Author : Shoba Suri

Published on Mar 27, 2024 Updated 0 Hours ago

पाण्याची टंचाई वाढत असताना, त्याचा परिणाम अन्नधान्य व्यवस्थेवर होतो. यामुळे शेती उत्पादन आणि अन्नधान्य सुरक्षा थेट प्रभावित होते.

अन्नसुरक्षेचे रक्षण: पाण्याची महत्त्वाची भूमिका

हा लेख विश्व जल दिवस 2024: शांततेसाठी पाणी, जीवनासाठी पाणी या लेख मालिकेचा भाग आहे.

जगाच्या स्थिरतेसाठी आणि समृद्धीसाठी पाणी अतिशय महत्वाचा घटक आहे, विशेषत: अन्नधान्य सुरक्षेच्या बाबतीत. शेती उत्पादन सुनिश्चित करणे, पिकांची वाढ आणि जनावरांचे पालनपोषण करणे यासाठी ते मूलभूत संसाधन आहे. पुरेसा आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा अन्नधान्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे, कारण ते थेट शेती उत्पादनावर आणि जगभरातील लोकांसाठी पौष्टिक अन्नाच्या उपलब्धतेवर परिणाम करते. याशिवाय, अर्थव्यवस्थेला स्थिरीकरण करण्यात पाणी महत्वाची भूमिका बजावते, विशेषत: ज्या प्रदेशात शेती हा अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे तेथे. उलट, पाण्याची टंचाई किंवा पाण्याची अपुरी उपलब्धता अर्थव्यवस्थेला अस्थिर करू शकते, गरिबी वाढवू शकते आणि सामाजिक अशांतता निर्माण करू शकते. शेती आणि आर्थिक स्थिरतेमधील भूमिकेव्यतिरिक्त, पाणी सर्वसाधारण समाजकल्याण आणि सार्वजनिक आरोग्यात देखील योगदान देते. म्हणून सर्व लोकांना स्वच्छ पाण्याचा समान वितरण सुनिश्चित करणे हे समुदाय आणि राष्ट्रांमध्ये स्थिरता, समृद्धी आणि सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी आवश्यक आहे (आकृती 1).

आकृती क्रमांक 1

स्त्रोत : वॉटर अँड  फूड सिक्युरिटी लिंकेज

जगातील 8 बिलियन लोकांना पुरेल इतका अन्नधान्य पुरवठा करण्याची क्षमता असूनही, तब्बल 828 दशलक्ष लोक दररोज उपाशी झोपतात. कोविड-19 साथीच्या आर्थिक परिणामांमधून सावरण्यासाठी प्रयत्न करत असतानाही, 2030 पर्यंत "झिरो हंगर" हा शाश्वती विकास ध्येय साध्य करण्यात मोठी कमतरता येईल असा संयुक्त राष्ट्राचा अंदाज आहे. दशकाच्या अखेरीस अंदाजानुसार 670 दशलक्ष लोक अजूनही उपासमाराला सामोरे जातील. एकूण लागवडीयोग्य जमिनीच्या 20 टक्के क्षेत्राचा समावेश असलेली सिंचित शेती ही पायाभूत आधारवस्तू असून, जागतिक अन्नधान्य उत्पादनात 40 टक्के योगदान देते. उल्लेखनीय म्हणजे, सिंचन शेती ही पावसाळ्यावर अवलंबून असलेल्या शेतीपेक्षा जमीनीच्या प्रति युनिटवर किमान दुप्पट उत्पादनशील असते, ज्यामुळे उत्पादन वाढ आणि शेती विविधीकरण सुलभ होते.

लोकसंख्या वाढताना, शहरे विस्तारताना आणि हवामान बदलत असताना, पाण्याच्या साधनांसाठी स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे, विशेषत: शेती क्षेत्रावर त्याचा परिणाम होईल. हरितगृह वायूंचे उत्सर्जन करून शेती हवामान बदलामध्ये जशी भर घालते तशीच पृथ्वीच्या पाण्याच्या चक्रात व्यत्यय आल्याने अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित अनिश्चितता आणि धोके वाढवून ही आव्हानं अधिक जटिल बनतात. अंदाजानुसार, 2030 पर्यंत दक्षिण आशिया आणि दक्षिण आफ्रिका हे सर्वात असुरक्षित प्रदेश म्हणून उदयास येतील, जिथे हवामान बदलामुळे तीव्र अन्नधान्य टंचाई निर्माण होईल.

2050 पर्यंत जगाची लोकसंख्या 10 बिलियन पेक्षा जास्त होईल असा अंदाज असल्याने, जगाला टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांची आणि अन्नाची मागणी वाढेल. मूलभूत गरजा भागवण्यासाठी अन्नधान्य आणि तंतुमय पदार्थांची गरज वाढेल. वाढती मागणी आणि विकसित होत असलेल्या प्रदेशातील वाढत्या उत्पन्नामुळे कॅलरीज आणि विविध प्रकारच्या अन्नाचे वाढते सेवन यांच्यामुळे 2050 पर्यंत शेती उत्पादनात सुमारे 70 टक्के वाढ करण्याची गरज अधोरेखित होते.

पाणी हा अनेकदा दुर्लक्षित घटक राहतो, पण निश्चितच अत्यावश्यक संसाधनासाठी पाण्याचा पुरवठा आपल्या अन्नधान्य व्यवस्थेच्या गुंतागुंतीच्या जाळ्यावर अवलंबून असतो. पाण्याची टंचाई किंवा अपुरा पुरवठा हे कोरड्या शेतांपलीकडे दूरगामी परिणाम करते. शेतीपासून जेवणाच्या टेबलपर्यंतचा जटिल प्रवास यावर त्याचा सर्व बाजूंनी परिणाम होतो. शेती उत्पादनाच्या गाभ्यामध्ये, पाणी हे अंकुरापासून ते पीक कापणीपर्यंत पिकांना वाढवणारे जीवनरक्त आहे. पाण्याची अपुरी उपलब्धता ही रोपांच्या वाढीला अडथळा करते, पीक उत्पादनात घट होते आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला धोका पोहोचतो. तरीही, त्याचा परिणाम शेतीच्या बाहेरही जाणवतो. अपुरा पाणीपुरवठा हा नाजुक पर्यावरणीय संतुलन बिघडवतो, जैवविविधतेला धोका पोहोचवतो आणि शेतीच्या भूदृश्याची क्षमता धोक्यात आणतो.

पाणी आणि अन्नधान्य व्यवस्था यांच्यातील संबंध आपल्या ग्रहावर जीवन टिकण्यासाठी आवश्यक असलेल्या खोलवरच्या परस्पर अवलंबनाचे दर्शन घडवते. पाण्याची उपलब्धता, गुणवत्ता आणि व्यवस्थापन यांचे अन्नधान्य उत्पादन, वितरण आणि उपभोग यांच्याशी संतुलन साधणारे हे एक जटिल जाळे आहे. पाण्याची गुणवत्ता ही मातीचे आरोग्य, पोषणाची उपलब्धता आणि पिकांची झेलण्याची क्षमता ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, त्यावरून आपल्या अन्नासाठी पाणी अत्यावश्यक भूमिका अधोरेखित करते.

तरीही, या संबंधाला मोठ्या आव्ह्नांना सामोरे जावे लागते. पाण्याची टंचाई, प्रदूषण आणि अकार्यक्षम व्यवस्थापन पद्धती यामुळे जगभरातील अन्नधान्य व्यवस्थेची स्थिरता आणि झेलण्याची क्षमता धोक्यात आली आहे. कमी होणारे पाणीसाधन ही शेती उत्पादनात अडथळा ठरवतात, अन्नधान्य सुरक्षेची समस्या बिकट करतात आणि समुदायांमध्ये गरिबी आणि असुरक्षिततेची चक्रं चालू ठेवतात. याशिवाय, पाण्याच्या टंचाईचे परिणाम अन्नधान्य उत्पादनाच्या क्षेत्रापलीकडे दूरगामी परिणाम दाखवतात, ते अर्थव्यवस्था, पर्यावरणव्यवस्था सर्वत्र जाणवतात. कमी होत चाललेल्या पाण्याच्या साधनांसाठी स्पर्धा वाढवून तणावात वाढ, संघर्ष आणि सामाजिक असमानता वाढवू शकते, ज्यामुळे पाणी-अन्नधान्य यांच्या परस्पर संबंधाचा व्यापक परिणाम अधोरेखित होतो.

पाण्याची टंचाई वाढत असताना, त्याचा परिणाम अन्नधान्य व्यवस्थेवर होतो. यामुळे प्रक्रिया, वितरण आणि उपभोग यावर परिणाम होतो. पाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांमध्ये अडथळा येतो. त्यामुळे अन्न पदार्थ स्वच्छ करणे, निर्जंतुकीकरण करणे आणि टिकवून ठेवणे यांच्यावर मर्यादा येतात. यामुळे अन्नाची सुरक्षा आणि गुणवत्ता धोक्यात येऊन ग्राहकांच्या आरोग्याला धोका पोहोचतो. अन्नधान्याची वाहतूक आणि वितरण यांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असलेल्या पुरवठा साखळीवर अवलंबून असते. पाण्याचा अपुरा पुरवठा साखळीत अडथळा निर्माण करतो, ज्यामुळे अकार्यक्षमता, अन्नधान्य वाया जाणे आणि वाढलेले खर्च यांची समस्या निर्माण होते.

अन्नधान्य सुरक्षेच्या आधीच लढत असलेल्या असुरक्षित समुदायांवर या व्यत्ययांचा सर्वाधिक परिणाम होतो, ज्यामुळे उपासमार आणि कुपोषण वाढते.

पाण्याची टंचाई वाढल्याने मर्यादित संसाधनांसाठी स्पर्धा आणि असहमती तीव्र होते, त्यामुळे सामाजिक तणाव आणि अस्थिरता वाढते. राजकीय असंतोषाचा सामना करत असलेल्या प्रदेशात पाण्याचा अपुरा पुरवठा हा अस्तित्वात असलेल्या आव्हानांना आणखी गंभीर करतो, ज्यामुळे गरिबी आणि असुरक्षिततेची चक्रं कायम ठेवतो. अन्नधान्य उत्पादन आणि उपलब्धता यावर थेट परिणामाव्यतिरिक्त, पाण्याची टंचाई हवामान बदलास कारणीभूत ठरते. पाण्याच्या साठ्यात घट झाल्याने जमीन खराब होते, वाळवंटीकरण होते आणि जंगलनाश होते, ज्यामुळे शेती पद्धतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम वाढतो.

या परस्परसंबंधाच्या गुंतागुंतीवर मात करण्यासाठी, पारंपारिक सीमा ओलांडून पाणी आणि अन्नधान्य व्यवस्थापनासाठी एकत्रित दृष्टिकोन स्वीकारणारे बहुआयामी उपाय आवश्यक आहेत. पाणी बचत करणार्‍या तंत्रज्ञानावर गुंतवणूक करणे, टिकाऊ शेती पद्धतींची वकालत करणे आणि अन्नधान्य व्यवस्थेचे पोषण करणे हे आवश्यक उपाय आहेत. एकत्रित कृती आणि सामूहिक देखरेखाद्वारेच आपण पाण्याद्वारे अन्नधान्य सुरक्षा सुनिश्चित करण्यात मदत करू शकतो.


शोभा सुरी या ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनमध्ये सीनियर फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.