Author : Aditi Jha

Expert Speak Digital Frontiers
Published on Sep 11, 2024 Updated 1 Hours ago

AI युगामध्ये कार्यरत लोकसंख्येसमोर येत असलेल्या संधींचा पुरेसा फायदा घेण्यासाठी उच्च कौशल्य अवगत करणे आवश्यक आहे.

AI चालित भविष्यानुसार भारताच्या वर्कफोर्सची निर्मिती

जनरेटिव्ह AI (GAI) च्या जलद प्रसारामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (AI) क्रांती झाली आहे. हे क्षेत्र आता जागतिक अर्थव्यवस्था आणि कामगार बाजारांच्या संरचनेत मूलभूत बदल घडवून आणण्यास सज्ज आहे. ही बाब जितकी भारताला लागू आहे तितकीच ती उर्वरित जगासही लागू आहे. पूर्वीच्या औद्योगिक आणि इंटरनेट क्रांतीप्रमाणे, बाजारपेठेतील काही क्षेत्रांमध्ये व्यत्यय आणण्याची क्षमता AI क्षेत्रामध्ये आहे. त्याचप्रमाणे इतर क्षेत्रांमध्ये मानवी क्षमता वाढवणे आणि पूर्वी अस्तित्वात नसलेल्या नवीन नोकरीच्या संधी निर्माण करणे याही बाबी साध्य करण्याची क्षमता आहे. AI मुळे अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम होणार आहे. अर्थात हा परिणाम प्रत्येक क्षेत्राप्रमाणे बदलत जाईल असे लिंक्डीनच्या डेटामधून सुचित करण्यात आले आहे.  GAI च्या स्वरूपामुळे त्यास वेळकाढू कामे पुर्ण कार्यक्षमतेने करता येतात तसेच कामगारांना त्यांची उत्पादकता वाढवण्याची अनुमती मिळते आणि टास्क बेस्ड वर्कफोर्सपासून स्किल फर्स्ट वर्कफोर्सकडे जाण्याचे यातून संकेत मिळतात. ट्रॅक करण्यात ४१००० कौशल्यांपैकी फक्त ५०० कौशल्याची जीआयद्वारे नक्कल करता येते म्हणून जीआयचा उपयोग हा नोकरीच्या बहुतांश संधी आणि कौशल्ये वाढवण्यासाठी करता येऊ शकतो. AI कौशल्यांवर अधिक भर देणारे रिक्रुटर्स आणि लिंक्डीनवर AI जॉबची दुप्पट पोस्टिंग हे जीआयचे सकारात्मक फायदे आहे.  

येथे उल्लेख करण्यात आलेली AI कौशल्ये ही केवळ मशीन लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यांसारख्या मुख्य १२१ हार्ड AI कौशल्यांपुरती मर्यादित नसून विविध समस्या सोडवणे, संवाद आणि महत्त्वाची विचार-कौशल्ये यांसारख्या मूळत: मानवी, मूलभूत तसेच पूरक सॉफ्ट स्किल्ससाही यात समावेश होतो. जीआय हे विशिष्ट कार्ये पार पाडण्यात पारंगत होत असल्याने, या सॉफ्ट स्किल्सच्या मागणीत लक्षणीय वाढ होत आहे.  ही कौशल्ये असणाऱ्यांना हार्ड स्किल्स असलेल्यांपेक्षा बढती मिळण्याची शक्यता १३ टक्क्यांहून अधिक आहे. म्हणून, AI प्रदान करत असलेल्या संधींचा पुरेसा फायदा घेण्यासाठी, कोणत्याही अर्थव्यवस्थेतील कुशल लोकसंख्येसाठी हार्ड आणि सॉफ्ट अशा दोन्ही प्रकारच्या कौशल्यांमध्ये पुरेसे कुशल असणे आवश्यक आहे. याद्वारे ते लोकांच्या कौशल्यांसोबत AI कौशल्ये संतुलित करू शकतात.

विशेष म्हणजे, हार्ड स्किल्ससह भारताची वर्कफोर्स ही AI क्रांतीचा फायदा घेण्यासाठी सुसज्ज आहे. जागतिक स्तरावर भारताचा सापेक्ष AI कौशल्य प्रवेश दर सर्वाधिक आहे. इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा जीआय वापरण्याची भारतीय लोकसंख्येची क्षमता तिप्पट आहे आणि भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या AI टॅलेंट पूलपैकी एक आहे. भारतातील तरुण, विशेषत: जेनझीज हे नोकरीच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक धार टिकवून ठेवण्यासाठी स्वत:ला वेगाने विकसित करत आहेत. भारताच्या स्टार्ट-अप इकोसिस्टमने AI सह नवनवीन वापरासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची क्षमता आधीच दाखवली आहे ही एक उल्लेखनीय बाब आहे.

परंतू, लिंक्डइनच्या डेटाने AIच्या आर्थिक फायद्यांचे अधिक न्याय्य आणि शाश्वत वितरण सुनिश्चित करण्यासाठी तीन विशिष्ट अडचणींवर प्रकाश टाकला आहे. या अडचणींवर मात करणे आवश्यक आहे.

सर्व प्रथम, आपण सातत्यपुर्ण कौशल्याच्या युगात प्रवेश करत आहोत. यामध्ये विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्यासाठी आणि आउटडेटेड होण्यापासून वाचण्यासाठी कामगारांनी त्यांची कौशल्ये वेगाने आणि सतत वाढवली पाहिजेत. महत्त्वाचे म्हणजे, नजीकच्या भविष्यात आवश्यक असणारी यातील बहुतांश कौशल्ये ही सॉफ्ट स्किल्स आहेत. ही सॉफ्ट स्किल्स इंडस्ट्री आणि सेक्टर अग्नोस्टिक आहेत. ही बाब उच्च शिक्षण आणि करिअरच्या प्रगतीच्या पारंपारिक मॉडेलला आव्हान देणारी आहे. पारंपारिक मॉडेल्समध्ये उद्योग-विशिष्ट हार्ड-स्किल्स ही पदवी आणि करिअर सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी होती. ही बाब ओळखून, बहुसंख्य कंपन्या (७६ टक्के) आधीच त्यांच्या कर्मचाऱ्यांना अपस्किलिंगमध्ये मदत करत आहेत. विशेष म्हणजे, लिंक्डइन स्वतः व्यावसायिकांना त्याच्या जनरेटिव्ह AI प्रोफेशनल प्रमाणपत्राद्वारे करिअरच्या नवीन संधी शोधण्यात मदत करत आहे. तथापि, भारताच्या आकारमानाच्या आणि विविधतेच्या श्रमिक बाजारपेठेसाठी, तंत्रज्ञानाचे आर्थिक फायदे पूर्णपणे मिळवण्यासाठी संपूर्ण कामगार स्पेक्ट्रममध्ये काही बेसलाइन कोर GAI आणि GAI पूरक सॉफ्ट कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे.

सर्व प्रथम, आपण सातत्यपुर्ण कौशल्याच्या युगात प्रवेश करत आहोत. यामध्ये विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्यासाठी आणि आउटडेटेड होण्यापासून वाचण्यासाठी कामगारांनी त्यांची कौशल्ये वेगाने आणि सतत वाढवली पाहिजेत.

दुसरी बाब म्हणजे ज्या नोकऱ्यांमध्ये अडव्हांस डिग्री आवश्यक आहे आणि सामान्यत: त्या जास्त पगाराच्या आहेत अशा नोकऱ्यांमध्ये अल्पावधीत जीआयमुळे व्यत्यय येण्याची शक्यता आहे. या आधीच्या तंत्रज्ञानातील क्रांतीमध्ये प्रामुख्याने लेबर स्पेक्ट्रमच्या खालच्या स्तरावर परिणाम झाला होता. या पार्श्वभुमीवर हा एक अभूतपूर्व आर्थिक विकास आहे, जिथे आर्थिक स्तराचा वरचा भाग तांत्रिक बदलामुळे खालच्या भागापेक्षा अधिक प्रभावित होणार आहे. भारताची आयटी वर्क फोर्स ही भारताच्या मध्यमवर्गाचा आणि आर्थिक बाबींचा कणा आहे. नजीकच्या भविष्यात, भारताच्या आयटी वर्क फोर्सवर GAI वरील वाढत्या अवलंबनामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. हे अवलंबन वेळेत कमी केले नाही तर काही आर्थिक अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे, असे सुचित झाले आहे. तंत्रज्ञान, माहिती आणि मीडिया क्षेत्रामध्ये GAIद्वारे व्यत्यय येण्याची सर्वाधिक शक्यता आहे, हे ही लिंक्डइनच्या डेटाद्वारे सिद्ध झाले आहे. अडव्हांस डिग्री असलेल्यांना उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या संधीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच त्यांच्याकडे आधीपासूनच काही मूलभूत तांत्रिक क्षमता असल्याने पुरेशा उच्च कौशल्याच्या संधी अस्तित्वात आहेत.

तिसरी बाब म्हणजे, श्रमिक बाजारपेठेतील लिंग या घटकावर GAI असममित प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. AIमुळे उपलब्ध होत असलेल्या नोकरीच्या संधींमध्ये महिलांवर अधिक नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन संधींचा फायदा घेण्यासाठीचे उचित कौशल्य महिलांकडे असण्याचीही शक्यता कमी आहे. अर्थात AIसाठी ही बाब विशेष नसली तरी यामुळे तंत्रज्ञान उद्योगातील मोठा संरचनात्मक फरक अधोरेखित झाला आहे. इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेत महिलांचा वाटा तुलनेत कमी असल्याने ही भारतासाठी चिंताजनक बाब आहे. लिंक्डइनच्या इकॉनॉमिक ग्राफ डेटानुसार, AI टॅलेंटमध्ये केवळ २५.६ टक्के महिला सहभागी आहेत. त्यामुळे महिलांनी AI लाटेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक AI कौशल्ये प्राप्त करण्यासाठी संधी निर्माण करणे अत्यावश्यक आहे.

स्किल इंडिया मिशनमध्ये AI मुळे मिळणाऱ्या संधींचा फायदा घेण्यासाठी भारतातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या सॉफ्ट स्किल्ससह GAI कौशल्यांचे मॉड्यूल समाविष्ट केले जाऊ शकते.

या चिंता विशिष्ट धोरणात्मक पुढाकाराने दूर केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, स्किल इंडिया मिशनमध्ये AIमुळे मिळणाऱ्या संधींचा फायदा घेण्यासाठी भारतातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या सॉफ्ट स्किल्ससह GAI कौशल्यांचे मॉड्यूल समाविष्ट केले जाऊ शकते. यासोबतच, शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना लहान वयातच जीआयची ओळख करून दिल्यास त्याचा फायदा त्यांना तंत्रज्ञान आणि त्याच्या अनुप्रयोगांशी परिचित होण्यासाठी होईलच पण त्यासोबत भारताच्या भावी कर्मचाऱ्यांच्या बेसलाइन कौशल्याच्या स्तरांमध्ये सुधारणा करण्यासाठी देखील हे शिक्षण उपयुक्त ठरणार आहे. व्यापक व सतत विकसित होत असलेल्या कौशल्य फ्रेमवर्क आणि अधिक उद्योग-शैक्षणिक सहकार्यावर आधारित प्रशिक्षणावर भर देणाऱ्या लवचिक शिक्षण प्रणालीमुळे श्रमशक्तीच्या क्षमता बदलत्या रोजगाराच्या आवश्यकतांशी सुसंगत होण्यास मदत होणार आहे. शेवटी, विद्यमान आर्थिक अंतर भरून काढण्यासाठी महिला आणि उपेक्षित गटांना AI कौशल्ये अवगत करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या महत्त्वाच्या धोरणांवर विशेष भर दिला जाऊ शकतो.

महत्त्वाचे म्हणजे, GAI ला भारतातील अध्यापनशास्त्र आणि कौशल्य प्रशिक्षणाचे एक अनिवार्य साधन बनवले जाऊ शकते आणि प्रशिक्षण व ज्ञान हस्तांतरणाचा खर्च लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. जीआयमुळे विविध भाषांमध्ये अचूक भाषांतर करता येऊ शकते. याचा वापर करून भारतातील कामगार त्यांच्या आवडीच्या भाषेत कौशल्यांचे शिक्षण घेऊ शकतात. काही परिस्थितींमध्ये अपस्किल करण्यासाठी इंग्रजीमध्ये काही प्रमाणात प्रवीणता असणे आवश्यक असते. याच पार्श्वभुमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या भाषिक अडथळ्यावर मात करता येऊ शकते.

AI युगामध्ये विविध संधींचा फायदा घेण्यासाठी कामगार आणि धोरणकर्त्यांच्या विचारांमध्ये बदल आणणे गरजेचे आहे. जॉब मार्केटमधील कौशल्यांच्या मागणीच्या तुलनेत AI कौशल्यांचा विचार करत असताना, भारतीय श्रमशक्तीची एकूण तयारी आणि स्थिती यांचा बारकाईने अभ्यास केल्यास विद्यमान विचारधारा आणि कृती यांच्यात बदल घडवता येऊ शकेल.


अदिती झा या LinkedIn India मध्ये बोर्ड डायरेक्टर, कायदेशीर आणि सरकारी कामकाजाच्या देश प्रमुख आणि लीडरशिप टीमच्या सदस्या आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Aditi Jha

Aditi Jha

Aditi Jha is a Board Director & Country Head: Legal & Government Affairs and a member ofthe leadership team at LinkedIn India. Prior to LinkedIn, Aditi ...

Read More +