Image Source: Getty
भारतामध्ये दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तन कर्करोगाचे निदान होते, जे या रोगाच्या वाढत्या प्रसाराचे चिंताजनक संकेत आहेत. 1990 च्या दशकात चौथ्या क्रमांकाचा सर्वात वारंवारतेचा कर्करोग असलेला स्तन कर्करोग आता भारतीय महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग बनला आहे आणि एक महत्त्वाचा जागतिक सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा बनला आहे.
"नेचर" नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, पुढील 10 वर्षांत भारतातील स्तन कर्करोगाच्या उपचाराधीन महिलांची संख्या दरवर्षी 50,000 ने वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वार्षिक सरासरी US$19.55 अब्ज खर्च येईल. आनुवंशिक स्थुलता, खराब जीवनशैली, अत्यधिक प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या अनेक कारणांनी या अचानक वाढीस हातभार लावला आहे. भारतात ही समस्या आणखी जास्त गुंतागुंतीची होते, कारण भारतीय महिलांना पश्चिमी देशांतील महिलांपेक्षा कमी किंवा तरुण वयात निदान होतो. स्तन कर्करोगाशी संबंधित जैविक वैशिष्ट्ये तरुण महिलांमध्ये अधिक आक्रमक असतात, आणि त्यांना पुनरागमन आणि मेटास्टेसिसचा जास्त धोका असतो, ज्यामुळे वृद्ध महिलांपेक्षा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो. अशा समस्यांचे समाधान करण्यासाठी विद्यमान परिस्थिती, मुख्य आव्हाने आणि संभाव्य उपाय यांची सखोल समज आवश्यक आहे.
स्तन कर्करोगाशी संबंधित जैविक वैशिष्ट्ये तरुण महिलांमध्ये अधिक आक्रमक असतात, आणि त्यांना पुनरागमन आणि मेटास्टेसिसचा जास्त धोका असतो, ज्यामुळे वृद्ध महिलांपेक्षा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो.
2024 मध्ये प्रकाशित झालेल्या लोकसभेच्या दस्तऐवजात 2019 ते 2023 दरम्यान महिलांमधील स्तन कर्करोगाची अंदाजित प्रकरणे आणि मृत्यू दर दिले आहेत. चित्र 1 मध्ये दर्शविल्याप्रमाणे, स्तन कर्करोगाच्या प्रकरणांची संख्या 2019 मध्ये 200,218 पासून 2023 मध्ये 221,579 पर्यंत स्थिरपणे वाढली; त्याच वेळी, या रोगामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या भारतात 74,481 पासून 82,429 पर्यंत वाढली. जरी कर्करोगाच्या घटना मृत्यू दरापेक्षा खूप जास्त असल्या तरी, मृत्यू दर सतत वाढत आहेत, ज्याचा अर्थ लवकर निदान, उपचारांपर्यंत पोहोच आणि प्रभावी व्यवस्थापनासंबंधी समस्या आहेत."
चित्र 1: महिलांमध्ये भारतात (2019-2023) पासून स्तनाच्या कर्करोगाची घटना आणि मृत्यू दर अंदाजे

स्रोत: संसदेचं दस्तऐवज
स्तन कर्करोगाचा वाढता प्रादुर्भाव ही फक्त सुरूवात आहे. हे वाढते ओझे अनेक मूलभूत समस्यांमुळे आहे, जसे की जनजागृतीचा अभाव, जीवनशैलीतील बदल, भौगोलिक अडचणी, आर्थिक अडचणी आणि उशिरा निदान होणे. पश्चिमी देशांच्या तुलनेत, भारतामध्ये स्तन कर्करोगाचा सर्व्हायवल रेट म्हणजेच रोगमुक्त जगण्याचा दर खूपच कमी आहे. स्टेज I कर्करोगाने निदान झालेल्या रुग्णांचा सर्व्हायवल रेट सुमारे 93.3 टक्के आहे, तर स्टेज IV कर्करोगाने निदान झालेल्या रुग्णांचा सर्व्हायवल रेट 24.5 टक्के इतका कमी असू शकतो. भारतातील स्तन कर्करोगाच्या सुमारे 60 टक्के रुग्णांचे निदान स्टेज III किंवा IV मध्ये होते. भारतातील महिलांमध्ये स्तन कर्करोग, त्याची लक्षणे आणि नियमित तपासणीचे महत्त्व याबद्दल सामान्य ज्ञानाचा अभाव हा एक मोठा अडथळा आहे, जो रोगाचे लवकर निदान होण्यास अडथळा निर्माण करतो. अनेक अभ्यासकांनी दर्शवले आहे की, दारिद्र्य, कमी शैक्षणिक स्तर, जनजागृतीचा अभाव, दुर्गम आणि दुर अडचणीच्या ठिकाणी राहणे आणि उपचारांपर्यंत अपर्याप्त पोहोच यामुळे स्तन कर्करोगाचे उशिरा निदान होणे जास्त प्रमाणात होते, विशेषत: कमी सामाजिक-आर्थिक स्तरातील आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी.
भारतातील महिलांमध्ये स्तन कर्करोग, त्याची लक्षणे आणि नियमित तपासणीचे महत्त्व याबद्दल सामान्य ज्ञानाचा अभाव हा एक मोठा अडथळा आहे, जो रोगाचे लवकर निदान होण्यास अडथळा निर्माण करतो.
2019-2021 च्या NFHS डेटानुसार, 30-49 वयातील फक्त 0.9 टक्के महिलांनी स्तन कर्करोगाची तपासणी केली आहे. एका मोठा महिलांचा वर्ग स्तन कर्करोगाच्या लक्षणांची आणि नियमित तपासणीच्या महत्त्वाची माहितीपासून दुर आहे. स्तन-स्वास्थ्याशी संबंधित सांस्कृतिक सामाजिक वर्ज्यता (taboos) आणि कलंकामुळे, लक्षणे दिसल्यावरही वैद्यकीय मदतीसाठी उशीर होतो. "पिंक मंथ" मोहीम सारख्या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्तन कर्करोगाबद्दल जागरूक करणे आणि जेव्हा त्यांना मदतीची आवश्यकता असेल तेव्हा त्यांना मदतीसाठी प्रेरित करणे आहे.
भारतातील स्तन कर्करोगाची तपासणी म्हणजे स्क्रीनिंग पायाभूत सुविधांद्वारे स्तन कर्करोगाच्या लवकर निदानाची वाढती गरज पूर्ण केली जाऊ शकत नाही, कारण प्रभावी स्तन कर्करोग स्क्रीनिंगसाठी भारतामध्ये विशेषज्ञ उपचार सुविधा आणि पुरेशी मॅमोग्राफी उपकरणे उपलब्ध नाहीत. मॅमोग्राफी ही एक सामान्यत: वापरली जाणारी स्क्रीनिंग पद्धत असली तरी, भौगोलिक फरकांमुळे त्याची उपलब्धता आणि पोहोच मर्यादित आहे, ज्यामुळे मॅमोग्राफीची परिणामकारकता कमी होते. या समस्येला प्रशिक्षित कामगारांची आणि योग्य सुविधांची कमतरता अधिक गंभीर बनवते. उदाहरणार्थ, भारतीय महिलांमध्ये स्तनाची घनता ( ब्रेस्ट डेनसीटी) जास्त असण्यामुळे मॅमोग्राफीच्या संवेदनशीलतेत मोठ्या प्रमाणावर फरक पडतो, ज्यामुळे अधिक निदान (ओव्हर डाग्नोसिस) आणि चुकीचे सकारात्मक (फॉल्स पॉझीटीव्ह) परिणाम होऊ शकतात. भारतातील सुमारे 40 टक्के रुग्णालयांना अत्याधुनिक कर्करोग उपचार तंत्रज्ञानाची पुरेशी उपब्धता नाही, आणि देशातील केवळ काही सुविधा स्तन कर्करोगासाठी केमोरेडिएशन आणि शस्त्रक्रिया प्रदान करतात. "स्तन कर्करोग असलेल्या अनेक महिलांसाठी उपचारांचा खर्च हा एक मोठा अडथळा आहे, जो विविध घटकांनुसार INR 100,000 ते INR 1,000,000 किंवा त्यापेक्षा अधिक असतो. अपुरी विमा परतफेड, प्रचंड बाह्य खर्च, आणि उपचारांची असमान गुणवत्ता हे स्तन कर्करोगाच्या उपचारांमध्ये उच्च दराने रुग्ण गमावण्याचे प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर, ग्रामीण भागातील लोकसंख्या संसाधनांच्या अभावामुळे (१० मिलियन रुग्णांसाठी केवळ २,००० ऑन्कोलॉजिस्ट्स आहेत) आणि सुविधा वितरणाच्या असंतुलनामुळे (95 टक्के सुविधा महानगरांमध्ये आहेत) जास्त प्रभावित होते, ज्यामुळे उपचारांपर्यंत पोहोच अधिक कठीण होते. असे आढळले आहे की, काही स्तन कर्करोगाच्या रुग्णांमध्ये नवीन उपचार पर्याय, जसे की इम्यूनोथेरपी आणि लक्षित औषधे, चांगला प्रतिसाद देतात. तथापि, भारतासारख्या कमी ते मध्यम उत्पन्न असलेल्या देशात अशा महागड्या पर्यायांपर्यंत पोहोच अत्यंत मर्यादित आहे.
भारतातील सुमारे 40 टक्के रुग्णालयांना अत्याधुनिक कर्करोग उपचार तंत्रज्ञानाची पुरेशी उपब्धता नाही, आणि देशातील केवळ काही सुविधा स्तन कर्करोगासाठी केमोरेडिएशन आणि शस्त्रक्रिया प्रदान करतात.
स्तन कर्करोगाचे प्रत्येक निदान ही एक जीवनाची किंवा अस्तित्वाची समस्या आहे, ज्यासाठी खूप धैर्याची आवश्यकता असते आणि त्याचा रुग्णावर थेट मानसिक परिणाम होतो. या निदानामुळे रुग्णांना मानसिक अस्वस्थता अनुभवावी लागते, ज्यामध्ये अनिश्चितता, विश्वास न ठेवणे, निराशा, राग, भीती, चिंता आणि शोक अशा भावना समाविष्ट असतात. या अचानक बदलामुळे त्यांचे दररोजचे जीवन आणि कुटुंब प्रभावित होते.
या महत्त्वाच्या अडचणींच्या बाबतीत, भारतात स्तन कर्करोगाच्या उपचार आणि परिणामांमध्ये सुधारणा करण्याच्या अनेक संधी आहेत. स्तन कर्करोगाची जनजागृती सार्वजनिक आरोग्य मोहिमांवर खूप अवलंबून आहे. सामाजिक माध्यमांवर मोहिमा आणि समुदाय कार्यशाळांच्या माध्यमातून सरकारी आणि गैर-सरकारी स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीद्वारे संपर्क वाढवता येईल. कार्यस्थळांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करून आणि तपासण्या प्रदान करून, तसेच शाळा आणि समुदाय कार्यक्रमांमध्ये स्तन कर्करोगाला त्यांच्या अभ्यासक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग बनवून, जनजागृती लवकर करण्यात येऊ शकते.
राष्ट्रीय तपासणी कार्यक्रम आणि समुदाय जनजागृती हे लवकर निदानासाठी महत्त्वाचे आहेत, परंतु याचप्रमाणे वैद्यकीय व्यावसायिकांना या समस्येचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे देखील महत्त्वाचे आहे. युनायटेड किंगडममधील ईस्ट आंग्लिया विद्यापीठ (UEA) आणि इंटरनॅशनल स्कूल ऑफ ऑन्कोप्लास्टी (ISOS) यांच्यासोबत भागीदारीत, प्रशांती कॅन्सर केअर मिशन (PCCM) च्या क्षमता विकास शाखेने या क्षेत्रात प्रगती केली आहे. हे कार्यक्रम भारतात स्तन कर्करोग व्यवस्थापनासाठी, विशेषतः ऑन्कोप्लास्टीवर भर देणारे, प्रगत प्रशिक्षण घेऊन आले आहेत. स्ट्रक्चरल फेलोशिपद्वारे, हा कार्यक्रम शस्त्रक्रियात्मक परिणाम आणि रुग्ण देखभाल सुधारण्याचा प्रयत्न करतो, तसेच स्तन संरक्षणाला प्रोत्साहन देऊन आणि ऑन्कोप्लास्टिक मदतीद्वारे त्याचे संकेत विस्तारित करतो.
वैयक्तिकृत औषध, औषध विकास, दूरून (रिमोट) रुग्ण निरीक्षण, आणि सुधारित प्रतिमेचे विश्लेषण (इम्प्रोवड इमेज अन्यालिसिस) या सर्व गोष्टी स्तन कर्करोगाच्या निदान आणि उपचारात रिजनरेटिव्ह एआयमुळे (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्रांतिकारी बनत आहेत. हे जटिल अल्गोरिदम वापरून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय डेटा, जसे की एमआरआय स्कॅन, अल्ट्रासाऊंड, आणि मॅमोग्रॅम, विश्लेषित करू शकते आणि कर्करोगाच्या अस्तित्वाचे संकेत देणारे सूक्ष्म नमुने आणि विसंगती ओळखू शकते. "मॅमोअसिस्ट" आणि इतर रिजनरेटिव्ह एआय प्रणालींनी अधिक प्रभावी मॅमोग्राफी विश्लेषणाद्वारे निदानाच्या अचूकतेत सुधारणा करण्याची खात्री दिली आहे. या प्रगतींमध्ये रुग्णांवरील परिणामांमध्ये सुधारणा करण्याची क्षमता आहे, तसेच वैद्यकीय व्यावसायिकांवरील काही ताण कमी करण्याची शक्यता आहे.
मॅमोअसिस्ट" आणि इतर रिजनरेटिव्ह एआय प्रणालींनी अधिक प्रभावी मॅमोग्राफी विश्लेषणाद्वारे निदानाच्या अचूकतेत सुधारणा करण्याची खात्री दिली आहे.
स्तन आरोग्य उपक्रम (ब्रेस्ट हेल्थ इनिशियटिव्हज - BHI) सुरू केला गेला होता, ज्याचा उद्देश एक स्केलेबल मॉडेल वापरून लवकर स्तन कर्करोगाच्या निदान आणि उपचारापर्यंत पोहोच कशी सुधारता येईल हे दाखविणे आहे. BHI अंमलबजावणी योजनेचा एक भाग म्हणून, प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सहाय्यक नर्स मिडवायव्ह्स (ANMs), स्टाफ नर्सेस आणि वैद्यकीय अधिकारी यांना दर्जेदार क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन (CBE) प्रशिक्षण देण्यात आले, आणि महिला समुदाय आरोग्य कार्यकर्त्यांना ज्यांना मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या [अक्रेडटेड सोशल हेल्थ ॲक्टिविस्ट ASHAs] म्हणतात त्यांना तयार करून, 30 ते 65 वर्षे वय असलेल्या महिलांसाठी सानुकूलित (कस्टमाईस्ड) स्तन कर्करोग जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी नेमले गेले. तरीही, कर्करोगाच्या सर्व पैलूंना, म्हणजे प्रतिबंधापासून ते उपचारापर्यंत, समाविष्ट करणारी व्यापक राष्ट्रीय धोरणे आवश्यक आहेत, ज्यामुळे सर्व सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील लोकांसाठी न्यायपूर्ण उपब्धता मिळू शकेल.
भारतामध्ये स्तन कर्करोगाच्या वाढत्या दरामुळे त्वरित, बहुआयामी उपाययोजना आवश्यक आहेत. महत्त्वाच्या अडचणी असतानाही, अजूनही प्रगतीसाठी भरपूर आशावादी संधी आहेत. भारताकडे धोरणात्मक बदल, पायाभूत संरचना विकास, लवकर निदान आणि जनजागृतीवर भर देऊन स्तन कर्करोगाच्या उपचारात क्रांती घडवण्याची क्षमता आहे. महिलांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा विचार न करता, धोरणात्मक आरोग्य गुंतवणूक आणि समुदाय-आधारित उपक्रमांच्या मदतीने सर्व महिलांसाठी स्तन कर्करोग सहनशील आणि रोगमुक्त जगण्यायोग्य बनवता येऊ शकतो.
माधवी झा ह्या ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशनमध्ये रिसर्च इंटर्न आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.