीच चूक करण्याच्या मार्गावर आहोत. जीवनचक्राच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहभागी असलेले विकासक आणि इतर लोक जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा ते समस्याप्रधान तंत्रज्ञान तयार करतात, तेव्हा ती प्रत्येकाची समस्या बनते.   

सायबर तंत्रज्ञानाच्या समस्येत आणखी एक भर पडते. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि इंटरनेटच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये, अभियंत्यांनी सरकार आणि सैन्य इतर देशांविरुद्धच्या असुरक्षिततेचे शोषण कसे करू शकतात याचा विचार केला नाही.

अलीकडच्या काळात, सायबर तंत्रज्ञान आणि सायबर समस्येला तोंड द्यावं लागतंय. यात लष्करी आणि नागरी वापरातही समस्या येत असून, जशा या गोष्टी फायद्याच्या आहेत तशाच तोट्याच्या देखील आहेत.

निष्कर्ष 

जर एआय नियमनाच्या सभोवतालच्या चर्चा चालू राहिल्या तर लष्करी वापरांना इतर वापरांपासून वेगळे करण्याच्या सध्याच्या प्रवृत्तीचे अनुसरण करत राहिल्यास, याचे धोके लक्षणीयरित्या वाढतात. परंतु जर आपण एआयच्या लष्करी वापराचा विचार केला तर आपण या समस्यांना अधिक प्रभावीपणे हाताळू शकतो. एआयचा शस्त्र म्हणून वापर केल्याने एआयच्या वापरासंबंधित काही महत्त्वपूर्ण धोके निर्माण होतात. मात्र यासाठी लष्कराने काही अत्यंत कठोर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणं आवश्यक आहे. लष्करी कमांडर एआय प्रोग्रामसह शस्त्र प्रणालीची मागणी करत असतील तर त्यांनी त्यांच्या सैन्याविरूद्ध वापरल्या जाऊ शकणाऱ्या एआय शस्त्रांच्या प्रसाराचा धोका कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करावं. 

आता हे विचित्र जरी वाटत असलं तरी, एआय संबंधी जागतिक नियमांमुळे लष्करी वापरासह सर्व प्रकारच्या एआयच्या जबाबदार वापरास आणि विकासास प्रोत्साहन मिळेल. 

एरियल कॉन हे ग्लोबल शील्डचे सह-संस्थापक आहेत आणि संरक्षण प्रणालींसाठी स्वायत्तता आणि एआयच्या मुद्द्यांवर IEEE-SA संशोधन गटाचे नेतृत्व करतात. 

इंग्विल्ड बोडे हे युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्कमधील सेंटर फॉर वॉर स्टडीजमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Ariel Conn

Ariel Conn

Ariel Conn leads the IEEE-SA Research Group on Issues of Autonomy and AI for Defense Systems, she's the founder of the nonprofit consultancy, Mag10 Consulting, ...

Read More +
Ingvild Bode

Ingvild Bode

Dr Ingvild Bode is Associate Professor at the Centre for War Studies, University of Southern Denmark. She is the Principal Investigator of the European Research ...

Read More +